RNI No. MAHBIL/ 2009/ 37831
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार- ब
रविवार, मार्च २७ , २०२२/चैत्र ६, शके १ ९ ४४
वर्ष ८ , अंक ३९]
[पृष्ठे २ , किंमत : रुपये ९ .००
असाधारण क्रमांक ९ ३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
मंत्रालय, मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक २७ मार्च , २०२२ .
आदेश
महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षा अधिनियम, २०१७ .
क्र. मेसमा-२०२२/प्र.क्र-४८/ऊर्जा-५. - ज्याअर्थी, विद्युत अधिनियम , २००३ ( २००३ च्या ३६ ) खालील परवानेधारक, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित ( यापुढे ज्यास ' सदर परवानेधारक' असे संबोधण्यात आले आहे ) हे महाराष्ट्र राज्यामध्ये वीज पुरवठा करण्याबाबतच्या सेवांमध्ये व्यस्त आहेत ;
आणि ज्याअर्थी, सदर परवानेधारक कंपनींचे कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता आहे ;
आणि ज्याअर्थी , महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षा अधिनियम, २०१७ च्या (महाराष्ट्र २०१८ चा १८ ) कलम २ च्या खंड (अ) च्या उपखंड (दोन) अन्वये , वीज पुरवठयाशी संबंधित असलेली कोणतीही सेवा ही अत्यावश्यक सेवा आहे ;
आणि ज्याअर्थी, सदर परवानेधारक कंपनींच्या अत्यावश्यक सेवेमध्ये संप करण्यास प्रतिबंध करणे सार्वजनिक हितास्तव आवश्यक आहे, अशी महाराष्ट्र शासनाची खात्री पटली आहे ;
त्याअर्थी आता, महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षा अधिनियम, २०१७ च्या (महाराष्ट्र २०१८ चा १८ ) कलम ४ च्या उपकलम (१) यासह कलम २ च्या खंड (अ) च्या उपखंड (दोन) अन्वये दिलेल्या अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्र शासन, याद्वारे , सदर परवानेधारक कंपनींच्या अत्यावश्यक सेवेमध्ये संप करण्यास महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये सदर आदेश प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून प्रतिबंध करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
प्रशांत पुं. बडगेरी , शासनाचे उप सचिव.
(१)
भाग चार-ब- ९३-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, रविवार , मार्च २७ , २०२२ /चैत्र ६ , शके १ ९ ४४
INDUSTRIES , ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Mantralaya , Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mumbai 400 032 , dated the 27th March , 2022
ORDER
MAHARASHTRA ESSENTIAL SERVICES MAINTENANCE ACT , 2017 .
No. MESMA - 2022/CR - 48 /Energy - 5.-Whereas , the Maharashtra State Power Generation Company Limited , Maharashtra State Electricity Transmission Company Limited and Maharashtra State Electricity Distribution Company Limited ( hereinafter referred to as 'the said Licensees ' ) licensees under the Electricity Act , 2003 ( 36 of 2003 ) , are engaged in the services connected with the supply of electricity in the State of Maharashtra;
And whereas , employees of the said Licensees are likely to go on strike ;
And whereas , any service connected with the supply of electricity is an essential service within the meaning of sub- clause ( ii) of clause (a) of section 2 of the Maharashtra Essential Services Maintenance Act , 2017 ( Mah . XVIII of 2018 ) ;
And whereas , the Government of Maharashtra is satisfied that in the public interest , it is necessary to prohibit strike in the said essential service provided by the said Licensees ;
Now , therefore, in exercise of the powers conferred by sub- section (1) of section 4 read with sub - clause ( ii) of clause (a) of section 2 of the Maharashtra Essential Services Maintenance Act , 2017 ( Mah . XVIII of 2018 ) , the Government of Maharashtra hereby prohibits strike in the said essential service provided by the said Licensees from the date of publication of this Order in the Maharashtra Government Gazette .
By order and in the name of the Governor of Maharashtra,
PRASHANT P. BADGERI , Deputy Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .