RNI No. MAHBIL /2009/35530
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार
वर्ष ८ , अंक ८]
शुक्रवार , मार्च ११ , २०२२/ फाल्गुन २० , शके १ ९ ४३ [पृष्ठे ३ , किंमत: रुपये २३.००
असाधारण क्रमांक २३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.
अनुक्रमणिका
पृष्ठे सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २१.- मुंबई महानगरपालिका अधिनियम, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र नगरपरिषदा , नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ यांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम. १-३ दिनांक ११ मार्च २०२२ रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी , याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे .
सतिश वाघोले , प्रभारी सचिव (विधि विधान) , महाराष्ट्रशासन, विधि व न्याय विभाग .
सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २१ . (माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर " महाराष्ट्र शासन राजपत्रात " दिनांक ११ मार्च २०२२ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम. )
मुंबई महानगरपालिका अधिनियम, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९ ६५ यांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम.
१८८८ चा ३ . ज्याअर्थी , यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता , मुंबई महानगरपालिका अधिनियम , महाराष्ट्र महानगरपालिका १९ ४९ चा अधिनियम आणि महाराष्ट्र नगरपरिषदा , नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ यांमध्ये आणखी ५९ .
१९६५ चा
महा. ४० .
भाग चार- २३-१
(१) २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार , मार्च ११ , २०२२ /फाल्गुन २० , शके १ ९ ४३
सुधारणा करणे इष्ट आहे ; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या त्र्याहत्तराव्या वर्षी , याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे
प्रकरण एक
प्रारंभिक .
संक्षिप्त नाव.
१. या अधिनियमास , मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी ( सुधारणा ) अधिनियम , २०२२ , असे म्हणावे.
प्रकरण दोन
मुंबई महानगरपालिका अधिनियमाची सुधारणा.
सन १८८८ चा
अधिनियम क्रमांक
३ याच्या कलम २. मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम १ ९ मध्ये , पोट- कलम ( १ ) मधील , खंड ( अ ) मध्ये , १८८८ चा ३ . " राज्य निवडणूक आयुक्त" हा मजकूर जेथे आला असेल त्या दोन्ही ठिकाणी , त्या मजकुराऐवजी , " राज्य शासन , १९ ची सुधारणा . राज्य निवडणूक आयुक्ताच्या मान्यतेने , " हा मजकूर , त्याच्या व्याकरणिक फेरबदलांसह दाखल करण्यात येईल.
प्रकरण तीन
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाची सुधारणा.
३. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ५ मध्ये, पोट- कलम ( ३ ) मध्ये, " राज्य निवडणूक १ ९ ४ ९ चा अधिनियम क्रमांक आयुक्त" हा मजकूर जेथे आला असेल त्या दोन्ही ठिकाणी , त्या मजकुराऐवजी, " राज्य शासन, राज्य निवडणूक ५ ९ .
ची सुधारणा . आयुक्ताच्या मान्यतेने , " हा मजकूर, त्याच्या व्याकरणिक फेरबदलांसह दाखल करण्यात येईल.
सन १ ९ ४ ९ चा ५ ९ याच्या कलम ५
प्रकरण चार
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व
औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९६५ याची सुधारणा.
सन १९ ६५ चा
महा . ४० .
४. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ , याच्या कलम १० १ ९ ६५ चा महाराष्ट्र मध्ये, पोट- कलम ( १ ) ऐवजी , पुढील पोट - कलम दाखल करण्यात येईल : -
" ( १ ) कलम ९ च्या तरतुदींना अधीन राहून,-
अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम १० ची सुधारणा.
( अ ) राज्य शासन , राज्य निवडणूक आयुक्ताच्या मान्यतेने , वेळोवेळी, राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे , प्रत्येक नगरपालिका क्षेत्रासाठी , असे क्षेत्र ज्या प्रभागामध्ये विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व विस्तार निश्चित करील :
परंतु , असा कोणताही आदेश प्रसिद्ध करण्यापूर्वी राज्य शासन , राज्य निवडणूक आयुक्ताच्या मान्यतेने , त्याने करण्याचे योजिलेल्या आदेशाचा मसुदा, नगरपालिका क्षेत्रातील सर्व रहिवाश्यांच्या माहितीसाठी , नगरपालिका कार्यालयातील सूचना फलकावर आणि त्यास योग्य वाटेल अशा नगरपालिका क्षेत्रातील इतर ठिकाणी लावण्याची व्यवस्था करील आणि असा आदेश प्रसिद्ध करण्याचा त्याचा इरादा घोषित करणारी नोटीस , त्या क्षेत्रात प्रसारित होणाऱ्या किमान एका वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याची व्यवस्था करील आणि पूर्वोक्त आदेशाच्या मसुद्याबाबत ज्यांना आक्षेप दाखल करावयाचे आहेत अशा सर्व व्यक्तींना , नोटीस वृत्तपत्रात प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून सात दिवसांच्या आत , त्यांच्या कारणांसह आक्षेप लेखी सादर करण्याबद्दल कळवील.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार , मार्च ११ , २०२२ /फाल्गुन २० , शके १ ९ ४३
(ब) राज्य निवडणूक आयुक्त, ज्यामध्ये अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती , नागरिकांचा मागासवर्ग आणि महिला यांच्यासाठी ( अनुसूचित जातीच्या , अनुसूचित जमातीच्या व नागरिकांच्या मागासवर्गाच्या महिलांसाठी राखून ठेवलेल्या जागांसह) जागा राखून ठेवलेल्या आहेत असे प्रभाग , राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे विनिर्दिष्ट करील . राज्य निवडणूक आयुक्त, नंतरच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता असा कोणताही आदेश संमत करताना, सर्व प्रभागांना अशा आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी नगरपालिका क्षेत्रातील निरनिराळ्या प्रभागांमध्ये अशा जागा, आळीपाळीने राखून ठेवलेल्या आहेत , अशी खात्री करील:
परंतु , असा कोणताही आदेश प्रसिद्ध करण्यापूर्वी राज्य निवडणूक आयुक्त, त्याने करण्याचे योजिलेल्या आदेशाचा मसुदा , नगरपालिका क्षेत्रातील सर्व रहिवाश्यांच्या माहितीसाठी , नगरपालिका कार्यालयातील सूचना फलकावर आणि त्याला योग्य वाटेल अशा नगरपालिका क्षेत्रातील इतर ठिकाणी लावण्याची व्यवस्था करील आणि असा आदेश प्रसिद्ध करण्याचा त्याचा इरादा घोषित करणारी नोटीस , त्या क्षेत्रात प्रसारित होणाऱ्या किमान एका वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याची व्यवस्था करील आणि पूर्वोक्त आदेशाच्या मसुद्याबाबत ज्यांना आक्षेप दाखल करावयाचे आहेत अशा सर्व व्यक्तींना , नोटीस वृत्तपत्रात प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून सात दिवसांच्या आत , त्यांच्या कारणांसह आक्षेप लेखी सादर करण्याबद्दल कळवील . " .
प्रकरण पाच
संकीर्ण
१८८८ चा ३ .
महानगरपालिका , ५. मुंबई महानगरपालिका अधिनियम , महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र नगरपरिषदा ,
नगरपरिषदा व १९ ४ ९ चा ५९ .
नगर पंचायती १९६५ चा
महा . ४०.
यांच्या क्षेत्रांची २०२२ चा
प्रभागांमध्ये विभागणी महा . २१ .
करण्याची प्रक्रिया रद्द करणे .
नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ ( यात यापुढे ज्यांचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे) आणि त्याखाली केलेले नियम यांमध्ये काहीही अंतर्भूत असले तरी , जेथे मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा , नगर पंचायती व औद्योगिक नगरी ( सुधारणा) अधिनियम , २०२२ , याच्या प्रारंभाच्या दिनांकापूर्वी, राज्य निवडणूक आयुक्ताने , महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगर पंचायती यांच्या क्षेत्रांची प्रभागांमध्ये विभागणी करण्याची आणि त्यांच्या हद्दी विनिर्दिष्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली असेल किंवा पूर्ण केली असेल तेथे, ती प्रक्रिया , रद्द करण्यात आली असल्याचे मानण्यात येईल आणि उक्त महानगरपालिकांच्या, नगरपरिषदांच्या व नगर पंचायतींच्या क्षेत्रांची प्रभागांमध्ये विभागणी करण्याची आणि त्यांच्या हद्दी विनिर्दिष्ट करण्याची प्रक्रिया, या अधिनियमाद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या उक्त अधिनियमांच्या तरतुदींनुसार नव्याने करण्यात येईल .
RUPENDRA DINESH MORE , ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 OF EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .