|
सामान्य प्रशासन विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,
दिनांक ३१ मार्च २०२२
अधिसूचना
क्रमांक डीआयपी-२०२२/प्र. क्र. ३७/३०.-----ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुधीर गजानन जोशी यांचे गुरुवार दिनांक १७ फेब्रुवारी, २०२२
रोजी मुंबई येथे झालेल्या दु:खद निधनाबद्दल राज्य मंत्रिमंडळाने खालीलप्रमाणे ठराव पारित करून श्रध्दांजली अर्पण केली.
ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुधीर गजानन जोशी यांचे गुरुवार दि. १७ फेब्रुवारी २०२२ रोजी मुंबई येथे निधन झाले. मराठी भूमिपुत्रांच्या न्याय
हक्कांसाठी लढा उभा करणारे माजी मंत्री सुधीर जोशी यांच्या निधनाबद्दल राज्य मंत्रिमंडळ तीव्र शोक व्यक्त करीत आहे.
सुधीर जोशी यांचा जन्म दि.२५ मे १९४० रोजी दादर येथील व्यापारी कुटुंबात झाला. त्यांनी विज्ञान शाखेतून रसायनशास्त्राची पदवी घेतली
होती. ते शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय सहकारी राहीले. मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठीच्या
अनेक आंदोलनात ते पुढे होते. ते १९६८ मध्ये मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले. त्यांनी तिथे गटनेता, विरोधी पक्षनेता म्हणूनही
आपल्या कामाचा ठसा उमटवला. मुंबई महापालिकेचे सर्वात तरूण महापौर होण्याचा मानही त्यांनी १९७३ मध्ये पटकावला होता. नोकयांमध्ये
मराठी माणसांचा टक्का वाढलाच पाहिजे यासाठी ते आग्रही होते. त्यासाठी स्थापन झालेल्या स्थानीय लोकाधिकार समितीचे ते १९७७ पासून २० वर्षे
अध्यक्ष होते.
स्वर्गीय जोशी विधिमंडळात १९८५ ते १९९७ अशा सलग दोन कालावधीसाठी आणि त्यानंतर जानेवारी १९९८ पासून पुढे असा दीर्घ काळ
विधान परिषद सदस्य होते. या दरम्यान त्यांनी जुलै १९९३ ते जुलै १९९४ विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता म्हणून काम केले. या काळात त्यांनी
निष्कर्ष
राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांचा प्रत्यक्ष पाहणी अहवाल '
' पुस्तिकेद्वारे सादर केला होता.
स्व. जोशी यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात मार्च ते जून १९९५ महसूल ; जून १९९५ ते मार्च १९९६ महसूल आणि शालेय शिक्षण आणि पुढे
मे १९९६ ते जुलै १९९९ शालेय शिक्षण अशा खात्यांचे मंत्रीपदही भुषवले होते. महसूल आणि शिक्षण मंत्री म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा ठसा
उमटवला.
स्व. जोशी यांचे अनेक सामाजिक आणि राजकीय संस्था, संघटनांच्या वाटचालीत योगदान राहिले आहे. या संस्था, संघटनांचे त्यांनी अध्यक्ष
म्हणून र्िनविवादपणे नेतृत्व केले. यातून त्यांच्या संघटना बांधणीचा आणि नेतृत्वगुणांचा आवाका लक्षात येतो. स्व. जोशी नव बालोद्यान ट्रस्ट, साने
गुरुजी विद्यालय-दादर, सार्वजनिक वाचनालय-दादर, जसलोक रुग्णालय कर्मचारी संघटना, जाणीव प्रतिष्ठान-मुंबई, राष्ट्रीय शिक्षक कल्याण प्रतिष्ठान
ं
राज्य कार्यकारी समिती, महाराष्ट्र राज्य प्रौढ शिक्षण संस्था-औरंगाबाद, जवाहर बालभवन मु
बई, महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक र्िनमिती व अभ्यासक्रम
संशोधन मंडळ - पुणे, राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था (बालचित्रवाणी)- पुणे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद-मुंबई, ग्राहक संरक्षण कक्ष, एअर
इंडिया केबिन क्रू असोसिएशन, सिमेंट कंपनी स्टाफ असोसिएशन, बँक कर्मचारी सेना, महाराष्ट्र दूध वितरक सेना, महाराष्ट्र शेती महामंडळ यांचे
अध्यक्ष होते. |
|
|
याशिवाय ते गरवारे क्लब, सी. के. पी. को-ऑप बँक लि., वनिता समाज दादर-मुंबई, शिवाई सेवा ट्रस्ट यांचे संचालक, सल्लागार होते.
स्व. जोशी बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी सेना, इंडियन ओव्हरसिज कर्मचारी सेना, कॅनरा बँक कर्मचारी सेना, बँक कर्मचारी महासंघ, नाबार्ड
कर्मचारी सेना, विमा कर्मचारी सेना यांचेही अध्यक्ष होते. मितभाषी पण मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी प्रसंगी आक्रमक होणाया स्व. जोशी
यांच्या धडाक्यामुळे अनेक मराठी होतकरू तरुणांचा खाजगी आणि केंद्र सरकारी आस्थापनांमध्ये प्रवेश सुकर झाला. रस्त्यावरच्या लढाईतही ते
कुठेही मागे राहीले नाहीत. यामुळे कार्पोरेट कंपन्यांनाही स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगाराबाबतची भूमिका बदलावी लागली होती. परिणामी आज अनेक
मराठी कुटुंबांना रोजगारासह, शिक्षण, उद्योग-व्यवसायांमध्ये स्थैर्य लाभू शकले आहे. या स्थैर्यामुळेच त्यानंतरच्या पिढयांना प्रगती साधता आली आहे.
अशा या अभ्यासू, संघर्षशील ज्येष्ठ नेत्याचे माजी मंत्री सुधीर जोशी यांचे गुरुवार दि. १७ फेब्रुवारी २०२२ रोजी मुंबई येथे दुःखद निधन झाले.
ं
त्यांच्या निधनामुळे पक्षाशी अखेरपयर्ंत एकनिष्ठ आणि मु
बई, महाराष्ट्रातील भूमिपुत्रांच्या सुख-दुःखाशी समरस झालेले नेतृत्व हरपले आहे.
ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांच्या निधनाबद्दल राज्य मंत्रिमंडळ तीव्र शोक व्यक्त करत असून राज्य मंत्रिमंडळाने व्यक्त केलेल्या भावना ज्येष्ठ
नेते सुधीर जोशी यांच्या कुटुंबियांना कळविण्यात याव्यात.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
मनु कुमार श्रीवास्तव,
मुख्य सचिव. |
|