महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार
वर्ष ८, अंक २] गुरुवार, जानेवारी २०, २०२२/पौष ३०, शके १९४३ [पृष्ठे २, किंमत : रुपये २३.००
असाधारण क्रमांक ३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.
अनुक्रमणिका
पृष्ठे १-२ सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३.-- भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ महाराष्ट्र राज्यास लागू असताना, त्यात आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम. . .
दिनांक ६ जानेवारी २०२२ रोजी मा.राष्ट्रपतींनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.
सतिश वाघोले, प्रभारी सचिव (विधि विधान), महाराष्ट्र शासन, विधि व न्याय विभाग.
सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३
(मा. राष्ट्रपतींची संमती मिळाल्यानंतर '' महाराष्ट्र शासन राजपत्रात '' दिनांक २० जानेवारी २०२२ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)
भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाईचा आणि पारदर्शकतेचा हक्क
अधिनियम, २०१३ महाराष्ट्र राज्यास लागू असताना, त्यात आणखी सुधारणा करण्यासाठी
अधिनियम.
२०१३ चा ३०.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, जानेवारी २०, २०२२/पौष ३०, शके १९४३ २०१८ चा महा. ३७.२०१३ चा ३०.
सन २०१३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३० याच्या कलम १०५-क ची सुधारणा.
२०१८ चा महा. ३७.
२०२२ चा महा. ३.
२. भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाईचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०१८ याद्वारे सुधारणा केलेल्या भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाईचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३, महाराष्ट्र राज्यास लागू असताना, याच्या कलम १०५-क मधील, पोट-कलम (२) मध्ये, '' भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाईचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०१८ याच्या प्रारंभाच्या दिनांकापासून एक वर्षाच्या आत, '' या मजकुराऐवजी, '' भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाईचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०२० याच्या प्रारंभाच्या दिनांकापासून एक वर्षाच्या आत, '' हा मजकूर दाखल करण्यात येईल.