महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ८, अंक ८(२)] सोमवार, जानेवारी ३१, २०२२/माघ ११, शके १९४३ [ पृष्ठे २, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक १४
प्राधिकृत प्रकाशन
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त
व्यक्िंतची विशेष कार्यकारी अधिकारी पदी नेमणूक.
जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे
वाचा.----शासनाचे सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक विकाअ-१११५/प्र.क्र. ८८/५, दिनांक ३१ डिसेंबर २०१५.
अधिसूचना
निर्णय क्रमांक गृह/क-१/टे-५/विकाअ/कावि-३०६२५/२०२१.----उपोद्घातातील शासन निर्णयान्वये अ.क्र. १ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मी, राजेश ज. नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे आता खालील नमूद केलेल्या अनुसूचीमध्ये विर्िनदिष्ट केलेल्या ठाणे जिल्हयातील गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त झालेल्या व्यक्िंतची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती त्यांच्या वयाच्या ७० वषार्ंपयर्ंत चालू राहील व वयाच्या ७० वषार्ंनंतर त्यांना अनर्ह ठरवण्यात येईल. तसेच सदर व्यक्िंतची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हयाची नोंद आढळल्यास अथवा फौजदारी गुन्हयाखाली शिक्षा झाली किंवा त्यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदविण्यात आला किंवा कोणत्याही न्यायालयाने त्यास नादार (Bankrupt) जाहीर केल्यास सदरची नियुक्ती संपुष्टात येईल.
२. विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम राहतील :----
(एक) साक्षांकनाचे काम.-----विशेष कार्यकारी अधिकारी हे केवळ ''साक्षांकनाचे '' काम करतील. मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्यांनी साक्षांकन करू नये. तसेच उपोद्घातातील शासन निर्णयामधील परिशिष्ट '' ५ '' मधील रबरी शिक्क्यासह मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतीवर न चुकता दिनांकासहित साक्षांकन करावे. मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती नमूद असलेल्या कागदपत्रांवर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन करू नये. वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर जर ''सत्य प्रत '' म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाया सर्व प्रकारच्या परिणामांकरिता '' विशेष कार्यकारी अधिकारी '' म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील. अशी घटना उघडकीस आल्यास, त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुर्ननियुक्तीस अपात्र असेल.
३. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती '' मानसेवी '' असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकायाला कोणतेही मानधन अथवा वेतन/भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी ३१, २०२२/माघ ११, शके १९४३४. नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकायाने साक्षांकनाचे काम करू नये व सर्व साहित्य जिल्हाधिकारी यांचेकडे तात्काळ परत करावे. अन्यथा अशी व्यक्ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुर्ननियुक्तीसाठी अपात्र ठरेल. नियुक्तीचा कालावधी संपल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकायाने साक्षांकन केल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांचेविरुद्ध जिल्हाधिकारी यांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवावा.
अनुसूची
वर्ष शासन आधारकार्ड नंबर अनुक्रमांक अर्जदाराचे नाव स्थायी पत्ता निर्णयानुसार
जिल्हा क्रमांक
(१) (२) (३) (४) (५) (६) २०२२ २१ ५६१७७९२७१८९८ १ श्री. राजु महादेव खंडझोडे रा. ग्रिन व्हिलेज, बि. नं. बी ००२,
काशिमिरा, मिरा-भाइर्ंदर, जिल्हा ठाणे.
राजेश ज. नार्वेकर, जिल्हादंडाधिकारी, ठाणे.
ठाणे, दिनांक २० जानेवारी २०२२.