महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--मध्य उप-विभाग
वर्ष ८, अंक १८] सोमवार, एप्रिल १८, २०२२/चैत्र २८, शके १९४४ [पृष्ठे २, किंमत : रुपये ४.००
असाधारण क्रमांक २४
प्राधिकृत प्रकाशन
सामान्य प्रशासन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १८ एप्रिल २०२२
अधिसूचना
क्रमांक डीआयपी-२०२२/प्र.क्र.४८/३०.— महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री ज्येष्ठ नेते स्व. शंकरराव गेणूजी कोल्हे यांचे
बुुधवार, दिनांक १६ मार्च २०२२ रोजी झालेल्या दु:खद निधनाबद्दल राज्य मंत्रिमंडळाने खालीलप्रमाणे ठराव पारित करून
श्रद्धांजली अर्पण केली.
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री ज्येष्ठ नेते स्व. शंकरराव गेणूजी कोल्हे यांचे बुुधवार, दिनांक १६ मार्च २०२२ रोजी निधन झाले. ज्येष्ठ नेते स्व. कोल्हे यांच्या निधनाबद्दल राज्य मंत्रिमंडळ तीव्र शोक व्यक्त करीत आहे.
शंकरराव कोल्हे यांचा जन्म २४ मार्च १९२९ रोजी अहमदनगर जिल्ह्यत कोपरगांव तालुक्यातील येसगाव येथे झाला. त्यांचे शिक्षण बी.एस्सी पयर्ंत झाले होते.
शंकरराव कोल्हे यांनी १९५० मध्ये येसगांवचे सरपंच म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. ते १९६२ मध्ये कोपरगांव पंचायत समितीचे सभापती, १९६२ ते १९७२ या काळात अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य होते. त्यांनी विधानसभेत १९७२, १९७८, १९८०, १९९०, १९९५ व १९९९ असे सहा वेळा कोपरगांव मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यांनी मार्च, १९९० ते मार्च, १९९३ या कालावधीत सहकार, राज्य उत्पादन शुल्क, कृषि / फलोत्पादन, परिवहन तसेच नागरी जमीन कमाल धारणा खात्याचे मंत्रीपद भूषविले होते.
खंडकरी शेतकयांच्या आणि दुध उत्पादकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी लढा दिला. शेतकयांच्या कर्जावरील व्याज कमी करण्यासाठी त्यांनी रिझव्र्ह बँकेवर रुमणे मोर्चा काढला होता. महाराष्ट्र लोकनाटय समितीचे अध्यक्ष म्हणून वृद्ध कलावंतांना मानधन मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते.
शंकरराव कोल्हे यांनी सहकार क्षेत्रात अनेक संस्थांची स्थापना केली. तसेच अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय संस्थांमध्ये त्यांनी संचालक, सदस्य म्हणून कार्य केले. संजीवनी एज्युकेशन सोसायटी, संजीवनी शैक्षणिक ग्रामीण विश्वस्त संस्था, संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम कार्य केले होते.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, एप्रिल १८, २०२२/चैत्र २८, शके १९४४अशा या जेष्ठ नेत्याचे बुुधवार, दिनांक १६ मार्च २०२२ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल राज्य मंत्रिमंडळ तीव्र शोक व्यक्त करत असून राज्य मंत्रिमंडळाने व्यक्त केलेल्या भावना माजी मंत्री, ज्येष्ठ नेते स्व. शंकरराव कोल्हे यांच्या कुटुंबियांना कळविण्यात याव्यात.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
मनु कुमार श्रीवास्तव, शासनाचे मुख्य सचिव.