RNI No. MAHBIL /2012/46121
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
सोमवार, फेब्रुवारी २८ , २०२२ / फाल्गुन ९ , शके १ ९४३
वर्ष ८ , अंक १४]
[पृष्ठ १ , किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक २७
प्राधिकृत प्रकाशन
बृहन्मुंबई महानगरपालिका
अधिसूचना
क्रमांक निवडणूक/ ६००६/सा.
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक निवडणूक-२०१७ मध्ये श्री. प्रकाश देवजी मोरे , भारतीय जनता पार्टी पक्षाने पुरस्कृत केलेले उमेदवार प्रभाग क्र . १५९ मधून निवडून आले होते. उच्चतम द्वितीय क्रमांकाची मते मिळविणारे उमेदवार श्रीम . कोमल कमलाकर जामसांडेकर यांनी मा. लघुवाद न्यायालयात निवडणूक याचिका क्र . EP/ 13/2017 दाखल केली होती.
मा. लघुवाद न्यायालयाने निवडणूक याचिका क्र. EP/13/2017 वर सुनावणी घेऊन दिनांक २१ फेब्रुवारी २०२२ रोजी आदेश दिला. त्यानुसार श्री. प्रकाश देवजी मोरे यांची नगरसेवक म्हणून झालेली निवड रद्दबातल केली आणि उच्चतम द्वितीय क्रमांकाची मते मिळविणारे उमेदवार श्रीम . कोमल कमलाकर जामसांडेकर यांना विजयी घोषित केले .
मा. लघुवाद न्यायालयाने निवडणूक याचिका क्र . EP/13/ 2017 मध्ये दिनांक २१ फेब्रुवारी २०२२ रोजी दिलेल्या आदेशानुसार, श्रीम. कोमल कमलाकर जामसांडेकर (शिवसेना ) पक्षाने पुरस्कृत केलेले उमेदवार यांना दिनांक २१ फेब्रुवारी २०२२ पासून निर्वाचित घोषित करण्यात येत आहे.
मुंबई,
इ सिं चहल , महानगरपालिका आयुक्त,
बृहन्मुंबई महानगरपालिका.
दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ .
भाग दोन-२७-१
(१)
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE .