RNI No. MAHBIL/2009/36619
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ८, अंक ४७] सोमवार, जुलै २५, २०२२/श्रावण ३, शके १९४४ [ पृष्ठे ४, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ८३
प्राधिकृत प्रकाशन
सक्षम प्राधिकारी तथा उप विभागीय अधिकारी, उल्हासनगर यांजकडून
भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अंतर्गत
कलम क्र. ११ ची अधिसूचना.
क्रमांक उजि/भूसं (समन्वय)/टे-१/एन.एच-४/आसोडे, बुदर्ुल, नाहेण व उसाटणे/२०२२.------ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (ज्याचा उल्लेख पुढे उक्त अधिनियम असा करण्यात आला आहे) च्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्र. संकीर्ण ११/२०१४/प्र. क्र. ७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश उक्त अधिसूचना असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड-अ) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यतील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता भूमी संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्यचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या, ठाणे जिल्ह्यच्या जिल्हाधिकायास यासोबत जोडलेल्या " अनुसूची-एक " मध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेली जमीन (यापुढे जिचा निर्देश उक्त जमीन असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त " सार्वजनिक प्रयोजन " असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते. ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या " अनुसूची दोन " मध्ये दिलेले आहे. आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत विकास आराखडयातील प्रस्तावित तळोजा एम.आय.डी.सी. ते एन.एच-४ रस्त्यासाठी बाधीत होणाया खाजगी जमिनीची भूसंपादन या प्रकल्पाच्या सार्वजनिक प्रयोजनासाठी मौजे आसोडे, बुदर्ुल, नाहेण व उसाटणे, ता. अंबरनाथ, जि. ठाणे, येथील अनुुसूची-एक मध्ये दर्शविलेल्या जमिनीची आवश्यता भासण्याची शक्यता आहे ;
आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमी संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या " अनुसूची तीन " मध्ये दिलेली आहे.
आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या " अनुसूची चार " मध्ये दिलेला आहे. आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या " अनुसूची पाच " मध्ये दिलेला आहेत.
(१)
त्याअर्थी, आता घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) नुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण-चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपयर्ंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही. परंतू उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकायास विशेष परिस्िथतीची लेखी कारणे नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल. भाग एक-(को.वि.पु).--८३२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, जुलै २५, २०२२/श्रावण ३, शके १९४४ परंतू, आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने, या तरतुदींचे बुद्धीपरस्पर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीचे किंवा क्षतीची जिल्हाधिकायांकडून भरपाई दिली जाणार नाही.
तसेच उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार जिल्हाधिकारी, भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१३ (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त नियम " असा करण्यात आला आहे) यांच्या नियम-१० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमी अभिलेखाच्या अद्ययावती करणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी, ठाणे उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी सक्षम प्राधिकारी तथा उप विभागीय अधिकारी, उल्हासनगर यांस पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची - एक
खरेदी द्यावयाच्या जमिनीचा तपशील
जिल्हा ठाणे, तालुका अंबरनाथ
| अ. क्र. नगर भूमापन गट क्र./सव्र्हे नं. खरेदीने संपादन करावयाचे क्षेत्र (चौ.मी.) (१) (२) (३) | ||
| गावाचे नाव -आसोडे | ||
| १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ | १८ १९ २० २१ २६ २५ २७ २९ ३१ ४८ ४९ ४७ | १३२१.९१ ३२९५.६५ २२२०.७४ २६७८.६३ १५४६.३५ १२२३.४९ ४५३३.४२ ४९०१.९८ १०१११.६६ ६०३९.१६ ५३९४.९२ ११४३.७३ |
| एकूण गावाचे नाव - बुदर्ुल | ४४४११.६४ | |
| १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ | ६ १८ १७ २५ २६ २७ २८ २९ | ७८९०.२३ २१५९.८८ ३०९६.५८ ६३२.१५ ६८००.५१ २९३३.६६ ३६६५.४४ ७९९५.७१ |
| एकूण गावाचे नाव - नाहेण | ३५१७४.१६ | |
| १ २ ३ ४ | ४३ ४२ ४१ ४५ | ८१६.४२ ६४२.५९ ७६७.६८ २१.८१ |
| एकूण गावाचे नाव - उसाटणे | २२४८.५० | |
| १ २ ३ ४ ५ ६ ७ | २३ २४ २८ २५ २७ ४३ ४० | ५७.९४ ३५५९.८६ ९९५.२८ २८३३.५७ ४५९०.८७ २३.४१ १००५९.१२ |
| एकूण | २२१२०.०५ |
अनुसूची - दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव :-- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत विकास आराखडयातील प्रस्तावित तळोजा एम.आय.डी.सी. ते एन.एच.-४ रस्ता प्रकल्प.
प्रकल्पाचे वर्णन :-- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत विकास आराखडयातील प्रस्तावित तळोजा एम.आय.डी.सी. ते एन.एच.-४ रस्ता प्रकल्प या प्रकल्पात ठाणे जिल्ह्यतील अंबरनाथ तालुक्यातील ४ गावे समाविष्ट आहे त्या गावातील अंदाजित एकूण क्षेत्र १०२९५४.३५ चौ. मी. संपादित होत आहे.
समाजाला मिळणारे लाभ :-- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत विकास आराखडयातील प्रस्तावित तळोजा एम.आय.डी.सी. ते एन.एच.-४ रस्ता प्रकल्पाचे बांधकाम करणे, त्याचा वापर करणे व देखभाल करणे या कामी रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत. स्थानिक लोकांना त्याचे कौशल्य आणि अनुभव यानुसार त्या जागेतील प्रचलित नियमानुसार रोजगाराच्या संधी मिळतील तसेच त्या प्रकल्पामुळे प्रवासी वाहतूक वाढ, सुरक्षित आणि जलद प्रवास, भौगोलिक आणि सामाजिक दृष्टीने सवर्ंकष विकास, मोठयाप्रमाणात रोजगार र्िनमिती पर्यावरण स्िथरता याबाबी अभिप्रेत आहेत.
अनुसूची - तीन
बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे :-- १. प्रकल्पाचे बांधकाम ;
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, जुलै २५, २०२२/श्रावण ३, शके १९४४अनुसूची - चार
सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश :-- भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ (२०१३ चा ३०) यामध्ये कलम १० (क) समाविष्ट केले असून त्यामध्ये अशी तरतूद केली आहे की, समुचित शासनाला जनहिताच्या दृष्टीने अधिसूचनेद्वारे, उक्त अधिनियमाच्या प्रकरण २ व प्रकरण ३ यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देता येते. त्यानुसार महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, दिनांक १३ मार्च २०१५ नुसार उक्त प्रकल्पाला जनहिताच्या दृष्टीने लोकहितकारी प्रकल्प असल्याकारणाने प्रकरण दोन व तीन च्या तरतुदी लागू करण्यापासून उक्त प्रकल्पाला सूट देण्यात आली आहे.
अनुसूची - पाच
नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील
प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात अधिकायाचे पदनाम :-- जिल्हा पुनर्वसन अधिकारी, ठाणे.
प्रशासनाच्या कार्यालयाचा पत्ता :-- जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, ठाणे, ठाणे जिल्हा सत्र न्यायालयासमोर, कोर्टनाका, ठाणे (प.), जि. ठाणे, पिनकोड ४०० ६०१.
ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशील :-- अधिनियमाच्या कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी जिल्हा पुनर्वसन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांची प्रशासक, पुनर्वसन व पुनस्र्थापना म्हणून प्रशासकाची नियुक्त करण्याची तरतूद ठेवली आहे.
सदर अधिसूचनेद्वारे ज्या जमिनीची सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा आवश्यकता भासल्यास संभव असल्याचे कायद्याच्या कलम ११ चे उप कलम (१) खाली अधिसूचित करण्यात आले आहे. प्रारंभिक अधिसूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून ६० दिवसांचा आत सक्षम प्राधिकारी तथा उप विभागीय अधिकारी, उल्हासनगर उप विभाग उल्हासनगर, पवई चौक, उल्हासनगर-०३ यांचे कार्यालयात आक्षेप नोंदविता येईल.
जयराज कारभारी,
ठाणे, दिनांक १८ जुलै २०२२.
सक्षम प्राधिकारी, तथा उप विभागीय अधिकारी, उल्हासनगर उप विभाग, उल्हासनगर.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.