|
सामान्य प्रशासन विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २४ फेब्रुवारी २०२२.
अधिसूचना
क्रमांक डीआयपी-२०२२/प्र. क्र. १४/३०.-----माजी मंत्री प्रा. नारायण ज्ञानदे
व तथा एन. डी. पाटील यांचे
सोमवार, दिनांक १७ जानेवारी २०२२ रोजी कोल्हापूर येथे झालेल्या दु:खद निधनाबद्दल राज्य मंत्रिमंडळाने खालीलप्रमाणे ठराव
पारित करून श्रद्धांजली अर्पण केली.
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री ज्येष्ठ नेते प्रा. नारायण ज्ञानदेव तथा एन. डी. पाटील यांचे सोमवार, दिनांक १७ जानेवारी २०२२ रोजी कोल्हापूर
येथे निधन झाले. ज्येष्ठ नेते प्रा. पाटील यांच्या निधनाबद्दल राज्य मंत्रिमंडळ तीव्र शोक व्यक्त करीत आहे.
ज्येष्ठ नेते प्रा. पाटील यांचा जन्म दिनांक १५ जुलै १९२९ रोजी सांगली जिल्ह्यतील ढवळी नागाव येथील शेतकरी कुटुंबात झाला. प्रा. पाटील
यांनी खडतर परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले. त्यांनी पुणे विद्यापीठातून एम.ए. अर्थशास्त्राची आणि पुढे एल.एल.बी. ची पदवी संपादन केली.
प्रा. पाटील यांची ' एन. डी. सर' म्हणून सर्वच क्षेत्रात आदरार्थी ओळख होती. त्यांनी १९४८ पासून शेतकरी कामगार पक्षाचे काम सुरू केले.
काही काळ मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस म्हणूनही काम पाहिले. प्रा. पाटील १९६० ते १९८२ अशी २२ वर्षे विधान परिषद सदस्य
म्हणून विधिमंडळात होते. प्रा. पाटील यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात १९७८-१९८० दरम्यान सहकारी मंत्रीपदही भुषवले आहे. या काळात त्यांनी
शेतकरी, सहकार आणि पणन क्षेत्रासाठी क्रांतीकारी असे निर्णय घेतले. विधिमंडळात त्यांनी १९८५-१९९० या कालावधीत विधानसभा सदस्य
म्हणून कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले.
महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते म्हणून प्रा. पाटील यांनी मोठा लढा दिला. त्यासाठी अनेकदा
संघर्षशील भूमिका घेतली. त्यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान अमूल्य असेच आहे. शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा त्यांच्या
जीवनावर मोठा प्रभाव होता. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेची धूरा त्यांनी तितक्याच तडफेने आणि तळमळीतून खांद्यावर
घेतली. अखेरपयर्ंत ते रयत शिक्षण संस्थेच्या कार्यात सक्रीय होते. शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या सल्लागार समितीचे ते सदस्य होते. पुढे त्यांनी
शिवाजी विद्यापीठाशी निगडीत कार्यकारिणी, समित्यांवर सन्मानाने काम केले. राज्याच्या प्राथमिक शिक्षण आयोगाचे सदस्य म्हणून त्यांनी घेतलेली
परखड आणि कणखर भूमिका क्रांतीकारी ठरली. राज्यातील तीन विद्यापीठांनी प्रा. एन. डी. पाटील यांना डी.लिट, या मानद पदवीने सन्मानित केले
आहे. त्यांच्या विद्वतेचा, कार्य कतर्ृत्वाचा सन्मान म्हणून देश आणि राज्यभरातील अनेक सन्मानदर्शक पुरस्कार, पदव्यांनी त्यांना गौरविण्यात आले
आहे. प्रा. पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात पथदर्शक असे उपक्रम राबविले. असामान्य विद्वतेचे धनी, विविध |
|
|
विषयांचा व्यासंग आणि सुक्ष्म सामाजिक भान यामुळे प्रा. पाटील यांनी लेखनही केले आहे. त्यांच्या सर्व पुस्तकांचे विषयही सामाजिक, र्आथिक,
शैक्षणिक आणि दुबळ्यांच्या उत्थानाशी निगडीत असेच आहेत.
प्रा. पाटील वंचित-शोषितांच्या, बेरोजगार, कामगार-कष्टकरी यांच्या चळवळीत पुढे असत. अनेक सामाजिक, शेती-सहकार यांसह
अनेकविध क्षेत्रातील संस्था, संघटनांशी त्यांचा निकटचा संबंध होता. ते त्यांच्यासाठी दीपस्तंभ होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढयातही ते बिनीचे
शिलेदार होते. तसेच सीमा प्रश्नातील मराठी भाषिकांसाठी प्रा. पाटील बुलंद आवाज होते. त्यांनी सीमा प्रश्नाची धग कमी होऊ दिली नाही.
अभ्यासपूर्ण, सडेतोड मांडणी, परखड आणि ठाम विचार हे प्रा. पाटील यांच्या व्यक्तिमवाच्या अनेक पैलू
पैकी काही पैलू होते. प्रा. पाटील
ं
अखेरच्या श्वासापयर्ंत शेतकरी कामगार पक्षाशी आणि रयत शिक्षण संस्थेशी एकनिष्ठ राहीले.
शेतकरी, कष्टकयांचा बुलंद आवाज, पुरोगामी विचारांचे खंदे पुरस्कर्ते ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे सोमवार, दिनांक १७ जानेवारी
२०२२ रोजी कोल्हापूर येथे दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने आधुनिक महाराष्ट्राच्या वाटचालीतील चिंतनशील, संघर्षशील असे तेजस्वी नेतृत्व
काळाच्या पडद्याआड गेले आहे. ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनाबद्दल राज्य मंत्रिमंडळ तीव्र शोक व्यक्त करत असून, राज्य
मंत्रिमंडळाने व्यक्त केलेल्या भावना प्रा. पाटील यांच्या कुटुंबियांना कळविण्यात याव्यात.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
द
बाशिष चक्रबर्ती,
े
शासनाचे मुख्य सचिव. |
|