महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ८, अंक ५] मंगळवार, जानेवारी २५, २०२२/माघ ५, शके १९४३ [ पृष्ठे २, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ६
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांजकडून
अधिसूचना
क्रमांक उपजिभूक्र. ७/भूसं/मुंउजि/एलएक्यू/८४३/२०२२.----मौजे मालाड, तालुका बोरीवली, जिल्हा मुंबई उपनगर येथील " भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ " अंतर्गत न.भू.क्र. ८२७, भाग स. क्र. २३९ भाग चे भूसंपादन ;
ज्याअर्थी, प्रस्तुत भूसंपादन प्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला असून प्रकरणी भूसंपादनाची कार्यवाही करणेकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाने दिनांक १० ऑक्टोबर २०१८ रोजीचे आदेशान्वये उप जिल्हाधिकारी (भूसंपादन) क्रमांक ७ यांना प्राधिकृत केले आहे. प्रकरणी कलम ११ ची अधिसूचना दिनांक २५--३१ ऑक्टोबर २०१८ रोजी व कलम १९ (१) ची अधिसूचना दिनांक ११ जानेवारी २०१९ रोजी प्रसिद्ध झाली ;
ज्याअर्थी, विहित मुदतीत निवाडा घोषित करणे शक्य नसल्याची जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांची खात्री झाल्याने व भूमिसंपादन अधिनियम, २०१३ चे कलम २५ अन्वये अधिसूचना महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध करणेत येऊन निवाडा घोषित करण्याच्या कालावधीत ६ महिन्यांची वाढ यापूर्वी मंजूर करण्यात आली आहे ;
ज्याअर्थी, उप जिल्हाधिकारी (भूसंपादन) क्रमांक ७ यांनी सादर केलेल्या प्रस्तावामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून नुकसान भरपाईची ३०% रक्कम अप्राप्त, मा. उच्च न्यायालयात बृहन्मुंबई महानगरपालिकेने संपादनाखालील जमिनीच्या क्षेत्राबाबत दाखल केलेली Notice of Motion (L) No. 103/2019 व Review Petition (L) No. 41/2019 याचिका, तसेच हितसंबंधितांनी संपादनाखालील क्षेत्राबाबत नोंदविलेला आक्षेप व मा. उच्च न्यायालयात दाखल केलेली W.P. (L) No. 6042/2020 (W.P. No. 2600/2021) या अद्याप अर्िननित असून मा. उच्च न्यायालयाने W.P. (L) No. 6042/2020 (W.P. No. 2600/2021) मध्ये दिनांक ७ जानेवारी २०२२ रोजीचे आदेशान्वये प्रकरणी दिनांक ३१ मार्च २०२२ पयर्ंत मुदतवाढ दिली आहे ;
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी २५, २०२२/माघ ५, शके १९४३ त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम २५ अन्वये, मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे अनुषंगाने खालील प्रकरणातील अंतिम निवाडा पारितकरण्यास दिनांक ३१ मार्च २०२२ पासून ३ (तीन) महिन्यांची वाढीव मुदत मंजूर करत आहे :----
अनुसूची--एक-जमिनीचे वर्णन
मौजे मालाड, तालुका बोरीवली, जिल्हा मुंबई उपनगर
| अ.क्र. | न.भू.क्र. | स.क्र. | कलम १९ (१) चे दिनांक २९ ऑगस्ट २०२० रोजीचे शुद्धीपत्रकानुसार अधिसूचित केलेले क्षेत्र (चौ.मी.) |
| १. | ८२७अ | २३९ पै. | १,४२,८२३.८० |
संपादनाचे प्रयोजन :- पुनर्वसन व पुनस्र्थापन, २-महानगरपालिका शाळा व विकास नियोजन रस्तेकरिता भूसंपादन.
मुंबई, दिनांक १९ जानेवारी २०२२.
निधी चौधरी, जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा.