RNI No. MAHBIL /2009/40124
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग पाच
शुक्रवार , मार्च ४ , २०२२ /फाल्गुन १३ , शके १ ९ ४३
वर्ष ८ , अंक १]
[पृष्ठे ३ , किंमत: रुपये २६.००
असाधारण क्रमांक १
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधानपरिषदेत सादर केलेली विधेयके.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय
महाराष्ट्र विधानसभेत दिनांक ४ मार्च , २०२२ रोजी पुरःस्थापित करण्यात आलेले खालील विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियम ११६ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे: -
L. A. BILL No. I OF 2022 .
A BILL TO AMEND THE MAHARASHTRA SHOPS AND ESTABLISHMENTS (REGULATION OF EMPLOYMENT AND CONDITIONS OF SERVICE )
АСТ , 2017 .
सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १ .
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन ) अधिनियम, २०१७ यामध्ये सुधारणा करण्याकरिता विधेयक.
२०१७ चा ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी , महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्तीचे महा. ६१. विनियमन) अधिनियम , २०१७ यात सुधारणा करणे इष्ट आहे ; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या त्र्याहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे : -
१. या अधिनियमास, महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन ) (सुधारणा) संक्षिप्त नाव. अधिनियम , २०२२ , असे म्हणावे.
(१)
भाग पाच-१-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च ४ , २०२२ /फाल्गुन १३, शके १ ९ ४३
२०१७ चा महा . ६१ .
२. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ (यात यापुढे ज्याचा निर्देश " मुख्य अधिनियम " असा केलेला आहे) , याच्या कलम १ मधील , पोट- कलम (३ ) ऐवजी , पुढील पोट-कलम दाखल करण्यात येईल :-
सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६१ याच्या कलम १ ची सुधारणा .
" ( ३ ) (क) कलम ७ खेरीज करून, या अधिनियमाच्या तरतुदी, दहा किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी नोकरीवर ठेवणाऱ्या आस्थापनांना लागू असतील.
(ख ) कलमे ७ व ३६ क यांच्या तरतुदी, दहापेक्षा कमी कर्मचारी नोकरीवर ठेवणाऱ्या आस्थापनांना लागू असतील. " .
३. मुख्य अधिनियमाच्या कलम १७ मधील , खंड ( छ ) वगळण्यात येईल.
सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६१ याच्या कलम १७ ची सुधारणा .
४. मुख्य अधिनियमाच्या कलम ३६ नंतर , पुढील कलम समाविष्ट करण्यात येईल : -
सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६१ यामध्ये नवीन कलम ३६क समाविष्ट करणे.
नामफलक मराठीत असणे.
" ३६क. ( १ ) कलम ६ अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक आस्थापनेचा किंवा ज्या आस्थापनेला कलम ७ लागू आहे त्या प्रत्येक आस्थापनेचा नामफलक, देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असेल :
परंतु, अशा आस्थापनेच्या नियोक्त्याकडे, देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक देखील असू शकतील:
परंतु आणखी असे की, मराठी भाषेतील अक्षरलेखन, नामफलकावर सुरुवातीलाच लिहिणे आवश्यक असेल आणि मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार , इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही.
( २ ) ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते , अशी आस्थापना, नामफलकावर महान व्यक्तींची किंवा गड - किल्ल्यांची नावे लिहिणार नाही . " .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च ४ , २०२२ /फाल्गुन १३ , शके १ ९ ४३
उद्देश व कारणे यांचे निवेदन
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन ) अधिनियम, २०१७ ( २०१७ चा महा . ६१ ) ( यात, यापुढे , ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केलेला आहे ) , यामध्ये दुकाने व इतर आस्थापना यांमध्ये नोकरीवर ठेवलेल्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीच्या शर्तीचे आणि इतर सेवाशर्तीचे विनियमन करण्यासाठी तरतूद असून तो, दहा किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कामावर ठेवणाऱ्या आस्थापनांना लागू आहे .
२. उक्त अधिनियमाअन्वये केलेला, महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) नियम , २०१८ याचा नियम ३५ हा , नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेत प्रदर्शित करण्यासाठी प्रत्येक आस्थापनेस , अनिवार्य करतो.
विविध संघटनांनी शासनाच्या असे निदर्शनास आणून दिले आहे की , दहा पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या काही आस्थापना , कलम ७ खेरीज, उक्त अधिनियमाच्या तरतुदी त्यांना लागू नसल्यामुळे, मराठीत नामफलक प्रदर्शित करीत नाहीत . म्हणून प्रत्येक आस्थापनेने , मग दहा किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी अथवा दहा पेक्षा कमी कर्मचारी नोकरीत असोत तिचा नामफलक मराठीत प्रदर्शित करण्याचे अनिवार्य करण्याची मागणी विविध संघटनांकडून सातत्याने करण्यात येत आहे.
म्हणून , उक्त अधिनियमाच्या कलम ६ अन्वये नोंदणी केलेली प्रत्येक आस्थापना , आणि कलम ७ लागू असलेली प्रत्येक आस्थापना त्यांचा नामफलक , देवनागरी लिपीतील मराठी भाषेत प्रदर्शित करील , अशी तरतूद करण्याच्या दृष्टीने , त्यामध्ये नवीन कलम ३६क समाविष्ट करून , उक्त अधिनियमात यथोचित सुधारणा करणे शासनाला इष्ट वाटते . आस्थापनेच्या नियोक्त्यास देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक देखील ठेवता येईल , तथापि , नामफलकावर सुरुवातीस मराठी भाषेतील अक्षरलेखन लिहिलेले असणे अत्यावश्यक असेल आणि मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार , इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही .
३. उक्त अधिनियमाच्या कलम १७ च्या खंड (छ ) मध्ये, प्रत्येक कर्मचाऱ्याच्या ओळखपत्रावर आधार क्रमांक अंतर्भूत असण्याची तरतूद आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या विनंतीवरून, आधार (वित्तीय व इतर अर्थसहाय्य , लाभ व सेवा यांचे लक्ष्यित वितरण ) अधिनियम , २०१६ ( २०१६ चा १८ ) याच्या कलम २ ९ चे पोट-कलम ( ४ ) आणि त्याखाली केलेले आधार ( माहितीची देवाणघेवाण) विनियमन, २०१६ याचा विनियम ६ यांच्या तरतुदी लक्षात घेता , उक्त खंड वगळणे शासनास इष्ट वाटते.
४. वरील उद्दिष्टे साध्य करणे , हा या विधेयकाचा हेतू आहे.
मुंबई ,
हसन मुश्रीफ,
कामगार मंत्री.
दिनांक २२ फेब्रुवारी २०२२ .
विधान भवन :
राजेन्द्र भागवत ,
प्रधान सचिव,
मुंबई,
दिनांक ४ मार्च , २०२२ .
महाराष्ट्र विधानसभा .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .