Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I (K.D.S.) Ex.36 (22-4-22), उपविभागीय अधिकारी, पालघर उप विभाग, पालघर, याजंकडून, प्राथमिक अधिसूचना क्रमांक पीडी /भूसं हायब्रीड ॲन्युईटी /कावि 314 /2022.

Published 22 April 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-04-22.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, एप्रिल २२, २०२२/वैशाख २, शके १९४४

RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ८, अंक २४] शुक्रवार, एप्रिल २२, २०२२/वैशाख २, शके १९४४ [पृष्ठे ३, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक ३६

प्राधिकृत प्रकाशन

उपविभागीय अधिकारी, पालघर उप विभाग, पालघर, यांजकडून

हायब्रीड अॅन्युईटी अंतर्गत एम.आय.डी.सी. औद्योगिक सेक्टर पालघर (मान-कल्लाळे-नंडोरे रोड) (कि.मी.०/००० ते ९/

२००) (अर्थन शोल्डरसह दुपरीकरण करुन सुधारणा करणे) प्रकल्पासाठी भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना, करताना

वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अंतर्गत कलम ११ (१) ची अधिसूचना

प्राथमिक अधिसूचना

क्रमांक पीडी/भूसं/हायब्रीड अॅन्युईटी/कावि३१४/२०२२.----ज्याअर्थी भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम,२०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकिर्ण ११/२०१४/प्र.क्र.७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश उक्त्त अधिसूचना असा करण्यात आला आहे.) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त्त अधिनियमाच्या कलम ३ खंड (झेड ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यतील १०,००० हेक्टर पेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात अशा जिल्ह्यचा जिल्हाधिकारी हा उक्त्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल.

आणि ज्याअर्थी, उक्त्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या पालघर जिल्ह्यच्या जिल्हाधिकायास यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त्त जमीन" असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त्त "सार्वजनिक प्रयोजन" असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची दोन मध्ये दिलेले आहे. आणि म्हणून उक्त्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त्त जमिनीची उक्त्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

त्याअर्थी, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त्त अधिनियमाच्या कलम ११ चा पोट-कलम ४अ नुसार कोणतीही व्यक्त्ती ही अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपयर्ंत उक्त्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त्त जमिनीवर कोणतेही भार निर्माण करणार नाही.

परंतु, उक्त्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकायास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु, आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्त्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकायाकडून भरपाई दिली जाणार नाही.

(१)

भाग एक-(को.वि.पु.)-३----१महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, एप्रिल २२, २०२२/वैशाख २, शके १९४४ २ तसेच उक्त्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-नियम (०५) नुसार जिल्हाधिकारी भूमिसंपादन पूनर्वसन व पूनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क महाराष्ट्र नियम २०१४ (यापुढे ज्याचा निर्देश उक्त्त नियम असा करण्यात आला आहे.) यांच्या नियम १० च्या उप-नियम (०३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्यावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पुर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त्त अधिनियमाच्या कलम ३ चा खंड (छ) समुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी, उक्त्त अधिनियमाखालील जिल्हाधिकायाची कार्य पार पाडण्यासाठी पालघर तालुक्याकरिता उपविभागीय अधिकारी, पालघर उप विभाग, पालघर यांस पदनिर्देशित केले आहे.

अनुसूची एक

अ.क्र. गावाचे नाव भूमापन किंवा गट क्र. अंदाजित क्षेत्र हे.आर मध्ये (खाजगी)

(१) (२)

(३)

(४)

१ पडघे

३२७ ०.३७०४ २

३६१

३

३४७

४

३४२

५

३४९

६

४२७/१/१

७

४२७/१/३

८

४२७/१/४

९

४२७/१/५

१०

४०९ ०.१३२१ ११

४२८ ०.०४३८ १२

४२९/२ ०.१२८९ १३

४३० ०.१६७५ १४

४४१ ०.०८२९ १५

४४२ ०.०५३५ १६

४५४ ०.२८२८

एकूण १.२६१९

अनुसूची-२

सार्वजनिक प्रयोजन स्वरुपाचे विवरण

प्रकल्पाचे नाव : हायब्रीड अॅन्युईटी अंतर्गत एम.आय.डी.सी. औद्योगिक सेक्टर पालघर (मान-कल्लाळे-नंडोरे रोड) (कि.मी.०/००० ते ९/२००) (अर्थन शोल्डरसह दुपरीकरण करून सुधारणा करणे) प्रकल्पप्रकल्पाचे वर्णन : हायब्रीड अॅन्युईटी अंतर्गत एम.आय.डी.सी. औद्योगिक सेक्टर पालघर (मान-कल्लाळे-नंडोरे रोड) (कि.मी.०/००० ते ९/२००) (अर्थन शोल्डरसह दुपरीकरण करून सुधारणा करणे) प्रकल्प हा एकूण ०/ ०० ते ९/२०० किमी चा प्रकल्प आहे. समाजाला मिळणारे लाभ : पालघर जिल्हा व तालुक्यातील रेल्वे विभाग व महाराष्ट्र शासन यांनी १०० प्रमाणात खर्च करून हायब्रीड अॅन्युईटी अंतर्गत एम.आय.डी.सी. औद्योगिक सेक्टर पालघर (मान-कल्लाळे-नंडोरे रोड) (कि.मी.०/ ००० ते ९/२००) (अर्थन शोल्डरसह दुपरीकरण करून सुधारणा करणे) प्रकल्प हा एकूण ०/०० ते ९/ २०० किमी चा दुपदरीकरण रस्ता सार्वजनिक कामाकरिता उपयोगात येणार आहे. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, एप्रिल २२, २०२२/वैशाख २, शके १९४४

अनुसूची-३

प्रमाणित करण्यात येते की, हायब्रीड अॅन्युईटी अंतर्गत एम.आय.डी.सी. औद्योगिक सेक्टर पालघर (मान-कल्लाळे-नंडोरे रोड) (कि.मी. ०/ ०० ते ९/२००) (अर्थन शोल्डरसह दुपदरीकरण करुन सुधारणा करणे) साठी भूसंपादन प्रकल्पाच्या आखणीमध्ये समाविष्ट असलेल्या प्रस्तावित जमिनीचे सीमांकन करण्यात आले आहे. प्रस्तावित जमिनीचा ताबा खाजगी वाटाघाटीने अथवा अन्य कोणत्याही मार्गाने घेतलेला नाही.

प्रस्तावामध्ये समाविष्ट भूधारकांच्या जमिनी खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी केल्यानंतर, सदर भूधारक भूमिहीन/अल्पभूधारक होत नाहीत. तथापि, प्रस्तावित जमिनीची संयुक्त्त मोजणी झाल्यानंतर, भूधारक भूमिहीन/अल्पभूधारक होतात अगर कसे? याची त्या भूधारकांनी अन्य ठिकाणी धारण केलेल्या क्षेत्राची पडताळणी करून निश्चिती करण्यात येईल.

प्रकल्पाच्या आखणीमध्ये समाविष्ट वन जमिनी वन विभागाकडून हस्तांतरीत करण्याबाबत आणि त्याप्रमाणे आवश्यक कार्यवाही प्रादेशिक विभाग/प्राधिकरण/महामंडळाच्या वतीने स्वतंत्ररित्या कार्यान्वित करण्यात येत आहे.

प्रकल्पाच्या आखणीमध्ये समाविष्ट शासकीय जमिनी/इतर विभागाच्या जमिनी महामंडळास हस्तांतरीत करण्याबाबत आणि त्याप्रमाणे आवश्यक कार्यवाही प्रादेशिक विभाग/प्राधिकरण/महामंडळाच्या वतीने स्वतंत्ररित्या कार्यान्वित करण्यात येत आहे.

सदरचा प्रस्ताव यापूर्वी प्रादेशिक विभाग/प्राधिकरण/महामंडळ वतीने दाखल करण्यात आलेला नाही.

अनुसूची-४

हायब्रीड अॅन्युईटी अंतर्गत एम.आय.डी.सी. औद्योगिक सेक्टर पालघर (मान-कल्लाळे-नंडोरे रोड) (कि.मी. ०/०० ते ९/२००) (अर्थन शोल्डरसह दुपदरीकरण करून सुधारणा करणे) साठी प्रशासकीय मान्यता मिळालेली असून आदेशाची प्रत सोबत जोडण्यात आलेली आहे.

धनाजी तोरस्कर, सक्षम प्राधिकारी (हायब्रीड अॅन्युईटी) तथा उपविभागीय अधिकारी, पालघर उप विभाग, पालघर.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 22 April 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-04-22.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-04-22.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.