Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, असा. क्र. २५, जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग, यांजकडून क्रमांक गृह/एमएजी-९/वा.बंद/आंबेत पूल/१३५९२/२०२२

Published 10 March 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-03-10.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, मार्च १०, २०२२/फाल्गुन १९, शके १९४३ १ RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ८, अंक १६] गुरुवार, मार्च १०, २०२२/फाल्गुन १९, शके १९४३ [ पृष्ठे २, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक २५

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग, यांजकडून

वाहतूक बंदी अधिसूचना

क्रमांक गृह/एमएजी-१/वा.बंद/आंबेत पुल/१३५९२/२०२२.----ज्याअर्थी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांनी उपोद्घातातील अ.क्र. ३ कडील पत्रान्वये " म्हाप्रळ आंबेत पुरार रस्त्यावरील (रामा. १०१) सावित्री खाडीवरील कि.मी. ०/८०० मधील आंबेत पुल हा एकूण ३७६ मी. लांबीचा मोठा पूल आहे. हा पूल जवळजवळ ४३ वर्ष जूना असून, पुलाचा पाया कमकुवत झाल्याने अधीक्षक अभियंता, संकल्पचित्र मंडळ (पूल) यांनी सूचविल्याप्रमाणे पुलाच्या पायाच्या दुरुस्तीसाठी या कार्यालयाकडून कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. सदर पुलाचा पिअरचा पाया हा Well Foundation चा आहे. सदर पुलाच्या पिअरच्या पायाची पाण्याखालील पाहणी (Under water obsevation) दिनांक ३ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू करण्यात आलेली आहे. सदर पाहणी थ्री डी सोनार सव्र्हे व Visiual inspection by Robot मार्फत करण्यात आली आहे. दिनांक ५ फेब्रुवारी २०२२ रोजी पिअर क्र. ५ च्या पायाचे (Well foundation) निरक्षण केले असता, पूर्व दिशेला प्रवाहाच्या अपस्िट्रम बाजूला Well Cap च्या १८ मीटर खाली Crack आढळून आलेली आहे. तसेच त्याच बाजूस Well Cap पासून ४.५० मीटर खाली Cavity आढळून आलेली आहे. सदरची बाब या विभागाच्या मुख्य अभियंता, कोकण सा.बां. प्रादेशिक विभाग व अधीक्षक अभियंता रायगड (सा.बां.), मंडळ याच्या निर्दशनास आणली आहे तसेच अधीक्षक अभियंता, संकल्प चित्र मंडळ यांचे सोबतही याविषयी चर्चा करून, सद्य:स्थितीत पूलावरून वाहतूक सुरु ठेवणे धोकादायक आहे असे सर्वाचे मत आहे. आंबेत पूलावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद करणेबाबत यापूर्वी दिनांक ८ फेब्रुवारी २०२२ रोजी अधिसूचना काढण्यात आलेली आहे. तरी सदर सर्व प्रकारची वाहतूक पुढे किमान दोन महिने बंद ठेवणेचे आदेश निर्गमित व्हावेत, " अशी विनंती केलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, यापूर्वी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांनी म्हाप्रळ आंबेत पुरार रस्त्यावरील (रामा. १०१) सावित्री खाडीवरील कि.मी. ०/८०० मधील आंबेत पुल हा सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद करण्याबाबत केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांनी दिनांक ८ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या पत्रान्वये, (१) मंडणगड व दापोली येथून मुंबई पुणेकडे जाणाया प्रवाशांसाठी म्हाप्रळ महाड रस्ता व दापोली लाटवण करंजाडी महाड (२) मुंबई व पुणे येथून मंडणगड व दापोलीकडे जाणाया प्रवाशांसाठी महाड म्हाप्रळ मंडणगड व महाड करजाडी लाटवण दापोली या पर्यायी मार्गाने मार्गस्थ करता येणार, असे अभिप्राय दिलेले आहेत व त्यानुसार सदर पुल सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद करण्यात आलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांनी उपरोक्त प्रमाणे सादर केलेल्या प्रस्तावानुसार उक्त पुलाच्या दुरुस्तीच्या कामाकरिता म्हाप्रळ आंबेत पुरार रस्त्यावरील (रामा. १०१) सावित्री खाडीवरील कि.मी. ०/८०० मधील आंबेत पुल सर्व प्रकारच्या वाहतुकीस पुढील दोन महाकरिता बंद करणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे.

(१) भाग एक (को.वि.पु.)----२५--१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, मार्च १०, २०२२/फाल्गुन १९, शके १९४३

त्याअर्थी, मी, डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हादंडाधिकारी रायगड उपोद्घातातील अ.क्र. १ व २ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार या अधिसूचनेच्या दिनांकापासून दोन महाकरिता म्हाप्रळ आंबेत पुरार रस्त्यावरील (रामा. १०१) सावित्री खाडीवरील कि.मी. ०/८०० मधील आंबेत पुल हा सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद करणेबाबतचे आदेश जारी करीत आहे.

रायगड-अलिबाग,

डॉ. महेंद्र कल्याणकर,

दिनांक ४ मार्च २०२२.

जिल्हादंडाधिकारी, रायगड.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHEDAT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 10 March 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-03-10.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-03-10.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.