RNI No. MAHBIL/2009/31743
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार-ब
वर्ष ८ , अंक ६]
गुरुवार ते बुधवार, मार्च २४-३० , २०२२/चैत्र ३ - ९ , शके १९ ४४
[पृष्ठे ४, किंमत: रुपये २०.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले ( भाग एक, एक- अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश.
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२, दिनांक १५ फेब्रुवारी २०२२
अधिसूचना
महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवास्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष अधिनियम , १ ९ ६०.
क्रमांक स्मारक २०२० /प्र.क्र.९ ८/सां.का.३ . - ज्याअर्थी, शासनाच्या अधिसूचनेनुसार क्र. महाराष्ट्र शासनाने या सोबत असलेल्या अनुसूचीत निर्दिष्ट प्राचीन व ऐतिहासिक स्मारक संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा इरादा असल्याची महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवास्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष अधिनियम, १ ९ ६० ( सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १२ ) या अधिनियमाच्या कलम ४ च्या पोट - कलम (१ ) मधील तरतुदीनुसार दोन महिन्याची नोटीस दिली होती ;
आणि ज्याअर्थी, असे स्मारक संरक्षित म्हणून घोषित करण्यासंबंधी शासनाकडे कोणत्याही हरकती आलेल्या नाहीत.
त्याअर्थी, आता , महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवास्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष अधिनियम , १ ९ ६० ( सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १२ ) या अधिनियमाच्या कलम ४ च्या पोट- कलम (३ ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे उक्त प्राचीन व ऐतिहासिक स्मारक संरक्षित स्मारक असल्याचे जाहीर करत आहे.
भाग चार-ब-१
(१) २
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, मार्च २४-३० , २०२२/चैत्र ३ - ९ , शके १ ९ ४४
अनुसूची
स्थान : खर्डा
जिल्हा : अहमदनगर
तालुका : जामखेड
सर्व्हे/गट क्र. : - १२२४, १७३६/२ , १७३६/३
स्मारकाचे नाव
: निंबाळकर गढी, निंबाळकर छत्री , ओंकारेश्वर मंदिर व बारव.
मालकी
: रयत शिक्षण संस्था व इतर.
:
तपशील
पेशवाईत मराठे व निजाम यांच्यात झालेल्या खर्थ्याच्या ऐतिहासिक लढाईत सरदार निंबाळकर यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांची निष्ठा व शौर्य यांची साक्ष देणारे त्यांचे निवासस्थान म्हणजे निंबाळकर गढी होय. सरदार निंबाळकर यांनी शेवटपर्यंत येथे वास्तव्य केले . गढी सोबत त्यांची समाधी असून त्यांचे आराध्य दैवत असलेले ओंकारेश्वर मंदिर व बारव या महत्त्वपूर्ण वास्तूआहेत.
संरक्षित करावयाच्या : (१ ) निंबाळकर गढी : - लांबी २१० मी. x रुंदी १८० मी. = ३७८०० चौ.मी.
स्मारकाचे क्षेत्रफळ.
(२ ) निंबाळकर छत्री : - लांबी ३७ मी. x रुंदी २५ मी. = ९ २५ चौ.मी.
(३ ) ओंकारेश्वर मंदिर व बारव : - लांबी १७५ मी. x रुंदी १५० मी. = २६२५० चौ. मी.
: उपनिर्दिष्ट स्मारकांच्या प्रत्येक बाजूकडून ५ मीटरपर्यंतचे क्षेत्र.
संरक्षित करावयाच्या स्मारकाभोवतालचे क्षेत्र.
: (१) निंबाळकर गढी
संरक्षित करावयाच्या क्षेत्राच्या चतूःसीमा.
पश्चिम : राघोबा गोलेकर व बाबुरामा गोलेकर यांची जागा ;
पूर्व: रस्ता; उत्तर : रस्ता ;
दक्षिण : केशव पाटील व बलभिम गोलेकर , भैरु येवले यांची जागा.
(२ ) निंबाळकर छत्री
पूर्व : अप्पा आंदळकर यांची जागा ; पश्चिम: रस्ता; उत्तर : बारव ; दक्षिण : संजय कुंभार यांची जागा.
(३ ) ओंकारेश्वर मंदिर व बारव
पूर्व : पप्पू कोरे यांची जागा ;
पश्चिम : नाळे शेत जमीन ;
उत्तर : गावठाण ; दक्षिण: नाळे वस्ती.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
विलास रा. थोरात,
शासनाचे उप सचिव.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार- ब गुरुवार ते बुधवार , मार्च २४-३० , २०२२/चैत्र ३ - ९ , शके १ ९ ४४
TOURISM AND CULTURAL AFFAIRS DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated 15th February , 2022
NOTIFICATION
MAHARASHTRA ANCIENT MONUMENTS AND ARCHAEOLOGICAL SITES AND REMAINS ACT, 1960 .
No. SPM - 2020/C.R.98/C.A.3 . Whereas , by Government Notification , the Government of Maharashtra had given two months notice of its intention to declare the ancient and historical monument specified in the Schedule appended to here to be a protected monument , AS REQUIRED BY SUB - SECTION ( 1 ) OF SECTION 4 OF THE MAHARASHTRA ANCIENT MONUMENT AND ARCHAEOLOGICAL SITES AND REMAINS ACT , 1960 ( MAH . XII OF 1961) ; the Government has not received any objection to the making of such declaration.
Now , therefore , in exercise of the powers conferred by sub - section (3) of section 4 of the Maharashtra Ancient Monuments and Archaeological Sites and Remains Act , 1960 ( Mah . XII of 1961) , the Government of Maharashtra hereby declare the said ancient and historical monument to be a protected monument.
Schedule
Taluka: Jamkhed
Locality: Kharda
District : Ahmadnagar Survey/Gat No. 1224 , 1736/2 , 1736/3
: Nimbalkar Gadhi , Nimbalkar Chhatri , Omkareshwar Temple and Barav .
Name of the Monument to be protected .
Ownership
: Rayat Shikshan Sanstha and others .
Particulars
: Sardar Nimbalkar played a vital role in the Battle of Kharda which was fought between Maratha and Nizam during Peshwa period . Nimbalkar wada at Kharda which tells us the stories of loyalties and braveness of Sardar Nimbalkar . Sardar Nimbalkar lived here till his last breath . In front of this Wada important monument like his samadhi ( Grave ) is , the temple of their clan deity Omkareshwar and Barav ( step well ) are located .
: ( 1) Nimbalkar Gadhi : length 210m . x width 180m = 37800 Sq.m. ( 2) Nimbalkar Chhatri : length 37m . x width 25m = 925 Sq.m. Area of the Monument to be Protected.
( 3 ) Omkareshwar Temple and Barav ( step well ) : length 175m.x width 150m 26250 Sq.m.
Total Area around : 5 meters on all sides of the above mentioned area .
the Monument to be protected.
४
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार- ब गुरुवार ते बुधवार , मार्च २४-३० , २०२२/चैत्र ३ - ९ , शके १ ९ ४४
Boundaries
(1) Nimbalkar Gadhi
East: Road ;
West : Raghoba Gholekar and Baburama Gholekar's land ;
North: Road ;
South : Keshav Patil , Balbhim Gholekar and Bairu Yeole's land .
( 2) Nimbalkar Chhatri
East : Appa Aandalkar's land ;
West : Road ;
North : Barav ( step well ) ;
South : Sanjay Kumbhar's land .
( 3 ) Omkareshwar Temple and Barav ( Step Well ) ;
East : Pappu Kore's land ;
West : Nale's Agricultural land ;
North : Gaonthan ;
South : Nale's settlement ( vasti) .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
VILAS R. THORAT , Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .