Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग चार असा. क्र. १ (१७-०१-२०२२), सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १.

Published 17 January 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-01-17.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, जानेवारी १७, २०२२/पौष २७, शके १९४३ १ RNI No. MAHBIL /2009/35530

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष ८, अंक १] सोमवार, जानेवारी १७, २०२२/पौष २७, शके १९४३ [पृष्ठे २, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक १

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

पृष्ठे १-२ सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १.--- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम यात आणखी सुधारणा करण्याकरिता . . . . . . . .

अधिनियम.

दिनांक १५ जानेवारी २०२२ रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.

सतिश वाघोले, प्रभारी सचिव (विधि विधान), महाराष्ट्र शासन, विधि व न्याय विभाग.

सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १.

(माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर " महाराष्ट्र शासन राजपत्रात " दिनांक १७ जानेवारी २०२२ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम यात आणखी सुधारणा करण्याकरिता अधिनियम.

ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नव्हते ;

१९४९ चा ५९.

आणि ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम यामध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली होती ; आणि, म्हणून, त्यांनी दिनांक ३० सप्टेंबर २०२१ रोजी, महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) अध्यादेश, २०२१, हा प्रख्यापित केला होता ; (१) २०२१ चा महा अध्या ४. भाग चार १---१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, जानेवारी १७, २०२२/पौष २७, शके १९४३ आणि ज्याअर्थी, उक्त अध्यादेशाचे राज्य विधानमंडळाच्या अधिनियमात रुपांतर करणे इष्ट आहे ; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या बाहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :-----

१. (१) या अधिनियमास, महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) अधिनियम, २०२१, असे म्हणावे.

संक्षिप्त नाव व प्रारंभ.

(२) तो, दिनांक ३० सप्टेंबर २०२१ रोजी अंमलात आला असल्याचे मानण्यात येईल.

१९४९ चा ५९.

२. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (यात यापुढे ज्याचा निर्देश ""मुख्य अधिनियम"" असा करण्यात आला आहे), याच्या कलम ५ मध्ये, पोट-कलम (३) मधील पहिल्या परंतुकाऐवजी, पुढील परंतुक दाखल करण्यात येईल :-----

सन १९४९ चा अधिनियम क्रमांक ५९ याच्या कलम ५ ची सुधारणा.

२०२२ चा महा. १.

""परंतु, महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) अधिनियम, २०२१ याच्या प्रारंभानंतर, महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या बाबतीत, प्रत्येक प्रभागातून शक्य असेल तेथवर तीन पालिका सदस्य, परंतु दोनपेक्षा कमी नाहीत व चारपेक्षा अधिक नाहीत एवढे पालिका सदस्य निवडून देण्यात येतील, आणि या अधिनियमामध्ये काहीही अंतभर्ूत असले तरी, प्रत्येक मतदाराला, त्याच्या प्रभागातील निवडून द्यावयाच्या पालिका सदस्यांच्या संख्येइतकी मते देण्याचा हक्क असेल :"".

३. (१) महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) अध्यादेश, २०२१ हा, याद्वारे, निरसित करण्यात येत आहे.

२०२१ चा महा. अध्या. ४ सन २०२१ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ४ याचे निरसन व व्यावृत्ती.

(२) अशा प्रकारे निरसन झाले असले तरी, उक्त अध्यादेशाद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या मुख्य अधिनियमाच्या संबंधित तरतुदींन्वये करण्यात आलेली कोणतीही कृती किंवा कोणतीही कार्यवाही (काढण्यात आलेली कोणतीही अधिसूचना किंवा दिलेला आदेश यांसह) ही, या अधिनियमान्वये सुधारणा करण्यात आलेल्या मुख्य अधिनियमाच्या संबंधित तरतुदींन्वये करण्यात आलेली कोणतीही कृती, कार्यवाही किंवा, यथास्थिती, काढण्यात आलेली अधिसूचना किंवा दिलेला आदेश असल्याचे मानण्यात येईल.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 17 January 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-01-17.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-01-17.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-.