Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग चार, असा. क्रमांक २६, प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४. गुरुवार, मार्च १७, २०२२/फाल्गुन २६, शके १९४३.

Published 17 March 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-03-17.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, मार्च १७, २०२२/फाल्गुन २६, शके १९४३ १ RNI No. MAHBIL /2009/35530

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष ८, अंक १०] गुरुवार, मार्च १७, २०२२/फाल्गुन २६, शके १९४३ [पृष्ठे २, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक २६

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

पृष्ठे १-२ सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४.--- महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तींचे विनियमन) . .

अधिनियम, २०१७ यामध्ये सुधारणा करण्याकरिता अधिनियम . . . .

दिनांक १६ मार्च २०२२ रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.

सतीश वाघोले,

प्रभारी सचिव (विधि विधान),

महाराष्ट्र शासन, विधि व न्याय विभाग.

सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४.

(माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर " महाराष्ट्र शासन राजपत्रात " दिनांक १७ मार्च २०२२ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.) महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशतर्ींचे विनियमन) अधिनियम, २०१७ यामध्ये सुधारणा करण्याकरिता अधिनियम.

२०१७ चा महा. ६१.

ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी, महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशतर्ींचे विनियमन) अधिनियम, २०१७ यात सुधारणा करणे इष्ट आहे ; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या याहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :----

संक्षिप्त नाव. १. या अधिनियमास, महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशतर्ींचे विनियमन) (सुधारणा) अधिनियम, २०२२, असे म्हणावे. (१) भाग चार-२६---१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, मार्च १७, २०२२/फाल्गुन २६, शके १९४३ २०१७ चा महा. ६१.

२. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशतर्ींचे विनियमन) अधिनियम, २०१७ (यात यापुढे ज्याचा निर्देश ""मुख्य अधिनियम"" असा केलेला आहे), याच्या कलम १ मधील, पोट-कलम (३) ऐवजी, पुढील पोट-कलम दाखल करण्यात येईल :------

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६१ याच्या कलम १ ची सुधारणा.

""(३) (क) कलम ७ खेरीज करून, या अधिनियमाच्या तरतुदी, दहा किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी नोकरीवर ठेवणाया आस्थापनांना लागू असतील.

(ख) कलमे ७ व ३६क यांच्या तरतुदी, दहापेक्षा कमी कर्मचारी नोकरीवर ठेवणाया आस्थापनांना लागू असतील."".

३. मुख्य अधिनियमाच्या कलम १७ मधील, खंड (छ) वगळण्यात येईल.

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६१ याच्या कलम १७ ची सुधारणा.

४. मुख्य अधिनियमाच्या कलम ३६ नंतर, पुढील कलम समाविष्ट करण्यात येईल :------

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६१ यामध्ये नवीन कलम ३६क समाविष्ट करणे.

""३६क. (१) कलम ६ अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक आस्थापनेचा किंवा ज्या आस्थापनेला कलम नामफलक मराठीत असणे.

७ लागू आहे त्या प्रत्येक आस्थापनेचा नामफलक, देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असेल :

परंतु, अशा आस्थापनेच्या नियोक्त्याकडे, देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरिक्त्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक देखील असू शकतील :

परंतु आणखी असे की, मराठी भाषेतील अक्षरलेखन, नामफलकावर सुरुवातीलाच लिहिणे आवश्यक असेल आणि मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार, इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही.

(२) ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते, अशी आस्थापना, नामफलकावर महान व्यक्त्तींची किंवा गड-किल्ल्यांची नावे लिहिणार नाही."".

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 17 March 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-03-17.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-03-17.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-.