महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ८, अंक १४] गुरुवार, मार्च ३, २०२२/फाल्गुन १२, शके १९४३ [ पृष्ठे ४, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक २३
प्राधिकृत प्रकाशन
उपविभागीय अधिकारी कल्याण, यांजकडून
अधिसूचना
खाजगी क्षेत्रातील जमीन भूसंपादन व पुनर्वसन, पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम,
२०१३ चे कलम १९(२) अन्वये ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस.
क्रमांक के.डी./टे-२/भूसं/निळजे ते हेदुटणे डी.पी. रस्त्याचे भूसंपादन/कावि- ०२/२०२२.----ज्याअर्थी, भूमि व मिळकत व्यवस्थापक, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण बांद्रा (पूर्व), मुंबई यांनी त्यांचेकडील क्र.भू.व.मि.शा./निळजे ते हेदुटणे/भूसंपादन/१६३८/२०२१, दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ अन्वये " कल्याण विकास केंद्र प्रकल्पातील निळजे ते हेदुटणे येथील प्रस्तावित डी.पी.रस्ता विकसित करणे " या सार्वजनिक प्रयोजनाकरीता खाजगी क्षेत्रातील जमीन भूसंपादन व पुर्नवसन, पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये जमीन संपादन करणेकामी व सदरची जमीन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण बांद्रा (पूर्व), मुंबई यांचे नावे घेण्याबाबत प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी, ठाणे यांचेकडे सादर केला आहे ;
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, ठाणे यांचे पत्र क्रमांक क्र. उजि/भूसं(समन्वय)/टे-१/डी.पी./बा.को.नं. L १६३२२९३९४४९८९/२०२१ दिनांक १६ डिसेंबर २०२१ अन्वये उक्त प्रस्तावासंबंधी भूसंपादन व पुर्नवसन, पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले आहेत ;
ज्याअर्थी उप जिल्हाधिकारी (भूसंपादन) मेट्रो सेंटर क्र. ३, ठाणे, जि. ठाणे यांनी यापूर्वीच अनुसूची-एक मध्ये नमूद खाजगी क्षेत्रातील जमीन भूसंपादन व पुर्नवसन, पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये "मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण बांद्रा (पूर्व), मुंबई" यांचे नावे घेण्याबाबत महाराष्ट्र राज्याचे दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ रोजीच्या राजपत्रामध्ये, असाधारण क्र. ८० अन्वये आणि दै. लोकमत व दै. पुढारी या वृत्तपत्रात दिनांक ८ डिसेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध झाली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त जाहीर नोटीसीद्वारे संबंंधित जमीन धारकांकडून शासनाच्या प्रचलित धोरणाप्रमाणे खाजगी जमीन भूसंपादन कायदा, २०१३ अन्वये " मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण बांद्रा (पूर्व), मुंबई " यांचे नावे संपादन करून देण्यास स्वेच्छेने तयार असल्याबाबत व जिल्हास्तरीय समितीने निश्चित केलेला मोबदला संपूर्णत: व अंतिमरित्या स्विकारण्यास तयार असल्याबाबतची संमतीपत्रे (विकल्प) मागविण्यात येत आहेत ;
त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येते कि, न्याय नुकसान भरपाई मिळण्याचा हक्क आणि पुनर्वसन व पुनर्वसाहत यांमध्ये पारदर्शकता राखणे अधिनियम, २०१३ च्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण ४ खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधी पयर्ंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही परंतु जिल्हाधिकारी अशा प्रकारे अधिसूचित केलेल्या जमिनीच्या मालकाने केलेल्या अर्जावरून या पोट-कलमाच्या अमंलबजावणीतून अशा मालकास लेखी नोंदवावयाच्या विशेष परिस्िथती मध्ये सूट देऊ शकेल :
(१)
भाग एक (को.वि.पु.)----२३--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, मार्च ३, २०२२/फाल्गुन १२, शके १९४३ परंतु आणखी असे की, कोणत्याही व्यक्तीने या तरतूदीचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्यामूळे तिला सहन कराव्या लागलेल्या कोणत्याही नुकसानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकायाद्वारे भरपाई करण्यात येणार नाही ;
त्याअर्थी, आता मी, अभिजित भांडे पाटील, उप विभागीय अधिकारी, कल्याण तथा भूसंपादन अधिकारी, जि. ठाणे याद्वारे मौजे हेदुटणे, ता. कल्याण या गावातील संपादित होत असलेल्या अनुसूची १ मध्ये नमूद केलेल्या स.नं./हि.नं. च्या जमिनी " मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण बांद्रा (पूर्व), मुंबई " यांचे नावे संपादन करण्यात येणार असल्याने, या अनुसूचीमध्ये नमूद सव्र्हे नंबर/गट नंबरमधील जमिनीच्या मालकी हक्काबाबत व न्यायालयीन दाव्यांबाबत जमीन मालकांकडून किंवा हितसंबंधित व्यक्तीकडून ही जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसाच्या आत हरकती किंवा सूचना विहित नमुना-४ मध्ये मागवित आहे किंवा त्यांना माझ्यासमोर उपस्थित राहण्यास सांगत आहे :---
१. हरकती किंवा सूचनांचा विहित नमुना-४ उपविभागीय अधिकारी, कल्याण यांच्या उप विभागीय अधिकारी कल्याण उप विभाग कल्याण, मोहन प्राईड सांस्कृतिक कल्याण केंद्र दूसरा मजला, पोद्दार शाळेजवळ, खडकपाडा, कल्याण या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे. तसेच सदर नमुना या कार्यालयामार्फत " मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, बांद्रा (पूर्व), मुंबई " च्या प्राधिकृत संबंंधितांना उपलब्ध करुन देण्यात येईल.
२. " मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, बांद्रा-कुर्ला कॉम्पेलक्स, बांद्रे पूर्व, मुंबई ४०० ०५१ " यांचेकडून सदर प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आलेल्या क्षेत्राच्या आराखडयांच्या प्रती उप विभागीय अधिकारी कल्याण उप विभाग कल्याण, उप विभाग कल्याण यांचे कार्यालय, मोहन प्राईड सांस्कृतिक कल्याण केंद्र, दूसरा मजला, पोद्दार शाळेजवळ खडकपाडा, कल्याण (प.) या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत जमीन धारकांना किंवा हितसंबंंधित व्यक्तींना तसेच जनतेस निरीक्षणासाठी खुल्या ठेवण्यात आल्या आहेत.
३. ही जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत जमिनीच्या मालकी हक्काबाबत व न्यायालयीन दाव्याबाबत जमीन मालकाकडून किंवा हितसंबंधित व्यक्तीकडून प्राप्त झालेली हरकतीची किंवा सूचनांची चौकशी करण्यात येईल आणि संबंधित हरकत घेणायांना त्यांच्या हरकतीच्या किंवा सूचनांच्या समर्थनार्थ तोंडी वा कागदोपत्री पुरावा सादर करण्यासाठी जातीने किंवा कोणत्याही कायदेशीर व्यक्तीमार्फत उपस्थित राहण्याची मुभा असेल.
४. उक्त कालावधीमध्ये हरकती किंवा सूचना प्राप्त न झाल्यास, उक्त जमिनीबाबत अन्य कोणत्याही व्यक्तीचे हितसंबंंध नाहीत असे गृहित धरुन, कायदेशीर शीर्षक अहवालाच्या अनुषंगाने सदर जमीन संपादन जमीन करून ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्यात येईल.
अनुसूची-एक
संपादन कराव्याच्या जमिनींचा तपशिल
मौजे हेदूटणे, जि. ठाणे, ता. कल्याण.
अ.क्र. गावाचे नाव भूमापन क्रमांक/गट क्रमांक खरेदी/संपादन करावयाचे क्षेत्र
(हे.आर.प्र.)
(१) (२) (३)
(४)
१
२१४/१/अ ०.०१.२६
२
६/१
०.०३.३७
३
२१४/२/अ
२१४/२/क ०.०२.९५
२१४/२/ड
४
७ ०.४१.५३
५ मौजे हेदूटणे २१४/२/अ
२१४/२/क ०.०१.७१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, मार्च ३, २०२२/फाल्गुन १२, शके १९४३ ३ अनुसूची - एक--चालू (१) (२) (३)
(४)
२१२/१५/क
७
८/१
०.१४.४६
८
८/२/अ
०.००.४१
८/२/ब
९
९/१/अ
०.१०.१५
९/१/ब
१०
९/२ ०.२६.२९
११
२५८ ०.०५.८०
१२
१०/१/अ
१०/१/ब ०.२०.८०
१०/१/ड
१०/१/क ०.२१.१०
१३
१७ ०.०६.२४
१४ २१२/१४ ०.२१.३५
१५
२१२/१३
०.१८.८६
०.४५.००
१६
१४/६ ०.०३.६५
१७ १४/३/अ
१४/३/ब ०.००.९७
१८
१४/२ ०.३३.६७
१९
१४/१ ०.००.२२
२०
२६/२/ब
०.११.५५ ०.०४.००
२१
२६/१ ०.३०.३१
२२
२६/२/अ ०.०९.८१
२३
२५/२/ब ०.१२.८४
२४ २८ ०.२८.९८
२५
२९ ०.०१.३४
२६
२०९/२ ०.९९.७६
२७ २०९/१ ०.०६.००
०.०२.००
२८
३० ०.०८.१०
२९ ४६/१ ०.१७.८६ ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, मार्च ३, २०२२/फाल्गुन १२, शके १९४३ अनुसूची - एक--समाप्त (१) (२) (३)
(४)
३२
३३/२ ०.०१.४६
३३
३३/१/अ ०.०३१.७०
३३/१/ब ०.०७.९०
३४ २४८ ०.००.६०
३५
९४/२ ०.१९.६५
३६
९४/३/ड ०.००.७३
३७ ९४/३/इ ०.१९.६६
३८
९४/४/इ ०.०७.९३
३९
२४८ ०.०१.००
एकूण . . ६.९०२८
अभिजित भांडे पाटील,
कल्याण, दिनांक २ मार्च २०२२.
उपविभागीय अधिकारी, कल्याण उपविभाग कल्याण तथा भूसंपादन अधिकारी, कल्याण.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHEDAT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.