Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक (कोविपु) असा. क्र. ३१, (८-४-२०२२) भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (महसूल) कुडाळ यांजकडून अधिसूचना भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्हयाचा आणि पारदर्क्कशकतेचा हक्क अधिनियम, २०१३

Published 08 April 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-04-08.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, एप्रिल ८, २०२२/चैत्र १८, शके १९४४ १ RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ८, अंक २१] शुक्रवार, एप्रिल ८, २०२२/चैत्र १८, शके १९४४ [ पृष्ठे ६, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक ३१

प्राधिकृत प्रकाशन

भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (महसूल) कुडाळ यांजकडून

अधिसूचना

भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.

क्रमांक भूसंपादन/मसुरे (आंगणेवाडी)/०२-२०२१/२०२२.----ज्याअर्थी, " भूमिसंपादन, पुनर्वन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ " (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारेे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकिर्ण ११/२०१४/प्र.क्र. ७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश " उक्त अधिसूचना " असा करण्यात आला आहे.) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड अे) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यतील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमिन संपाद करण्याच्या संबंधित अशा जिल्ह्यचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या, सिंधुदुर्ग जिल्ह्यच्या जिल्हाधिकायास यासोबत जोडलेल्या अनुसूची-एक मध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेली जमिन (यात यापुढे जिचा निर्देश " उक्त जमिन " असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त सार्वजनिक प्रयोजन " असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते. ज्याच्या स्वरुपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोन मध्ये दिलेले आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदींन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमी संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीन मध्ये दिलेला आहेत ;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चार मध्ये दिलेला आहे.

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशिल यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाच मध्ये दिलेला आहे ;

(१)

भाग एक (को.वि.पु.)--३१-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, एप्रिल ८, २०२२/चैत्र १८, शके १९४४ त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम ४ अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपयर्ंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही. किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भाराच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकायास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमुद करून अशा उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल ;

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरस्पर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकायांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी " भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ " (यात यापुढे जिचा निर्देश " उक्त नियम " असा करण्यात आला आहे.) यांच्या नियम १० च्या उप नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमी अभिलेखाच्या अद्यावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखिल घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उप विभागीय अधिकारी (महसूल) कुडाळ यांस पदनिर्देशित केलेले आहे.

अनुसूची-एक

जमिनीचे वर्णन

गाव देऊळवाडा, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग

अ.क्र. सव्र्हे नंबर

हिस्सा नंबर अंदाजित क्षेत्र (हेक्टर आर मध्ये) (१) (२) (३)

(४)

१ २२ ० पै

०.८०००

२ २४ ० पै

०.४८५०

३ २५ १ अ ०.०२००

४ २५ १ब +२क ०.०१३०

५ २५ २अ ०.०२००

६ २५ २ब+३ ०.०३३०

७ २५ ४ ०.०४५०

८ २५ ५+६ब ०.०४००

९ २५ ६अ+११क ०.०१००

१० २५ ६क+१२ब ०.०१३०

११ २५ १०ब +११ब ०.०१००महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, एप्रिल ८, २०२२/चैत्र १८, शके १९४४ ३ अनुसूची - एक--चालू (१) (२)

(३)

(४)

भाग एक (को.वि.पु.)--३१-२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, एप्रिल ८, २०२२/चैत्र १८, शके १९४४ अनुसूची - एक--चालू (१) (२)

(३)

(४)

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, एप्रिल ८, २०२२/चैत्र १८, शके १९४४ ५ अनुसूची - एक--चालू

(१) (२)

(३)

(४)

६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, एप्रिल ८, २०२२/चैत्र १८, शके १९४४ अनुसूची - एक--समाप्त

(१) (२)

(३)

(४)

"

अनुसूची-दोन

अनुसूची--तीन

अनुसूची--चार

अनुसूची-पाच

कुडाळ, दिनांक २३ मार्च २०२२.

वंदना खरमाळे, भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (महसूल), कुडाळ.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, २१-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI ४०० ००४ AND PUBLISHEDAT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, २१-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,MUMBAI ४०० ००४. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 08 April 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-04-08.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-04-08.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.