RNI No. MAHBIL /2009/35530
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार
वर्ष ८, अंक ७] गुरुवार, फेब्रुवारी १७, २०२२/माघ २८, शके १९४३ [पृष्ठे ३, किंमत : रुपये २३.००
असाधारण क्रमांक २२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.
अनुक्रमणिका
पृष्ठे १-३ सन २०२२ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक २.--- मुंबई महानगरपालिका अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी . . अध्यादेश.
..
..
. .
नगर विकास विभाग
मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक १७ फेब्रुवारी २०२२.
MAHARASHTRA ORDINANCE No. II OF 2022.
AN ORDINANCE
FURTHER TO AMEND THE MUMBAI MUNICIPAL
CORPORATION ACT.
सन २०२२ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक २.
मुंबई महानगरपालिका अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश.
ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही ;
१८८८ चा ३.
आणि ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, मुंबई महानगरपालिका अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे ;
त्याअर्थी, आता, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ च्या खंड (१) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे, पुढील अध्यादेश प्रख्यापित करीत आहे:----
१. (१) या अध्यादेशास, मुंबई महानगरपालिका (सुधारणा) अध्यादेश, २०२२, असे म्हणावे.
संक्षिप्त नाव व प्रारंभ.
(२) तो, तात्काळ अंमलात येईल.
(१)
भाग--चार २२---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, फेब्रुवारी १७, २०२२/माघ २८, शके १९४३ २. मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ६ब नंतर, पुढील कलम समाविष्ट करण्यात येईल:--- १८८८ चा ३.
सन १८८८ चा अधिनियम क्रमांक ३ यात कलम ६क समाविष्ट करणे.
प्रशासकाची नियुक्ती.
""६क. (१) या अधिनियमात काहीही अंतभर्ूत असले तरी, राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाच्या असे निदर्शनास आणून दिले आहे की, राज्यातील कोविड-१९ च्या सार्वत्रिक साथरोगाच्या परिस्थितीमुळे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक घेणे राज्य निवडणूक आयोगास शक्य होणार नाही, म्हणून, राज्य शासनास, आदेशाद्वारे, अधिनियमांतर्गत महानगरपालिकेच्या सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी व सर्व कार्ये व कर्तव्ये पार पाडण्यासाठी, त्यात विर्िनदिष्ट केलेल्या कालावधीसाठी कोणत्याही शासकीय अधिकायाची प्रशासक म्हणून नियुक्ती करता येईल :
परंतु, प्रशासक, महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर, पहिल्या सर्वसाधारण सभेच्या बैठकीपयर्ंत ते पद धारण करील.
(२) पोट-कलम (१) अन्वये नियुक्त केलेल्या प्रशासकास, महानगरपालिका निधीतून राज्य शासन, वेळोवेळी, निर्धारित करील असे वेतन व भत्ते मिळतील."".
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, फेब्रुवारी १७, २०२२/माघ २८, शके १९४३ ३निवेदन
मुंबई महानगरपालिका (दुसरी सुधारणा) अधिनियम, २०२१ (२०२२ चा महा. २) द्वारे मुंबई महानगरपालिकेची सदस्य संख्या २२७ वरून २३६ पयर्ंत वाढवली आहे. हद्दींचे सीमांकन व प्रभाग परिसीमन करण्याचे काम महानगरपालिकेकडून सुरू आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियम (१८८८ चा ३) याच्या विद्यमान तरतुदींनुसार, महानगरपालिकेची विद्यमान मुदत ७ मार्च २०२२ रोजी संपणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाला कळवले आहे की, राज्यातील कोविड-१९ सार्वत्रिक साथरोग परिस्थितीमुळे, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महानगरपालिकेमधील इतर मागासवर्गाचे आरक्षण बदलण्याकरिता आणि महानगरपालिकेच्या हद्दींचे सीमांकन व प्रभागांचे परिसीमन करण्याचे काम सुरू असल्याने, मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे आयोजन वेळेवर करणे राज्य निवडणूक आयोगाला शक्य होणार नाही, आणि, म्हणून, महानगरपालिकेची मुदत संपल्यानंतर महानगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्याची शासनाला विनंती केली आहे.
२. म्हणून, मुंबई महानगरपालिका अधिनियमात उचित तरतूद करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी आणि सर्व कार्ये व कर्तव्ये पार पाडण्यासाठी, कोणत्याही शासकीय अधिकायाची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यासाठी, उक्त अधिनियमात नवीन कलम ६ क समाविष्ट करणे इष्ट वाटते.
३. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही आणि उपरोक्त प्रयोजनांसाठी, मुंबई महानगरपालिका अधिनियम (१८८८ चा ३) यात आणखी सुधारणा करण्याकरिता, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कारवाई करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे, म्हणून, हा अध्यादेश प्रख्यापित करण्यात येत आहे.
मुंबई, दिनांक १७ फेब्रुवारी २०२२.
भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
महेश पाठक, शासनाचे प्रधान सचिव.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.