Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A (Weekly) (Date 20-26, January 2022)

Published 20 January 2022

Type
Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-01-20.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2009/ 31732

सत्यमेव जयते

महाराष्ट्रशासन राजपत्र

भाग चार- अ

वर्ष ८ , अंक २ ]

[पृष्ठे ६ , किंमत: रुपये ९ .०० गुरुवार ते बुधवार, जानेवारी २०-२६ , २०२२/ पौष ३० - माघ ६, शके १ ९ ४३

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक- अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

महिला व बाल विकास विभाग

नवीन प्रशासन भवन, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ , दिनांक ३० डिसेंबर , २०२१

अधिसूचना

भारताचे संविधान.

क्रमांक मबाआ -२०१६ /प्र.क्र.२४/का -७ . भारताचे संविधानाच्या अनुच्छेद ३० ९ च्या परंतुकाव्दारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून आणि त्याबाबतीत करण्यात आलेले व महाराष्ट्र राज्यात लागू असलेले सर्व विद्यमान नियम , आदेश किंवा संलेख यांचे अधिक्रमण करून महाराष्ट्राचे राज्यपाल याव्दारे महिला व बाल विकास विभागांतर्गत येणाऱ्या महिला व बाल विकास आयुक्तालय मधील " सह आयुक्त, उप आयुक्त, बाल विकास प्रकल्प अधिकारी ( नागरी ) , सहायक आयुक्त, परिविक्षा अधीक्षक, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी , जिल्हा कार्यक्रम अधिकारी ( महिला व बाल विकास ) जिल्हा परिषद , गट अ ( राजपत्रित ) या सर्वसाधारण राज्य सेवा मधील पदावरील सेवाभरती विनियमित करणारे पुढील नियम करीत आहेत : -

१. या नियमांना, महिला व बाल विकास आयुक्तालयातंर्गत "सह आयुक्त, उप आयुक्त, बाल विकास प्रकल्प अधिकारी ( नागरी ) , सहायक आयुक्त , परिविक्षा अधीक्षक, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी , जिल्हा कार्यक्रम अधिकारी ( महिला व बाल विकास ) जिल्हा परिषद, गट अ ( राजपत्रित ) या सर्वसाधारण राज्य सेवा मधील पदावरील सेवाप्रवेश नियम , २०२१ असे म्हणावे . " २. या नियमांमध्ये, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर,

( अ ) " आयोग " याचा अर्थ, महाराष्ट्र लोकसेवा आयोग असा आहे.

( ब ) " आयुक्तालय " याचा अर्थ , महिला व बाल विकास आयुक्तालय असा आहे .

(१)

भाग चार-अ-१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग चार - अ, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २०-२६, २०२२/ पौष ३० - माघ ६ , शके १ ९ ४३ (क ) "विभाग " याचा अर्थ, महाराष्ट्र शासनाचा महिला व बाल विकास विभाग असा आहे.

(ड) " शासन " याचा अर्थ, महाराष्ट्र शासन असा आहे.

३. विभागातंर्गत आयुक्तालयामधील सह आयुक्त, गट - अ या पदावरील नियुक्ती पुढील मार्गाने करण्यात येईल : - ( अ ) आयुक्तालयामधील उप आयुक्त, गट अ मधील पद धारण करणाऱ्या व सदर पदावर ३ वर्षापेक्षा कमी नाही इतकी नियमित सेवा पूर्ण केलेल्या व्यक्तीमधून ज्येष्ठता अधीन पात्रता या निकषावर योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने , किंवा

( ब ) पदोन्नतीने नियुक्तीसाठी पात्र उमेदवार उपलब्ध होत नसल्यास , महाराष्ट्र शासनाच्या किंवा अन्य कोणत्याही राज्य शासनाच्या किंवा भारत सरकारच्या किंवा कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाच्या किंवा वैधानिक महामंडळाच्या सेवेतील समतुल्य पद धारण करणाऱ्या सांविधिक विद्यापीठाची पदवी अथवा शासनाने समतुल्य म्हणून मान्यता दिलेली अन्य कोणतीही अर्हता धारण करणाऱ्या योग्य व्यक्तीची प्रतिनियुक्तीवर नियुक्ती करण्यात येईल .

४. विभागातंर्गत आयुक्तालयामधील उप आयुक्त, गट - अ या पदावरील नियुक्ती पुढील मार्गाने करण्यात येईल : - (अ ) आयुक्तालयामधील बाल विकास प्रकल्प अधिकारी ( नागरी प्रकल्प ) / सहायक आयुक्त / परिविक्षा अधीक्षक / जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी , जिल्हा कार्यक्रम अधिकारी ( महिला व बाल विकास ) , जिल्हा परिषद, गट अ मधील पद धारण करणाऱ्या व सदर पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी नियमित सेवा केलेल्या व्यक्तींमधून ज्येष्ठता अधीन पात्रता या निकषावर योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने, किंवा

( ब ) पदोन्नतीने नियुक्तीसाठी पात्र उमेदवार उपलब्ध होत नसल्यास , महाराष्ट्र शासनाच्या किंवा अन्य कोणत्याही राज्य शासनाच्या किंवा भारत सरकारच्या किंवा कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाच्या किंवा वैधानिक महामंडळाच्या सेवेतील समतुल्य पद धारण करणाऱ्या सांविधिक विद्यापीठाची पदवी अथवा शासनाने समतुल्य म्हणून मान्यता दिलेली अन्य कोणतीही अर्हता धारण करणाऱ्या योग्य व्यक्तीची प्रतिनियुक्तीवर नियुक्ती करण्यात येईल .

५. विभागातंर्गत आयुक्तालयामधील बाल विकास प्रकल्प अधिकारी ( नागरी ) , सहायक आयुक्त, परिविक्षा अधीक्षक, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी , जिल्हा कार्यक्रम अधिकारी ( महिला व बाल विकास ) जिल्हा परिषद, गट अ ( सर्वसाधारण राज्य सेवा ) , या पदावरील नियुक्ती पुढील मार्गाने करण्यात येईल: -

( अ ) आयुक्तालयामधील निरिक्षक प्रमाणित शाळा व संस्था किंवा रचना व कार्यपध्दती अधिकारी किंवा अधिव्याख्याता किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी ( ग्रामीण प्रकल्प ) किंवा अधीक्षक किंवा सांख्यिकी अधिकारी , गट - ब ( राजपत्रित ) या संवर्गातील पदे धारण करणाऱ्या व सदर पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी नियमित सेवा केलेल्या व्यक्तींमधून ज्येष्ठता अधीन पात्रता या निकषावर योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने , किंवा

( ब ) आयोगाने शिफारस केलेल्या व्यक्तींमधून नामनिर्देशनाने करण्यात येईल , -

(एक ) ज्यांचे वय १ ९ वर्षापेक्षा कमी नाही व ३८ वर्षापेक्षा जास्त वय नाही परंतु, राखीव प्रवर्गातील व्यक्तींच्या बाबतीत उच्च वयोमर्यादा पाच वर्षांपर्यंत शिथिल करण्यात येईल .

(दोन ) ज्यांनी सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी धारण केली आहे.

( क ) या उप नियमाच्या खंड ( ब ) च्या उप खंड ( दोन ) मध्ये नमूद केलेली अर्हता धारण करणाऱ्या व महाराष्ट्र शासनाच्या किंवा इतर कोणत्याही राज्य शासनाच्या किंवा भारत सरकारच्या किंवा कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाच्या किंवा सांविधिक महामंडळाच्या सेवेत समतुल्य पद धारण करणाऱ्या योग्य व्यक्तीची प्रतिनियुक्तीवर नियुक्ती करण्यात येईल .

६. नियम ५ येथे नमूद पदांवर नामनिर्देशनाने नियुक्त होणाऱ्या व्यक्तींनी एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत ( सीपीटीपी ) प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक राहील . एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या अधिकाऱ्यांचे परिविक्षाधीन प्रशिक्षण , परिविक्षाधीन कालावधी , सेवा ज्येष्ठता, विभागीय परीक्षा तसेच अन्य अनुषंगिक बाबींसाठी सामान्य प्रशासन विभागाच्या सीपीटीपी ( प्रशिक्षण ) कार्यासनामार्फत विविध शासन निर्णय , शासन परिपत्रके, नियम व अधिसूचना इ.व्दारे वेळोवेळी विहित करण्यात आलेल्या तरतुदी लागू राहतील . नियम ५ येथे नमूद पदावर नामनिर्देशनाने नियुक्त होणारी व्यक्ती परिविक्षा कालावधीमध्ये शिफारस प्राप्त पदासाठी अयोग्य असल्याचे आढळले तर, ती सेवा समाप्त केली जाण्यास पात्र असेल.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग चार - अ , गुरुवार ते बुधवार, जानेवारी २०-२६ , २०२२ / पौष ३० - माघ ६, शके १ ९ ४३ ७. नियम क्र.५ मध्ये नमूद केलेल्या पदांवर नामनिर्देशनाव्दारे व पदोन्नतीव्दारे करावयाच्या नियुक्त्या ह्या ५०:५० या गुणोत्तरात करण्यात येतील.

८. नियम ३ , ४, ५, यामध्ये नमूद केलेल्या पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीने याबाबतीत करण्यात आलेल्या नियमांनुसार हिंदी व मराठी भाषा परीक्षा, अगोदरच उत्तीर्ण केलेल्या नसतील , किंवा त्या परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून तिला सूट मिळाली नसेल , तर तिला सदर परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील . अन्यथा विहित मुदतीनंतर परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत वार्षिक वेतनवाढ नियुक्ती अनुज्ञेय ठरणार नाही. तसेच वरिष्ठ पदावर पदोन्नती अनुज्ञेय असणार नाही.

९. नियम ३ , ४, ५ , यामध्ये नमूद केलेल्या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करताना शासनाने वेळोवेळी घोषित केलेले प्रतिनियुक्तीचे धोरण /नियम लागू राहतील.

१०. नियम क्र.३ , ४, ५ यामध्ये नमूद केलेल्या पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीने , संगणक अर्हता प्रमाणपत्रासंदर्भात शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमानुसार संगणक अर्हता प्रमाणपत्र धारण करणे अथवा सदर प्रमाणपत्र धारण करण्यापासून सूट मिळवलेली आवश्यक राहील अन्यथा संगणक अर्हता प्रमाणपत्र धारण करेपर्यंत वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय राहणार नाही. तसेच वरिष्ठ पदावर पदोन्नती अनुज्ञेय असणार नाही .

११. नियम ३ , ४, ५ यामध्ये नमूद केलेल्या पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीने , महाराष्ट्र नागरी सेवा ( लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन ) नियम २००५ मधील तरतुदीनुसार व त्याबाबत वेळोवेळी करण्यात येणाऱ्या नियमानुसार , नियुक्तीच्या वेळी लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील अन्यथा सदर व्यक्ती शासकीय सेवेसाठी अनर्ह ठरेल .

१२. नियम क्र.३ , ४, ५ यांमध्ये नमूद केलेल्या पदावर नियुक्त केलेली व्यक्ती महाराष्ट्र राज्यात कोठेही बदली केली जाण्यास पात्र असेल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

वि. रा.ठाकूर, शासनाचे उप सचिव.

क्रमांक मबाआ-२०१६/प्र.क्र.२४ /का-७

महिला व बाल विकास विभाग,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ .

दिनांक ३० डिसेंबर, २०२१ .

प्रति,

१. राज्यपालांचे सचिव , राजभवन , मलबार हिल , मुंबई ,

२ . मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,

३ . सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,

४. मा. विरोधी पक्षनेता, विधानपरिषद/विधानसभा, विधान भवन , मुंबई,

५ . सर्व संसद सदस्य, विधानमंडळ सदस्य, महाराष्ट्र राज्य,

६ . मा. मुख्य सचिव ,

७. सर्व मंत्रालयीन विभागांचे मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,

८. सर्व मंत्रालयीन विभाग ,

९ . *प्रबंधक, मूळ शाखा , उच्च न्यायालय , मुंबई ,

१०. *प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय , मुंबई,

११. *प्रबंधक, लोकायुक्त आणि उप लोकायुक्त यांचे कार्यालय, मुंबई ,

१२. * सचिव , महाराष्ट्र लोकसेवा आयोग , मुंबई,

१३. *प्रधान सचिव , महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ( विधानसभा ) मुंबई ,

१४. *प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ( विधानपरिषद ) मुंबई,

१५. *सचिव , राज्य निवडणूक आयोग , नवीन प्रशासकीय भवन, मुंबई,

१६. * महालेखापाल , महाराष्ट्र-१ ( लेखा व अनुज्ञेयता ) महाराष्ट्र, मुंबई,

१७. * महालेखापाल , महाराष्ट्र-१ ( लेखा परीक्षा ) महाराष्ट्र, मुंबई ,

१८. * महालेखापाल , महाराष्ट्र-२ ( लेखा व अनुज्ञेयता ) महाराष्ट्र, मुंबई,

१ ९ . * महालेखापाल , महाराष्ट्र-२ ( लेखा परीक्षा ) महाराष्ट्र, मुंबई,

२०. * सचिव , राज्य मुख्य माहिती आयुक्त यांचे कार्यालय , नवीन प्रशासन भवन, मुंबई,

२१. *प्रबंधक , राज्य मानवी हक्क आयोग , मुंबई ४०० ००१ ,

२२. महासंचालक , महिती व जनसंपर्क महासंचालनालय , मुंबई ( २ प्रती प्रसिध्दीकरिता ) ,

२३. अधिदान व लेखा अधिकारी , मुंबई,

२४. निवासी लेखा परीक्षा अधिकारी , मुंबई,

२५. आयुक्त, महिला व बाल विकास , पुणे,

२६. आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना , नवी मुंबई,

२७. सर्व विभागीय आयुक्त,

२८. सर्व जिल्हाधिकारी ,

२ ९ . सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी ,

३०. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी ,

३१. निवड नस्ती,

(*पत्राने)

वि. रा. ठाकूर, शासनाचे उप सचिव.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग चार- अ, गुरुवार ते बुधवार , जानेवारी २०-२६, २०२२ / पौष ३० - माघ ६ , शके १ ९४३ WOMEN AND CHILD DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mumbai 400 032 , dated the 30th December 2021

NOTIFICATION

CONSTITUTION OF INDIA .

No.MBA- 2016/C.R.24/Desk- 7.- In exercise of the powers conferred by the proviso to article 309 of the Constitution of India and in supersession of all existing rules , orders or instruments made in this behalf, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the following rules regulating the recruitment to the posts of Joint Commissioner , Deputy Commissioner , Child Development Project Officer ( Urban Project ) , Assistant Commissioner , Probation Superintendent , District Women and Child Development Officer , District Programme Officer ( Women and Child Development ) , Zilla Parishad , Group - A ( Gazetted ) in General State Service under the Commissionerate of Women and Child Development under the Woman and Child Development Department of the Government of Maharashtra , namely : -

1. These rules may be called the Joint Commissioner , Deputy Commissioner , Child Development Project Officer( Urban Project ) , Assistant Commissioner , Probation Superintendent , District Women and Child Development Officer , District Programme Officer ( Women and Child Development ) , Zilla Parishad , Group-A ( Gazetted ) in General State Service under the Commissionarate of Women and Child Development ( Recruitment) Rules , 2021

2. In these rules , unless the context requires otherwise , -

( a) " Commission" means the Maharashtra Public Service Commission ;

( b ) "Commissionerate " means the Commissionerate of Women and Child Development ;

( c ) "Department " means the Women and Child Development Department Government of Maharashtra;

(d) "Government " means the Government of Maharashtra .

3. Appointment to the post of Joint Commissioner , Group - A in the Commissionerate under the Department shall be made either ,-

(a) by promotion of a suitable person , on the basis of strict selection with due regard to seniority from amongst the persons holding the posts in the cadre of Deputy Commissioner , Group -A, in the Commissionerate , for a period of not less than three years regular service ; or (b) ifeligible candidate is not available for appointment by promotion , then by deputation of a suitable person holding equivalent post in the service of the Government of Maharashtra or any other State Government or Government of India or any local authority or Statutory Corporation , possessing a degree of any Statutory University or any other qualification recognized by the Government to be equivalent thereto .

4. Appointment to the post of Deputy Commissioner , Group -A in the Commissionerate under the Department shall be made either ,-

( a) by promotion of a suitable person , on the basis of strict selection with due regard to seniority from amongst the persons holding the posts in the cadre of Child Development Project Officer (Urban Project) or Assistant Commissioner or Probation Superintendent or District Women and Child Development Officer or District Programme Officer ( Women and Child Development ) , Zilla Parishad , Group-A of General State Service in the Commissionerate , having not less than three years regular service in that cadre ; or

(b ) if eligible candidate is not available for appointment by promotion then by deputation of a suitable person holding equivalent post in the service of the Government of Maharashtra or any other State Government or Government of India or any local authority or Statutory Corporation , possessing a degree of a statutory University or any other qualification recognized by the Government to be equivalent thereto .

५

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग चार - अ, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २०-२६, २०२२/ पौष ३० - माघ ६ , शके १ ९ ४३ 5. Appointment to the posts of Child Development Project Officer ( Urban Project ) , Assistant Commissioner , Probation Superintendent , District Women and Child Development Officer , District Programme Officer ( Women and Child Development) , Zilla Parishad of General State Service , Group -A, in the Commissionerate under the Department shall be made either ,-

(a) by promotion of suitable person , on the basis of seniority from amongst the persons holding the posts in the cadre of Inspector Certified School and Institutions or Organization and Methods Officer or Lecturer or District Women and Child Development Officer , Child Development Project Officer ( Rural Project ) or Superintendent or Statistical Officer , Group -B (Gazetted) , in the Commissionerate , having not less than three years regular service in that cadre; or

(b) by nomination of a suitable person by the Commission from amongst the persons who, - (i ) are not less than nineteen years of age and not more than thirty eight years of age :

Provided that , the upper age limit shall be relaxed up to five years in case of persons belonging to reserved categories ;

( ii) possess a degree of any statutory university ;

( c ) by deputation of a suitable person holding equivalent post in the service of the Government of Maharashtra or any other State Government or Government of India or any local authority or Statutory Corporation , possessing the qualification mentioned in clause ( ii ) ofsub - rule ( b ) above .

6. It is mandatory for a person who is appointed by nomination to the post mentioned in rule 5 to complete the training under the Combined Probationary Training Programme ( CPTP ) . The provisions specified in various Government Resolutions , Government Circulars , Rules , and Notifications , from time to time by CPTP ( Training ) Desk of General Administration Department shall be applicable with respect to Probationary training , Probationary Period , Seniority , Departmental Examination and other related matters of officers undergoing training under CPTP. If the person appointed to the posts mentioned in rule 5 by nomination is found unfit for the posts during probationary period , then he shall be liable for termination of service .

7. Appointments to the posts mentioned in rule 5 by nomination and promotion shall be made in the ratio of 50:50 .

8. A person appointed to the post mentioned in rules 3 , 4 and 5 shall be required to pass the examinations in Marathi and Hindi Languages according to the rules made in that behalf, unless he has already passed or has been exempted from passing those examinations . A person shall not be eligible for annual increment or for the promotion , until he passes those examinations .

9. Deputation policies and the rules framed by the State Government in respect of deputation , from time to time , shall be applicable to the persons appointed by deputation to the posts mentioned in rules 3 , 4 and 5.

10. A person appointed to the post mentioned in rules 3 , 4 and 5 , should possesses a Knowledge ofComputer Operations as per the rules prescribed by the Government , from time to time, within the stipulated period , unless he has been exempted therefrom . A person shall not be eligible for annual increment or for the promotion , until he possess such a Knowledge of Computer Operations as per the rules prescribed by the Government in that behalf.

11. A person shall not be eligible for appointment by nomination , to the post mentioned in rule 5 unless he submits a declaration of Small Family as per the provisions of the Maharashtra Civil Services ( Small Family Declaration) Rules , 2005 or any other rules made by the Government in that behalf, from time to time .

६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग चार- अ, गुरुवार ते बुधवार , जानेवारी २०-२६, २०२२ / पौष ३० - माघ ६ , शके १ ९४३ 12. A person appointed to any of the posts mentioned in rules 3, 4 and 5 shall be liable to be transferred anywhere in the State of Maharashtra .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

V. R. THAKUR , Deputy Secretary to Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

No.MBA- 2016/C.R.24/Desk - 7

WOMEN AND CHILD DEVELOPMENT DEPARTMENT

Madam Kama Marg , Hutatma Rajguru Chowk ,

Mantralaya, Mumbai 400 032 .

Dated the 30th December , 2021 .

To,

1. The Secretary to the Governer , Raj Bhavan , Malbar Hill , Mumbai ,

2 . The Principal Secretary to the Chief Minister ,

3. The Private Secretary to all Ministers/State Ministers ,

4 Hon'ble Opposition Leader , Legislative Council of the State of Maharashtra/ Legislative Assembly of the State of Maharashtra ,

5 All Hon'ble Members of the Parliament/Members of the Legislative Council of the State of Maharashtra/ Members of the Legislative Assembly of the State of Maharashtra , 6. The Chief Secretary ,

7 . All Additional Chief Secretaries/Principal Secretaries/ Secretaries of Mantralaya Department ,

8. All Mantralaya Departments ,

9. * The Registrar , High Court ( Original Side) , Mumber ,

10. * The Registrar , High Court (Appellate Side ) , Mumbai ,

11. * The Registrar , Office of the Lok Ayukta and Upa - Loka Ayukta , Mumbai ,

12. * The Secretary , Maharashtra Public Service Commission , Mumbai ,

13 * The Principal Secretary , Secretariat of Maharashtra Legislature (Assembly) Mumbai , 14. * The Principal Secretary , Secretariat of Maharashtra Legislature ( Council ) Mumbai , 15. * The Secretary , State Election Commission , New Administrative Building , Mumbai , 16. * The Accountant General , Maharashtra- 1 (Account and Entitlement ) , Maharashtra Mumbai ,

17. * The Accountant General , Maharashtra - 1 ( Audit ) , Maharashtra , Mumbai ,

18. * The Accountant General , Maharashtra - 2 (Account and Entitlement ) , Maharashtra , Nagpur ,

19. * The Accountant General , Maharashtra- 2 (Audit ) , Maharashtra , Nagpur ,

20. * The Secretary . Office of the Chief Information Commissioner of the State , New Administrative Building , Mumbai ,

21. * The Registrar , State Human Rights Commission , Mumbai 400 001 ,

22. The Director General of Information and Public Relations , Mumbai ( 2 copies for publicity ) , 23. Pay and Accounts Officer , Mumbai ,

24. Resident Audit Officer , Mumbai ,

25. Commissioner , Women and Child Development Department . Pune ,

26. Commissioner , Integrated Child Development Services Scheme , New Mumbai , 27. All Divisional Commissioners ,

28. All Collectors ,

29. All Chief Executive Officers of Zilla Parishads ,

30. All District Treasury Officers ,

31. Select File .

(* By Letter)

V. R. THAKUR

Deputy Secretary to Government .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 20 January 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-01-20.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-01-20.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.