Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग चार. असाधारण क्रमांक ३६, प्राधिकृत प्रकाशन, सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४ मंगळवार एप्रिल १९, २०२२/चैत्र २९, शके १९४४.

Published 19 April 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-04-19.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, एप्रिल १९, २०२२/चैत्र २९, शके १९४४ १

RNI No. MAHBIL /2009/35530

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष ८, अंक १५] मंगळवार, एप्रिल १९, २०२२/चैत्र २९, शके १९४४ [पृष्ठे ६, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक ३६

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

पृष्ठे १-६ सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३४.--- महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ यात आणखी सुधारणा . . . . .. .. करण्यासाठी अधिनियम.

दिनांक १२ एप्रिल २०२२ रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.

सतिश वाघोले, प्रभारी सचिव (विधि विधान), महाराष्ट्र शासन, विधि व न्याय विभाग.

सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३४.

(मा. राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर ""महाराष्ट्र शासन राजपत्रात"" दिनांक १९ एप्रिल २०२२ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ यात आणखी सुधारणा करण्यासाठी

अधिनियम.

२०१७ चा महा. ६.

ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ यात आणखी सुधारणा करणे इष्ट आहे ; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या याहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :-----

१. या अधिनियमास, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) अधिनियम, २०२२, असे म्हणावे. संक्षिप्त नाव.

भाग चार--३६--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, एप्रिल १९, २०२२/चैत्र २९, शके १९४४ २. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ (यात यापुढे ज्याचा निर्देश, ""मुख्य अधिनियम"" २०१७ चा महा. ६.

असा केला आहे) याच्या कलम २ मध्ये,----

(क) खंड (६३) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येईल :----

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६ याच्या कलम २ ची सुधारणा.

""(६३) ""विद्यापीठ"" याचा अर्थ, अनुसूची क व अनुसूची ख यांमध्ये, नमूद केलेल्या सार्वजनिक विद्यापीठांपैकी कोणतेही विद्यापीठ, असा आहे ;"" ;

(ख) खंड (६४) मधील, ""अनुसूचीमध्ये"" या मजकुराऐवजी ""अनुसूची क मध्ये"" हा मजकूर दाखल करण्यात येईल.

३. मुख्य अधिनियमाच्या कलम ३ मध्ये,----

(क) ""अनुसूची"" हा मजकूर, जेथे जेथे आला असेल तेथे तेथे, त्याऐवजी, ""अनुसूची क"" हा मजकूर, त्याच्या व्याकरणिक फेरफारांसह, दाखल करण्यात येईल ;

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६ याच्या कलम ३ ची सुधारणा.

(ख) पोट-कलम (६) ऐवजी, पुढील पोट-कलम दाखल करण्यात येईल :----

""(६) या अधिनियमामध्ये काहीही अंतभर्ूत असले तरीही,----

२०२२ चा महा. ३४.

(क) अनुसूची ख च्या भाग एकच्या स्तंभ (१) मध्ये विर्िनदिष्ट केलेले प्रत्येक विद्यमान समूह विद्यापीठ, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) अधिनियम, २०२२ याच्या प्रारंभाच्या दिनांकापूर्वी, ज्या दिनांकापासून ते घटित केलेले आहे त्या दिनांकापासून, उक्त भागाच्या स्तंभ (२) व (३) मध्ये विर्िनदिष्ट केलेले अग्रणी महाविद्यालय किंवा परिसंस्था आणि घटक महाविद्यालये किंवा परिसंस्था यांचा समावेश असणारे सार्वजनिक विद्यापीठ असेल आणि ते या अधिनियमान्वये घटित करण्यात आले असल्याचे मानण्यात येईल ;

(ख) राज्य शासनास, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे,----

(एक) केंद्र सरकारद्वारे निर्धारित केलेल्या अशा मानकांची किंवा निकषांची पूर्तता करणारी आणि शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या अटी व शतर्ींचे अनुपालन करणारी, शासकीय महाविद्यालये किंवा शासकीय परिसंस्था किंवा शासकीय अनुदानित महाविद्यालये किंवा शासकीय अनुदानित परिसंस्था यांच्या समूहाचा समावेश असणारे समूह विद्यापीठ घटित करता येईल, आणि त्यात, अशा विद्यापीठाचे अग्रणी महाविद्यालय किंवा परिसंस्था व घटक महाविद्यालये किंवा परिसंस्था विर्िनदिष्ट करता येतील ;

(दोन) अनुसूची ख च्या भाग एक मधील, किंवा यथास्थिति, भाग दोन मधील, समूह विद्यापीठाशी संबंधित असणाया आवश्यक नोंदीची सुधारणा करता येईल किंवा ती समाविष्ट करता येईल ; आणि त्यानंतर, उक्त अनुसूचीमध्ये त्यानुसार सुधारणा करण्यात आली असल्याचे मानले जाईल ;

(तीन) अशा समूह विद्यापीठामध्ये, अधिसूचनेमध्ये विर्िनदिष्ट करण्यात येतील अशा विद्यापीठ प्राधिकरणांचा समावेश असेल आणि ते, अधिसूचनेमध्ये विर्िनदिष्ट करण्यात येतील अशा, विद्यापीठाच्या अधिकारांचा वापर करील व अशी कार्ये पार पाडील अशी तरतूद करता येईल ;

(चार) अधिसूचनेमध्ये विर्िनदिष्ट करण्यात येईल त्याप्रमाणे, राज्य शासनाला आवश्यक वाटतील अशा इतर पूरक, आनुषंगिक व परिणामस्वरूप तरतुदी करता येतील अशी तरतूद करता येईल :

परंतु, अशी प्रत्येक अधिसूचना, ती काढल्यानंतर, शक्य तितक्या लवकर, राज्य

विधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवण्यात येईल."".

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, एप्रिल १९, २०२२/चैत्र २९, शके १९४४ ३

४. मुख्य अधिनियमाच्या कलम ६ मध्ये, पोट-कलम (१) मधील, ""अनुसूचीत"" या मजकुराऐवजी, "" अनुसूची क मध्ये "" हा मजकूर दाखल करण्यात येईल.

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६ याच्या कलम ६ ची सुधारणा.

५. मुख्य अधिनियमाच्या कलम १०९ मध्ये,----

(१) पोट-कलम (३) मधील,----

(एक) खंड (घ) मधील, दुसरे व तिसरे परंतुक आणि त्याखालील तक्ता वगळण्यात येईल ;

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६ याच्या कलम १०९ ची सुधारणा.

(दोन) खंड (च) मधील, तिसरे परंतुक वगळण्यात येईल ;

(तीन) खंड (छ) मधील, दुसया परंतुकाऐवजी, पुढील परंतुक व तक्ता दाखल करण्यात येईल :---

"" परंतु आणखी असे की, २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षासाठी, उच्च शिक्षणाचे नवीन महाविद्यालय किंवा परिसंस्था सुरू करण्यासाठी इरादा पत्र मागण्याचे, अधिष्ठाता मंडळाद्वारे अर्जाची छाननी करण्याचे व ते राज्य शासनाकडे पाठविण्याचे, राज्य शासनाकडून इरादापत्र देण्याचे, अनुपालन अहवालाची छाननी करण्याचे व तो राज्य शासनाकडे पाठविण्याचे आणि राज्य शासनाकडून अंतिम मान्यता देण्याचे दिनांक वाढविण्याच्या दृष्टीने, खाली दिलेल्या तक्त्याच्या स्तंभ (२) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे, पोट-कलम (३) च्या खंड (क), (ग), (घ), (च) व (छ) मध्ये र्िनदिष्ट केलेला दिवस किंवा दिनांक हे, उक्त तक्त्याच्या स्तंभ (३) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे वाचण्यात येतील :----

तक्ता

खंड (१) विद्यमान तरतुदीमध्ये तरतूद केलेला दिवस किंवा दिनांक (२) २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी तरतूद केलेला दिवस किंवा दिनांक (३)
(क) ज्या वर्षी इरादा पत्र मागवले असेल त्या वर्षाच्या अगोदरच्या वर्षाच्या सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसापूर्वी. ३० एप्रिल २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी.
(ग) ज्या वर्षी असा अर्ज विद्यापीठाला प्राप्त झाला असेल त्या वर्षाच्या ३० नोव्हेंबर रोजी किंवा त्यापूर्वी. ३१ मे २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी.
(घ) विद्यापीठाच्या शिफारशीनंतर, लगतनंतरच्या वर्षाच्या ३१ जानेवारी रोजी किंवा त्यापूर्वी. १५ जुलै २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी.
(च) ज्या महिन्यामध्ये अनुपालन अहवाल प्राप्त झाला असेल त्या महिन्याच्या १ मे रोजी किंवा त्यापूर्वी. ३१ जुलै २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी.
(छ) ज्या वर्षी नवीन महाविद्यालये किंवा परिसंस्था सुरू करण्याचे प्रस्तावित केले आहे त्या वर्षाच्या १५ जून रोजी किंवा त्यापूर्वी. १७ ऑगस्ट २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी."";
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, एप्रिल १९, २०२२/चैत्र २९, शके १९४४

(२) पोट-कलम (४) मधील,----

(एक) खंड (क) मधील, परंतुक वगळण्यात येईल ;

(दोन) खंड (घ) मधील, दुसया परंतुकाऐवजी, पुढील परंतुक व तक्ता दाखल करण्यात येईल :---

""परंतु आणखी असे की, २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षासाठी, नवीन अभ्यास पाठयक्रम, विषय, विद्याशाखा, इत्यादी सुरू करण्यासाठी परवानगी मागण्याचा अर्ज करण्याचे, अधिष्ठाता मंडळाद्वारे अर्जाची छाननी करण्याचे आणि तो राज्य शासनाकडे पाठविण्याचे आणि राज्य शासनाकडून परवानगी देण्याचे दिनांक वाढविण्याच्या दृष्टीने, खाली दिलेल्या तक्त्याच्या स्तंभ (२) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे, पोट-कलम (४) च्या खंड (क), (ग) व (घ) मध्ये र्िनदिष्ट केलेला दिवस किंवा दिनांक हे, उक्त तक्त्याच्या स्तंभ (३) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे वाचण्यात येतील :----

तक्ता

खंड (१) विद्यमान तरतुदीमध्ये तरतूद केलेला दिवस किंवा दिनांक (२) २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी तरतूद केलेला दिवस व दिनांक (३)
(क) ज्या वर्षी परवानगी मागितली असेल त्या वर्षाच्या अगोदरच्या वर्षाच्या सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसापूर्वी. ३० एप्रिल २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी.
(ग) ज्या वर्षी अशा अर्जाची छाननी केली असेल व तो राज्य शासनाकडे पाठविला असेल त्या वर्षाच्या १ एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी. ३१ मे २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी.
(घ) ज्या वर्षी राज्य शासनाने परवानगी दिली असेल त्या वर्षाच्या १५ जून रोजी किंवा त्यापूर्वी. ३१ जुलै २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी."".

६. मुख्य अधिनियमास जोडलेल्या अनुसूचीमधील, "" अनुसूची "" या शीर्षाऐवजी "" अनुसूची क "" हे शीर्ष दाखल करण्यात येईल.

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६ यास जोडलेल्या अनुसूचीची सुधारणा.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, एप्रिल १९, २०२२/चैत्र २९, शके १९४४ ५

७. अनुसूची क नंतर, पुढील अनुसूची दाखल करण्यात येईल :----

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६ यामध्ये अनुसूची ख समाविष्ट करणे.

""अनुसूची ख

भाग एक

(कलम ३(६)(क) पहा)

समूह विद्यापीठाचे नाव (१) अग्रणी महाविद्यालयाचे किंवा परिसंस्थेचे नाव (२) घटक महाविद्यालयांची किंवा परिसंस्थांची नावे (३)
१. डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्र्हसिटी, मुंबई. विज्ञान संस्था मुंबई. (१) एल्फिन्स्टन महाविद्यालय, मुंबई, (२) सिडनहॅम महाविद्यालय, मुंबई, आणि (३) माध्यमिक प्रशिक्षण महाविद्यालय, मुंबई.
२. हैद्राबाद (सिंध) नॅशनल कॉलेजीएट विद्यापीठ, मु बई. ं हसाराम रिजुमल वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, चर्चगेट, मुंबई. (१) किशनचंद चेलाराम महाविद्यालय, चर्चगेट, मुंबई, आणि (२) बॉम्बे अध्यापक प्रशिक्षण महाविद्यालय, कुलाबा, मुंबई.
३. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा. यशवंतराव चव्हाण विज्ञान संस्था, सातारा. (१) छत्रपती शिवाजी महाविद्यालय, सातारा, आणि (२) धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा.

भाग दोन

(कलम ३(६)(ख) पहा)

समूह विद्यापीठाचे नाव (१) अग्रणी महाविद्यालयाचे किंवा परिसंस्थेचे नाव (२) घटक महाविद्यालयांची किंवा परिसंस्थांची नावे (३)
."".
६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, एप्रिल १९, २०२२/चैत्र २९, शके १९४४

अडचणी दूर करणे. ८. (१) जर या अधिनियमाद्वारे सुधारणा केलेल्या मुख्य अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणताना कोणतीही अडचण उद्भवल्यास, राज्य शासनास, प्रसंगानुरूप उद्भवेल त्याप्रमाणे, ती अडचण दूर करण्याच्या प्रयोजनासाठी त्यास आवश्यक किंवा इष्ट वाटेल अशी, या अधिनियमाद्वारे सुधारणा केलेल्या मुख्य अधिनियमाच्या तरतुदींशी विसंगत नसेल अशी कोणतीही गोष्ट, राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे करता येईल :

परंतु, असा कोणताही आदेश, या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून दोन वषार्ंचा कालावधी समाप्त झाल्यानंतर काढण्यात येणार नाही.

(२) पोेट-कलम (१) अन्वये काढलेला प्रत्येक आदेश, तो काढल्यानंतर, शक्य तितक्या लवकर, राज्य विधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहासमोर मांडण्यात येईल.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 19 April 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-04-19.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-04-19.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-.