Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग चार असा. क्र. 3३ (७-०४-२०२२) सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३१, महाराष्ट्र राज्यातिल स्थानिक प्राधिकरणांच्या शासकीय प्रयोजनांसाठी मराठी भाषेचा वापर करण्याकरिता तरतूद करण्यासाठी अधिनियम.

Published 07 April 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-04-07.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/35530

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

गुरुवार , एप्रिल ७ , २०२२/चैत्र १७ , शके १ ९ ४४

वर्ष ८ , अंक १३ ]

[पृष्ठे ५ , किंमत: रुपये २३.००

असाधारण क्रमांक ३३

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३१.- महाराष्ट्र राज्यातील स्थानिक प्राधिकरणांच्या शासकीय प्रयोजनांसाठी मराठी भाषेचा वापर करण्याकरिता तरतूद करण्यासाठी अधिनियम. पृष्ठे १-५ दिनांक ५ एप्रिल २०२२ रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे , प्रसिद्ध करण्यात येत आहे .

सतिश वाघोले, प्रभारी सचिव (विधि विधान ) , महाराष्ट्र शासन , विधि व न्याय विभाग .

सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३१.

( माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर " महाराष्ट्र शासन राजपत्रात " दिनांक ७ एप्रिल २०२२ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला

अधिनियम.)

महाराष्ट्र राज्यातील स्थानिक प्राधिकरणांच्या शासकीय प्रयोजनांसाठी मराठी भाषेचा वापर करण्याकरिता तरतूद करण्यासाठी अधिनियम.

ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्यातील स्थानिक प्राधिकरणांच्या शासकीय प्रयोजनांसाठी मराठी भाषेचा वापर करण्याकरिता तरतूद करणे इष्ट आहे ; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या त्र्याहत्तराव्या वर्षी, याद्वारे , पुढील अधिनियम करण्यात येत आहे :-

भाग चार-३३-१

१. या अधिनियमास , महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरणे ( राजभाषा ) अधिनियम , २०२२ , असे म्हणावे. संक्षिप्त नाव . (१) २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार , एप्रिल ७ , २०२२ /चैत्र १७ , शके १ ९ ४४

व्याख्या.

२. या अधिनियमात , संदर्भानुसार दुसरा अर्थ आवश्यक नसेल तर , -

(क) " नियुक्ती प्राधिकारी " याचा अर्थ, ज्याला स्थानिक प्राधिकरणात किंवा त्याच्या कोणत्याही विभागामध्ये किंवा कार्यालयामध्ये कर्मचारी नियुक्त करण्याचा अधिकार आहे असे कोणतेही स्थानिक प्राधिकरण किंवा त्याचा कोणताही अधिकारी किंवा प्राधिकारी , असा आहे ;

(ख) " शिस्तभंगविषयक प्राधिकारी " याचा अर्थ , कर्मचाऱ्यांना लागू असलेले शिस्तीशी संबंधित असणारे नियम व विनियम या अन्वये शास्ती लादण्यासाठी सक्षम असलेला प्राधिकारी , असा आहे ;

१९ ६५ चा महा . ५ .

(ग) " जिल्हा मराठी भाषा समिती " याचा अर्थ, महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १ ९ ६४ याच्या कलम ५ड अन्वये प्रत्येक जिल्ह्यामध्ये घटित केलेली जिल्हा मराठी भाषा समिती , असा आहे ;

(घ) " कर्मचारी " याचा अर्थ , स्थानिक प्राधिकरणाच्या कार्यालयातील कर्मचारी किंवा अधिकारी म्हणून नोकरीस असलेली कोणतीही व्यक्ती , असा आहे आणि यात , कंत्राटी तत्त्वावर नोकरीस असलेल्या व्यक्तींचा देखील समावेश होतो ;

(ङ) " स्थानिक प्राधिकरण " याचा अर्थ ,-

(एक) महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत , औद्योगिक नगरी , जिल्हा परिषद, पंचायत समिती , ग्रामपंचायत , अन्य कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था किंवा नियोजन प्राधिकरण; किंवा

( दोन) राज्य शासनाची मालकी असलेली , त्याचे नियंत्रण असलेली किंवा त्याने निधी पुरवठा केलेली वैधानिक महामंडळे , शासकीय कंपन्या किंवा कोणतेही प्राधिकरण,

असा आहे ;

(च) " मराठी " याचा अर्थ, वेळोवेळी काढलेल्या शासन निर्णयांन्वये राज्यात जिचा अंगीकार केला आहे, अशी देवनागरी लिपीतील मराठी भाषा , असा आहे ;

(छ) " मराठी भाषा अधिकारी " याचा अर्थ, कलम ५ अन्वये मराठी भाषा अधिकारी म्हणून पदनिर्देशित केलेला अधिकारी , असा आहे ;

(ज) " विहित " याचा अर्थ , नियमांद्वारे विहित केलेले , असा आहे ;

وو (झ) " राज्य शासन " याचा अर्थ , महाराष्ट्र शासन , असा आहे ;

१९ ६५ चा महा. ५ .

(ञ) " राज्य मराठी भाषा समिती " याचा अर्थ , महाराष्ट्र राजभाषा अधिनियम , १९ ६४ याच्या कलम ५क अन्वये घटित केलेली राज्य मराठी भाषा समिती , असा आहे .

स्थानिक शासकीय भाषा. प्राधिकरणांची

३. ( १ ) महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक प्राधिकरणांची शासकीय भाषा , मराठी असेल. मराठी ही , पोट - कलम ( २ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या शासकीय प्रयोजनांखेरीज , पुढील प्रयोजनांसह , स्थानिक प्राधिकरणांच्या सर्व कार्यालयांमधील सर्व शासकीय प्रयोजनांसाठी तसेच जनसंवाद व जनहित या संबंधातील प्रयोजनांसाठी वापरावयाची भाषा असेल :-

(क) स्थानिक प्राधिकरणाच्या सर्व कार्यालयांचा सर्व अंतर्गत व्यवहार किंवा कामकाज ;

(ख) स्थानिक प्राधिकरणाच्या कार्यालयाने राज्यातील जनतेबरोबर करावयाचे सर्व संदेशवहन व पत्रव्यवहार ;

(ग ) सर्व टिप्पण्या , मसुदे, आणि त्यावरील सर्व शेरे , अभिप्राय व मते, नियमपुस्तिका, कोणतीही प्रशासकीय कार्यवाही , उपविधि , सर्व प्रकारच्या सूचना , कोणतेही प्रशासकीय काम व कामकाज, योजना , कार्यक्रम , धोरणे , निर्णय , ठराव, प्रशासकीय व इतर अहवाल, प्रसिद्धीपत्रके , निमंत्रण पत्रिका, नाममुद्रित पत्रे , बैठकींचा पत्रव्यवहार, बैठकींचे इतिवृत्त किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या कोणत्याही कार्यालयाने काढावयाचे, जनसंवाद व जनहित यांच्याशी संबंधित असणारे इतर कोणतेही दस्तऐवज ;

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार , एप्रिल ७ , २०२२ /चैत्र १७ , शके १ ९ ४४

(घ) स्थानिक प्राधिकरण किंवा त्याचा कोणताही विभाग किंवा त्याचे कार्यालय यांनी किंवा त्यांच्या वतीने द्यावयाची किंवा निर्गमित करावयाची कोणतीही अनुज्ञप्ती , परवाना , प्रमाणपत्र , निविदा किंवा जाहिरात ;

(ङ) स्थानिक प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये वापरण्यात यावयाचे सर्व प्रमाण नमुने , प्रपत्रे किंवा नोंदवह्या अथवा जनसंवाद व जनहित यांच्याशी संबंधित असणारे इतर कोणतेही दस्तऐवज ;

(च) स्थानिक प्राधिकरणातील किंवा त्याच्या कोणत्याही विभागातील किंवा कार्यालयातील सर्व संकेतफलक, नामफलक, सूचना फलक आणि जनसंवाद व जनहित यांच्याशी संबंधित असणाऱ्या इतर कोणत्याही प्रदर्शक बाबी ;

( छ) स्थानिक प्राधिकरणाच्या कार्यालयांमध्ये वापरण्यात यावयाचे सर्व शिक्के व मोहोरा ;

(ज) स्थानिक प्राधिकरणाच्या कोणत्याही कार्यालयाने संगणक प्रणालीद्वारे पुरवावयाचे इतर कोणतेही दस्तऐवज किंवा सेवा आणि संकेतस्थळे , उपयोजके, संकेतस्थळद्वार (पोर्टल) यांमार्फत आणि संदेशवहनाच्या अन्य कोणत्याही वीजकीय ( इलेक्ट्रॉनिक) मार्गाने करावयाचे जनसंवाद व जनहित यांच्याशी संबंधित असणारे कोणतेही संदेशवहन ;

(झ) विहित करण्यात येतील अशी अन्य कोणतीही शासकीय प्रयोजने .

( २ ) पुढील प्रयोजनांमध्ये, इंग्रजी भाषेचा वापर करता येईल : -

(एक) निव्वळ तांत्रिक व शास्त्रीय स्वरूपाचे संदेशवहन ;

( दोन ) भारतीय राजदूतावास , वाणिज्यिक कार्यालये व व्यापार विषयक आयोग यांसह भारत सरकार व त्याच्या अंतर्गत असलेली कार्यालये यांच्याशी पत्रव्यवहार ;

(तीन ) भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३४६ च्या परंतुकामध्ये निर्दिष्ट केल्याप्रमाणे , ज्या राज्याशी तसा करार केलेला नाही अशा अन्य कोणत्याही राज्य शासनाशी पत्रव्यवहार ;

( चार ) परराष्ट्रीय राजदूतावासाशी किंवा वाणिज्य दूतावासाशी पत्रव्यवहार ;

(पाच) महालेखापालाकडे द्यावयाचे लेखे व महालेखापालाशी पत्रव्यवहार ;

(सहा) वैध अभिप्रायांबाबतची सर्व विवरणपत्रे आणि सर्व वैध अभिप्राय , वैध टाचणे व अभिहस्तांतरण लेखन , उच्च न्यायालयातील व सर्वोच्च न्यायालयातील विवादाशी संबंधित बाबी , वैध संकलने व विधि परीक्षा ;

(सात) वैद्यकीय औषधपत्रे, शवपरीक्षा अहवाल आणि न्यायवैद्यकीय प्रकरणांमधील अहवाल व स्थानिक प्राधिकरणांच्या वैद्यकीय विभागातील अशा इतर तांत्रिक बाबी ;

(आठ) विहित करण्यात येतील अशी इतर कोणतीही प्रयोजने.

या अधिनियमाच्या

प्रभावी ४. या अधिनियमाच्या तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक स्थानिक प्राधिकरण, जनसंवाद व जनहित यांच्याशी संबंधित असणाऱ्या त्याच्या धोरणांमध्ये मराठी भाषेचा वापर करण्यासाठी सुयोग्य तरतुदी करील.

अंमलबजावणीसाठी धोरणांमध्ये तरतुदी करणे.

भाग चार- ३३-२ ४

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार , एप्रिल ७ , २०२२ /चैत्र १७ , शके १ ९ ४४

मराठी भाषा ५. ( १ ) स्थानिक प्राधिकरणाचे प्रत्येक कार्यालय , या अधिनियमान्वये त्याला नेमून दिलेली कार्ये पार पाडण्यासाठी , एखाद्या सुयोग्य अधिकाऱ्यास " मराठी भाषा अधिकारी " म्हणून पदनिर्देशित करील.

अधिकारी

पदनिर्देशित करणे .

( २ ) मराठी भाषा अधिकारी , पुढील कार्ये पार पाडील : -

(क) कार्यालयामध्ये, शासकीय प्रयोजनांसाठी मराठीचा वापर करीत नसल्यासंबंधीची आणि या अधिनियमाच्या तरतुदींची अंमलबजावणी केली जात नसल्यासंबंधीची गाऱ्हाणी स्वीकारणे आणि त्यांचे प्रभावी निवारण करण्यासाठी सहाय्य करणे ; आणि

(ख ) या अधिनियमाच्या आणि त्याखाली केलेल्या नियमांच्या तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सुनिश्चिती करण्यासाठी उपाययोजना करणे .

(३ ) कार्यालय प्रमुख आणि कार्यालयातील अन्य कोणताही अधिकारी व कर्मचारी , या अधिनियमान्वये मराठी भाषा अधिकाऱ्यास नेमून दिलेली कार्ये पार पाडण्यासाठी त्याला आवश्यक ते सहाय्य करतील .

मराठी भाषेच्या वापराबाबत स्वयंप्रेरणेने

प्रकटीकरण.

६. स्थानिक प्राधिकरणाचे प्रत्येक कार्यालय , कलम ३ च्या पोट-कलम ( २) मध्ये नमूद केलेल्या प्रयोजनांव्यतिरिक्त, सर्व कार्यालयीन प्रयोजनांमध्ये तसेच जनसंवाद व जनहित यांच्याशी संबंधित असलेल्या प्रयोजनांमध्ये मराठी भाषेचा वापर केला जात आहे असे, त्याच्या संकेतस्थळावर किंवा इतर कोणत्याही वीजकीय ( इलेक्ट्रॉनिक) साधनावर किंवा जनतेला सहज मिळेल अशा संदेशवहनाच्या इतर कोणत्याही साधनावर स्वयंप्रेरणेने प्रसिद्धकरील.

७. स्थानिक प्राधिकरणाचा प्रशासकीय प्रमुख किंवा विभाग प्रमुख किंवा कार्यालय प्रमुख किंवा कार्यालयाचा नियंत्रण अधिकारी ,-

(क) या अधिनियमाच्या आणि त्याखाली केलेल्या नियमांच्या तरतुदींच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अंमलबजावणी व अनुपालन करण्याची जबाबदारी .

(ख) जिल्हा मराठी भाषा समितीने, राज्य मराठी भाषा समितीने व राज्य शासनाने , वेळोवेळी दिलेल्या सर्व निदेशांच्या व अनुदेशांच्या अनुपालनासाठी ;

(ग) या अधिनियमाच्या आणि त्याखाली केलेल्या नियमांच्या तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी , सर्व आवश्यक सुविधा व सेवा पुरविण्यासाठी ,

जबाबदार असेल .

८. (१ ) जिल्हा मराठी भाषा समिती , पुढील अधिकारांचा वापर करील आणि पुढील कार्ये पार पाडील: - जिल्हा मराठी भाषा समितीचे अधिकार व कार्ये .

(क) या अधिनियमाच्या किंवा त्याखाली केलेल्या नियमांच्या तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील स्थानिक प्राधिकरणाच्या सर्व कार्यालयांना निदेश देणे ;

(ख ) शासकीय प्रयोजनांसाठी तसेच जनसंवाद व जनहित यांच्याशी संबंधित असलेल्या प्रयोजनांसाठी मराठीचा वापर करीत नसल्यासंबंधीच्या आणि या अधिनियमाच्या व त्याखाली केलेल्या नियमांच्या तरतुदींची अंमलबजावणी केली जात नसल्यासंबंधीच्या गाऱ्हाण्यांची व तक्रारींची चौकशी करणे व त्याचे निवारण करणे ;

(ग ) जिल्ह्यातील स्थानिक प्राधिकरणाच्या सर्व कार्यालयांमधून, या अधिनियमाखालील तक्रारींशी किंवा गाऱ्हाण्यांशी संबंधित असलेली आवश्यक माहिती, अभिलेख व अहवाल मागविणे व प्राप्त करणे ;

(घ) या अधिनियमाच्या अंमलबजावणीशी संबंधित असणाऱ्या तक्रारींची किंवा गाऱ्हाण्यांची चौकशी करणे व त्यांचे निवारण करणे आणि त्या शीघ्ररीतीने निकालात काढणे ;

(ङ) या अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले तर, या अधिनियमाच्या तरतुदींचे अनुपालन करण्यासाठी स्थानिक प्राधिकरणाच्या संबंधित कार्यालयास निदेश देणे ;

(च) या अधिनियमाखालील तिची कार्ये पार पाडताना तिने केलेल्या कारवाईबद्दलचा वार्षिक अहवाल या अधिनियमाच्या तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या संबंधातील तिच्या शिफारशींसह राज्य मराठी भाषा समितीला सादर करणे.

( २ ) स्थानिक प्राधिकरणाची कार्यालये, जिल्हा मराठी भाषा समितीच्या निदेशांचे , ते प्राप्त झाल्यापासून पंधरा दिवसांच्या कालावधीच्या आत, अनुपालन करतील आणि जिल्हा मराठी भाषा समितीला अनुपालन अहवाल पाठवतील.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार , एप्रिल ७ , २०२२ /चैत्र १७ , शके १ ९ ४४

९ . राज्य शासनास व राज्य मराठी भाषा समितीस , या अधिनियमाच्या आणि त्याखाली केलेल्या नियमांच्या निदेश देण्याचा तरतुदींची प्रभावी अंमलबजाणी करण्यासाठी, आवश्यक असतील असे निदेश किंवा अनुदेश , स्थानिक प्राधिकरणाच्या अधिकार . सर्व कार्यालयांना देता येतील . स्थानिक प्राधिकरणाची कार्यालये , राज्य शासनाच्या व राज्य मराठी भाषा समितीच्या निदेशांचे पालन करतील .

१०. नियुक्ती प्राधिकारी व शिस्तभंगविषयक प्राधिकारी , या अधिनियमाच्या आणि त्याखाली केलेल्या शिक्षा. नियमांच्या तरतुदींची अंमलबजावणी करीत नसल्यासंबंधीची तक्रार किंवा गाऱ्हाणे प्राप्त झाल्यावर , आवश्यक असल्याचे आढळून आल्यास , संबंधित स्थानिक प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्याविरूद्ध , त्याला लागू असलेल्या अन्य कोणत्याही सेवा नियमांन्वये किंवा विनियमांन्वये शिस्तभंगाची कारवाई सुरू करील. नियुक्ती प्राधिकारी व शिस्तभंगविषयक प्राधिकारी , त्याने केलेल्या अशा शिस्तभंगाच्या कारवाईसंबंधीचा अहवाल , जिल्हा मराठी भाषा समितीला सादर करील.

नियम करण्याचा अधिकार .

११. ( १ ) राज्य शासनास, या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी राजपत्रातील , अधिसूचनेद्वारे नियम करता येतील .

( २) या अधिनियमान्वये केलेला प्रत्येक नियम , तो केल्यांनतर , शक्य तितक्या लवकर , राज्य विधानमंडळाचे अधिवेशन चालू असताना , एकाच अधिवेशनात किंवा लागोपाठच्या दोन अधिवेशनात मिळून एकूण तीस दिवसांचा होईल इतक्या कालावधीसाठी राज्य विधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहापुढे ठेवण्यात येईल , आणि ज्या अधिवेशनात तो अशा रीतीने ठेवण्यात येईल, ते अधिवेशन किंवा त्याच्या लगतनंतरचे अधिवेशन समाप्त होण्यापूर्वी, त्या नियमात कोणताही फेरबदल करण्यास दोन्ही सभागृहे सहमत होतील किंवा असा कोणताही नियम करण्यात येऊ नये याबाबत दोन्ही सभागृहे सहमत होतील तर, त्या आशयाचा त्यांचा निर्णय , राजपत्रात अधिसूचित करतील , आणि तो नियम , असा निर्णय , राजपत्रात प्रसिध्द केल्याच्या दिनांकापासून केवळ अशा फेरबदल केलेल्या स्वरूपातच अंमलात येईल किंवा , यथास्थिति, मुळीच अंमलात येणार नाही ; तथापि , अशा कोणत्याही फेरबदलामुळे किंवा विलोपनामुळे त्या नियमान्वये पूर्वी केलेल्या किंवा करण्याचे वर्जिलेल्या कोणत्याही गोष्टीच्या विधिग्राह्यतेस बाधा येणार नाही .

अडचणी दूर करण्याचा अधिकार .

१२. ( १ ) जर या अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणताना कोणतीही अडचण उद्भवल्यास , राज्य शासनास , प्रसंगानुरूप उद्भवेल त्याप्रमाणे , ती अडचण दूर करण्याच्या प्रयोजनांकरिता , त्यास आवश्यक किंवा इष्ट वाटेल अशी, या अधिनियमाच्या तरतुदींशी विसंगत नसलेली कोणतीही गोष्ट, राजपत्रात प्रसिध्द केलेल्या आदेशाद्वारे , करता येईल :

परंतु , या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून दोन वर्षांचा कालावधी समाप्त झाल्यानंतर , असा कोणताही आदेश काढण्यात येणार नाही .

( २) पोट -कलम ( १ ) अन्वये काढलेला प्रत्येक आदेश , तो काढण्यात आल्यानंतर, शक्य तितक्या लवकर, राज्य विधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवण्यात येईल.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21- A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 07 April 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-04-07.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-04-07.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-.