सं. १ ]
नई दिल्ली, अगस्त ४-१०, २०२२/१३-१९ श्रावण (शक) १९४४ [खंड २०
No. 1 ] NEW DELHI, AUGUST 4-10, 2022/13-19 SHRAVANA (SAKA) 1944 [Vol. 20
अं. १ ]
नवी दिल्ली, ऑगस्ट ४-१०, २०२२/१३-१९ श्रावण (शके) १९४४ खंड २०
स्वंतत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
विधि और न्याय मंत्रालय
(विधायी विभाग)
नई दिल्ली,
(१) दि इंटिग्रेटेड गुडस् अॅन्ड र्सव्िहसेस् टॅक्स अॅक्ट, २०१७ ; (२) दि युनियन टेरिटरी गुडस् अॅन्ड र्सव्िहसेस् टॅक्स अॅक्ट, २०१७ ; (३) दि सेंट्रल गुडस् अॅन्ड र्सव्िहसेस् टॅक्स (एक्सटेन्शन टू जम्मू अॅन्ड कश्मिर) अॅक्ट, २०१७ ; (४) दि इंटिग्रेटेड गुडस् अॅन्ड र्सव्िहसेस् टॅक्स (एक्सटेन्शन टू जम्मू अॅन्ड कश्मिर) अॅक्ट, २०१७ के मराठी अनुवाद राष्ट्रपती के प्राधिकार से प्रकाशित किये जाते है और ये प्राधिकृत पाठ (केंद्रीय विधि) अधिनियम, १९७३ (१९७३ का ५०) की धारा २ के खण्ड़ (क) के अधीन उनके मराठी प्राधिकृत पाठ समझे जायेंगे। भाग बारा-(२०)-१२ भारताचे राजपत्र, असाधारण [भाग बारा GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARY [PART XII
MINISTRY OF LAW AND JUSTICE
(LEGISLATIVE DEPARTMENT)
New Delhi,
The Translation in Marathi of (1) The Integrated Goods and Services Tax Act, 2017 ; (2) The Union Territory Goods and Services Tax Act, 2017 ; (3) The Central Goods and Services Tax (Extension to Jammu and Kashmir) Act, 2017 ; (4) The Integrated Goods and Services Tax (Extension to Jammu and Kashmir) Act, 2017 are hereby published under the authority of the President and shall be deemed to be the authoritative texts thereof in Marathi under clause (a) of Section 2 of the Authoritative Texts (Central Laws) Act, 1973 (50 of 1973).
विधि व न्याय मंत्रालय
(विधायी विभाग)
नवी दिल्ली,
(१) दि इंटिग्रेटेड गुडस् अॅन्ड र्सव्िहसेस् टॅक्स अॅक्ट, २०१७ ; (२) दि युनियन टेरिटरी गुडस् अॅन्ड र्सव्िहसेस् टॅक्स अॅक्ट, २०१७ ; (३) दि सेंट्रल गुडस् अॅन्ड र्सव्िहसेस् टॅक्स (एक्सटेन्शन टू जम्मू अॅन्ड कश्मिर) अॅक्ट, २०१७ ; (४) दि इंटिग्रेटेड गुडस् अॅन्ड र्सव्िहसेस् टॅक्स (एक्सटेन्शन टू जम्मू अॅन्ड कश्मिर) अॅक्ट, २०१७ यांचा मराठी अनुवाद याद्वारे, राष्ट्रपतीच्या प्राधिकारान्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि तो, प्राधिकृत पाठ (केंद्रीय विधि) अधिनियम, १९७३ (१९७३ चा ५०) याच्या कलम २ च्या खंड (क) अन्वये मराठीतील त्यांचा प्राधिकृत पाठ असल्याचे मानण्यात येईल.
भारताचे राजपत्र, असाधारण ३ अनुभाग १] SECTION 1] GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARYनिर्देशसूची
Table of Contents
| अनुक्रमांक अधिनियमाचे नाव पृष्ठ क्रमांक Serial No. Name of the Act Page No. (१) (२) | ३ |
| १ एकात्मिक वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ | ४ |
| The Integrated Goods and Services Tax Act, 2017 २ संघ राज्यक्षेत्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ | २५ |
The Union Territory Goods and Services Tax Act, 2017
३ केंद्रीय वस्तू व सेवा कर (जम्मू व काश्मीरवर विस्तार) अधिनियम, २०१७ ४२ The Central Goods and Services Tax (Extension to Jammu and
Kashmir) Act, 2017
४ एकात्मिक वस्तू व सेवा कर (जम्मू व काश्मीरवर विस्तार) अधिनियम, २०१७ ४३ The Integrated Goods and Services Tax (Extension to Jammu and
Kashmir) Act, 2017
भाग बारा-(२०)-१अभारताचे राजपत्र, असाधारण ४ अनुभाग १] SECTION 1] GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARY
एकात्मिक वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७
(२०१७ चा अधिनियम क्रमांक १३)
[२४ ऑगस्ट, २०२१ रोजी यथाविद्यमान]
[१२ एप्रिल, २०१७] केंद्र सरकारने वस्तुंच्या किंवा सेवांच्या किंवा दोन्हींच्या आंतरराज्यीय पुरवठयावरील कराची आकारणी व वसुली करण्यासाठी आणि तत्संबंधित किंवा तद्नुषंगिक बाबींकरिता तरतूद करण्याकरिता अधिनियम.
तो, भारतीय गणराज्याच्या अडुसष्टाव्या वर्षी, संसदेद्वारे पुढीलप्रमाणे अधिनियमित होवो :-----
प्रकरण एक
प्रारंभिक
१. (१) या अधिनियमास, एकात्मिक वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ असे म्हणावे.
संक्षिप्त नाव,
व्याप्ती व प्रारंभ.
(२) तो, १[* *] संपूर्ण भारतास लागू असेल.{{^{{FOOTNOTE *}}}}
(३) तो, केंद्र सरकार, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियत करील अशा दिनांकास२ अंमलात येईल :
परंतु असे की, या अधिनियमाच्या विविध तरतुदींसाठी वेगवेगळे दिनांक नियत करता येतील आणि या अधिनियमाच्या प्रारंभाच्या अशा कोणत्याही तरतुदींमधील कोणत्याही निर्देशाचा, ती तरतूद अंमलात येण्याचा निर्देश आहे, असा अन्वयार्थ लावण्यात येईल.
व्याख्या.
२. या अधिनियमात, संदर्भानुसार दुसरा अर्थ आवश्यक नसेल तर,-------
(१) ""केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियम"" याचा अर्थ, केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७, असा आहे ;
(२) ""केंद्रीय कर"" याचा अर्थ, केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियमान्वये आकारलेला व वसूल केलेला कर, असा आहे ;
(३) ""सलग प्रवास"" याचा अर्थ, ज्यासाठी एकतर एका सेवा पुरवठादाराने किंवा एकापेक्षा अधिक सेवा पुरवठादारांच्या वतीने कार्य करणाया अभिकत्र्यामार्फत, एकाच वेळी एक किंवा अधिक तिकिटे किंवा बीजके दिले असतील असा प्रवास, असा आहे, आणि त्यामध्ये, ज्यासाठी एक किंवा अधिक स्वतंत्र तिकिटे किंवा बीजके दिले असतील अशा प्रवासाच्या कोणत्याही टप्प्यांमधील प्रवासातील तात्पुरत्या थांब्याचा अंतर्भाव असणार नाही;
स्पष्टीकरण.----या खंडाच्या प्रयोजनार्थ, ""तात्पुरता थांबा"" याचा अर्थ, जेथे एखादा प्रवासी, एकतर दुसया वाहनात जाण्यासाठी किंवा नंतर कोणत्याही वेळी पुन्हा प्रवास सुरू करण्याच्या दृष्टीने, विवक्षित कालावधीसाठी त्याचा प्रवास खंडित करून उतरू शकतो असे ठिकाण, असा आहे;
(४) ""भारताच्या सीमाशुल्क सरहद्दी"" याचा अर्थ, सीमाशुल्क अधिनियम, १९६२ याच्या कलम २ १९६२ चा ५२.
मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे सीमाशुल्क क्षेत्राच्या सीमा, असा आहे ;
१. २०१७ चा अधिनियम क्रमांक २७ याच्या कलम २(२) द्वारे हा मजकूर वगळला (८ जुलै, २०१७ रोजी व तेव्हापासून).
२. अधिसूचना क्रमांक जी.एस.आर. ६०३(३), दिनांक १९ जून २०१७ अन्वये, कलम १, २, ३, १४, २० आणि २२ साठी, २२ जून, २०१७ पहा भारताचे राजपत्र असाधारण भाग दोन, अनुभाग ३(एक).
* अधिसूचना क्रमांक स्थायी आदेश ३९१२ (ई), दिनांक ३० ऑक्टोबर, २०१९ यान्वये हा अधिनियम जम्मू व काश्मीर संघ राज्यक्षेत्रास व लडाख संघ राज्यक्षेत्रास लागू केला.
५ भारताचे राजपत्र, असाधारण [भाग बारा GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARY [PART XII(५) ""वस्तुंची निर्यात"" याचा त्याच्या व्याकरणिक फेरफारांसह व सजातीय शब्दप्रयोगांसह अर्थ, भारतातून भारताबाहेरील ठिकाणी वस्तू घेऊन जाणे, असा आहे ;
(६) ""सेवांची निर्यात"" याचा अर्थ, जेव्हा, -
(एक) सेवा पुरवठादार भारतात स्थित असतो ;
(दोन) सेवा प्राप्तकर्ता भारताबाहेर स्थित असतो ;
(तीन) सेवापुरवठयाचे ठिकाण भारताबाहेर असते;
(चार) अशा सेवेचे प्रदान, सेवा पुरवठादारास, परिवर्तनयोग्य परकीय चलनामध्ये १[किंवा भारतीय रिझव्र्ह बँकेने जेथे जेथे परवानगी दिली असेल तेथे तेथे भारतीय रूपयांत] प्राप्त झालेले असते; आणि
(पाच) सेवा पुरवठादार व सेवा प्राप्तकर्ता हे, कलम ८ मधील स्पष्टीकरण १ नुसार केवळ विभिन्न व्यक्त्तींच्या आस्थापना नसतात, तेव्हा कोणत्याही सेवेचा पुरवठा, असा आहे ;
(७) ""स्थिर आस्थापना"" याचा अर्थ, तिच्या स्वत:च्या गरजांकरिता सेवांचा पुरवठा करण्यासाठी किंवा सेवा मिळविण्यासाठी आणि सेवांचा वापर करण्यासाठी मानवी व तांत्रिक साधनसंपत्तीच्या दृष्टीने स्थायीपणाच्या व सुयोग्य संरचनेच्या पर्याप्त प्रमाणात ज्याचे गुणवर्णन केले जाते असे ठिकाण (धंद्याच्या नोंदणीकृत ठिकाणाव्यतिरिक्त्त), असा आहे;
(८) ""वस्तू व सेवा कर (राज्यांना भरपाई) अधिनियम"" याचा अर्थ, वस्तू व सेवा कर (राज्यांना भरपाई) अधिनियम, २०१७, असा आहे ;
(९) ""सरकार"" याचा अर्थ, केंद्र सरकार, असा आहे;
(१०) ""वस्तुंची आयात"" याचा, त्याच्या व्याकरणिक फेरफार व सजातीय शब्दप्रयोगांसह अर्थ, भारताबाहेरील ठिकाणाहून भारतामध्ये वस्तू आणणे, असा आहे;
(११) ""सेवांची आयात"" याचा अर्थ, जेव्हा,-----
(एक) सेवा पुरवठादार भारताबाहेर स्थित असतो ;
(दोन) सेवा प्राप्तकर्ता भारतात स्थित असतो ; आणि
(तीन) सेवापुरवठयाचे ठिकाण भारतात असते,
तेव्हा, कोणत्याही सेवेचा पुरवठा, असा आहे ;
(१२) ""एकात्मिक कर"" याचा अर्थ, या अधिनियमान्वये आकारलेला एकात्मिक वस्तू व सेवा कर, असा आहे;
(१३) ""मध्यस्थ"" याचा अर्थ, जो जो दोन किंवा अधिक व्यक्त्तींमध्ये वस्तुंचा किंवा सेवांचा किंवा दोन्हींचा पुरवठा करण्याची किंवा प्रतिभूती देण्याची व्यवस्था करतो किंवा सुलभ करतो असा दलाल, अभिकर्ता, किंवा इतर कोणतीही व्यक्त्ती-मग तिला कोणत्याही नावाने संबोधण्यात येवो,--असा आहे, परंतु, यात, जी स्वत:हून अशा वस्तुंचा किंवा सेवांचा किंवा दोन्हींचा पुरवठा करते किंवा प्रतिभूती देते अशा व्यक्त्तीचा समावेश होत नाही;
१. २०१८ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम २ द्वारे हा मजकूर समाविष्ट केला (१ फेब्रुवारी, २०१९ रोजी व तेव्हापासून).
भारताचे राजपत्र, असाधारण ६ अनुभाग १] SECTION 1] GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARY(१४) ""सेवा प्राप्तकत्र्याचे स्थान"" याचा अर्थ,-------
(क) ज्यासाठी नोंदणी मिळविण्यात आली आहे अशा धंद्याच्या ठिकाणी जेव्हा पुरवठा प्राप्त केला जातो तेव्हा, धंद्याच्या अशा ठिकाणाचे स्थान ;
(ख) ज्यासाठी धंद्याच्या ठिकाणासाठी नोंदणी मिळविण्यात आली आहे अशा धंद्याच्या ठिकाणाहून अन्य ठिकाणी (अन्यत्र स्थिर आस्थापना) जेव्हा पुरवठा प्राप्त केला जातो तेव्हा, अशा स्थिर आस्थापनेचे स्थान ;
(ग) जेव्हा एकाहून अधिक आस्थापनांमध्ये----मग ते धंद्याचे ठिकाण असो किंवा स्थिर आस्थापना असो,----पुरवठा प्राप्त केला जातो तेव्हा, पुरवठा प्राप्त करण्याशी अधिक थेट संबंधित असलेले आस्थापनेचे स्थान; आणि
(घ) अशा ठिकाणांच्या अभावी, प्राप्तकत्र्याच्या नेहमीच्या निवासस्थानाच्या ठिकाणाचे स्थान, असा आहे ;
(१५) ""सेवा पुरवठादाराचे स्थान"" याचा अर्थ,-----
(क) ज्यासाठी नोंदणी मिळविण्यात आली आहे त्या धंद्याच्या ठिकाणाहून जेव्हा पुरवठा केला जातो तेव्हा, धंद्याच्या अशा ठिकाणाचे स्थान ;
(ख) ज्यासाठी नोंदणी मिळविण्यात आली असेल त्या धंद्याच्या ठिकाणाव्यतिरिक्त्त जेव्हा अन्य ठिकाणाहून (अन्यत्र स्थिर आस्थापना) पुरवठा केला जातो तेव्हा, अशा स्थिर आस्थापनेचे स्थान ;
(ग) जेव्हा एकाहून अधिक आस्थापनांतून---मग ते धंद्याचे ठिकाण असो किंवा स्थिर आस्थापना असो,---पुरवठा केला जातो तेव्हा, तो पुरवठा करण्याच्या तरतुदीशी अधिक थेट संबंधित असलेले स्थिर आस्थापनेचे स्थान ; आणि
(घ) अशा ठिकाणांच्या अभावी, पुरवठादाराचे नेहमीचे निवासस्थानाचे ठिकाण असलेले स्थान, असा आहे ;
(१६) ""बिगर-करपात्र ऑनलाईन ग्रहीता"" याचा अर्थ, करपात्र राज्यक्षेत्रांत स्थित असलेला वाणिज्य, उद्योग किंवा इतर कोणताही धंदा किंवा पेशा यांव्यतिरिक्त्त, इतर कोणत्याही प्रयोजनाच्या संबंधात, नोंदणीकृत नसलेले आणि ऑनलाईन माहिती व विदाआधारित सुविधा किंवा पुन:प्राप्त सेवा स्वीकारणारे कोणतेही सरकार, स्थानिक प्राधिकरण, शासकीय प्राधिकरण, एखादी व्यक्त्ती किंवा इतर कोणतीही व्यक्त्ती, असा आहे ;
स्पष्टीकरण.- या खंडाच्या प्रयोजनार्थ, ""शासकीय प्राधिकरण"" याचा अर्थ,----
संविधानाच्या १[अनुच्छेद २४३ छ अन्वये एखाद्या पंचायतीकडे किंवा] अनुच्छेद २४३ ब अन्वये एखाद्या नगरपालिकेकडे सोपवलेले कोणतेही काम पार पाडण्यासाठी समन्याय किंवा नियंत्रण या मार्गाने नव्वद टक्के किंवा त्यापेक्षा अधिक सहभाग असलेले,
(एक) संसदेच्या किंवा राज्य विधानमंडळाच्या एखाद्या अधिनियमाद्वारे स्थापन केलेले ; किंवा (दोन) कोणत्याही सरकारने स्थापन केलेले, एखादे प्राधिकरण किंवा मंडळ किंवा इतर कोणताही निकाय, असा आहे ;
१. २०१८ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम २ द्वारे हा मजकूर समाविष्ट केला (१ फेब्रुवारी, २०१९ रोजी व तेव्हापासून).
७ भारताचे राजपत्र, असाधारण [भाग बारा GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARY [PART XII(१७) ""ऑनलाईन माहिती व विदाआधारित सुविधा किंवा पुन:प्राप्त सेवा"" याचा अर्थ, आंतरजालावरून (इंटरनेट) किंवा इलेक्ट्रॉनिकजाळ्या (नेटवर्क) वरून माहिती तंत्रज्ञानाद्वारे ज्यांची पोचवणी केली जाते आणि ज्यांचे स्वरूप त्यांचा पुरवठा मूलत: स्वयंचलितपणे करणे, हे असते आणि ज्यात कमीत कमी मानवी हस्तक्षेपाचा अंतर्भाव असतो आणि माहिती तंत्रज्ञानाच्या अभावी ज्यांची सुनिश्चिती करणे अशक्य असते, अशा सेवा, असा आहे आणि यात,-----
(एक) आंतरजालावर (इंटरनेट) जाहिरात करणे ;
(दोन) क्लाउड सेवा पुरविणे ;
(तीन) दूरसंचार जाळे किंवा आंतरजाल (इंटरनेट) यांमार्फत ई-पुस्तके, चित्रपट, संगीत, संगणक आज्ञावली आणि इतर अमूर्त गोष्टी पुरविणे ;
(चार) संगणक जाळ्यामार्फत इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कोणत्याही व्यक्त्तीला पुन:प्राप्त करण्यायोग्य किंवा अन्यथा, विदा किंवा माहिती पुरविणे ;
(पाच) डिजिटल आशयाचा (चित्रपट, दूरचित्रवाणी कार्यक्रम, संगीत व तत्सम) ऑनलाईन पुरवठा करणे ;
(सहा) डिजिटल विदा साठवण ; आणि
(सात) ऑनलाईन खेळ ;
यांसारख्या इलेक्ट्रॉनिक सेवांचा समावेश होतो ;
(१८) एखाद्या करपात्र व्यक्त्तीच्या संबंधात, ""उद्विष्टी कर"" याचा अर्थ, तिने किंवा तिच्या अभिकत्र्याने केलेल्या वस्तुंच्या किंवा सेवांच्या किंवा या दोन्हींच्या करपात्र पुरवठयावर या अधिनियमान्वये आकारणीयोग्य असलेला एकात्मिक कर, असा आहे, परंतु त्यात, प्रत्यावर्ती आकार आधारावर तिने प्रदेय असलेल्या कराचा समावेश होत नाही;
(१९) ""विशेष र्आथिक प्रक्षेत्र"" यास विशेष र्आथिक प्रक्षेत्र अधिनियम, २००५ याच्या कलम २ च्या २००५ चा २८.
खंड (य क) मध्ये जो अर्थ नेमून दिलेला असेल, तोच अर्थ असेल ;
२००५ चा २८.
(२०) ""विशेष र्आथिक प्रक्षेत्र विकासक"" यास विशेष र्आथिक प्रक्षेत्र अधिनियम, २००५ याच्या कलम २ च्या खंड (छ) मध्ये जो अर्थ नेमून दिलेला असेल तोच अर्थ असेल आणि यात उक्त्त अधिनियमाच्या कलम २ च्या खंड (घ) मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे प्राधिकरण आणि खंड (च) मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे सहविकासक यांचा समावेश होतो ;
(२१) ""पुरवठा"" यास, केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियमाच्या कलम ७ मध्ये जो अर्थ नेमून दिलेला असेल तोच अर्थ असेल ;
(२२) ""करपात्र राज्यक्षेत्र"" याचा अर्थ, ज्याला या अधिनियमाच्या तरतुदी लागू होतात असे राज्यक्षेत्र, असा आहे ;
(२३) ""शून्य-दरित पुरवठा"" यास, कलम १६ मध्ये नेमून दिलेला अर्थ असेल ;
(२४) या अधिनियमात वापरलेले व व्याख्या न केलेले परंतु, केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियम, संघ राज्यक्षेत्र वस्तू व सेवा कर अधिनियम आणि वस्तू व सेवा कर (राज्यांना भरपाई) अधिनियम, यांत व्याख्या केलेले शब्द व शब्दप्रयोग यांना, त्या अधिनियमांमध्ये जो अर्थ नेमून दिलेला असेल तोच अर्थ असेल ;
भारताचे राजपत्र, असाधारण ८ अनुभाग १] SECTION 1] GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARY(२५) जो जम्मू व काश्मीर{{^{{FOOTNOTE *}}}} राज्यात अंमलात नाही अशा एखाद्या कायद्याच्या त्या राज्याच्या संबंधातील या अधिनियमातील कोणत्याही संदर्भाचा, त्या राज्यात अंमलात असलेल्या कोणताही असल्यास, तत्सम कायद्याचा, संदर्भ म्हणून अन्वयार्थ लावण्यात येईल.
प्रकरण दोन
प्रशासन
३. मंडळास, या अधिनियमाखालील अधिकारांचा वापर करण्यासाठी, त्यास योग्य वाटतील अशा केंद्रीय अधिकायांची नियुक्त्ती.
कर अधिकायांची नियुक्त्ती करता येईल.
४. या अधिनियमाच्या तरतुदींस बाध न आणता, राज्य वस्तू व सेवा कर अधिनियमान्वये किंवा संघ राज्यक्षेत्र वस्तू व सेवा कर अधिनियमान्वये नियुक्त्त केलेल्या अधिकायांना, परिषदेच्या शिफारशींवरून, सरकार, अधिसूचनेद्वारे विर्िनदिष्ट करील असे अपवाद व शर्ती यांस अधीन राहून, या अधिनियमाच्या प्रयोजनार्थ, समुचित अधिकारी असल्याचे प्राधिकृत केले आहे.
विवक्षित
परिस्थितीत
समुचित अधिकारी
म्हणून राज्य कर
किंवा संघ राज्यक्षेत्र
कर अधिकायांची
प्राधिकृतता.
प्रकरण तीन
कर आकारणी व वसुली
कर आकारणी व
वसुली.
५. (१) पोट-कलम (२) च्या तरतुदींस अधीन राहून, मानवी सेवनाच्या अल्कोहोलयुक्त्त मद्याच्या पुरवठयावर असेल त्याखेरीज, अन्य वस्तुंच्या किंवा सेवांच्या किंवा दोन्हींच्या सर्व आंतरराज्यीय पुरवठयांवर, केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियमाच्या कलम १५ अन्वये निर्धारित केलेल्या मूल्यावर आणि परिषदेच्या शिफारशींवरून सरकार अधिसूचित करील अशा, चाळीस टक्क्यांपेक्षा अधिक नसेल अशा दरांनी, एकात्मिक वस्तू व सेवा कर या नावाने संबोधला जाणारा कर, आकारण्यात येईल आणि विहित करण्यात येईल अशा रीतीने वसूल करण्यात येईल आणि करपात्र व्यक्त्तीद्वारे प्रदान करण्यात येईल :
१९६२ चा ५२.
१९७५ चा ५१.
परंतु असे की, भारतात आयात केलेल्या वस्तुंवरील एकात्मिक कर, जेव्हा सीमाशुल्क अधिनियम, १९६२ याच्या कलम १२ अन्वये उक्त्त वस्तुंवर सीमाशुल्क आकारला जातो त्या वेळी सीमाशुल्क प्रशुल्क अधिनियम, १९७५ अन्वये निर्धारित केलेल्या अशा मूल्यावर, उक्त्त अधिनियमाच्या कलम ३ च्या तरतुदींनुसार, आकारण्यात येईल व वसूल करण्यात येईल.
(२) पेट्रोलिअम क्रूड, हाय स्पीड डिझेल, मोटार स्पिरिट (सामान्यत:, पेट्रोल म्हणून ओळखले जाणारे) , नैर्सगिक वायु व विमानचालन चक्की इंधन (एव्हीएशन टर्बाइन फ्यूइल) यांच्या पुरवठयावरील एकात्मिक कर, हा परिषदेच्या शिफारशींवरून, सरकारकडून अधिसूचित करण्यात येईल अशा दिनांकापासून आकारण्यात येईल.
(३) सरकारला, परिषदेच्या शिफारशींवरून, वस्तुंच्या किंवा सेवांच्या अथवा दोन्हींच्या प्राप्तकत्र्याकडून प्रत्यावर्ती आकाराच्या आधारे ज्यांवर कर प्रदान करण्यात येईल अशा वस्तुंच्या किंवा सेवांच्या किंवा दोन्हींच्या पुरवठयाचे प्रवर्ग अधिसूचनेद्वारे विर्िनदिष्ट करता येतील आणि या अधिनियमाच्या सर्व तरतुदी, असा प्राप्तकर्ता, जणू काही, अशा वस्तुंच्या किंवा सेवांच्या किंवा दोन्हींच्या पुरवठयाच्या संबंधात कर प्रदान करण्यासाठी पात्र आहे असे समजून त्यास लागू होतील.
{{^{{FOOTNOTE *}}}} अधिसूचना क्रमांक स्थायी आदेश ३९१२ (ई), दिनांक ३० ऑक्टोबर, २०१९ यान्वये हा अधिनियम जम्मू व काश्मीर संघ राज्यक्षेत्रास व लडाख संघ राज्यक्षेत्रास लागू केला.
भाग बारा-(२०)-२९ भारताचे राजपत्र, असाधारण [भाग बारा GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARY [PART XII १[(४) सरकारला, परिषदेच्या शिफारशींवरून, ज्या व्यक्त्ती, एखाद्या बिगर नोंदणीकृत पुरवठादाराकडून प्राप्त झालेल्या वस्तुंच्या किंवा सेवांच्या किंवा दोन्हींच्या विर्िनदिष्ट प्रवगार्ंच्या पुरवठयाच्या बाबतीत, वस्तुंच्या किंवा सेवांच्या अथवा दोन्हींच्या अशा पुरवठयाचा प्राप्तकर्ता म्हणून प्रत्यावर्ती आकारावर आधारित कर प्रदान करतील अशा नोंदणीकृत व्यक्त्तींचा वर्ग अधिसूचनेद्वारे, विर्िनदिष्ट करता येईल, आणि या अधिनियमाच्या सर्व तरतुदी असा प्राप्तकर्त्ता, जणू काही, वस्तुंच्या किंवा सेवांच्या किंवा दोन्हींच्या अशा पुरवठयाच्या संबंधात कर प्रदान करण्यासाठी, पात्र आहे असे समजून त्यास लागू होतील.]
(५) सरकारला, परिषदेच्या शिफारशींवरून, ज्या सेवांच्या आंतरराज्यीय पुरवठयांवरील कर इलेक्ट्रॉनिक वाणिज्य प्रचालकाकडून प्रदान करण्यात येईल, अशा सेवा इलेक्ट्रॉनिक वाणिज्य प्रचालकामार्फत पुरविल्या जात असतील तर अशा सेवांचे प्रवर्ग अधिसूचनेद्वारे, विर्िनदिष्ट करता येतील, आणि या अधिनियमाच्या सर्व तरतुदी, असा इलेक्ट्रॉनिक वाणिज्य प्रचालक जणू काही अशा सेवा पुरविण्याच्या संबंधात कर प्रदान करण्यासाठी पात्र पुरवठादार आहे असे समजून त्यास लागू होतील :
परंतु असे की, जेव्हा करपात्र राज्यक्षेत्रामध्ये एखाद्या इलेक्ट्रॉनिक वाणिज्य प्रचालकाची प्रत्यक्ष उपस्थिती नसते तेव्हा अशा बाबतीत, करपात्र राज्यक्षेत्रामध्ये कोणत्याही प्रयोजनासाठी अशा इलेक्ट्रॉनिक वाणिज्य प्रचालकाचे प्रतिनिधित्व करणारी कोणतीही व्यक्त्ती कर प्रदान करण्यास पात्र असेल :
परंतु आणखी असे की, जेव्हा करपात्र राज्यक्षेत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक वाणिज्य प्रचालकाची प्रत्यक्ष उपस्थिती नसते आणि तसेच उक्त्त राज्यक्षेत्रामध्ये त्याचा प्रतिनिधी देखील नसतो तेव्हा अशा बाबतीत असा इलेक्ट्रॉनिक वाणिज्य प्रचालक, कर प्रदान करण्याच्या प्रयोजनासाठी करपात्र राज्यक्षेत्रात एखाद्या व्यक्त्तीची नेमणूक करील आणि अशी व्यक्त्ती, कर प्रदान करण्यास पात्र असेल.
करातून सूट
देण्याचा
अधिकार.
६. (१) जेव्हा सरकारची, तसे करणे लोकहिताच्या दृष्टीने आवश्यक आहे अशी खात्री पटते तेव्हा ते, परिषदेच्या शिफारशींवरून, अधिसूचनेद्वारे, विर्िनदिष्ट केलेल्या कोणत्याही वर्णनाच्या वस्तुंवर किंवा सेवांवर किंवा दोन्हींवर आकारण्यायोग्य असलेल्या करातून संपूर्ण किंवा अंशत: सर्वसाधारणपणे एकतर बिनशर्तपणे किंवा तीमध्ये विर्िनदिष्ट करण्यात येईल अशा शतर्ींस अधीन राहून, अधिसूचनेमध्ये विर्िनदिष्ट करण्यात येईल अशा दिनांकापासून सूट देऊ शकेल.
(२) जेव्हा सरकारची, तसे करणे लोकहिताच्या दृष्टीने आवश्यक आहे अशी खात्री पटते तेव्हा ते, परिषदेच्या शिफारशींवरून, प्रत्येक प्रकरणी विशेष आदेशाद्वारे, ज्यावर कर आकारण्यायोग्य आहे अशा कोणत्याही वस्तुंवरील किंवा सेवांवरील किंवा दोन्हींवरील कराच्या प्रदानातून अशा आदेशामध्ये नमूद करावयाच्या अपवादात्मक स्वरूपाच्या परिस्थितीत, सूट देऊ शकेल.
(३) सरकारला, पोट-कलम (१) अन्वये काढलेल्या कोणत्याही अधिसूचनेची किंवा पोट-कलम (२) अन्वये काढलेल्या आदेशाची व्याप्ती किंवा प्रयोज्यता स्पष्ट करण्याच्या प्रयोजनासाठी तसे करणे आवश्यक किंवा इष्ट वाटत असेल तर, ते, पोट-कलम (१) अन्वये अधिसूचना किंवा पोट-कलम (२) अन्वये आदेश काढल्यापासून एका वर्षाच्या आत कोणत्याही वेळी, अधिसूचनेद्वारे, अशा अधिसूचनेत किंवा, यथास्थिति, आदेशात स्पष्टीकरणाचा समावेश करू शकेल, आणि असे प्रत्येक स्पष्टीकरण हे, जणू काही अशा पहिल्या अधिसूचनेचा किंवा, यथास्थिति, आदेशाचा नेहमीच भाग झाले होते असे समजून अंमलात येईल.
स्पष्टीकरण :--------या कलमाच्या प्रयोजनार्थ, कोणत्याही वस्तू किंवा सेवा किंवा दोन्हींच्या बाबतीत, त्यावर आकारण्यायोग्य असलेल्या संपूर्ण करातून किंवा त्याच्या भागातून बिनशर्त सूट दिलेली असेल तेथे, अशा वस्तू किंवा सेवा किंवा दोन्ही पुरविणारी नोंदणीकृत व्यक्त्ती अशा वस्तू किंवा सेवा किंवा दोन्हींवर लागू असलेल्या दरापेक्षा अधिक कर गोळा करणार नाही.
१. २०१८ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ३ द्वारे बदली दाखल केले (१ फेब्रुवारी, २०१९ रोजी व तेव्हापासून).
भारताचे राजपत्र, असाधारण १० अनुभाग १] SECTION 1] GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARYप्रकरण चार
पुरवठयाचे स्वरूप निश्चित करणे
७. (१) कलम १० च्या तरतुदींस अधीन राहून, जेव्हा पुरवठादाराचे स्थान आणि पुरवठयाचे ठिकाण,-----
आंतरराज्यीय
पुरवठा.
(क) दोन वेगवेगळ्या राज्यांमध्ये असते ;
(ख) दोन वेगवेगळ्या संघ राज्यक्षेत्रांमध्ये असते ; किंवा
(ग) एखाद्या राज्यात व एखाद्या संघ राज्यक्षेत्रामध्ये असते, तेव्हा, वस्तुंचा पुरवठा हा, आंतरराज्यीय व्यापाराच्या किंवा वाणिज्याच्या ओघात केलेला वस्तुंचा पुरवठा म्हणून समजण्यात येईल.
(२) भारताच्या राज्यक्षेत्रात आयात केलेला वस्तुंचा पुरवठा हा, भारताच्या सीमाशुल्क सरहद्दी ओलांडेपयर्ंत, आंतरराज्यीय व्यापाराच्या किंवा वाणिज्याच्या ओघात केलेला वस्तुंचा पुरवठा आहे, असे समजण्यात येईल.
(३) कलम १२ च्या तरतुदींस अधीन राहून, जेव्हा पुरवठादाराचे स्थान व पुरवठयाचे ठिकाण,----
(क) दोन वेगवेगळ्या राज्यांमध्ये असेल ;
(ख) दोन वेगवेगळ्या संघ राज्यक्षेत्रांमध्ये असते ; किंवा
(ग) एखाद्या राज्यात व संघ राज्यक्षेत्रामध्ये असते,
तेव्हा सेवांचा पुरवठा हा, आंतरराज्यीय व्यापाराच्या किंवा वाणिज्याच्या ओघात केलेला सेवा पुरवठा असल्याचे समजण्यात येईल.
(४) भारताच्या राज्यक्षेत्रात आयात केलेल्या सेवांचा पुरवठा हा, आंतरराज्यीय व्यापाराच्या किंवा वाणिज्याच्या ओघात केलेला सेवांचा पुरवठा असल्याचे समजण्यात येईल.
(५) वस्तुंचा किंवा सेवांचा किंवा दोन्हींचा पुरवठा हा,----
(क) जेव्हा पुरवठादार भारतात स्थित असतो आणि पुरवठयाचे ठिकाण भारताबाहेर असते तेव्हा ;
(ख) विशेष र्आथिक प्रक्षेत्र विकासक किंवा विशेष र्आथिक प्रक्षेत्र युनिट यांना किंवा त्यांच्याद्वारे केला जातो ;
(ग) राज्यांतर्गत पुरवठा नसणारा आणि या कलमात अन्यत्र समावेश नसलेल्या, करपात्र राज्यक्षेत्रामधील असतो,
तेव्हा, तो आंतरराज्यीय व्यापाराच्या किंवा वाणिज्याच्या ओघात केलेला वस्तुंचा किंवा सेवांचा अथवा दोन्हींचा पुरवठा असल्याचे समजण्यात येईल.
राज्यांतर्गत
पुरवठा.
८. (१) कलम १० च्या तरतुदींस अधीन राहून, जेव्हा पुरवठादाराचे स्थान व वस्तुंच्या पुरवठयाचे ठिकाण एकाच राज्यात किंवा एकाच संघ राज्यक्षेत्रात असते तेव्हा वस्तुंचा पुरवठा हा, राज्यांतर्गत पुरवठा असल्याचे समजण्यात येईल :
परंतु असे की, वस्तुंचा पुढील पुरवठा हा, राज्यांतर्गत पुरवठा असल्याचे समजण्यात येणार नाही :-----
(एक) विशेष र्आथिक प्रक्षेत्र विकासक किंवा विशेष र्आथिक प्रक्षेत्र युनिट यांना किंवा त्यांनी केलेला वस्तुंचा पुरवठा ;
(दोन) भारताच्या राज्यक्षेत्रात आयात केलेल्या वस्तू, त्या भारताच्या सीमाशुल्क सरहद्दी ओलांडतात तोपयर्ंत ; किंवा
(तीन) कलम १५ मध्ये र्िनदिष्ट केलेल्या पर्यटकाला केलेला पुरवठा.
(२) कलम १२ च्या तरतुदींस अधीन राहून, जेव्हा पुरवठादाराचे स्थान आणि सेवांच्या पुरवठयाचे ठिकाण एकाच राज्यात किंवा एकाच संघ राज्यक्षेत्रात असते तेव्हा, तेथे सेवांचा पुरवठा हा, राज्यांतर्गत पुरवठा म्हणून समजण्यात येईल :
भाग बारा-(२०)-२अ११ भारताचे राजपत्र, असाधारण [भाग बारा GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARY [PART XII परंतु असे की, सेवांच्या राज्यांतर्गत पुरवठयामध्ये, विशेष र्आथिक प्रक्षेत्र विकासक किंवा विशेष र्आथिक युनिट यांना किंवा त्यांनी केलेल्या सेवांच्या पुरवठयाचा समावेश नसेल.
स्पष्टीकरण १.---या अधिनियमाच्या प्रयोजनाकरिता, जेव्हा एखाद्या व्यक्त्तीची,-----
(एक) भारतात एक आस्थापना असते आणि भारताबाहेर दुसरी एखादी आस्थापना असते ;
(दोन) राज्यात किंवा संघ राज्यक्षेत्रात एक आस्थापना असते आणि त्या राज्याबाहेर किंवा संघ राज्यक्षेत्राबाहेर दुसरी एखादी आस्थापना असते; किंवा
(तीन) एखाद्या राज्यात किंवा संघ राज्यक्षेत्रात एक आस्थापना असते आणि त्या राज्यामध्ये किंवा संघ राज्यक्षेत्रामध्ये १[{{^{{FOOTNOTE *}}}} {{^{{FOOTNOTE *}}}} {{^{{FOOTNOTE *}}}}] नोंदणीकृत असलेली अन्य कोणतीही आस्थापना असते, तेव्हा, अशा आस्थापना या, विभिन्न व्यक्त्तींच्या आस्थापना असल्याचे समजण्यात येईल.
स्पष्टीकरण २.----कोणत्याही राज्यक्षेत्रात एखाद्या शाखेमार्फत किंवा अभिकरणामार्फत किंवा प्रातिनिधिक कार्यालयामार्फत धंदा करणारी एखादी व्यक्त्ती, त्या राज्यक्षेत्रातील आस्थापना असल्याचे समजण्यात येईल.
९. या अधिनियमात काहीही अंतभर्ूत असले तरी,-----
क्षेत्रीय जलधीतील
पुरवठा.
(क) जेव्हा पुरवठादाराचे स्थान, क्षेत्रीय जलधीतील असते तेव्हा, अशा पुरवठादाराचे स्थान हे, किंवा (ख) जेव्हा पुरवठयाचे ठिकाण, क्षेत्रीय जलधीतील असते तेव्हा, पुरवठयाचे ठिकाण हे, या अधिनियमाच्या प्रयोजनार्थ, जेथे समुचित आधाररेषेच्या नजीकचे ठिकाण (पॉइर्ंट) स्थित असते, त्या समुद्रतटीय राज्यातील किंवा संघ राज्यक्षेत्रातील असल्याचे मानण्यात येईल.
प्रकरण पाच
वस्तुंच्या किंवा सेवांच्या किंवा दोन्हींच्या पुरवठयाचे ठिकाण
१०. (१) भारतात आयात केलेल्या किंवा भारतातून निर्यात केलेल्या वस्तुंच्या पुरवठयाव्यतिरिक्त्त, वस्तुंच्या पुरवठयाचे ठिकाण, खालीलप्रमाणे असेल :----
भारतात आयात
केलेल्या किंवा
भारतातून निर्यात
केलेल्या वस्तुंच्या
पुरवठयाव्यतिरिक्त्त
वस्तुंचा पुरवठा
करण्याचे ठिकाण.
(क) जेव्हा पुरवठयामध्ये वस्तुंची - मग त्या पुरवठादाराद्वारे असो किंवा प्राप्तकत्र्याद्वारे असो किंवा इतर कोणत्याही व्यक्त्तीद्वारे असो ने-आण करण्याचा समावेश असतो तेव्हा, अशा वस्तुंच्या पुरवठयाचे ठिकाण हे, प्राप्तकत्र्याला पोचवणी करण्यासाठी वस्तुंची ने-आण ज्यावेळी पूर्ण होते त्यावेळचे वस्तुंचे स्थान असेल ;
(ख) जेव्हा पुरवठादाराने त्रयस्थ व्यक्त्तीच्या निदेशावरून - मग तो अभिकर्ता म्हणून किंवा अन्यथा काम करीत असो- वस्तुंची ने-आण करण्यापूर्वी किंवा करताना, एकतर वस्तुंच्या मालकी हक्काच्या दस्तऐवजांच्या हस्तांतरणाद्वारे किंवा अन्यथा, प्राप्तकत्र्याला किंवा अन्य कोणत्याही व्यक्त्तीला वस्तुंची पोचवणी केली असेल तेव्हा, उक्त्त त्रयस्थ व्यक्त्तीला वस्तू प्राप्त झाल्या आहेत असे मानण्यात येईल आणि अशा वस्तुंच्या पुरवठयाचे ठिकाण हे, अशा व्यक्त्तीच्या धंद्याचे प्रमुख ठिकाण असेल ;
(ग) जेव्हा पुरवठयामध्ये,वस्तुंची - मग ती पुरवठादाराद्वारे असो किंवा प्राप्तकत्र्याद्वारे असो ने-आण करण्याचा समावेश नसेल तेव्हा, पुरवठयाचे ठिकाण हे, प्राप्तकत्र्याला पोचवणी करते वेळी अशा वस्तुंचे स्थान असेल ;
१. २०१८ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ४ द्वारे हा मजकूर वगळला (१ फेब्रुवारी, २०१९ रोजी व तेव्हापासून).
भारताचे राजपत्र, असाधारण १२ अनुभाग १] SECTION 1] GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARY(घ) जेव्हा वस्तुंची जुळणी किंवा मांडणी जागेवरच केली जाते तेव्हा, पुरवठयाचे ठिकाण हे, अशा मांडणीचे किंवा जुळणीचे ठिकाण असेल ;
(ङ) जेव्हा जहाज, विमान, आगगाडी किंवा मोटार वाहन यांसह वाहतुकीच्या एखाद्या साधनांवर चढवतांना वस्तुंचा पुरवठा केला जातो तेव्हा, पुरवठयाचे ठिकाण हे, ज्या स्थानी अशा वस्तू चढविण्यासाठी घेतल्या आहेत, असे स्थान असेल.
(२) जेव्हा वस्तुंच्या पुरवठयाचे ठिकाण निर्धारित करता येऊ शकत नसेल तेव्हा, पुरवठयाचे ठिकाण हे, विहित करण्यात येईल अशा रीतीने निर्धारित करण्यात येईल.
११. (क) भारतात आयात केलेल्या वस्तुंच्या पुरवठयाचे ठिकाण हे, आयातदाराचे स्थान, असेल ;
(ख) भारतातून निर्यात केलेल्या वस्तुंच्या पुरवठयाचे ठिकाण हे, भारताबाहेरचे स्थान, असेल.
भारतात आयात
केलेल्या किंवा
भारतातून निर्यात
केलेल्या वस्तुंच्या
पुरवठयाचे
ठिकाण.
१२. (१) जेव्हा सेवांच्या पुरवठादाराचे स्थान आणि सेवा प्राप्तकत्र्याचे स्थान भारतात असेल तेव्हा, सेवांच्या पुरवठयाचे ठिकाण निर्धारित करण्यासाठी, या कलमाच्या तरतुदी लागू असतील.
(२) पोट-कलमे (३) ते (१४) यांमध्ये विर्िनदिष्ट केलेल्या सेवांखेरीज,----
(क) नोंदणीकृत व्यक्त्तीला दिलेल्या सेवांच्या पुरवठयाचे ठिकाण हे, अशा व्यक्त्तीचे स्थान असेल;
जेव्हा पुरवठादार
व प्राप्तकर्ता यांचे
ठिकाण
भारतामध्ये असते
तेव्हा सेवा
पुरवठयाचे
ठिकाण.
(ख) नोंदणीकृत व्यक्त्ती व्यतिरिक्त्त इतर कोणत्याही व्यक्त्तीला दिलेल्या सेवांच्या पुरवठयाचे ठिकाण हे,----
(एक) जेव्हा अभिलेखावरील पत्ता अस्तित्वात असतो तेव्हा, प्राप्तकत्र्याचे स्थान असेल; आणि (दोन) इतर प्रकरणांमध्ये सेवा पुरवठादाराचे स्थान असेल.
(३) (क) वास्तुविशारद, अंतर्गत सजावटकार, भूमापक, अभियंते आणि इतर संबंधित तज्ज्ञ किंवा संपदा अभिकर्ते (इस्टेट एजंटस्) यांनी पुरवलेल्या सेवा, स्थावर मालमत्तेचा वापर करण्याचा हक्क देण्याच्या मार्गाने किंवा बांधकाम करण्यासाठी किंवा त्यात समन्वयन साधण्यासाठी पुरविलेल्या कोणत्याही सेवा यांसह स्थावर मालमत्तेच्या संबंधात थेटपणे ; किंवा
(ख) हॉटेल, पथिकाश्रम, अतिथीगृह, घरगुती मुक्काम, क्लब किंवा छावणीस्थान-मग ते कोणत्याही नावाने संबोधण्यात येवो, यांद्वारे आणि गृहनौका किंवा इतर कोणतीही जलयाने यांसह, निवासी सोय करण्याच्या मार्गाने ; किंवा
(ग) कोणताही विवाह किंवा स्वागत समारंभ किंवा त्याच्याशी संबंधित बाबी, शासकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धर्ामिक किंवा व्यवसायविषयक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी कोणत्याही स्थावर मालमत्तेमध्ये, अशा मालमत्तेत अशा कार्यक्रमांच्या संबंधात पुरविलेल्या सेवांसह, निवास व्यवस्था करण्याच्या मार्गाने ; किंवा
(घ) खंड (क), (ख) व (ग) यांमध्ये र्िनदिष्ट केलेल्या सेवांशी आनुंषगिक असलेल्या कोणत्याही सेवांच्या,
सेवा पुरवठयाचे ठिकाण हे, ज्या स्थानी स्थावर मालमत्ता, जहाज किंवा, यथास्थिति, जलयान स्थित असेल किंवा जेथे ते स्थित असण्याचे उद्देशित असेल ते स्थान असेल :
परंतु असे की, जर स्थावर मालमत्तेचे किंवा जहाजाचे किंवा जलयानाचे स्थान भारताबाहेर स्थित असेल किंवा स्थित असण्याचे उद्देशित असेल तर, पुरवठयाचे ठिकाण हे, प्राप्तकत्र्याचे स्थान असेल.
१३ भारताचे राजपत्र, असाधारण [भाग बारा GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARY [PART XIIस्पष्टीकरण.----जेव्हा स्थावर मालमत्ता किंवा जहाज किंवा जलयान हे एकापेक्षा अधिक राज्यांमध्ये किंवा संघ राज्यक्षेत्रामध्ये स्थित असते तेव्हा, सेवांचा पुरवठा हा, या संबंधात केलेल्या करारानुसार किंवा करारनाम्यानुसार किंवा अशा कराराच्या किंवा करारनाम्या अभावी विहित करता येतील अशा इतर गोष्टींच्या आधारे, स्वतंत्रपणे वसूल केलेल्या किंवा निर्धारित केलेल्या सेवांच्या मूल्याच्या प्रमाणात, संबंधित राज्यांपैकी किंवा संघ राज्यक्षेत्रांपैकी प्रत्येक राज्यामध्ये किंवा संघ राज्यक्षेत्रांमध्ये केला असल्याचे समजण्यात येईल.
(४) उपाहारगृह व खानपान सेवा, वैयक्ित्तक सौंदर्यप्रसाधन, स्वास्थ्य, सौंदर्योपचार, सौंदर्यवर्धक व त्वचारोपण शस्त्रक्रिया यांसह आरोग्य सेवा यांचे पुरवठयाचे ठिकाण हे, जेथे या सेवा प्रत्यक्षपणे दिल्या जातात ते स्थान असेल.
(५) प्रशिक्षण व कामगिरीचे मूल्यमापन यांच्या संबंधातील सेवांच्या पुरवठयाचे ठिकाण, हे,------
(क) नोंदणीकृत व्यक्त्तीच्या बाबतीत, अशा व्यक्त्तीचे स्थान असेल ;
(ख) नोंदणीकृत व्यक्त्तीव्यतिरिक्त्त इतर व्यक्त्तीच्या बाबतीत, जेथे अशा सेवा प्रत्यक्षपणे दिल्या जातात ते स्थान असेल.
(६) सांस्कृतिक, कलात्मक, क्रीडा, वैज्ञानिक, शैक्षणिक, करमणूक कार्यक्रम किंवा मनोरंजन उपवन किंवा इतर कोणतेही ठिकाण येथे प्रवेश करण्याच्या मार्गाने पुरविलेल्या सेवांच्या आणि तद्नुषंगिक सेवांच्या पुरवठयाचे ठिकाण हे, जेथे कार्यक्रम प्रत्यक्षपणे घेतला आहे किंवा जेथे उपवन किंवा असे इतर ठिकाण स्थित आहे असे ठिकाण असेल.
(७) (क) संमेलन, जत्रा, प्रदर्शन, महोत्सव किंवा तत्सम कार्यक्रम यांच्या संबंधातील सेवा पुरविण्यासह सांस्कृतिक, कलात्मक, क्रीडा, वैज्ञानिक, शैक्षणिक किंवा करमणूक कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या ; किंवा (ख) खंड (क) मध्ये र्िनदिष्ट केलेल्या कोणत्याही कार्यक्रमांपैकी किंवा सेवांपैकी कोणत्याही कार्यक्रमाचे किंवा सेवेचे आयोजन करण्याच्या, किंवा अशा कार्यक्रमांचे प्रायोजकत्व नेमून देण्याच्या आनुषंगिक सेवांच्या, मार्गाने पुरविलेल्या सेवांच्या पुरवठयाचे ठिकाण हे,-----
(एक) एखाद्या नोंदणीकृत व्यक्त्तीसाठी, अशा व्यक्त्तीचे स्थान असेल ;
(दोन) नोंदणीकृत व्यक्त्तीव्यतिरिक्त्त इतर व्यक्त्तीसाठी, जेथे असा कार्यक्रम प्रत्यक्षपणे घेतला आहे, ते ठिकाण असेल आणि जर कार्यक्रम भारताबाहेर घेतला असेल, तर पुरवठयाचे ठिकाण हे, प्राप्तकत्र्याचे स्थान असेल.
स्पष्टीकरण .----जेव्हा कार्यक्रम एकापेक्षा अधिक राज्यांमध्ये किंवा संघ राज्यक्षेत्रांमध्ये घेतला असेल आणि अशा कार्यक्रमाशी संबंधित असणाया सेवा पुरविण्यासाठी एकत्रित रक्कम आकारली असेल तेव्हा, अशा सेवांच्या पुरवठयाचे ठिकाण हे, यासंबंधात केलेल्या करारानुसार किंवा करारनाम्यानुसार किंवा अशा कराराच्या किंवा करारनाम्याच्या अभावी, विहित करण्यात येतील अशा इतर गोष्टींच्या आधारे, स्वतंत्रपणे वसूल केलेल्या किंवा निर्धारित केलेल्या सेवांच्या मूल्याच्या प्रमाणात, संबंधित राज्यांपैकी किंवा संघ राज्यक्षेत्रांपैकी प्रत्येक राज्यामध्ये किंवा संघ राज्यक्षेत्रांमध्ये असल्याप्रमाणे विचारात घेण्यात येईल.
(८) डाकेने (मेल) किंवा कुरिअरने यांसह वस्तुंची वाहतूक करण्याच्या मार्गाने सेवा पुरविण्याचे ठिकाण हे,-----
(क) नोंदणीकृत व्यक्त्तीच्या बाबतीत, अशा व्यक्त्तीचे स्थान असेल ;
(ख) नोंदणीकृत व्यक्त्तीव्यतिरिक्त्त इतर व्यक्त्तींच्या बाबतीत, ज्या स्थानी, अशा वस्तू त्याच्या वाहतुकीसाठी सुपूर्द केल्या जातात ते स्थान असेल :
भारताचे राजपत्र, असाधारण १४ अनुभाग १] SECTION 1] GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARY१[परंतु असे की, जेव्हा वस्तुंच्या वाहतुकीचे ठिकाण हे भारताबाहेरील एखादे ठिकाण असते तेव्हा, पुरवठयाचे ठिकाण हे, अशा वस्तुंचे अंतिम ठिकाण असेल.]
(९) प्रवासी वाहतुकीच्या सेवा पुरवण्याचे ठिकाण हे ,-----
(क) नोंदणीकृत व्यक्त्तीच्या बाबतीत, अशा व्यक्त्तीचे स्थान असेल;
(ख) नोंदणीकृत व्यक्त्तीव्यतिरिक्त्त इतर व्यक्त्तीच्या बाबतीत, जेथे प्रवासी सलग प्रवासासाठी एखाद्या वाहनात प्रवेश करतात ते ठिकाण असेल :
परंतु असे की, जेव्हा प्रवासाचा हक्क, भविष्यातील वापरासाठी दिलेला असेल आणि प्रवासाचा हक्क देतेवेळी, प्रवासाच्या आरंभाचा टप्पा माहीत नसेल तेव्हा, अशा सेवा पुरवठयाचे ठिकाण हे, पोट- कलम (२) च्या तरतुदींनुसार निर्धारित करण्यात येईल.
स्पष्टीकरण.----या पोट-कलमाच्या प्रयोजनार्थ, पुढील व परतीच्या प्रवासाचा हक्क त्याच वेळेस दिला जात असला तरीदेखील परतीचा प्रवास स्वतंत्र प्रवास म्हणून समजण्यात येईल.
(१०) जलयान, विमान, आगगाडी किंवा मोटार वाहन यांसह एखाद्या वाहनात चढल्यावर सेवा पुरवण्याचे ठिकाण हे, प्रवासासाठी ते वाहन निघण्याच्या पहिल्या नियोजित टप्प्याचे स्थान असेल.
(११) कोणत्याही व्यक्त्तीला विदा हस्तांतरण, प्रक्षेपण, केबल व घरोघरी थेट दूरदर्शन सेवा यांसह दूरसंचार सेवा पुरवण्याचे ठिकाण हे,------
(क) स्थिर दूरसंचार तारमार्ग, भाडेपट्टयाने घेतलेले परिपथ, भाडेपट्टयाने घेतलेले आंतरजाल (इंटरनेट) परिपथ, केबल किंवा डिश अॅन्टेना या मार्गाने सेवा पुरविण्याच्या बाबतीत, जेथे सेवा प्राप्त करण्यासाठी दूरसंचार तारमार्ग, भाडेपट्टयाने घेतलेले परिपथ किंवा केबल जोडणी किंवा डिश अॅन्टेना बसविला आहे, ते स्थान असेल ;
(ख) प्रदानोत्तर (पोस्ट-पेड) तवावर पुरविलेल्या दूरसंचारासाठी भ्रमणध्वनी जोडणी व आंतरजाल (इंटरनेट) सेवांच्या बाबतीत, सेवा पुरवठादाराच्या अभिलेखावर असलेल्या सेवा प्राप्तकत्र्याच्या देयकावरील पयाचे स्थान असेल ;
(ग) जेव्हा दूरसंचारासाठी भ्रमणध्वनी जोडणी, आंतरजाल सेवा आणि घरोघरी थेट दूरदर्शन सेवा, प्रमाणकाद्वारे किंवा इतर कोणत्याही साधनांद्वारे पूर्व - प्रदानाच्या तत्वावर,----
(एक) उपयोगकर्ता ओळख परिमाणपत्राचा (मोडयुल कार्ड) किंवा पुनर्प्रभारण (रिचार्ज) प्रमाणकाचा विक्री अभिकर्ता किंवा पुर्नविक्रेता किंवा वितरक यांच्यामार्फत पुरविल्या जातात त्याबाबतीत, पुरवण्याच्या वेळी पुरवठादाराच्या अभिलेखानुसार विक्री अभिकत्र्याचा किंवा पुर्नविक्रेत्याचा किंवा वितरकाचा पत्ता असेल ; किंवा
(दोन) कोणत्याही व्यक्त्तीने शेवटच्या उपयोगकत्र्याला पुरविल्या असतील त्याबाबतीत, जेथे असे पूर्व प्रदान प्राप्त झाले असेल किंवा अशी प्रमाणके विकली असतील ते स्थान असेल ;
(घ) इतर प्रकरणी, सेवा पुरवठादाराच्या अभिलेखानुसार प्राप्तकत्र्याचा पत्ता असेल आणि जेव्हा असा पत्ता उपलब्ध नसेल तेव्हा पुरवठयाचे ठिकाण हे, सेवा पुरवठादाराचे स्थान असेल :
परंतु असे की, जेव्हा सेवा पुरवठादाराच्या अभिलेखानुसार प्राप्तकत्र्याचा पत्ता उपलब्ध नसेल तेव्हा, पुरवठयाचे ठिकाण हे, सेवा पुरवठादाराचे स्थान असेल :
१. २०१८ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ५ द्वारे हे परंतुक समाविष्ट केले (१ फेब्रुवारी, २०१९ रोजी व तेव्हापासून).
१५ भारताचे राजपत्र, असाधारण [भाग बारा GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARY [PART XIIपरंतु आणखी असे की, जर आंतरजाल बँकिंगद्वारे किंवा प्रदानाच्या इतर इलेक्ट्रॉनिक प्रकाराद्वारे अशा पूर्व प्रदान सेवेचा उपयोग करून घेतलेला असेल किंवा पुनर्प्रभारण केले जात असेल तर, सेवा पुरवठादाराच्या अभिलेखावरील सेवा प्राप्तकत्र्याचे स्थान हे, अशा सेवा पुरवठयाचे ठिकाण असेल.
स्पष्टीकरण.----जेव्हा भाडेपट्टयाने घेतलेला परिपथ, एकापेक्षा अधिक राज्यांमध्ये किंवा संघ राज्यक्षेत्रांमध्ये बसविला असेल आणि अशा परिपथाशी संबंधित असणाया सेवा पुरविठयाकरिता एकत्रित रक्कम आकारली जात असेल तेव्हा, अशा सेवा पुरवठयाचे ठिकाण हे, यासंबंधात केलेल्या करारानुसार किंवा करारनाम्यानुसार किंवा अशा कराराच्या किंवा करारनाम्याच्या अभावी, विहित करण्यात येतील अशा इतर गोष्टींच्या आधारे, स्वतंत्रपणे गोळा केलेल्या किंवा निर्धारित केलेल्या सेवांच्या मूल्याच्या प्रमाणात, संबंधित राज्यांपैकी किंवा संघराज्यक्षेत्रांपैकी प्रत्येक राज्यामध्ये किंवा संघ राज्यक्षेत्रामध्ये करण्यात येत असल्याप्रमाणे, विचारात घेण्यात येईल.
(१२) कोणत्याही व्यक्त्तीला पुरविलेल्या रोखे दलाली सेवांसह बँकिंग किंवा इतर वित्तीय सेवा पुरवण्याचे ठिकाण हे, सेवा पुरवठादाराच्या अभिलेखावरील सेवा प्राप्तकत्र्याचे स्थान असेल :
परंतु असे की, सेवा प्राप्तकत्र्याचे स्थान पुरवठादाराच्या अभिलेखावर नसेल तर, पुरवण्याचे ठिकाण हे, सेवा पुरवठादाराचे स्थान असेल.
(१३) विमा सेवा पुरवण्याचे ठिकाण हे,----
(क) नोंदणींकृत व्यक्त्तीच्या बाबतीत, अशा व्यक्त्तीचे स्थान असेल;
(ख) नोंदणीकृत व्यक्त्तीव्यतिरिक्त्त इतर व्यक्त्तींच्या बाबतीत, सेवा पुरवठादाराच्या अभिलेखावर असलेले सेवा प्राप्तकत्र्याचे स्थान असेल.
(१४) केंद्र सरकार, राज्य शासन, करारामध्ये किंवा कारारनाम्यामध्ये निश्चित केलेल्या राज्यांसाठी किंवा संघ राज्यक्षेत्रांसाठी असलेले वैधानिक मंडळ किंवा स्थानिक प्राधिकरण यांना जाहिरात सेवापुरवण्याचे ठिकाण हे, अशा प्रत्येक राज्यामध्ये किंवा संघ राज्यक्षेत्रामध्ये असल्याप्रमाणे विचारात घेण्यात येईल आणि प्रत्येक राज्याच्या किंवा संघ राज्यक्षेत्राच्या अशा विर्िनदिष्ट पुरवठयाचे मूल्य, यांसंबंधात केलेल्या करारानुसार किंवा करारनाम्यानुसार किंवा, अशा कराराच्या किंवा करारनाम्याच्या अभावी, विहित करण्यात येईल अशा इतर गोष्टींच्या आधारे निर्धारित करण्यात येईल त्याप्रमाणे संबंधित राज्यांमध्ये किंवा संघ राज्यक्षेत्रांमध्ये प्रसारित करण्याच्या मार्गाने पुरवलेल्या सेवांशी संबंध लावता येण्याजोग्या रकमेच्या प्रमाणात असेल.
१३. (१) जेव्हा सेवा पुरवठादाराचे स्थान किंवा सेवा प्राप्तकत्र्याचे स्थान भारताबाहेर असते तेव्हा, सेवा पुरवण्याचे ठिकाण निर्धारित करण्यासाठी या कलमाच्या तरतुदी लागू होतील.
(२) पोट-कलमे (३) ते (१३) यांमध्ये विर्िनदिष्ट केलेल्या सेवांखेरीज सेवांच्या पुरवठयाचे ठिकाण हे, सेवा प्राप्तकत्र्याचे स्थान असेल :
परंतु असे की, जेव्हा सेवा प्राप्तकत्र्याचे स्थान, व्यवसायाच्या सर्वसाधारण ओघात उपलब्ध नसते तेव्हा, जेव्हा पुरवठादाराचे स्थान किंवा प्राप्तकत्र्याचे स्थान भारताबाहेर असते तेव्हा सेवा पुरवण्याचे ठिकाण.
पुरवण्याचे ठिकाण हे, सेवा पुरवठादाराचे स्थान असेल.
(३) पुढील सेवा पुरवण्याचे ठिकाण हे, जेथे सेवा प्रत्यक्षपणे दिल्या जातात ते स्थान असेल :-----
(क) सेवा प्राप्तकत्र्याने, सेवा पुरवठादाराला किंवा सेवा पुरवण्याच्या दृष्टीने सेवा पुरवठादाराच्या वतीने काम करणाया व्यक्त्तीला ज्या वस्तू प्रत्यक्षपणे उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असते अशा वस्तुंच्याबाबत पुरवलेल्या सेवा :
परंतु असे की, जेव्हा अशा सेवा, इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे सुदूर स्थानावरून पुरविल्या जातात तेव्हा, पुरवठयाचे ठिकाण हे, सेवा पुरविते वेळी जेथे वस्तू स्थित असतात ते स्थान असेल :
भारताचे राजपत्र, असाधारण १६ अनुभाग १] SECTION 1] GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARY१[परंतु आणखी असे की, या खंडात अंतभर्ूत असलेली कोणतीही गोष्ट, ज्या वस्तू दुरूस्तीसाठी किंवा इतर कोणत्याही उपचारासाठी किंवा प्रक्रियेसाठी भारतात तात्पुरत्या आयात केल्या जातात आणि अशा दुरूस्तीनंतर किंवा उपचारानंतर किंवा प्रक्रियेनंतर ज्या अशी दुरूस्ती, उपचार किंवा प्रक्रिया यांसाठी आवश्यक आहेत त्या व्यतिरिक्त्त भारतात कोणत्याही वापरासाठी न ठेवता निर्यात केल्या जातात अशा वस्तुंच्या संबंधात पुरविलेल्या सेवांच्या बाबतीत लागू होणार नाही ;]
(ख) ज्यामध्ये सेवा पुरविण्यासाठी पुरवठादारासोबत प्राप्तकत्र्याची किंवा त्याच्या वतीने काम करणाया व्यक्त्तीची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असते, तेथे एकतर सेवा प्राप्तकर्ता म्हणून किंवा प्राप्तकत्र्याच्या वतीने काम करणारी व्यक्त्ती म्हणून प्रतिनिधित्व केलेल्या व्यक्त्तीला पुरविलेल्या सेवा.
(४) स्थावर मालमत्तेच्या संबंधात, तज्ज्ञ व्यक्त्तींनी व संपदा अभिकत्यार्ंनी पुरवलेल्या सेवांसह थेट पुरविलेल्या सेवा पुरवठयाचे, हॉटेल, पथिकाश्रम, अतिथीगृह, क्लब किंवा छावणी स्थान - मग कोणत्याही नावाने संबोधण्यात येवो- याद्वारे निवासव्यवस्था पुरविण्याचे, स्थावर मालमत्तेचा वापर करण्याचा हक्क देण्याचे, वास्तुविशारद किंवा अंतर्गत सजावटकार यांच्याकामासह बांधकाम करण्याच्या किंवा त्यात समन्वय साधण्याच्या सेवांचे ठिकाण हे, जेथे स्थावर मालमत्ता स्थित असेल किंवा स्थित असण्याचे उद्देशित असेल ते ठिकाण असेल.
(५) सांस्कृतिक, कलात्मक, क्रीडा, वैज्ञानिक, शैक्षणिक किंवा करमणूकविषयक कार्यक्रम किंवा महोत्सव, संमेलन, जत्रा, प्रदर्शन किंवा तत्सम कार्यक्रम यांस प्रवेश देण्याच्या किंवा त्यांचे आयोजन करण्याच्या मार्गाने पुरविलेल्या सेवांच्या किंवा असा प्रवेश देण्याशी किंवा आयोजन करण्याशी आनुषंगिक असलेल्या सेवांच्या पुरवठयाचे ठिकाण हे, जेथे असा कार्यक्रम प्रत्यक्षपणे घेतला असेल ते ठिकाण असेल.
(६) जेव्हा पोट-कलम (३) किंवा पोट-कलम (४) किंवा पोट-कलम (५) मध्ये र्िनदिष्ट केलेल्या कोणत्याही सेवा, करपात्र राज्यक्षेत्रातील स्थानासह एकाहून अधिक ठिकाणी पुरवल्या असतील तेव्हा सेवा पुरवठयाचे ठिकाण हे, करपात्र राज्यक्षेत्रातील स्थान असेल.
(७) जेव्हा पोट-कलम (३) किंवा पोट-कलम (४) किंवा पोट-कलम (५) मध्ये र्िनदिष्ट केलेल्या सेवा एकाहून अधिक राज्यांमध्ये किंवा संघ राज्यक्षेत्रांमध्ये पुरविल्या जातात तेव्हा, अशा सेवा पुरवण्याचे ठिकाण हे, संबंधित राज्यांपैकी किंवा संघराज्यक्षेत्रांपैकी प्रत्येक राज्यामध्ये किंवा संघ राज्यक्षेत्रामध्ये असल्याप्रमाणे विचारात घेण्यात येईल आणि प्रत्येक राज्यासाठी किंवा संघ राज्यक्षेत्रासाठी विर्िनदिष्ट असलेले अशा पुरवठयांचे मूल्य हे, यासंबंधात केलेल्या करारानुसार किंवा करारनाम्यानुसार किंवा अशा कराराच्या किंवा करारनाम्याच्या अभावी, विहित करण्यात येतील अशा इतर गोष्टींच्या आधारे, स्वतंत्रपणे वसूल केलेल्या किंवा निर्धारित केलेल्या सेवांच्या मूल्याच्या प्रमाणात असेल.
(८) पुढील सेवा पुरवण्याचे ठिकाण हे, सेवा पुरवठादाराचे स्थान असेल :-----
(क) एखाद्या बँक व्यवसायी कंपनीने किंवा वित्तीय संस्थेने किंवा बँकेतर वित्तीय कंपनीने खातेधारकाला पुरवलेल्या सेवा ;
(ख) मध्यस्थ सेवा ;
(ग) नौकांसह, परंतु विमाने व जलयाने वगळून एक महिन्याच्या कालावधीपयर्ंत वाहतुकीची साधने भाडयाने घेण्याचा समावेश असणाया सेवा.
स्पष्टीकरण.----या पोट-कलमाच्या प्रयोजनार्थ,------
(क) ""खाते"" या शब्दप्रयोगाचा अर्थ, ठेवीदाराला व्याज देणारे खाते, असा आहे, आणि यामध्ये अनिवासी बा खात्याचा आणि अनिवासी सर्वसाधारण खात्याचा समावेश होतो ;
१. २०१८ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ६ द्वारे हा मजकूर बदली दाखल केला (१ फेब्रुवारी, २०१९ रोजी व तेव्हापासून).
भाग बारा-(२०)-३१७ भारताचे राजपत्र, असाधारण [भाग बारा GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARY [PART XII (ख) ""बँक व्यवसायी कंपनी"" या शब्दप्रयोगास,
भारतीय रिझव्र्ह बँक अधिनियम, १९३४ याच्या कलम ४५ क च्या खंड (क) अन्वये तिला जो १९३४ चा २.
अर्थ नेमून दिला असेल, तोच अर्थ असेल ;
(ग) ""वित्तीय संस्था"" या शब्दप्रयोगास, भारतीय रिझव्र्ह बँक अधिनियम, १९३४ याच्या खंड ४५ १९३४ चा २.
झ च्या खंड (ग) मध्ये, तिला जो अर्थ नेमून दिला असेल, तोच अर्थ असेल ;
(घ) ""बँकेतर वित्तीय कंपनी"" या शब्दप्रयोगाचा अर्थ,-----
(एक) जी एक कंपनी आहे, अशी वित्तीय संस्था;
(दोन) जी कंपनी आहे आणि जिचा कोणत्याही योजनेखाली किंवा व्यवस्थेखाली किंवा इतर कोणत्याही रीतीने ठेवी मिळवण्याचा, किंवा कोणत्याही रीतीने कर्ज देण्याचा प्रमुख व्यवसाय आहे, अशी बँकेतर संस्था ; किंवा
(तीन) भारतीय रिझव्र्ह बँक, केंद्र सरकारच्या पूर्वमान्यतेने आणि राजपत्रातील अधिसूचनेद्वारे विर्िनदिष्ट करील अशी इतर बँकेतर संस्था किंवा अशा संस्थांचा वर्ग ;
असा आहे.
(९) मेल किंवा कुरिअर या मागार्ंव्यतिरिक्त्त अन्य मार्गाने वस्तुंची वाहतूक करण्याच्या सेवा पुरवण्याचे ठिकाण हे, अशा वस्तुंचे अंतिम ठिकाण असेल.
(१०) प्रवासी वाहतूक सेवांच्या बाबतीत पुरवठयाचे ठिकाण हे, जेथे सलग प्रवासासाठी प्रवासी वाहनात प्रवेश करतो ते ठिकाण असेल.
(११) वाहनात असताना पूर्णत: किंवा मोठया प्रमाणात उपभोग घेण्याचे उद्देशित असलेल्या सेवांसह, प्रवासी वाहतूक करण्याच्या ओघात वाहनात चढल्यावर पुरविलेल्या सेवांच्या पुरवठयाचे ठिकाण हे, प्रवासासाठी ते वाहन निघण्याचा पहिला नियोजित टप्पा असेल.
(१२) ऑनलाईन माहिती व विदाआधारित सुविधा किंवा पुन:प्राप्त सेवा पुरवण्याचे ठिकाण हे, सेवा प्राप्तकत्र्याचे स्थान असेल.
स्पष्टीकरण.----या पोट-कलमाच्या प्रयोजनार्थ, अशा सेवा प्राप्त करणारी व्यक्त्ती, जर ती पुढील परस्परविरोधी नसलेल्या शतर्ींपैकी कोणत्याही दोन शतर्ींची पूर्तता करीत असेल तर ती, करपात्र राज्यक्षेत्रात स्थित असल्याचे मानण्यात येईल :-----
(क) आंतरजालामार्फत सेवा प्राप्तकत्र्याने सादर केलेल्या पयाचे स्थान हे, करपात्र राज्यक्षेत्रातील आहे;
(ख) सेवा प्राप्तकर्ता, ज्याद्वारे प्रदान चुकते करतो ते पतपत्र (क्रेडिट कार्ड) किंवा नावे पत्र (डेबिट कार्ड) किंवा भांडार मूल्य पत्र (स्टोअर व्हॅल्यूकार्ड) किंवा भार-पत्र (चार्ज कार्ड) किंवा अद्ययावत पत्र (स्मार्ट कार्ड) किंवा इतर कोणतेही पत्र (कार्ड) , करपात्र राज्यक्षेत्रात देण्यात आले आहे ;
(ग) सेवा प्राप्तकत्र्याच्या देयकाचा पत्ता, करपात्र राज्यक्षेत्रातील आहे ;
(घ) सेवा प्राप्तकत्र्याने वापरलेल्या यंत्राचा आंतरजाल प्रोटोकॉल पत्ता करपात्र राज्यक्षेत्रातील आहे ;
(ङ) प्रदान करण्यासाठी वापरलेले खाते ज्या बँकेमध्ये ठेवलेले आहे ती सेवा प्राप्तकत्र्याची बंक, करपात्र राज्यक्षेत्रातील आहे ;
(च) सेवा प्राप्तकत्र्याने वापरलेल्या उपयोगकर्ता ओळख परिमाण पत्राचा (मोडयुल कार्ड) देशाचा संकेतांक, करपात्र राज्यक्षेत्रातील आहे ;
(छ) ज्यामार्फत प्राप्तकत्र्यास सेवा मिळत आहे त्या स्थिर दूरध्वनीचे (लॅन्डलाईनचे) स्थान, करपात्र राज्यक्षेत्रातील आहे.
भारताचे राजपत्र, असाधारण १८ अनुभाग १] SECTION 1] GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARY(१३) सेवा पुरवण्याच्या दुहेरी कर आकारणीस किंवा करेतर आकारणीस प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने, किंवा नियम एकरुपतेने लागू करण्यासाठी, सरकारला, कोणत्याही वर्णनाच्या सेवा किंवा ज्यामध्ये पुरवठयाचे ठिकाण हे, सेवेचा प्रभावी वापर व उपभोग घेण्याचे ठिकाण असेल अशा परिस्थिती, अधिसूचित करण्याचा अधिकार असेल.
१४. (१) बिगर-करपात्र राज्यक्षेत्रात स्थित असलेल्या कोणत्याही व्यक्त्तीने, ऑनलाईन माहिती व विदाआधारित सुविधा किंवा पुन:प्राप्त सेवा पुरविल्यावर आणि बिगर-करपात्र ऑनलाईन प्राप्तकत्र्यास मिळाल्यावर बिगर-करपात्र राज्यक्षेत्रात स्थित असलेला सेवा पुरवठादार हा, सेवांच्या अशा पुरवठयावर एकात्मिक कर प्रदान करण्यास पात्र असलेली व्यक्त्ती असेल :
ऑनलाईन माहिती
व विदाआधारित
सुविधा किंवा
पुन:प्राप्त सेवा
यांच्या
पुरवठादाराने
कराचे प्रदान
करण्यासाठी
विशेष तरतूद.
परंतु असे की, बिगर-करपात्र राज्यक्षेत्रात स्थित असलेल्या कोणत्याही व्यक्त्तीने, ऑनलाईन माहिती व विदाआधारित सुविधा किंवा पुन:प्राप्त सेवा पुरविल्यास आणि बिगर-करपात्र ऑनलाईन प्राप्तकत्र्यास मिळाल्यास अशा बाबतीत, जो अशी सेवा पुरवण्याची व्यवस्था करतो किंवा सुविधा करतो, अशा बिगर-करपात्र राज्यक्षेत्रात स्थित असलेल्या मध्यस्थाला, जेव्हा असा मध्यस्थ पुढील शतर्ींची पूर्तता करतो ते खेरीज करून, बिगर-करपात्र राज्यक्षेत्रातील सेवांच्या पुरवठादाराकडून अशा सेवांचा प्राप्तकर्ता असल्याचे, आणिबिगर-करपात्र ऑनलाईन प्राप्तकत्र्याला अशा सेवा पुरविल्या असल्याचे मानण्यात येईल :----
(क) पुरवठयात भाग घेणाया अशा मध्यस्थाने दिलेले किंवा उपलब्ध केलेले बीजक किंवा ग्राहकाचे देयक किंवा पावती, बिगर-करपात्र राज्यक्षेत्रातील प्रश्नास्पद सेवा व त्यांचा पुरवठादार स्पष्टपणे निश्चित करतात ;
(ख) पुरवठयामध्ये सहभागी असलेला मध्यस्थ, मध्यस्थ जो वसूल करीत नाही किंवा कोणत्याही रीतीने प्रदान करण्याच्या प्रक्रियेत नसतो आणि अशा सेवांचा बिगर-करपात्र ऑनलाईन प्राप्तकर्ता आणि पुरवठादार यांच्यामधील प्रदानासाठीही जबाबदार नसतो; असा आकार ग्राहकाला प्राधिकृत करीत नाही किंवा तो आकारण्यामध्ये भाग घेत नाही;
(ग) पुरवठयात सहभागी असलेला मध्यस्थ, पोचवणी करण्यास प्राधिकृत करीत नाही; आणि
(घ) पुरवठयाच्या सर्वसाधारण अटी व शर्ती ह्य, पुरवठयामध्ये सहभागी असलेल्या मध्यस्थाने निश्चित केलेल्या नाहीत तर सेवा पुरवठादाराने निश्चित केलेल्या आहेत.
(२) पोट-कलम (१) मध्ये र्िनदिष्ट केलेल्या ऑनलाईन माहिती व विदाआधारित सुविधा किंवा पुन:प्राप्त सेवा पुरवठादार, एकात्मिक कराच्या प्रदानासाठी, सरकारने अधिसूचित करावयाच्या सरलीकृत नोंदणी योजनेअंतर्गत एकल नोंदणी करील :
परंतु असे की, करपात्र राज्यक्षेत्रात, कोणत्याही प्रयोजनासाठी अशा पुरवठादाराचे प्रतिनिधित्व करणारी करपात्र राज्यक्षेत्रात स्थित असलेली कोणतीही व्यक्त्ती, नोंदणी करून घेईल आणि अशा पुरवठादाराच्या वतीने एकात्मिक कर प्रदान करील :
परंतु आणखी असे की, जर असा पुरवठादार, करपात्र राज्यक्षेत्रात प्रत्यक्ष उपस्थित राहत नसेल, किंवा त्याचा कोणत्याही प्रयोजनासाठी कोणताही प्रतिनिधी नसेल तर, त्याला, एकात्मिक कर प्रदान करण्याच्या प्रयोजनार्थ, करपात्र राज्यक्षेत्रात एखाद्या व्यक्त्तीची नियुक्त्ती करता येईल आणि अशी व्यक्त्ती, अशा कराच्या प्रदानासाठी उत्तरदायी असेल.
भाग बारा-(२०)-३अ१९ भारताचे राजपत्र, असाधारण [भाग बारा GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARY [PART XII
प्रकरण सहा
आंतरराष्ट्रीय पर्यटकाला एकात्मिक कराचा परतावा
१५. भारत सोडून जाणाया पर्यटकाने भारताबाहेर घेऊन गेलेल्या वस्तुंच्या कोणत्याही पुरवठयावर प्रदान केलेला एकात्मिक कर, विहित करण्यात येईल अशा रीतीने व अशा शतर्ींना आणि संरक्षक उपाययोजनांना अधीन राहून, परत करण्यात येईल.
भारत सोडून
जाणाया
पर्यटकाला
वस्तुंच्या
पुरवठयावर प्रदान
केलेल्या एकात्मिक
कराचा परतावा.
स्पष्टीकरण.----या कलमाच्या प्रयोजनार्थ, ""पर्यटक"" या शब्दप्रयोगाचा अर्थ, जी वैध बिगर-आप्रवासी प्रयोजनांकरिता सहा महिन्यांपेक्षा अधिक नसेल इतका काळ राहण्याकरिता भारतात येते, अशी सर्वसाधारणपणे भारताची रहिवासी नसलेली व्यक्त्ती, असा आहे.
प्रकरण सात
शून्यदरित पुरवठा
१६. (१) ""शून्यदरित पुरवठा"" याचा अर्थ, वस्तूंचा किंवा सेवांचा किंवा दोन्हींचा पुढील पुरवठयापैकी शून्यदरित पुरवठा.
कोणताही पुरवठा, असा आहे, जसे :----
(क) वस्तुंची किंवा सेवांची किंवा दोन्हींची निर्यात; किंवा
(ख) विशेष र्आथिक प्रक्षेत्र विकासकाला किंवा विशेष र्आथिक प्रक्षेत्र युनिटाला १[प्राधिकृत कार्यासाठी] वस्तूंचा किंवा सेवांचा किंवा दोन्हींचा पुरवठा.
(२) केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियमाच्या कलम १७ च्या पोट-कलम (५) च्या तरतुदींना अधीन राहून, शून्यदरित पुरवठा हा, कर माफ पुरवठा असला तरीसुद्धा, निविष्टी कराच्या जमा रकमेचा उपयोग शून्यदरित पुरवठा करण्यासाठी करून घेता येईल.
२[(३) शून्यदरित पुरवठा करणारी नोंदणीकृत व्यक्त्ती, विहित करण्यात येतील अशा शर्तीस, संरक्षक उपाययोजनांस व कार्यपद्धतीस अधीन राहून, केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियमाच्या कलम ५४ च्या तरतुदी किंवा त्याखालील केलेले नियम यांनुसार, बंधपत्र किंवा हमीपत्र या अन्वये, एकात्मिक कराचे प्रदान न करता, वस्तुंच्या किंवा सेवांच्या अथवा दोन्हींच्या पुरवठयावरील न वापरलेल्या निविष्टी कराच्या जमा रकमेच्या परताव्याचा दावा करण्यासाठी पात्र असेल :
१९९९ चा ४२.
परंतु, वस्तुंचा शून्यदरित पुरवठा करणारी नोंदणीकृत व्यक्त्ती, विक्री उत्पन्नाच्या बिगर-वसुलीच्या बाबतीत, विहित करण्यात येईल अशा रीतीने, परकीय चलनाचे वित्तप्रेषण मिळण्याकरिता, परकीय चलन व्यवस्थापन अधिनियम, १९९९ अन्वये विहित केलेली मुदत समाप्त झाल्यानंतर तीस दिवसांच्या आत, केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियमाच्या कलम ५० अन्वये अनुज्ञेय असलेल्या व्याजासह या पोट-कलमान्वये अशा प्रकारे मिळालेला परतावा जमा करण्यासाठी पात्र असेल.
(४) सरकारला, परिषदेच्या शिफारशीवरून, आणि अशा शतर्ींस, संरक्षक उपाययोजनांस व कार्यपद्धतीस अधीन राहून, अधिसूचनेद्वारे,-----
(एक) ज्या व्यक्त्ती एकात्मिक कराचे प्रदान केल्यावर शून्यदरित पुरवठा करतील आणि अशा प्रकारे प्रदान केलेल्या कराच्या परताव्याचा दावा करतील अशा व्यक्त्तींचा वर्ग विर्िनदिष्ट करता येईल ;
(दोन) एकात्मिक कराचे प्रदान केल्यावर ज्या निर्यात करता येतील अशा वस्तुंचा किंवा सेवांचा वर्ग विर्िनदिष्ट करता येईल आणि अशा वस्तुंच्या किंवा सेवांच्या पुरवठादारास अशा प्रकारे प्रदान केलेल्या कराच्या परताव्याचा दावा करता येईल.]
१. २०२१ चा अधिनियम क्रमांक १९ याच्या कलम १२३ द्वारे हा मजकूर समाविष्ट केला (२८ मार्च, २०२१ रोजी व तेव्हापासून).
२. वरील अधिनियमाच्या कलम १२३ द्वारे पोट-कलम (३) ऐवजी दाखल केला (२८ मार्च, २०२१ रोजी व तेव्हापासून).
भारताचे राजपत्र, असाधारण २० अनुभाग १] SECTION 1] GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARYप्रकरण आठ
कराचे संविभाजन व निधीची संव्यवस्था
१७. (१) केंद्र सरकाराला प्रदान केलेल्या एकात्मिक करापैकी,----
कराचे संविभाजन
व निधीची
संव्यवस्था.
(क) केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियमाच्या कलम १० अन्वये, कर प्रदान करणाया बिगर नोंदणीकृत व्यक्त्तीला किंवा नोंदणीकृत व्यक्त्तीला केलेल्या वस्तुंच्या किंवा सेवांच्या किंवा दोन्हींच्या आंतरराज्यीय पुरवठयाच्या बाबतीत ;
(ख) जेव्हा नोंदणीकृत व्यक्त्ती, निविष्टी कराच्या जमा रकमेसाठी पात्र नसते तेव्हा, वस्तुंच्या किंवा सेवांच्या किंवा दोन्हींच्या आंतरराज्यीय पुरवठयाच्या बाबतीत ;
(ग) जेव्हा नोंदणीकृत व्यक्त्ती विर्िनदिष्ट कालावधीमध्ये निविष्टी कराच्या जमा रकमेचा उपयोग करून घेत नाही आणि अशा प्रकारे, ज्यावर्षी पुरवठा केला होता अशा वर्षाचे वर्ाषिक विवरण सादर करण्याचा नियत दिनांक समाप्त झाल्यानंतर, एकात्मिक कर लेख्यामध्ये ती रक्कम शिल्लक राहते तेव्हा, तिला वित्तीय वर्षामध्ये केलेल्या वस्तुंच्या किंवा सेवांच्या किंवा दोन्हींच्या आंतरराज्यीय पुरवठयाच्या बाबतीत ;
(घ) केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियमाच्या कलम १० अन्वये कर प्रदान करणाया बिगर नोंदणीकृत व्यक्त्तीने किंवा नोंदणीकृत व्यक्त्तीने वस्तुंची किंवा सेवांची किंवा दोन्हींची आयात करण्याच्या बाबतीत ;
(ङ) जेव्हा नोंदणीकृत व्यक्त्ती, निविष्टी कराच्या जमा रकमेसाठी पात्र नसते तेव्हा, वस्तुंच्या किंवा सेवांच्या किंवा दोन्हींच्या आयातीच्या बाबतीत ;
(च) जेव्हा नोंदणीकृत व्यक्त्ती, विर्िनदिष्ट कालावधीत उक्त्त जमा रकमेचा उपयोग करून घेत नाही आणि अशा प्रकारे, ज्या वर्षी पुरवठा प्राप्त झाला होता अशा वर्षाचे वर्ाषिक विवरण सादर करण्याचा नियत दिनांक समाप्त झाल्यानंतर, एकात्मिक कर लेख्यामध्ये ती रक्कम शिल्लक राहते तेव्हा, तिने वित्तीय वर्षात वस्तुंची किंवा सेवांची किंवा दोन्हींची आयात करण्याच्या बाबतीत,
तत्सम राज्यांतर्गत पुरवठयावरील केंद्रीय कराइतक्या दराने परिगणित केलेली कराची रक्कम, केंद्र सरकारकडे संविभाजित करण्यात येईल.
(२) ज्यासाठी पोट-कलम (१) अन्वये केंद्र सरकारकडे संविभाजन करण्यात आलेले आहे अशा पुरवठयाच्या बाबतीत, एकात्मिक कर लेख्यामधील उर्वरित एकात्मिक कराची शिल्लक रक्कम ही,----
(क) जेव्हा असा पुरवठा करण्यात येतो तेव्हा अशा राज्याकडे ; आणि
(ख) जेव्हा असा पुरवठा संघ राज्यक्षेत्रामध्ये करण्यात येतो, तेव्हा केंद्र सरकारकडे,
संविभाजित करण्यात येईल :
पंरतु असे की, जेव्हा कोणत्याही करपात्र व्यक्त्तीने केलेल्या अशा पुरवठयाचे ठिकाण, स्वतंत्रपणे निश्चित केले जाऊ शकत नसेल तेव्हा, तेथे उक्त्त शिल्लक रक्कम ही, एखाद्या वित्तीय वर्षामध्ये अशा प्रत्येक राज्याकडे, किंवा, यथास्थिति, संघ राज्यक्षेत्राकडे अशा करपात्र व्यक्त्तीने केलेल्या एकूण पुरवठयाच्या प्रमाणात,-----
(क) प्रत्येक राज्याकडे ; आणि
(ख) संघ राज्यक्षेत्रांच्या संबंधात केंद्र सरकारकडे, संविभाजित करण्यात येईल :
परंतु आणखी असे की, जेव्हा असा पुरवठा करणारी करपात्र व्यक्त्ती निश्चित करता येण्याजोगी नसते तेव्हा, उक्त्त शिल्लक रक्कम ही, लगतपूर्वीच्या वित्तीय वर्षामध्ये संबंधित राज्याने किंवा, यथास्थिति, केंद्र सरकारने, राज्य कर म्हणून किंवा, यथास्थिति, संघ राज्यक्षेत्र कर म्हणून गोळा केलेल्या रकमेच्या प्रमाणात, सर्व राज्यांकडे आणि केंद्र सरकारकडे संविभाजित करण्यात येईल.
२१ भारताचे राजपत्र, असाधारण [भाग बारा GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARY [PART XII१[ (२क) पोट-कलम (१) व पोट-कलम (२) अन्वये संविभाजित न केलेली रक्कम ही, त्या त्या वेळी, परिषदेच्या शिफारशींवरून, तदर्थ तवावर केंद्र सरकारला पन्नास टक्के, राज्य शासनांना किंवा, यथास्थिति, संघ राज्यक्षेत्रांना पन्नास टक्के या दराने संविभाजित करता येईल, आणि उक्त्त पोट-कलमांन्वये संविभाजित केलेल्या रकमेनुसार ती समायोजित करण्यात येईल.]
(३) एकात्मिक कराच्या संविभाजनाशी संबंधित असणाया पोट-कलमे (१) व (२) च्या तरतुदी, अशा प्रकारे संविभाजित केलेल्या कराच्या संबंधात वसूल केलेल्या व्याजाच्या, शास्तीच्या व आपसमेळ रकमेच्या संविभाजनासाठी योग्य त्या फेरफारांसह, लागू होतील.
(४) जेव्हा पोट-कलम (१) किंवा पोट-कलम (२) किंवा पोट-कलम (३) अन्वये केंद्र सरकारकडे किंवा राज्य शासनाकडे रक्कम संविभाजित करण्यात आली असेल तेव्हा, एकात्मिक कर म्हणून वसूल केलेली रक्कम, अशा प्रकारे संविभाजित केलेल्या रकमेइतक्या रकमेने कमी होईल आणि केंद्र सरकार, विहित करण्यात येईल अशा रीतीने व अशा वेळेत, केंद्र सरकारकडे संविभाजित केलेल्या संबंधित रकमेइतकी रक्कम, केंद्रीय कर लेख्यात किंवा संघ राज्यक्षेत्र कर लेख्यात हस्तांतरित करील आणि त्या राज्याकडे संविभाजित केलेल्या रकमेइतकी रक्कम, संबंधित राज्यांच्या राज्य कर लेख्यामध्ये हस्तांतरित करील.
२[विवक्षित
रकमांचे
हस्तांतरण.
१७क. जेव्हा कोणतीही रक्कम या अधिनियमाखालील इलेक्ट्रॉनिक रोख खात्यातून राज्य वस्तू व सेवा कर अधिनियम किंवा संघ राज्यक्षेत्र वस्तू व सेवा कर अधिनियमाखालील इलेक्ट्रॉनिक रोख खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात आली असेल तेव्हा, सरकार, विहित करण्यात येईल अशा रीतीने व अशा वेळेत, इलेक्ट्रॉनिक रोख खात्यातून हस्तांतरित केलेल्या रकमेइतकी रक्कम राज्य कर लेख्यात किंवा संघ राज्य कर लेख्यात हस्तांतरित करील.]
१८. या अधिनियमान्वये उपयोग करून घेतलेल्या एकात्मिक कराच्या जमा रकमेचा वापर,-----
निविष्टी कराच्या
जमा रकमेचे
हस्तांतरण.
(क) केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियमाच्या कलम ४९ च्या पोट-कलम (५) च्या तरतुदींनुसार केंद्रीय कराच्या प्रदानासाठी केल्यावर, एकात्मिक कर म्हणून वसूल केलेली रक्कम, अशा प्रकारे वापरलेल्या जमा रकमेइतक्या रकमेने कमी करण्यात येईल आणि केंद्र सरकार, विहित करण्यात येईल अशा रीतीने व अशा वेळेत, अशा प्रकारे कमी केलेल्या रकमेइतकी रक्कम एकात्मिक कराच्या लेख्यामधून केंद्रीय कर लेख्यात हस्तांतरित करील ;
(ख) संघ राज्यक्षेत्र वस्तू व सेवा कर अधिनियमाच्या कलम ९ च्या तरतुदीनुसार, संघ राज्यक्षेत्र कराच्या प्रदानासाठी केल्यावर, एकात्मिक कर म्हणून वसूल केलेली रक्कम, अशा प्रकारे वापरलेल्या जमा रकमेइतक्या रकमेने कमी करण्यात येईल आणि केंद्र सरकार, विहित करण्यात येईल अशा रीतीने व अशा वेळेत अशा प्रकारे कमी केलेल्या रकमेइतकी रक्कम एकात्मिक कराच्या लेख्यामधून संघ राज्यक्षेत्र कर लेख्यात हस्तांतरित करील ;
(ग) संबंधित राज्य वस्तू व सेवा कर अधिनियमाच्या तरतुदींनुसार राज्य कराच्या प्रदानासाठी केल्यावर, एकात्मिक कर म्हणून वसूल केलेली रक्कम, अशा प्रकारे वापरलेल्या जमा रकमेइतक्या रकमेने कमी करण्यात येईल आणि समुचित राज्य शासनाकडे संविभाजित करण्यात येईल आणि केंद्र सरकार, विहित करण्यात येईल अशा रीतीने आणि अशा वेळेत अशी संविभाजित केलेली रक्कम समुचित राज्य शासनाच्या लेख्यामध्ये हस्तांतरित करील.
स्पष्टीकरण.- या प्रकरणाच्या प्रयोजनार्थ, एखाद्या करपात्र व्यक्त्तीच्या संबंधात, ""समुचित राज्य"" याचा अर्थ, केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियमाच्या तरतुदींन्वये जेथे तिने नोंदणी केलेली आहे किंवा ती नोंदणी करण्यास पात्र आहे तेथे असे राज्य किंवा संघ राज्यक्षेत्र, असा आहे.
१. २०१८ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ७ द्वारे हा मजकूर समाविष्ट केला (१ फेब्रुवारी, २०१९ रोजी तेव्हापासून).
२. २०१९ चा अधिनियम क्रमांक २३ याच्या कलम ११४ द्वारे हा मजकूर समाविष्ट केला (१ जानेवारी, २०२० रोजी व तेव्हापासून).
भारताचे राजपत्र, असाधारण २२ अनुभाग १] SECTION 1] GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARY१९. (१) ज्या नोंदणीकृत व्यक्त्तीने आंतरराज्यीय पुरवठा समजून आंतरराज्यीय एकात्मिक कर प्रदान केला असेल, परंतु नंतर जो राज्यांतर्गत पुरवठा असल्याचा निर्णय झाला असेल तेव्हा, विहित करण्यात येईल अशा रीतीने आणि अशा शतर्ींस अधीन राहून, अशा प्रकारे प्रदान केलेली एकात्मिक कराची रक्कम परत करण्यास मंजुरी देण्यात येईल.
दोषपूर्ण रीतीने
गोळा केलेला
आणि केंद्र
सरकारला किंवा
राज्य शासनाला
प्रदान केलेला
कर.
(२) ज्या नोंदणीकृत व्यक्त्तीने राज्यांतर्गत पुरवठा समजून एखाद्या व्यवहारावर केंद्रीय कर किंवा राज्य कर किंवा यथास्थिति, संघ राज्यक्षेत्र कर प्रदान केला असेल, परंतु नंतर जो, आंतरराज्यीय पुरवठा असल्याचा निर्णय झाला असेल तेव्हा, प्रदेय असलेल्या एकात्मिक कराच्या रकमेवर कोणतेही व्याज प्रदान करण्याची आवश्यकता असणार नाही.
प्रकरण नऊ
संकीर्ण
२०. या अधिनियमाच्या व त्याखाली केलेल्या नियमांच्या तरतुदींना अधीन राहून, केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियमाच्या,----
(एक) पुरवठयाची व्याप्ती ;
केंद्रीय वस्तू व
सेवा कर
अधिनियमांच्या
तरतुदी लागू
करणे.
(दोन) संयुक्त्त पुरवठा व मिश्र पुरवठा ;
(तीन) पुरवठयाची वेळ व मूल्य ;
(चार) निविष्टी कराची जमा रक्कम ;
(पाच) नोंदणी ;
(सहा) कराचे बीजक, जमापत्र व नावेपत्र ;
(सात) लेखे व अभिलेख ;
(आठ) विलंब शुल्काव्यतिरिक्त्त विवरणे ;
(नऊ) कराचे प्रदान ;
(दहा) मूळ स्रोतातून कराची वजात ;
(अकरा) मूळ स्रोतातून कराची वसूली ;
(बारा) करनिर्धारण ;
(तेरा) परतावे ;
(चौदा) लेखापरीक्षा ;
(पंधरा) तपासणी, झडती, जप्ती व अटक ;
(सोळा) मागणी व वसुली ;
(सतरा) विवक्षित प्रकरणी प्रदान करण्याचे दायित्व ;
(अठरा) आगाऊ अधिनिर्णय ;
(एकोणीस) अपिले व पुनरीक्षण ;
(वीस) दस्तऐवजांसंबधी गृहीतक ;
(एकवीस) अपराध व शास्ती ;
(बावीस) उक्त्ते काम ;
२३ भारताचे राजपत्र, असाधारण [भाग बारा GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARY [PART XII(तेवीस) ई-वाणिज्य ;
(चोवीस) संक्रमणकालीन तरतुदी ; आणि
(पंचवीस) व्याज व शास्ती लादण्याशी संबंधित असणाया तरतुदींसह संकीर्ण तरतुदी,
यांच्याशी संबंधित असणाया वस्तू व सेवा कर अधिनियमाच्या तरतुदी, या जणू काही त्या या अधिनियमाखाली अधिनियमित केलेल्या आहेत असे समजून केंद्रीय कराच्या संबंधात जशा लागू होत्या, तशाच त्या शक्य असेल तेथवर एकात्मिक कराच्या संबंधात योग्य त्या फेरफारांसह, लागू होतील :
परंतु असे की, मूळ स्रोतातून वजात केलेल्या कराच्या बाबतीत, वजातदार, पुरवठादाराला केलेल्या किंवा त्याच्याकडे जमा केलेल्या प्रदानामधून दोन टक्के दराने कराची वजात करील :
परंतु आणखी असे की, मूळ स्रोतातून वसूल केलेल्या कराच्या बाबतीत, परिचालक, परिषदेच्या शिफारशींवरून अधिसूचित करण्यात येईल त्याप्रमाणे करपात्र पुरवठयाच्या निव्वळ मूल्याच्या दोन टक्क्यांपेक्षा अधिक नसेल अशा दराने कर वसूल करील :
परंतु तसेच, या अधिनियमाच्या प्रयोजनार्थ, पुरवठयाच्या मूल्यामध्ये, या अधिनियमाव्यतिरिक्त्त त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये आणि वस्तू व सेवा कर (राज्यांना भरपाई) अधिनियमान्वये आकारलेले, कोणतेही कर, शुल्क, उपकर, फी आणि आकार, जर पुरवठादाराने स्वतंत्रपणे आकारलेले असतील तर, यांचा समावेश असेल :
परंतु तसेच की, जेव्हा केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियम आणि राज्य वस्तू व सेवा कर अधिनियम किंवा संघ राज्यक्षेत्र वस्तू व सेवा कर अधिनियमयाअन्वये शास्ती आकारणीयोग्य असेल त्याबाबतीत, या अधिनियमान्वये आकारण्यायोग्य असलेली शास्ती, उक्त्त शास्तींची एकूण रक्कम असेल :
१[परंतु तसेच, जेव्हा अपील प्राधिकरणासमोर किंवा अपील न्यायाधिकरणासमोर अपील दाखल करावयाचे असेल तेव्हा, प्रदेय असलेली कमाल रक्कम, अनुक्रमे रुपये पन्नास कोटी व रुपये शंभर कोटी इतकी असेल.] २१. नियत दिनांकास किंवा त्यानंतर केलेल्या सेवांची आयात, अशा सेवा आयात करण्याबाबतचे व्यवहार, नियत दिनांकापूर्वी सुरू करण्यात आलेले आहेत किंवा कसे, हे विचारात न घेता, या अधिनियमाच्या तरतुदींन्वये करास पात्र असतील:
नियत दिनांकास
किंवा त्यानंतर
केलेल्या सेवांची
आयात.
परंतु असे की, जर अशा सेवांच्या आयातीवरील कर विद्यमान कायद्यान्वये संपूर्ण प्रदान करण्यात आलेला असेल तर, या अधिनियमान्वये अशा आयातीवर कोणताही कर प्रदेय असणार नाही :
परंतु आणखी असे की, जर अशा सेवांच्या आयातीवरील कर विद्यमान कायद्यान्वये अशंत: प्रदान करण्यात आलेला असेल तर, कराची शिल्लक रक्कम या अधिनियमान्वये अशा आयातीवरील प्रदेय असेल.
स्पष्टीकरण.---या कलमाच्या प्रयोजनार्थ,जर एकतर अशा पुरवठयाशी संबंधित असणारे बीजक किंवा प्रदान एकतर पूर्णत: किंवा अंशत: नियत दिनांकापूर्वी प्राप्त झालेले असेल, किंवा केलेले असेल तर, व्यवहार नियत दिवसापूर्वी सुरू झाल्याचे मानण्यात येईल.
२२. (१) सरकारला, या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी परिषदेच्या शिफारशींवरून, अधिसूचनेद्वारे, नियम करण्याचा अधिकार.
नियम करता येतील.
(२) पोट-कलम (१) च्या तरतुदींच्या सर्वसाधारणतेस बाध न आणता सरकारला, या अधिनियमाद्वारे, विहित करण्याची आवश्यकता आहे किंवा विहित करता येतील किंवा ज्या बाबतीत नियमांद्वारे तरतुदी करावयाच्या आहेत किंवा करता येतील अशा सर्व किंवा त्यापैकी कोणत्याही बाबींकरिता नियम करता येतील.
१. २०१८ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ८ द्वारे हे परंतुक समाविष्ट केले (१ फेब्रुवारी, २०१९ रोजी व तेव्हापासून).
भारताचे राजपत्र, असाधारण २४ अनुभाग १] SECTION 1] GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARY(३) या कलमाद्वारे प्रदान केलेल्या नियम करण्याच्या अधिकारात, ज्या दिनांकास या अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आल्या असतील त्या दिनांकाच्या अगोदरचा नसेल अशा दिनांकापासून नियमांना किंवा त्यापैकी कोणत्याही नियमास, भूतलक्षी प्रभाव देण्याच्या अधिकाराचा समावेश होतो.
(४) पोट-कलम (१) अन्वये केलेल्या कोणत्याही नियमांत अशी तरतूद करता येईल की, त्यांचे उल्लंघन झाल्यास, दहा हजार रुपयांहून अधिक नसेल एवढया शास्तीसाठी पात्र असेल.
२३. मंडळास, अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी या अधिनियमाशी व त्याखाली विनियम करण्याचा अधिकार.
केलेल्या नियमांशी सुसंगत असतील असे विनियम करता येतील.
नियम, विनियम व
अधिसूचना मांडणे.
२४. या अधिनियमान्वये सरकारने केलेला प्रत्येक नियम, मंडळाने केलेला प्रत्येक विनियम आणि सरकारने काढलेली प्रत्येक अधिसूचना, ते करण्यात आल्यानंतर किंवा ती काढण्यात आल्यानंतर शक्य तितक्या लवकर, संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर ते एका सत्राने बनलेल्या अथवा दोन किंवा अधिक क्रमवर्ती सत्रे मिळून बनलेल्या अशा एकूण तीस दिवसांच्या कालावधीकरिता सत्रासीन असताना, मांडण्यात येतील, आणि जर उपरोक्त्त सत्राच्या किंवा क्रमवर्ती सत्रांच्या पाठोपाठचे सत्र संपण्यापूर्वी जर, त्या नियमात किंवा विनियमात किंवा, यथास्थिति, अधिसूचनेत कोणताही फेरबदल करण्याबाबत दोन्ही सभागृहांचे मतैक्य झाले तर अथवा तो नियम किंवा विनियम करण्यात येऊ नये किंवा, यथास्थिति, ती अधिसूचना काढण्यात येऊ नये याबाबत दोन्ही सभागृहांचे मतैक्य झाले तर, असा नियम, विनियम किंवा, यथास्थिति, अधिसूचना अशा फेरबदल केलेल्या, स्वरूपातच अंमलात येईल किंवा, यथास्थिति, मुळीच अंमलात येणार नाही ; तथापि, अशा कोणत्याही फेरबदलामुळे किंवा शून्यीकरणामुळे, त्या नियमाखाली, विनियमाखाली किंवा, यथास्थिति, अधिसूचनेखाली तत्पूर्वी केलेल्या कोणत्याही गोष्टीच्या विधिग्रातेस बाध येणार नाही.
अडचणी दूर
करणे.
२५. (१) जर या अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदी अंमलात आणताना, कोणतीही अडचण उद्भवली तर, सरकारला, परिषदेच्या शिफारशींवरून, राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे उक्त्त अडचणी दूर करण्याच्या प्रयोजनासाठी आवश्यक किंवा इष्ट असेल त्याप्रमाणे या अधिनियमाच्या किंवा त्याखाली केलेल्या नियमांच्या किंवा विनियमांच्या तरतुदींशी विसंगत नसतील अशा तरतुदी करता येतील :
परंतु असे की, या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून १[पाच वषार्ंचा] कालावधी समाप्त झाल्यानंतर, असा कोणताही आदेश काढण्यात येणार नाही.
(२) या कलमान्वये काढलेला प्रत्येक आदेश, तो काढण्यात आल्यानंतर, शक्य तितक्या लवकर संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवण्यात येईल.
१. २०२० चा वित्त अधिनियम क्रमांक १२ याच्या कलम १३४ द्वारे हा मजकूर बदली दाखल केला (३० जून, २०२० रोजी पासून).
भाग बारा-(२०)-४२५ भारताचे राजपत्र, असाधारण [भाग बारा GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARY [PART XII एकात्मिक वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ चा वरील मराठी अनुवाद हा प्राधिकृत पाठ (केंद्रीय विधि) अधिनियम, १९७३, कलम २, खंड (क) अन्वये राजपत्रात प्रसिद्ध करण्यासाठी राष्ट्रपती महोदयांनी प्राधिकृत केला आहे.
सचिव, भारत सरकार.
एकीकृत माल और सेवा कर अधिनियम, २०१७ के उपयर्ुक्त्त मराठी अनुवाद को प्राधिकृत पाठ (केंद्रीय विधि) अधिनियम, १९७३ की धारा २ के खण्ड (क) के अधीन राजपत्र में राष्ट्रपतीने प्रकाशित किए जाने के लिए प्राधिकृत कर दिया है।
सचिव, भारत सरकार। The above translation in Marathi of the Integrated Goods and Services Tax Act, 2017 has been, authorised by the President to be published in the Official Gazette under clause (a) of section 2 of the Authoritative Texts (Central Laws) Act, 1973.
New Delhi,
Dated : Secretary to the Government of India.
भारताचे राजपत्र, असाधारण २५ अनुभाग १] SECTION 1] GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARYसंघ राज्यक्षेत्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७
(२०१७ चा अधिनियम क्रमांक १४)
[१५ सप्टेंबर, २०२१ रोजी यथाविद्यमान]
[१२ एप्रिल, २०१७] वस्तुंच्या किंवा सेवांच्या किंवा दोन्हींच्या राज्यांतर्गत पुरवठयावर संघ राज्यक्षेत्रांद्वारे कर आकारण्यासाठी व तो वसूल करण्याकरिता आणि त्याच्याशी संबंधित किंवा तदनुषंगिक बाबींकरिता तरतूद करण्यासाठी अधिनियम.
तो, भारतीय गणराज्याच्या अडुसष्टाव्या वर्षी, संसदेद्वारे, पुढीलप्रमाणे अधिनियमित होवो :-----
प्रकरण एक
प्रारंभिक
१. (१) या अधिनियमास, संघ राज्यक्षेत्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७, असे म्हणावे.
संक्षिप्त नाव,
व्याप्ती व प्रारंभ.
(२) तो, अंदमान व निकोबार बेटे, लक्षद्वीप, दादरा व नगर हवेली, दमण व दीव, चंदीगढ व इतर राज्यक्षेत्र यांना लागू आहे.
(३) तो, केंद्र सरकार, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियत करील अशा दिनांकास १ अंमलात येईल :
परंतु असे की, या अधिनियमाच्या विविध तरतुदींसाठी वेगवेगळे दिनांक नियत करता येतील आणि या अधिनियमाच्या प्रारंभाच्या अशा कोणत्याही तरतुदींमधील कोणत्याही संदर्भाचा, ती तरतूद अंमलात येण्याचा संदर्भ म्हणून अन्वयार्थ लावण्यात येईल.
२. या अधिनियमात, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर,---
व्याख्या.
(१) ""नियत दिवस"" याचा अर्थ, ज्या दिनांकास या अधिनियमाच्या तरतुदी अंमलात येतील तो दिनांक, असा आहे ;
(२) ""आयुक्त्त"" याचा अर्थ, कलम ३ अन्वये नियुक्त्त केलेला संघ राज्यक्षेत्र कर आयुक्त्त, असा आहे ;
(३) ""पदनिर्देशित प्राधिकारी"" याचा अर्थ, आयुक्त्ताने अधिसूचित केला असेल असा प्राधिकारी, असा आहे.
(४) ""करमाफ पुरवठा"" याचा अर्थ, ज्यास कराचा निरंक दर लागू होतो अशा किंवा ज्यास कलम ८ अन्वये किंवा एकात्मिक वस्तू व सेवा कर अधिनियमाच्या कलम ६ अन्वये करामधून सूट देता येईल अशा वस्तुंचा किंवा सेवांचा किंवा दोन्हींचा पुरवठा, असा आहे, आणि त्यामध्ये करेतर पुरवठयाचा समावेश होतो ;
(५) ""विद्यमान कायदा"" याचा अर्थ, संसदेने किंवा कोणताही कायदा, अधिसूचना, आदेश, नियम किंवा विनियम करण्याचा अधिकार असलेल्या कोणत्याही प्राधिकरणाने किंवा व्यक्त्तीने या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी संमत केलेल्या किंवा केलेल्या वस्तूंवर किंवा सेवांवर किंवा दोन्हींवर शुल्क किंवा कर आकारण्याशी व वसूल करण्याशी संबंधित असणारा असा कोणताही कायदा, अधिसूचना, आदेश, नियम किंवा विनियम, असा आहे ;
१. अधिसूचना क्र. जी. एस. आर. ६१६ (ई), दि. २१ जून, २०१७ अन्वये कलमे १, २, ३, ४, ५, १७, २१ व २२ यांसाठी दिनांक २२ जून २०१७, भारताचे राजपत्र, असाधारण, भाग २, खंड ३(एक) पहा.
अधिसूचना क्र. जी. एस. आर. ७०१ (ई), दि. २८ जून २०१७ अन्वये कलमे ६ ते १६, १८ ते २० व २३ ते २६ यांसाठी दि. १ जुलै, २०१७, भारताचे राजपत्र, असाधारण, भाग दोन, खंड ३ (एक) पहा.
भाग बारा-(२०)-४अ२६ भारताचे राजपत्र, असाधारण [भाग बारा GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARY [PART XII (६) ""सरकार"" याचा अर्थ, प्रशासक किंवा केंद्र सरकारने प्रशासक म्हणून कार्य करण्यासाठी प्राधिकृत केलेला कोणताही प्राधिकारी किंवा अधिकारी, असा आहे ;
(७) एखाद्या करपात्र व्यक्त्तीच्या संबंधात ""उद्विष्टी कर"" याचा अर्थ, अशा व्यक्त्तीने किंवा तिच्या अभिकत्र्याने केलेल्या वस्तुंच्या किंवा सेवांच्या किंवा दोन्हींच्या करपात्र पुरवठयावर, या अधिनियमान्वये आकारणीयोग्य असलेला संघ राज्यक्षेत्र कर, असा आहे परंतु त्यामधून प्रत्यावर्ती-आकार तवावर तिने प्रदेय असलेला कर वगळला जातो ;
(८) ""संघ राज्यक्षेत्र"" याचा अर्थ,----
(एक) अंदमान व निकोबार बेटे ;
(दोन) लक्षद्वीप ;
(तीन) दादरा व नगरहवेली ;
(चार) दमण व दीव ;
(पाच) चंदीगढ ;
ही राज्यक्षेत्रे, किंवा
(सहा) इतर राज्यक्षेत्र,
असा आहे ;
स्पष्टीकरण.---या अधिनियमाच्या प्रयोजनार्थ, उपखंड (एक) ते (सहा) मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या राज्यक्षेत्रांपैकी प्रत्येक राज्यक्षेत्र हे, एक स्वतंत्र संघ राज्यक्षेत्र असल्याचे समजण्यात येईल ;
(९) ""संघ राज्यक्षेत्र कर"" याचा अर्थ, या अधिनियमान्वये आकारलेला कर, असा आहे ;
(१०) या अधिनियमात वापरलेल्या व व्याख्या न केलेल्या परंतु केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियम, एकात्मिक वस्तू व सेवा कर अधिनियम, राज्य वस्तू व सेवा कर अधिनियम आणि वस्तू व सेवा कर (राज्यांना भरपाई) अधिनियम, यांत व्याख्या केलेले शब्द व शब्दप्रयोग यांना, त्या अधिनियमांमध्ये जो अर्थ नेमून दिलेला असेल तोच अर्थ असेल.
प्रकरण दोन
प्रशासन
या
अधिनियमाखालील
अधिकारी.
३. प्रशासकाला, या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी आवश्यकता असतील अशा आयुक्त्तांची व इतर अधिकारी वर्गाची अधिसूचनेद्वारे, नियुक्त्ती करता येईल आणि असे अधिकारी, तिच्यात विर्िनदिष्ट करण्यात येईल अशा प्रयोजनांसाठी, समुचित अधिकारी असल्याचे मानण्यात येतील :
परंतु असे की, विद्यमान कायद्यान्वये नियुक्त्त केलेल्या अधिकायांना, या अधिनियमाच्या तरतुदींन्वये नियुक्त्त केलेले अधिकारी असल्याचे मानण्यात येईल.
अधिकायांना
प्राधिकृत करणे.
४. प्रशासकाला, या अधिनियमाच्या प्रशासनासाठी, संघ राज्यक्षेत्र कर सहायक आयुक्त्त, याच्या दर्जापेक्षा कमी दर्जा असलेल्या संघ राज्यक्षेत्र कर अधिकायांची नियुक्त्ती करण्यासाठी कोणत्याही अधिकायास आदेशाद्वारे, प्राधिकृत करता येईल.
भारताचे राजपत्र, असाधारण २७ अनुभाग १] SECTION 1] GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARYअधिकायांचे
अधिकार.
५. (१) आयुक्त्त लादील अशा शतर्ींस आणि मर्यादांस अधीन राहून, संघ राज्यक्षेत्र कर अधिकायास, या अधिनियमान्वये त्याला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करता येईल आणि त्याच्यावर लादलेली कर्तव्ये पार पाडता येतील.
(२) संघ राज्यक्षेत्र कर अधिकायास, जो त्याला दुय्यम आहे अशा इतर कोणत्याही संघ राज्यक्षेत्र कर अधिकायाला या अधिनियमान्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करता येईल किंवा त्याच्यावर लादलेली कर्तव्ये पार पाडता येतील.
(३) आयुक्त्तास, याबाबतीत त्याच्याकडून विर्िनदिष्ट करण्यात येतील अशा शतर्ींस व मर्यादांस अधीन राहून, त्याचे अधिकार, त्याला दुय्यम असलेल्या इतर कोणत्याही अधिकायाकडे सोपवता येतील.
(४) या कलमात काहीही अंतभर्ूत असले तरी, अपील प्राधिकारी, अन्य कोणत्याही संघ राज्यक्षेत्र कर अधिकायाला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करणार नाही आणि त्याच्यावर लादलेली कर्तव्ये पार पाडणार नाही.
६. (१) या अधिनियमाच्या तरतुदींना बाध न आणता, केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियमान्वये नियुक्त्त केलेल्या अधिकायांना, परिषदेच्या शिफारशींवरून सरकार अधिसूचनेद्वारे विर्िनदिष्ट करील, अशा शतर्ींना अधीन राहून, या अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी, समुचित अधिकारी म्हणून प्राधिकृत केले आहे.
विवक्षित
परिस्थितीत केंद्रीय
कर अधिकायांना
समुचित अधिकारी
म्हणून प्राधिकृत
करणे.
(२) पोटकलम (१) अन्वये काढलेल्या अधिसूचनेमध्ये विर्िनदिष्ट केलेल्या शतर्ींस अधीन राहून,----
(क)जेव्हा कोणताही समुचित अधिकारी, या अधिनियमान्वये एखादा आदेश काढतो तेव्हा, तो, केंद्रीय करविषयक अधिकारिता प्राप्त अधिकायाला तसे कळवून, उक्त्त अधिनियमाद्वारे प्राधिकृत केल्याप्रमाणे, केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियमान्वये देखील आदेश काढील ;
(ख) जेव्हा केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियमाखालील एखाद्या समुचित अधिकायाने एखाद्या विषयवस्तूवर कोणतीही कार्यवाही सुरू केली असेल त्याबाबतीत, या अधिनियमाखालील समुचित अधिकायाकडून त्याच विषयवस्तूवर कोणतीही कार्यवाही सुरू केली जाणार नाही.
(३) या अधिनियमान्वये नियुक्त्त केलेल्या एखाद्या अधिकायाने संमत केलेल्या कोणत्याही आदेशाची, जेथे जेथे लागू असेल तेथे तेथे, दुरुस्ती, अपील व पुनरीक्षण करण्याची कोणतीही कार्यवाही, केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियमान्वये नियुक्त्त केलेल्या अधिकायापुढे दाखल करण्यात येणार नाही.
प्रकरण तीन
कराची आकारणी व वसुली
आकारणी व
वसुली.
७. (१) पोटकलम (२) च्या तरतुदींस अधीन राहून, मानवी सेवनासाठी असलेल्या अल्कोहोलयुक्त्त मद्याच्या पुरवठयाखेरीज, वस्तुंच्या किंवा सेवांच्या किंवा दोन्हींच्या राज्यांतर्गत सर्व पुरवठयांवर, केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियमाच्या कलम १५ अन्वये निर्धारित केलेल्या मूल्याने आणि परिषदेच्या शिफारशींवरून, केंद्र सरकारद्वारे अधिसूचित करण्यात येईल अशा वीस टक्क्यांपेक्षा अधिक नसेल अशा दरांनी, संघ राज्यक्षेत्र कर, या नावाने संबोधला जाणारा कर, आकारण्यात येईल आणि विहित करण्यात येईल अशा रीतीने वसूल करण्यात येईल आणि करपात्र व्यक्त्तीकडून प्रदान करण्यात येईल.
२८ भारताचे राजपत्र, असाधारण [भाग बारा GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARY [PART XII(२) पेट्रोलियम क्रूड, हायस्पीड डिझेल, मोटार स्पिरिट (सामान्यत:, पेट्रोल म्हणून ओळखले जाणारे), नैर्सगिक वायू व विमानचालन चक्की इंधन (एव्हीएशन टर्बाइन फ्यूएल) यांच्या पुरवठयावरील संघ राज्यक्षेत्र कर, परिषदेच्या शिफारशींवरून केंद्र सरकारद्वारे अधिसूचित करण्यात येईल अशा दिनांकापासून आकारण्यात येईल.
(३) केंद्र सरकारला, परिषदेच्या शिफारशींवरून, ज्या वस्तुंवर किंवा सेवांवर किंवा दोन्हींवर प्राप्तकत्र्याकडून प्रत्यावर्ती-आकार तवावर कर प्रदान करण्यात येईल अशा वस्तुंच्या किंवा सेवांच्या किंवा दोन्हींच्या पुरवठयाचे प्रवर्ग अधिसूचनेद्वारे विर्िनदिष्ट करता येतील आणि असा प्राप्तकर्ता, जणू काही अशा वस्तुंच्या किंवा सेवांच्या किंवा दोन्हींच्या पुरवठयाच्या संबंधात कर प्रदान करण्यास पात्र आहे असे समजून या अधिनिमाच्या सर्व तरतुदी त्यास लागू होतील.
१[ (४) सरकारला, ज्या व्यक्त्ती एखाद्या बिगरनोंदणीकृत पुरवठादाराकडून मिळालेल्या वस्तुंच्या किंवा सेवांच्या किंवा दोन्हींच्या विर्िनदिष्ट प्रवगार्ंच्या पुरवठयाच्या बाबतीत, वस्तुंच्या किंवा सेवांच्या किंवा दोन्हींच्या अशा पुरवठयाचा प्राप्तकर्ता म्हणून प्रत्यावर्ती-आकार तवावर कर प्रदान करतात अशा नोंदणीकृत व्यक्त्तींचा वर्ग, परिषदेच्या शिफारशींवरून, अधिसूचनेद्वारे, विर्िनदिष्ट करता येईल, आणि असा प्राप्तकर्ता, जणू काही अशा वस्तुंच्या किंवा सेवांच्या किंवा दोन्हींच्या अशा पुरवठयाच्या संबंधात कर प्रदान करण्यास पात्र आहे असे समजून या अधिनियमाच्या सर्व तरतुदी त्यास लागू होतील.]
(५) ज्यांच्या राज्यांतर्गत पुरवठयांवरील कर, इलेक्ट्रॉनिक वाणिज्य प्रचालकाकडून प्रदान करण्यात येईल अशा सेवा जर इलेक्ट्रॉनिक वाणिज्य प्रचालकामार्फत पुरविल्या जात असतील तर, केंद्र सरकारला, परिषदेच्या शिफारशींवरून, अधिसूचनेद्वारे, अशा सेवांचे प्रवर्ग विर्िनदिष्ट करता येतील, आणि असा इलेक्ट्रॉनिक वाणिज्य प्रचालक, जणू काही अशा सेवा पुरविण्याच्या संबधात कर प्रदान करण्यास पात्र पुरवठादार आहे असे समजून, या अधिनियमाच्या सर्व तरतुदी, त्यांस लागू होतील :
परंतु असे की, जेव्हा इलेक्ट्रॉनिक वाणिज्य प्रचालक, करपात्र राज्यक्षेत्रामध्ये प्रत्यक्ष उपस्थित नसतो तेव्हा, करपात्र राज्यक्षेत्रामधील कोणत्याही प्रयोजनासाठी अशा इलेक्ट्रॉनिक वाणिज्य प्रचालकाचे प्रतिनिधित्व करणारी कोणतीही व्यक्त्ती, कर प्रदान करण्यास उत्तरदायी असेल :
परंतु आणखी असे की, जेव्हा इलेक्ट्रॉनिक वाणिज्य प्रचालक, करपात्र राज्यक्षेत्रामध्ये प्रत्यक्ष उपस्थित नसतो आणि उक्त्त राज्यक्षेत्रामध्ये त्याचा प्रतिनिधी देखील नसतो, असा इलेक्ट्रॉनिक वाणिज्य प्रचालक, कर प्रदान करण्याच्या प्रयोजनासाठी करपात्र राज्यक्षेत्रात एखाद्या व्यक्त्तीची नेमणूक करील आणि अशी व्यक्त्ती, कर प्रदान करण्यास उत्तरदायी असेल.
करातून सूट
देण्याचा
अधिकार.
८. (१) जेव्हा केंद्र सरकारची, लोकहिताच्या दृष्टीने तसे करणे आवश्यक आहे याबाबत खात्री पटली असेल तेव्हा, केंद्र सरकारला, परिषदेच्या शिफारशींवरून, अधिसूचनेद्वारे, विर्िनदिष्ट केलेल्या कोणत्याही वर्णनाच्या वस्तुंना किंवा सेवांना किंवा दोन्हींना, त्यावर आकारण्यायोग्य असलेल्या करातून संपूर्णत: किंवा त्याच्या कोणत्याही भागातून अशा अधिसूचनेमध्ये विर्िनदिष्ट करण्यात येईल अशा दिनांकापासून सर्वसाधारणपणे, एकतर बिनशर्तपणे किंवा तीमध्ये विर्िनदिष्ट करण्यात येईल अशा शतर्ींस अधीन राहून, सूट देता येईल.
(२) जेव्हा केंद्र सरकारची, लोकहिताच्या दृष्टीने तसे करणे आवश्यक आहे याबाबत खात्री पटली असेल तेव्हा, केंद्र सरकारला, परिषदेच्या शिफारशींवरून, प्रत्येक प्रकरणी विशेष आदेशाद्वारे, ज्यावर कर आकारण्यायोग्य आहे अशा कोणत्याही वस्तू किंवा सेवा किंवा दोन्हींना, अशा आदेशामध्ये नमूद करावयाच्या अपवादात्मक स्वरूपाच्या परिस्थितीत कराच्या प्रदानातून सूट देता येईल.
१. २०१८ चा अधिनियम क्रमांक ३३ याच्या कलम २ द्वारे, पोट-कलम (४) ऐवजी दाखल केला (१ फेब्रुवारी, २०१९ रोजी व तेव्हापासून)भारताचे राजपत्र, असाधारण २९ अनुभाग १] SECTION 1] GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARY (३) केंद्र सरकारला, पोटकलम (१) अन्वये काढलेल्या कोणत्याही अधिसूचनेची किंवा पोटकलम (२) अन्वये काढलेल्या आदेशाची व्याप्ती किंवा प्रयोज्यता स्पष्ट करण्याच्या प्रयोजनार्थ तसे करणे आवश्यक किंवा इष्ट वाटत असेल तर, केंद्र सरकारला, पोटकलम (१) अन्वये अधिसूचना किंवा पोटकलम (२) अन्वये आदेश काढल्यापासून एका वर्षाच्या आत, कोणत्याही वेळी, अधिसूचनेद्वारे, अशा अधिसूचनेत किंवा, यथास्थिति, आदेशात स्पष्टीकरणाचा समावेश करता येईल, आणि असे प्रत्येक स्पष्टीकरण हे, जणू काही अशा पहिल्या अधिसूचनेचा किंवा, यथास्थिति, आदेशाचा नेहमीच एक भाग होते असे समजून ते अंमलात येईल.
(४) केंद्र सरकारने केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियमाच्या कलम ११ च्या पोटकलम (१) अन्वये काढलेली कोणतीही अधिसूचना किंवा उक्त्त कलमाच्या पोटकलम (२) अन्वये काढलेला कोणताही आदेश हा, या अधिनियमाअन्वये काढलेली अधिसूचना किंवा, यथास्थिति, काढलेला आदेश असल्याचे मानण्यात येईल.
स्पष्टीकरण.----या कलमाच्या प्रयोजनार्थ, जेव्हा कोणत्याही वस्तुंच्या किंवा सेवांच्या किंवा दोन्हींच्या बाबतीत, त्यावर आकारण्यायोग्य असलेल्या संपूर्ण करातून किंवा त्याच्या भागातून बिनशर्तपणे सूट दिलेली असेल तेव्हा, अशा वस्तुंचा किंवा सेवांचा किंवा दोन्हींचा पुरवठा करणारी नोंदणीकृत व्यक्त्ती, अशा वस्तुंवर किंवा सेवांवर किंवा दोन्हींवर, लागू असलेल्या दरापेक्षा अधिक दराने कर वसूल करणार नाही.
प्रकरण चार
कराचे प्रदान
९. नोंदणीकृत व्यक्त्तीच्या इलेक्ट्रॉनिक जमा खातेवहीत,-----
कराचे प्रदान.
(क) एकात्मिक करास्तव उपलब्ध असलेली निविष्टी कराची जमा रक्कम, प्रथमत: एकात्मिक कराचे प्रदान करण्यासाठी वापरण्यात येईल आणि उर्वरित रक्कम, कोणतीही असल्यास, केंद्रीय कर व राज्य कर, किंवा यथास्थिति, संघ राज्यक्षेत्र कर, या क्रमाने तिचे प्रदान करण्यासाठी वापरण्यात येईल ;
(ख) संघ राज्यक्षेत्र करास्तव उपलब्ध असलेली निविष्टी कराची जमा रक्कम, प्रथमत: संघ राज्यक्षेत्र कराचे प्रदान करण्यासाठी वापरण्यात येईल आणि उर्वरित रक्कम, कोणतीही असल्यास, एकात्मिक कराचे प्रदान करण्यासाठी वापरण्यात येईल:
१[परंतु असे की, जेव्हा केंद्रीय करास्तव असलेल्या निविष्टी कराच्या जमा रकमेची शिल्लक रक्कम, एकात्मिक कराच्या प्रदानासाठी उपलब्ध नसेल तेव्हाच, केवळ संघ राज्यक्षेत्र करास्तव असलेली निविष्टी कराची जमा रक्कम, एकात्मिक कराचे प्रदान करण्यासाठी वापरण्यात येईल.]
(ग) संघ राज्यक्षेत्र करास्तव उपलब्ध असलेली निविष्टी कराची जमा रक्कम, केंद्रीय कराचे प्रदान करण्यासाठी वापरण्यात येणार नाही.
निविष्टी कराच्या
जमा रकमेचा
वापर करणे.
२[९क. कलम ९ मध्ये काहीही अंतभर्ूत असले तरी, संघ राज्यक्षेत्र करास्तव असलेली निविष्टी कराची जमा रक्कम, एकात्मिक करास्तव उपलब्ध असलेली निविष्टी कराची जमा रक्कम, प्रथमत: अशा प्रदानासाठी वापरल्यानंतरच केवळ एकात्मिक कराच्या किंवा, यथास्थिति, संघ राज्यक्षेत्र कराच्या प्रदानासाठी वापरण्यात येईल.
निविष्टी कराच्या
जमा रकमेच्या
वापराचा क्रम.
९ख. या प्रकरणात काहीही अंतभर्ूत असले तरी आणि कलम ९ च्या खंड (ग) च्या तरतुदींस अधीन राहून, सरकारला, परिषदेच्या शिफारशींवरून, एकात्मिक कर, केंद्रीय कर, राज्य कर किंवा, यथास्थिति, संघ राज्यक्षेत्र कर यांच्या करास्तव असलेल्या निविष्टी कराच्या जमा रकमेचा अशा कोणत्याही कराच्या प्रदानास्तव वापर करण्याचा क्रम व रीत विहित करता येईल.]
१. २०१८ चा अधिनियम क्रमांक ३३ याच्या कलम ३ द्वारे, हे परंतुक समाविष्ट केले (१ फेब्रुवारी, २०१९ रोजी व तेव्हापासून).
२. वरील अधिनियमाच्या कलम ४ द्वारे, ही कलमे समाविष्ट केली (१ फेब्रुवारी, २०१९ रोजी व तेव्हापासून).
३० भारताचे राजपत्र, असाधारण [भाग बारा GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARY [PART XIIनिविष्टी कराच्या
जमा रकमेचे
हस्तांतरण.
१०. केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियमाच्या कलम ३९ च्या पोटकलम (१) अन्वये सादर केलेल्या वैध विवरणात दर्शविल्याप्रमाणे, केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियमाच्या कलम ४९ च्या पोटकलम (५) च्या तरतुदींनुसार, एकात्मिक वस्तू व सेवा कर अधिनियमाखालील देय कराचे प्रदान करण्यासाठी संघ राज्यक्षेत्र कराच्या निविष्टी कराची जमा रक्कम वापरल्यावर, संघ राज्यक्षेत्र कर म्हणून वसूल केलेली रक्कम अशा प्रकारे वापरलेल्या अशा जमा रकमेइतक्या रकमेने कमी करण्यात येईल आणि केंद्र सरकार, अशा प्रकारे कमी केलेल्या रकमेइतकी रक्कम, विहित करण्यात येईल अशा रीतीने आणि अशा वेळेत संघ राज्यक्षेत्र कराच्या खात्यातून एकात्मिक कर खात्यात हस्तांतरित करील.
प्रकरण पाच
निरीक्षण, झडती, जप्ती व अटक
११. (१) पोलीस, रेल्वे, सीमा शुल्क यांचे सर्व अधिकारी, आणि ग्राम अधिकायांसह जमीन महसूल वसूल करणारे अधिकारी आणि केंद्रीय कर अधिकारी व राज्य कर अधिकारी या अधिनियमाच्या अंमलबजावणीमध्ये समुचित अधिकायांना सहाय्य करतील.
समुचित
अधिकायांना
सहाय्य
करण्यासाठी
आवश्यक असलेले
अधिकारी.
(२) जेव्हा आयुक्त्ताने तसे करण्याची मागणी केली असेल तेव्हा, सरकारला, अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाच्या अंमलबजावणीमध्ये समुचित अधिकायांना सहाय्य करण्यासाठी, इतर कोणत्याही वर्गाच्या अधिकायांना अधिकार प्रदान करता येतील आणि फर्मावता येईल.
प्रकरण सहा
मागण्या व वसुली
१२. (१) ज्या नोंदणीकृत व्यक्त्तीने, राज्यांतर्गत पुरवठा असल्याचे समजून एखाद्या व्यवहारावर केंद्रीय कर किंवा संघ राज्यक्षेत्र कर प्रदान केलेला आहे. परंतु नंतर जो आंतरराज्यीय पुरवठा असल्याचे समजण्यात आले आहे अशा व्यक्त्तीस, विहित करण्यात येईल अशा रीतीने आणि अशा शतर्ींस अधीन राहून, अशा प्रकारे प्रदान केलेल्या कराची रक्कम परत करण्यात येईल.
दोषपूर्ण रीतीने
वसूल केलेला व
केंद्र सरकारला
किंवा संघ
राज्यक्षेत्र
सरकारला प्रदान
केलेला कर.
(२) ज्या नोंदणीकृत व्यक्त्तीने, आंतरराज्यीय पुरवठा असल्याचे समजून एखाद्या व्यवहारावर एकात्मिक कर प्रदान केलेला आहे, परंतु नंतर जो राज्यांतर्गत पुरवठा असल्याचे समजण्यात आले आहे अशा व्यक्त्तीस, प्रदेय असलेल्या केंद्रीय कराच्या व संघ राज्यक्षेत्र कराच्या रकमेवर कोणतेही व्याज प्रदान करण्याची आवश्यकता असणार नाही.
कराची वसुली.
१३. (१) जेव्हा या अधिनियमाच्या किंवा त्याखाली केलेल्या नियमांच्या कोणत्याही तरतुदींन्वये एखाद्या व्यक्त्तीने सरकारला कराची, व्याजाची किंवा शास्तीची कोणतीही रक्कम प्रदेय असेल आणि जी प्रदान केलेली नसेल तेव्हा, केंद्रीय कराच्या समुचित अधिकायास, उक्त्त कराची थकबाकी वसूल करण्याच्या ओघात, जणू काही ती केंद्रीय कराची थकबाकी होती असे समजून उक्त्त व्यक्त्तीकडून रकमेची वसुली करता येईल आणि अशा प्रकारे वसूल केलेली रक्कम, संघ राज्यक्षेत्र कराच्या समुचित शीर्षाखाली सरकारच्या खात्यात जमा करता येईल.
(२) जेव्हा पोटकलम (१) अन्वये वसूल केलेली रक्कम, या अधिनियमान्वये आणि केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियमान्वये सरकारला देय असलेल्या रकमेपेक्षा कमी असेल तेव्हा, सरकारच्या खाती जमा करावयाची रक्कम, संघ राज्यक्षेत्र कर व केंद्रीय कर म्हणून देय असलेल्या रकमेच्या प्रमाणात असेल.
भारताचे राजपत्र, असाधारण ३१ अनुभाग १] SECTION 1] GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARYप्रकरण सात
आगाऊ अधिनिर्णय देणे
१४. या प्रकरणात, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर,-----
व्याख्या.
(क) ""आगाऊ अधिनिर्णय"" याचा अर्थ, अर्जदार करीत असलेल्या किंवा त्याने करण्याचे प्रस्तावित केलेल्या वस्तुंच्या किंवा सेवांच्या किंवा दोन्हींच्या पुरवठयाच्या संबंधात, केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियमाच्या कलम ९७ च्या पोट-कलम (२) मध्ये किंवा कलम १०० च्या पोट-कलम (१) मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या बाबींवर किंवा प्रश्नांवर प्राधिकरणाने किंवा, अपील प्राधिकरणाने अर्जदाराला दिलेला निर्णय, असा आहे ;
(ख) ""अपील प्राधिकरण"" याचा अर्थ, कलम १६ अन्वये घटित केलेले आगाऊ अधिनिर्णय अपील प्राधिकरण, असा आहे ;
(ग) ""अर्जदार"" याचा अर्थ, या अधिनियमान्वये नोंदणी केलेली किंवा नोंदणी मिळविण्यास इच्छुक असलेली कोणतीही व्यक्त्ती, असा आहे ;
(घ) ""अर्ज"" याचा अर्थ, केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियमाच्या कलम ९७ च्या पोट-कलम (१) अन्वये प्राधिकरणाकडे केलेला अर्ज, असा आहे ;
(ङ) ""प्राधिकरण"" याचा अर्थ, कलम १५ अन्वये घटित केलेले आगाऊ अधिनिर्णय प्राधिकरण, असा आहे ;
१५. (१) केंद्र सरकार, अधिसूचनेद्वारे, (संघ राज्यक्षेत्राचे नाव) आगाऊ अधिनिर्णय प्राधिकरण या नावाने ओळखले जाणारे प्राधिकरण घटित करील :
आगाऊ
अधिनिर्णय
प्राधिकरण घटित
करणे.
परंतु असे की, केंद्र सरकारला, या अधिनियमाच्या प्रयोजनार्थ प्राधिकरण म्हणून कार्य करण्यासाठी कोणत्याही राज्यात किंवा अन्य कोणत्याही संघ राज्यक्षेत्रात स्थित असलेल्या कोणत्याही प्राधिकरणाला परिषदेच्या शिफारशींवरून अधिसूचित करता येईल.
(२) प्राधिकरण हे, केंद्र सरकारने नियुक्त्त करावयाचा,-----
(एक) केंद्रीय कर अधिकायांमधील एक सदस्य ; आणि
(दोन) संघ राज्यक्षेत्र कर अधिकायांमधील एक सदस्य,
यांचे मिळून बनलेले असेल.
(३) सदस्यांची अर्हता व नियुक्त्तीची पद्धती आणि त्यांच्या सेवेच्या अटी व शर्ती, विहित करण्यात येतील त्याप्रमाणे असतील.
१६. (१) केंद्र सरकार, अधिसूचनेद्वारे, आगाऊ अधिनिर्णय प्राधिकरणाने अधिघोषित केलेल्या आगाऊ अधिनिर्णयाच्या विरोधातील अपिलांची सुनावणी करण्यासाठी, (संघ राज्यक्षेत्राचे नाव) वस्तू व सेवा कर आगाऊ अधिनिर्णय अपील प्राधिकरण म्हणून ओळखले जाणारे अपील प्राधिकरण घटित करील :
आगाऊ
अधिनिर्णय अपील
प्राधिकरण घटित
करणे.
परंतु असे की, केंद्र सरकारला, या अधिनियमाच्या प्रयोजनार्थ अपील प्राधिकरण म्हणून कार्य करण्यासाठी कोणत्याही राज्यात किंवा इतर कोणत्याही संघ राज्यक्षेत्रात स्थित असलेल्या कोणत्याही अपील प्राधिकरणास, परिषदेच्या शिफारशीवरून अधिसूचित करता येईल.
(२) अपील प्राधिकरण हे,------
(एक) मंडळाने पदनिर्देशित केल्याप्रमाणे, केंद्रीय कर मुख्य आयुक्त्त ; आणि
(दोन) अर्जदारासंबंधात अधिकारिता असणारा संघ राज्यक्षेत्र कर आयुक्त्त यांनी मिळून बनलेले असेल.
भाग बारा-(२०)-५३२ भारताचे राजपत्र, असाधारण [भाग बारा GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARY [PART XII
प्रकरण आठ
संक्रमणकालीन तरतुदी
विद्यमान
करदात्यांचे
स्थलांतर.
१७. (१) नियत दिनांकास व तेव्हापासून, कोणत्याही विद्यमान कायद्यान्वये नोंदणी केलेल्या आणि वैध स्थायी लेखा क्रमांक असणाया प्रत्येक व्यक्त्तीला, विहित करण्यात येतील अशा शतर्ींस अधीन राहून आणि अशा नमुन्यात व अशा रीतीने, तात्पुरत्या तवावर नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येईल, जे, पोट-कलम (२) खालील अंतिम नोंदणी प्रमाणपत्राद्वारे बदली केले नसेल तर, जर अशा प्रकारे विहित केलेल्या शतर्ींचे पालन केले नाही तर, रद्द होण्यास पात्र असेल.
(२) विहित करण्यात येईल अशा नमुन्यात व अशा रीतीने आणि अशा शतर्ींस अधीन राहून, अंतिम नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येईल.
(३) पोट-कलम (१) अन्वये एखाद्या व्यक्त्तीला दिलेले नोंदणी प्रमाणपत्र जर, ती केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियमाच्या कलम २२ किंवा कलम २४ अन्वये नोंदणी करण्यास पात्र नव्हती याबाबत अशा व्यक्त्तीने दाखल केलेल्या अर्जाला अनुसरून, उक्त्त नोंदणी रद्द केली असेल तर, ते देण्यात आलेले नाही, असे मानण्यात येईल.
निविष्टी कराच्या
जमा रकमेकरिता
संक्रमणकालीन
व्यवस्था.
१८. (१) केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियमाच्या कलम १० अन्वये कर प्रदान करण्याचा पर्याय निवडलेल्या व्यक्त्तीव्यतिरिक्त्त अन्य नोंदणीकृत व्यक्त्ती, नियत दिवसाच्या लगतपूर्वीच्या दिवशी समाप्त होणाया कालावधीशी संबंधित असणाया, विद्यमान कायद्यान्वये तिने दाखल केलेल्या विवरणामध्ये पुढे ओढलेली, कोणतीही असल्यास, मूल्यर्वधित कराची व प्रवेश कराची जमा रक्कम विहित करण्यात येईल अशा रीतीने, उक्त्त दिवसानंतर नव्वद दिवसांपेक्षा उशिरा नसेल तोपयर्ंत तिच्या इलेक्ट्रॉनिक जमा खातेवहीमध्ये, घेण्यास हक्कदार असेल :
परंतु असे की, नोंदणीकृत व्यक्त्तीस पुढील परिस्थितीत जमा रक्कम घेण्यास मुभा असणार नाही :-----
(एक) जेव्हा उक्त्त जमेची रक्कम, या अधिनियमान्वये निविष्टी कराची जमा रक्कम म्हणून अनुज्ञेय नसेल तेव्हा ; किंवा
(दोन) जेव्हा तिने, नियत दिवसाच्या लगतपूर्वीच्या सहा महिन्यांच्या कालावधीकरिता विद्यमान कायद्यान्वये आवश्यक असलेली सर्व विवरणे सादर केलेली नसतील तेव्हा ; किंवा
(तीन) जेव्हा उक्त्त जमा रक्कम, सरकारकडून अधिसूचित केले जाते त्याप्रमाणे, अशा सूटीच्या अधिसूचनांखाली विकलेल्या वस्तुंशी संबंधित असेल तेव्हा :
१९५६ चा ७४.
परंतु आणखी असे की, उक्त्त जमा रकमेपैकी जितकी रक्कम, केंद्रीय विक्रीकर अधिनियम, १९५६ याचे कलम ३, कलम ५ चे पोट-कलम (३), कलम ६ किंवा कलम ६क किंवा कलम ८ चे पोट-कलम (८) यांच्याशी संबंधित असलेल्या कोणत्याही दाव्याशी संबंध लावण्यायोग्य असेल म्हणजेच जी केंद्रीय विक्रीकर (नोंदणी व उलाढाल) नियम, १९५७ यांच्या नियम १२ मध्ये विहित केलेल्या रीतीने व विहित कालावधीत साधार असल्याचे दाखवलेले नाही तितकी रक्कम, इलेक्ट्रॉनिक जमा खातेवहीमध्ये जमा करण्यास पात्र असणार नाही:
परंतु तसेच, जेव्हा उक्त्त दावे केंद्रीय विक्रीकर (नोंदणी व उलाढाल) नियम, १९५७ याच्या नियम १२ मध्ये विहित केलेल्या रीतीने साधार असल्याचे दाखविले असेल तेव्हा, दुसया परंतुकात विर्िनदिष्ट केलेल्या जमा रकमेच्या समतुल्य रक्कम, विद्यमान कायद्यान्वये परत करण्यात येईल.
(२) केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियमाच्या कलम १० अन्वये कर प्रदान करण्याचा विकल्प निवडलेल्या व्यक्त्तीव्यतिरिक्त्त, अन्य नोंदणीकृत व्यक्त्ती, विहित करण्यात येईल अशा रीतीने, नियत दिवसाच्या लगतपूर्वीच्या दिवशी समाप्त होणाया कालावधीकरिता, तिने विद्यमान कायद्यान्वये, सादर केलेल्या विवरणामध्ये पुढे न ओढलेल्या,भारताचे राजपत्र, असाधारण ३३ अनुभाग १] SECTION 1] GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARY भांडवली वस्तुंच्या बाबतीतील उपयोग करून न घेतलेली निविष्टी कराची जमा रक्कम, तिच्या इलेक्ट्रॉनिक जमा खातेवहीमध्ये घेण्यास हक्कदार असेल:
परंतु असे की, उक्त्त जमा रक्कम, विद्यमान कायद्यान्वये निविष्टी कराची जमा रक्कम म्हणून अनुज्ञेय असल्याशिवाय आणि या अधिनियमान्वयेदेखील निविष्टी कराची जमा रक्कम म्हणून अनुज्ञेय देखील असल्याशिवाय, अशी जमा रक्कम घेण्यास नोंदणीकृत व्यक्त्तीस मुभा असणार नाही.
स्पष्टीकरण.---या कलमाच्या प्रयोजनार्थ, ""उपयोग करून न घेतलेली निविष्टी कराची जमा रक्कम"" या शब्दप्रयोगाचा अर्थ, करपात्र व्यक्त्तीने विद्यमान कायद्यान्वये भांडवली वस्तुंच्या बाबतीत आधीच उपयोग करून घेतलेली निविष्टी कराची जमा रक्कम, विद्यमान कायद्यान्वये उक्त्त भांडवली वस्तुंच्या बाबतीत ज्यासाठी उक्त्त व्यक्त्ती हक्कदार होती अशा निविष्टी कराच्या जमा रकमेच्या एकूण रकमेतून, उक्त्त व्यक्त्तीने वजा केल्यानंतर जी शिल्लक राहते ती रक्कम, असा आहे.
(३) विद्यमान कायद्यान्वये नोंदणी करण्यासाठी जी पात्र नव्हती, किंवा जी करमाफ असलेल्या वस्तुंची किंवा करमुक्त्त असलेल्या वस्तुंची अथवा विद्यमान कायद्यानुसार संघ राज्यक्षेत्रातील ज्या वस्तुंच्या विक्रीच्या पहिल्या टप्प्यात कर भरावा लागतो आणि ज्यांची नंतरची विक्री संघ राज्य क्षेत्रातील कराच्या अधीन नसते, परंतु या अधिनियमान्वये करासाठी पात्र आहेत अशा वस्तुंची विक्री करीत होती अशी एखादी नोंदणीकृत व्यक्त्ती किंवा जेथे वस्तुंच्या विक्रीच्या वेळी निविष्टी कराची रक्कम जमा होण्यास हक्कदार होती तेथे अशी व्यक्त्ती, पुढील शतर्ींस अधीन राहून, नियत दिवशी साठयामध्ये धारण केलेल्या निविष्टींच्या आणि साठयामध्ये धारण केलेल्या अर्ध-सिद्ध आणि सिद्ध वस्तुमध्ये अंतभर्ूत असलेल्या निविष्टींच्या बाबतीत, मूल्यर्वधित कराची आणि प्रवेश कराची जमा रक्कम तिच्या इलेक्ट्रॉनिक जमा खातेवहीत, घेण्यास हक्कदार असेल :-----
(एक) अशा निविष्टींचा किंवा वस्तुंचा, या अधिनियमान्वये करपात्र पुरवठा करण्यासाठी, वापर केला जात आहे किंवा त्या वापरण्याचे उद्देशित आहे ;
(दोन) उक्त्त नोंदणीकृत व्यक्त्ती, या अधिनियमान्वये अशा निविष्टींवर निविष्टी कराच्या जमा रकमेसाठी पात्र आहे ;
(तीन) अशा निविष्टीच्या बाबतीत विद्यमान कायद्यान्वये कर प्रदान केल्याच्या पुराव्यादाखल बीजक किंवा इतर विहित दस्तऐवज उक्त्त नोंदणीकृत व्यक्त्तीच्या कब्जात आहेत ; आणि
(चार) अशी बीजके किंवा इतर विहित दस्तऐवज, नियत दिवसाच्या लगतपूर्वीच्या बारा महिन्यांपेक्षा आधी नसेल अशा वेळी दिलेली होती:
परंतु असे की, जेव्हा वस्तु निर्माता किंवा सेवा पुरवठादार यांव्यतिरिक्त्त एखाद्या नोंदणीकृत व्यक्त्तीच्या कब्जात, निविष्टींच्या बाबतीत कर प्रदान केल्याच्या पुराव्यादाखलचे बीजक किंवा इतर कोणतेही दस्तऐवज नसतील तेव्हा, अशा नोंदणीकृत व्यक्त्तीस, उक्त्त करपात्र व्यक्त्ती, किंमती कमी करून त्याद्वारे अशा जमेचा लाभ प्राप्तकत्र्याला करून देईल यासह विहित करण्यात येतील अशा शतर्ींच्या, मर्यादांच्या व संरक्षक उपाययोजनांच्या अधीन राहून, विहित करण्यात येईल अशा दराने व अशा रीतीने जमा रक्कम घेण्याची मुभा देण्यात येईल.
(४) जी विद्यमान कायद्यान्वये करपात्र वस्तुंची तसेच करमाफी असलेल्या वस्तुंची किंवा करमुक्त्त वस्तुंची, परंतु या अधिनियमान्वये करासाठी पात्र आहेत, अशा वस्तूंची विक्री करत होती, अशी एखादी नोंदणीकृत व्यक्त्ती तिच्या इलेक्ट्रॉनिक जमा खातेवहीत,----
(क) पोट-कलम (१) च्या तरतुदीनंतर, तिने विद्यमान कायद्यान्वये सादर केलेल्या विवरणात पुढे ओढलेली मूल्यर्वधित कराची व प्रवेश कराची जमा रक्कम, कोणतीही असल्यास ; आणि
भाग बारा-(२०)-५अ३४ भारताचे राजपत्र, असाधारण [भाग बारा GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARY [PART XII (ख) पोट-कलम (३) च्या तरतुदींनुसार, अशा करमाफी असलेल्या वस्तुंच्या किंवा करमुक्त्त असलेल्या वस्तुंशी संबंधित, असणाया नियत दिनांकास, साठयात धारण केलेल्या निविष्टींच्या संबंधातील आणि साठयात असलेल्या अर्ध सिद्ध किंवा सिद्ध वस्तुंमध्ये अंतभर्ूत असलेल्या निविष्टींच्या बाबतीतील, मूल्यर्वधित कराची आणि प्रवेश कराची जमा रक्कम, कोणतीही असल्यास, घेण्यास हक्कदार असेल.
(५) नोंदणीकृत व्यक्त्ती, नियत दिवशी किंवा त्यानंतर मिळालेल्या निविष्टींच्या बाबतीत परंतु नियत दिवसापासून तीस दिवसांच्या कालावधीत अशा व्यक्त्तींच्या लेखा पुस्तकांमध्ये बीजकाची किंवा कर प्रदान करणाया इतर कोणत्याही दस्तऐवजाची नोंद केली होती या शर्तीस अधीन राहून, ज्याच्या बाबतीत विद्यमान कायद्यान्वये पुरवठादाराकडून कर प्रदान करण्यात आला आहे अशा मूल्यर्वधित कराची व प्रवेश कराची जमा रक्कम, कोणतीही असल्यास, तिच्या इलेक्ट्रॉनिक जमा खातेवहीत जमा करून घेण्यास हक्कदार असेल :
परंतु असे की, तीस दिवसांचा कालावधी हा, पुरेसे कारण दर्शविल्यावर तीस दिवसांपेक्षा अधिक होणार नाही इतक्या आणखी कालावधीकरिता, आयुक्त्ताद्वारे वाढविता येईल :
परंतु आणखी असे की, उक्त्त नोंदणीकृत व्यक्त्ती, या पोट-कलमान्वये घेण्यात आलेल्या जमा रकमेच्या बाबतीत, विहित करण्यात येईल अशा रीतीने, विवरणपत्र सादर करील.
(६) जी, विद्यमान कायद्यान्वये एकतर निश्चित दराने कर भरत होती किंवा प्रदेय कराऐवजी निश्चित रक्कम प्रदान करीत होती अशी नोंदणीकृत व्यक्त्ती, पुढे दिलेल्या शतर्ींच्या अधीन राहून, नियत दिवशी साठयामध्ये धारण केलेल्या निविष्टींच्या आणि साठयामध्ये धारण केलेल्या अर्ध-सिद्ध वस्तुंमध्ये किंवा सिद्ध वस्तुंमध्ये अंतभर्ूत असलेल्या निविष्टींच्या बाबतीत, तिच्या इलेक्ट्रॉनिक जमा खातेवहीमध्ये, मूल्यर्वधित कराची जमा रक्कम घेण्यास हक्कदार असेल :----
(एक) अशा निविष्टींचा किंवा वस्तुंचा, या अधिनियमान्वये करपात्र पुरवठा करण्यासाठी वापर केला जात आहे किंवा वापर करण्याचे उद्देशित आहे ;
(दोन) उक्त्त नोंदणीकृत व्यक्त्ती, केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियमाच्या कलम १० अन्वये कर प्रदान करीत नाही ;
(तीन) उक्त्त नोंदणीकृत व्यक्त्ती, या अधिनियमान्वये अशा निविष्टींवर निविष्टी कराच्या जमा रकमेकरिता पात्र आहे ;
(चार) उक्त्त नोंदणीकृत व्यक्त्तीकडे निविष्टींच्या बाबतीत विद्यमान कायद्यान्वये कर प्रदान केल्याच्या पुराव्यादाखल बीजक किंवा विहित केलेले अन्य दस्तऐवज आहेत ; आणि
(पाच) अशी बीजके किंवा विहित केलेले अन्य दस्तऐवज नियत दिवसाच्या लगतपूर्वीच्या बारा महिन्यांपेक्षा आधी नसेल अशा वेळी दिलेली होती.
(७) पोट-कलमे (३), (४) व (६) खालील जमेची रक्कम, विहित करण्यात येईल अशा रीतीने परिगणना करण्यात येईल.
उक्या कामाशी
संबंधित
संक्रमणकालीन
तरतुदी.
१९. (१) जेव्हा धंद्याच्या ठिकाणी मिळालेल्या कोणत्याही निविष्टी, आहेत तशा किंवा अंशत: प्रक्रिया करण्यात आल्यानंतर नियत दिवसाच्या पूर्वी, विद्यमान कायद्याच्या तरतुदींना अनुसरून, आणखी प्रक्रियेसाठी, चाचणीसाठी, दुरुस्तीसाठी, दुरुस्ती करून पुन:नवीकरणासाठी किंवा अन्य कोणत्याही प्रयोजनासाठी उक्त्ते काम करणाया कामगाराकडे पाठवण्यात आल्या असतील आणि अशा निविष्टी, उक्त्त ठिकाणी नियत दिवशी किंवा त्यानंतर परत केल्या जात असतील तेव्हा अशा बाबतीत, जर अशा निविष्टी, उक्त्ते काम पूर्ण झाल्यानंतर किंवा अन्यथा, नियत दिवसापासून सहा महिन्यांच्या आत उक्त्त ठिकाणी परत केल्या जात असतील तर, कोणताही कर प्रदेय असणार नाही :
भारताचे राजपत्र, असाधारण ३५ अनुभाग १] SECTION 1] GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARYपरंतु असे की, सहा महिन्यांचा कालावधी, पुरेसे कारण दर्शविल्यावर, दोन महिन्यांपेक्षा अधिक असणार नाही इतक्या आणखी कालावधीकरिता आयुक्त्ताद्वारे वाढविता येईल :
परंतु आणखी असे की, जर अशा निविष्टी, नियत दिवसापासून सहा महिन्यांच्या आत किंवा वाढवून दिलेल्या कालावधीत परत केल्या जात नसतील तर, निविष्टी कराची जमा रक्कम केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियमाच्या कलम १४२ च्या पोट-कलम (८) च्या खंड (क) च्या तरतुदींनुसार, वसूल करण्यास पात्र असेल.
(२) जेव्हा कोणत्याही अर्ध-सिद्ध वस्तू, नियत दिवसापूर्वी विद्यमान कायद्याच्या तरतुदींनुसार विवक्षित र्िनमिती- प्रक्रिया करण्यासाठी धंद्याच्या कोणत्याही ठिकाणाहून इतर कोणत्याही जागी पाठविण्यात आल्या असतील आणि अशा वस्तू (या कलमामध्ये यापुढे ज्याचा निर्देश ""उक्त्त वस्तू"" असा केला आहे), नियत दिवशी किंवा त्यानंतर उक्त्त ठिकाणी परत केल्या जात असतील तेव्हा अशा बाबतीत, जर उक्त्त वस्तू, चालू असणाया र्िनमिती प्रक्रियेनंतर किंवा अन्यथा, नियत दिवसापासून सहा महिन्यांत उक्त्त ठिकाणी परत केल्या जात असतील तर, कोणताही कर प्रदेय असणार नाही:
परंतु असे की, सहा महिन्यांचा कालावधी पुरेसे कारण दर्शविल्यावर, दोन महिन्यांपेक्षा अधिक असणार नाही इतक्या आणखी कालावधीकरिता आयुक्त्ताद्वारे वाढविता येईल :
परंतु आणखी असे की, जर उक्त्त वस्तू, या पोट-कलमामध्ये विर्िनदिष्ट केलेल्या कालावधीत परत केल्या जात नसतील तर, निविष्टी कराची जमा रक्कम केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियमाच्या कलम १४२ च्या पोट-कलम (८) च्या खंड (क) च्या तरतुदींनुसार, वसूल करण्यासाठी पात्र असतील :
परंतु तसेच, वस्तू पाठवणाया व्यक्त्तीस, विद्यमान कायद्याच्या तरतुदींनुसार, उक्त्त वस्तू नियत दिवसापासून सहा महिन्यांच्या कालावधीत किंवा, यथास्थिति, वाढीव कालावधीत कर प्रदान केल्यावर भारतात, किंवा कराचे प्रदान न करता निर्यातीसाठी, तेथून पुरवठा करण्याच्या प्रयोजनासाठी कोणत्याही नोंदणीकृत व्यक्त्तीच्या जागेत, हस्तांतरित करता येतील.
(३) जेव्हा कोणत्याही वस्तू, नियत दिवसापूर्वी विद्यमान कायद्याच्या तरतुदींनुसार चाचण्या करण्यासाठी किंवा अन्य कोणतीही प्रक्रिया करण्याकरिता कराचे प्रदान न करता, धंद्याच्या ठिकाणाहून अन्य कोणत्याही जागी,---- मग त्या नोंदणीकृत असो किंवा नसो- पाठविण्यात आल्या असतील आणि अशा वस्तू नियत दिवशी किंवा त्यानंतर, धंद्याच्या उक्त्त ठिकाणी परत केल्या जात असतील तेव्हा अशा बाबतीत जर उक्त्त वस्तू चाचण्या केल्यानंतर किंवा अन्य कोणतीही प्रक्रिया केल्यानंतर, नियत दिवसापासून सहा महिन्यांच्या कालावधीत अशा ठिकाणी परत केल्या जात असतील तर, कोणताही कर प्रदेय असणार नाही :
परंतु असे की, सहा महिन्यांचा कालावधी पुरेसे कारण दर्शविल्यावर, दोन महिन्यांपेक्षा अधिक असणार नाही इतक्या आणखी कालावधीसाठी आयुक्त्ताद्वारे वाढविता येईल :
परंतु आणखी असे की, जर उक्त्त वस्तू, या पोट-कलमात विर्िनदिष्ट केलेल्या कालावधीत परत केल्या जात नसतील तर, निविष्टी कराची जमा रक्कम, केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियमाच्या कलम १४२ च्या पोट-कलम (८) च्या खंड (क) च्या तरतुदींनुसार वसूल करण्यासाठी पात्र असेल :
परंतु तसेच, वस्तू पाठवणाया व्यक्त्तीस, विद्यमान कायद्याच्या तरतुदींनुसार, उक्त्त वस्तू, नियत दिवसापासून सहा महिन्यांच्या कालावधीत किंवा, यथास्थिति, वाढीव कालावधीत कर प्रदान केल्यावर भारतात किंवा कराचे प्रदान न करता निर्यातीसाठी, उक्त्त अन्य जागांमधून हस्तांतरित करता येतील.
(४) जर वस्तू पाठवणारी व्यक्त्ती आणि उे काम करणारा कामगार नियत दिवशी उक्त्त व्यक्त्तीच्या वतीने उे काम करणाया कामगाराने साठयात ठेवलेल्या निविष्टी व वस्तू यांचे तपशील विहित करण्यात येईल अशा नमुन्यात व रीतीने आणि अशा कालावधीत, घोषित करीत असेल तरच केवळ, पोट-कलमे (१), (२) व (३) अन्वये कर प्रदेय असणार नाही.
३६ भारताचे राजपत्र, असाधारण [भाग बारा GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARY [PART XIIसंकीर्ण
संक्रमणकालीन
तरतुदी.
२०. (१) जेव्हा ज्या कोणत्याही वस्तुंवर नियत दिवसापूर्वी सहा महिन्यांच्या आधीच्या नसणाया त्यांच्या विक्रीच्या वेळी, विद्यमान कायद्यान्वये, कोणताही असल्यास, कर प्रदान करण्यात आला होता अशा वस्तू, नियत दिवशी किंवा त्यानंतर धंद्याच्या कोणत्याही ठिकाणी परत केल्या जातात तेव्हा अशा बाबतीत, नोंदणीकृत व्यक्त्ती, जेव्हा अशा वस्तू, नोंदणीकृत व्यक्त्तीव्यतिरिक्त्त इतर व्यक्त्ती, नियत दिवसापासून सहा महिन्यांच्या कालावधीत धंद्याच्या उक्त्त ठिकाणी परत करीत असेल आणि अशा वस्तू समुचित अधिकायाची खात्री होईल अशा प्रकारे ओळख पटण्यायोग्य असतील, तेव्हा, विद्यमान कायद्यान्वये प्रदान केलेल्या कराच्या परताव्यासाठी पात्र असेल:
परंतु असे की, जर अशा वस्तू नोंदणीकृत व्यक्त्तीद्वारे परत केल्या जात असतील तर, अशा वस्तु परत करणे हे, पुरवठा असल्याचे मानण्यात येईल.
(२) (क) जेव्हा नियत दिवसापूर्वी केलेल्या करारानुसार, नियत दिवशी किंवा त्यानंतर कोणत्याही वस्तुंच्या किंमतीत उध्र्व दिशेने सुधारणा झाली असेल तेव्हा, जिने अशा वस्तू विकल्या होत्या अशी नोंदणीकृत व्यक्त्ती, किंमतीत अशी सुधारणा झाल्यापासून तीस दिवसांच्या आत, विहित करण्यात येईल असा तपशील अंतभर्ूत असणारे पूरक बीजक किंवा नावेपत्र प्राप्तकत्र्याला देईल आणि या अधिनियमाच्या प्रयोजनार्थ, असे पूरक बीजक किंवा नावेपत्र हे, या अधिनियमान्वये केलेल्या जावक पुरवठयाच्या बाबतीत, देण्यात आलेले असल्याचे मानण्यात येईल.
(ख) जेव्हा नियत दिवसापूर्वी केलेल्या करारानुसार, नियत दिवशी किंवा त्यानंतर कोणत्याही वस्तुंच्या किंमतीत अधो दिशेने सुधारणा झाली असेल तेव्हा, जिने अशा वस्तू विकल्या होत्या अशी नोंदणीकृत व्यक्त्ती, अशी किंमतीत सुधारणा झाल्यापासून तीस दिवसांच्या आत, विहित करण्यात येईल असा तपशील अंतभर्ूत असणारे जमापत्र प्राप्तकत्र्याला देईल आणि या अधिनियमाच्या प्रयोजनार्थ, असे जमापत्र हे, या अधिनियमान्वये केलेल्या जावक पुरवठयाच्या बाबतीत देण्यात आलेले असल्याचे मानण्यात येईल :
परंतु असे की, जर जमापत्र प्राप्तकत्र्याने कर दायित्वाच्या अशा कपातीच्या प्रमाणात त्याची निविष्टी कराची जमा रक्कम कमी केली असेल तरच केवळ नोंदणीकृत व्यक्त्तींना, जमापत्र दिल्यामुळे त्याचे कर दायित्व कमी करण्याची मुभा देण्यात येईल.
(३) विद्यमान कायद्यान्वये प्रदान केलेली कोणत्याही निविष्टी कराची जमा रक्कम, कर, व्याज किंवा अन्य कोणतीही रक्कम यांच्या परताव्यासाठी, नियत दिवसापूर्वी, नियत दिवशी किंवा त्यानंतर, कोणत्याही व्यक्त्तीने दाखल केलेला परताव्याचा प्रत्येक दावा, विद्यमान कायद्याच्या तरतुदींनुसार निकालात काढण्यात येईल आणि परिणामस्वरूप त्याला उपर्ाजित होणारी कोणतीही रक्कम, उक्त्त कायद्याच्या तरतुदींनुसार रोख स्वरूपात त्याला परत करण्यात येईल :
परंतु असे की, जेव्हा निविष्टी कराच्या जमा रकमेच्या परताव्याचा कोणताही दावा पूर्णपणे किंवा अंशत:
नाकारण्यात आला असेल तेव्हा, अशा प्रकारे नाकारलेली रक्कम, व्यपगत होईल :
परंतु आणखी असे की, जेव्हा नियत दिवशी असल्याप्रमाणे उक्त्त रकमेची शिल्लक, या अधिनियमान्वये पुढे ओढण्यात आली असेल तेव्हा, कोणत्याही निविष्टी कराच्या जमा रकमेचा कोणताही परतावा देण्यात येणार नाही.
(४) नियत दिवसापूर्वी किंवा त्यानंतर निर्यात केलेल्या वस्तुंच्या बाबतीत विद्यमान कायद्यान्वये प्रदान केलेल्या कोणत्याही कराच्या परताव्यासाठी नियत दिवसानंतर दाखल केलेला परताव्याचा प्रत्येक दावा, विद्यमान कायद्याच्या तरतुदींनुसार निकालात काढण्यात येईल :
परंतु असे की, जेव्हा निविष्टी कराच्या जमा रकमेच्या परताव्याचा कोणताही दावा पूर्णपणे किंवा अंशत:
नाकारण्यात आला असेल तेव्हा, अशा प्रकारे नाकारण्यात आलेली रक्कम व्यपगत होईल :
भारताचे राजपत्र, असाधारण ३७ अनुभाग १] SECTION 1] GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARYपरंतु आणखी असे की, जेव्हा नियत दिवशी असल्याप्रमाणे, उक्त्त रकमेची शिल्लक, या अधिनियमान्वये पुढे ओढण्यात आली असेल तेव्हा, कोणत्याही निविष्टी कराच्या जमा रकमेचा कोणताही परतावा देण्यात येणार नाही.
(५) (क) विद्यमान कायद्यान्वये सुरू केलेली - मग ती नियत दिवसापूर्वी, नियत दिवशी किंवा त्यानंतर सुरू केलेली असो, निविष्टी कराच्या जमा रकमेच्या दाव्याशी संबंधित असणारी अपिलाची, पुर्नविलोकनाची, पुनरीक्षणाची किंवा निर्देशाची प्रत्येक कार्यवाही विद्यमान कायद्याच्या तरतुदींनुसार निकालात काढण्यात येईल, आणि दावाकारास अनुज्ञेय असल्याचे आढळून आलेली जमेची कोणतीही रक्कम विद्यमान कायद्याच्या तरतुदींनुसार त्याला रोख स्वरूपात परत करण्यात येईल, आणि नाकारलेली रक्कम, कोणतीही असल्यास, या अधिनियमाखालील निविष्टी कराची जमा रक्कम म्हणून अनुज्ञेय असणार नाही :
परंतु असे की, जेव्हा नियत दिवशी असल्याप्रमाणे, उक्त्त रकमेची शिल्लक या अधिनियमान्वये पुढे ओढण्यात आली असेल तेव्हा, कोणत्याही निविष्टी कराच्या जमा रकमेचा कोणताही परतावा देण्यात येणार नाही.
(ख) विद्यमान कायद्यान्वये, सुरू केलेली - मग ती नियत दिवसापूर्वी, नियत दिवशी किंवा त्यानंतर कधीही केलेली असो,- निविष्टी कराच्या जमा रकमेच्या वसुलीशी संबंधित असणारी अपिलाची, पुनरीक्षणाची, पुर्नविलोकनाची किंवा निर्देशाची प्रत्येक कार्यवाही, विद्यमान कायद्याच्या तरतुदींनुसार निकालात काढण्यात येईल, आणि अशा अपिलाच्या, पुनरीक्षणाच्या, पुर्नविलोकनाच्या किंवा निर्देशाच्या परिणामी, जर जमेची कोणतीही रक्कम, वसुलीयोग्य असेल तर, विद्यमान कायद्यान्वये वसूल केली नसेल तर, ती या अधिनियमाखालील कराची थकबाकी असल्याप्रमाणे, वसूल करण्यात येईल आणि अशा प्रकारे वसूल केलेली रक्कम, या अधिनियमाखालील निविष्टी कराची जमा रक्कम म्हणून अनुज्ञेय असणार नाही.
(६) (क) विद्यमान कायद्यान्वये, सुरू केलेली - मग ती नियत दिवसापूर्वी, नियत दिवशी किंवा त्यानंतर कधीही केलेली असो,- कोणत्याही उद्विष्टी कर दायित्वाशी संबंधित असणारी अपिलाची, पुनरीक्षणाची, पुर्नविलोकनाची किंवा निर्देशाची प्रत्येक कार्यवाही, विद्यमान कायद्याच्या तरतुदींनुसार निकालात काढण्यात येईल, आणि अशा अपिलाच्या, पुनरीक्षणाच्या, पुर्नविलोकनाच्या किंवा निर्देशाच्या परिणामी, जर कोणतीही रक्कम वसुलीयोग्य असेल तर, विद्यमान कायद्यान्वये ती वसूल केली नसेल तर, या अधिनियमाखालील कराची थकबाकी असल्याप्रमाणे, वसूल करण्यात येईल आणि अशा प्रकारे वसूल केलेली रक्कम, या अधिनियमाखालील निविष्टी कराची जमा रक्कम म्हणून अनुज्ञेय असणार नाही.
(ख) विद्यमान कायद्यान्वये, सुरू केलेली - मग ती नियत दिवसापूर्वी, नियत दिवशी अथवा त्यानंतर कधीही केलेली असो,- कोणत्याही उद्विष्टी कर दायित्वाशी संबंधित असणारी अपिलाची, पुनरीक्षणाची, पुर्नविलोकनाची किंवा निर्देशाची प्रत्येक कार्यवाही, विद्यमान कायद्याच्या तरतुदींनुसार निकालात काढण्यात येईल, आणि दावाकारास अनुज्ञेय असल्याचे आढळून आलेली, कोणतीही रक्कम विद्यमान कायद्याच्या तरतुदींनुसार त्याला रोख स्वरूपात परत करण्यात येईल, आणि कोणतीही असल्यास, नाकारलेली रक्कम, या अधिनियमाखालील निविष्टी कराची जमा रक्कम म्हणून अनुज्ञेय असणार नाही.
(७) (क) जेव्हा विद्यमान कायद्यान्वये, सुरू केलेल्या - मग ती नियत दिवसापूर्वी, नियत दिवशी किंवा त्यानंतर सुरू केलेली असो,- निर्धारणाच्या किंवा अभिनिर्णयाच्या कार्यवाही अनुसार, कराची, व्याजाची, शास्तीची किंवा दंडाची कोणतीही रक्कम एखाद्या व्यक्त्तीकडून वसुलीयोग्य झाली असेल तेव्हा ती, विद्यमान कायद्यान्वये वसूल झाली नसेल तर, या अधिनियमाखालील कराची थकबाकी असल्याप्रमाणे वसूल करण्यात येईल आणि अशा प्रकारे वसूल केलेली रक्कम या अधिनियमाखालील निविष्टी कराची जमा रक्कम म्हणून अनुज्ञेय असणार नाही.
३८ भारताचे राजपत्र, असाधारण [भाग बारा GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARY [PART XII(ख) जेव्हा विद्यमान कायद्यान्वये, सुरू केलेल्या- मग ती नियत दिवसापूर्वी, नियत दिवशी किंवा त्यानंतर सुरू केलेली असो,- निर्धारणाच्या किंवा अभिनिर्णयाच्या कार्यवाही अनुसार, कराची, व्याजाची, शास्तीची किंवा दंडाची रक्कम एखाद्या करपात्र व्यक्त्तीला परतावायोग्य असेल तेव्हा, ती उक्त्त कायद्यान्वये तिला रोख स्वरूपात परत करण्यात येईल आणि अशी नाकारलेली रक्कम, कोणतीही असल्यास, या अधिनियमाखालील निविष्टी कराची जमा रक्कम म्हणून अनुज्ञेय असणार नाही.
(८) (क) जेव्हा विद्यमान कायद्यान्वये सादर केलेल्या कोणत्याही विवरणात, नियत दिवसानंतर सुधारणा केली जात असेल तेव्हा आणि जर अशा सुधारणेनुसार, कोणतीही रक्कम वसुलीयोग्य असल्याचे आढळून आले असेल किंवा निविष्टी कराची कोणतीही जमा रक्कम, अनुज्ञेय नसल्याचे आढळून आले असेल तर, ती, विद्यमान कायद्यान्वये वसुली झाली नसेल तर, या अधिनियमाखालील कराची थकबाकी असल्याप्रमाणे वसूल करण्यात येईल आणि अशा प्रकारे वसूल केलेली रक्कम, या अधिनियमाखालील निविष्टी कराची जमा रक्कम म्हणून अनुज्ञेय असणार नाही.
(ख) जेव्हा विद्यमान कायद्यान्वये सादर केलेल्या कोणत्याही विवरणात, नियत दिनांकानंतर परंतु विद्यमान कायद्यान्वये अशा सुधारणेकरिता विर्िनदिष्ट केलेल्या कालमर्यादेत सुधारणा केली जात असेल तेव्हा, आणि अशा सुधारणेनुसार, कोणत्याही करपात्र व्यक्त्तीला, कोणतीही रक्कम परतावायोग्य असल्याचे आढळून आले असेल किंवा निविष्टी कराची कोणतीही जमा रक्कम अनुज्ञेय असल्याचे आढळून आले असेल तर, ती, विद्यमान कायद्यान्वये त्याला रोख स्वरूपात परत करण्यात येईल आणि कोणतीही असल्यास,नाकारलेली रक्कम, या कायद्याखालील निविष्टी कराची जमा रक्कम म्हणून अनुज्ञेय असणार नाही.
(९) या प्रकरणात अन्यथा तरतूद करण्यात आली असेल त्याखेरीज, नियत दिवसापूर्वी केलेल्या करारानुसार, नियत दिवशी किंवा त्यानंतर पुरवठा केलेल्या वस्तू किंवा सेवा किंवा दोन्ही, या अधिनियमाच्या तरतुदींन्वये करपात्र असतील.
(१०) (क) केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियमाच्या कलम १२ मध्ये काहीही अंतभर्ूत असले तरी, विद्यमान अधिनियमान्वये उक्त्त वस्तुंवर ज्या मर्यादेपयर्ंत कर आकारणीयोग्य होता त्या मर्यादेपयर्ंत या अधिनियमान्वये वस्तुंवर कोणताही कर प्रदेय असणार नाही.
१९९४ चा ३२.
(ख) केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियमाच्या कलम १३ मध्ये काहीही अंतभर्ूत असले तरी, वित्त अधिनियम, १९९४ याच्या प्रकरण पाच अन्वये उक्त्त सेवांवर ज्या मर्यादेपयर्ंत कर आकारणीयोग्य होता त्या मर्यादेपयर्ंत या अधिनियमान्वये सेवांवर कोणताही कर प्रदेय असणार नाही.
१९९४ चा ३२.
(ग) जेव्हा वस्तुंच्या विक्रीशी संबंधीत असणाया कोणत्याही विद्यमान कायद्यान्वये आणि वित्त अधिनियम, १९९४ च्या प्रकरण पाच, या दोन्हीं अन्वये कोणत्याही पुरवठयावर कर प्रदान केलेला असेल तेव्हा, या अधिनियमान्वये कर आकारणीयोग्य असेल आणि करपात्र व्यक्त्ती, नियत दिवसानंतर केलेल्या पुरवठयाच्या मर्यादेपयर्ंत विद्यमान कायद्यान्वये प्रदान केलेला मूल्यर्वधित कर किंवा सेवा कर यांची रक्कम जमा करून घेण्यास हक्कदार असेल आणि अशा जमा रकमेची, विहित करण्यात येईल अशा रीतीने परिगणना करण्यात येईल.
(११) जेव्हा नियत दिवसापूर्वी सहा महिन्यांपेक्षा आधी नसेल अशा कालावधीत, मान्यता घेण्याच्या तवावर पाठविलेल्या कोणत्याही वस्तू, खरेदीदाराकडून नाकारण्यात आल्या असतील किंवा त्यांना मान्यता दिली नसेल, आणि नियत दिवशी किंवा त्यानंतर त्या विक्रेत्यास परत केल्या असतील तर, जर अशा वस्तू, नियत दिवसापासून सहा महिन्यांच्या आत परत केल्या असतील तर, त्यावर कोणताही कर प्रदेय असणार नाही :
परंतु असे की, सहा महिन्यांचा उक्त्त कालावधी, पुरेसे कारण दर्शविल्यावर, दोन महिन्यांपेक्षा अधिक असणार नाही इतक्या आणखी कालावधीसाठी आयुक्त्ताद्वारे वाढविता येईल:
भारताचे राजपत्र, असाधारण ३९ अनुभाग १] SECTION 1] GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARYपरंतु आणखी असे की, जर अशा वस्तू, या अधिनियमान्वये करपात्र असतील आणि या पोट-कलमामध्ये विर्िनदिष्ट केलेल्या कालावधीनंतर त्या परत केल्या जात असतील तर, अशा वस्तू परत करणाया व्यक्त्तीकडून कर प्रदेय असेल :
परंतु तसेच, अशा वस्तू या अधिनियमान्वये करपात्र असतील आणि त्या या पोट-कलमामध्ये विर्िनदिष्ट केलेल्या कालावधीत परत केल्या जात नसतील तर, जिने मान्यता घेण्याच्या तवावर अशा वस्तू पाठविल्या असतील, त्या व्यक्त्तीकडून कर प्रदेय असेल.
(१२) जेव्हा वस्तुंच्या विक्रीशी संबंधित असणाया कोणत्याही विद्यमान कायद्यान्वये, ज्यांच्या बाबतीत मूळ स्रोतातून कर वजा करण्याची आवश्यकता होती अशा कोणत्याही वस्तुंची पुरवठादाराने विक्री केली असेल आणि नियत दिवसाच्यापूर्वी त्याचे बीजक देखील दिलेले असेल तेव्हा, जर उक्त्त पुरवठादारास नियत दिवशी किंवा त्यानंतर रक्कम प्रदान केली असेल तर, वजातदाराकडून, या अधिनियमास लागू असल्याप्रमाणे, केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियमाच्या कलम ५१ अन्वये, मूळ स्रोतातून कोणताही कर वजात केला जाणार नाही.
स्पष्टीकरण .----या प्रकरणाच्या प्रयोजनार्थ, ""भांडवली वस्तू"" या शब्दप्रयोगाला, वस्तुंच्या विक्रीशी संबंधित असणाया कोणत्याही विद्यमान कायद्यामध्ये जो अर्थ नेमून दिलेला असेल तोच अर्थ असेल
प्रकरण नऊ
संकीर्ण
२१. या अधिनियमाच्या तरतुदी आणि त्याखाली केलेले नियम यांस अधीन राहून, केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियमाच्या,-----
(एक) पुरवठयाची व्याप्ती ;
केंद्रीय वस्तू व
सेवाकर
अधिनियमाच्या
तरतुदी लागू
करणे.
(दोन) आपसमेळ आकारणी ;
(तीन) संयुक्त्त पुरवठा व मिश्र पुरवठा ;
(चार) पुरवठयाची वेळ व मूल्य ;
(पाच) निविष्टी कराची जमा रक्कम ;
(सहा) नोंदणी ;
(सात) कराचे बीजक, जमापत्र व नावेपत्र ;
(आठ) लेखे व अभिलेख ;
(नऊ) विवरणे ;
(दहा) कराचे प्रदान ;
(अकरा) मूळ स्रोतातून कराची वजात ;
(बारा) मूळ स्रोतातून कर वसूल करणे ;
(तेरा) करनिर्धारण ;
(चौदा) परतावे ;
(पंधरा) लेखापरीक्षा ;
(सोळा) तपासणी, झडती, जप्ती व अटक ;
(सतरा) मागणी व वसुली ;
(अठरा) विवक्षित प्रकरणी प्रदान करण्याचे दायित्व ;
भाग बारा-(२०)-६४० भारताचे राजपत्र, असाधारण [भाग बारा GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARY [PART XII (एकोणीस) आगाऊ अधिनिर्णय ;
(वीस) अपिले व पुनरीक्षण ;
(एकवीस) दस्तऐवजांसंबंधी गृहीतक ;
(बावीस) अपराध व शास्ती ;
(तेवीस) उक्त्ते काम ;
(चोवीस) ई-वाणिज्य ;
(पंचवीस) निधीची संव्यवस्था ;
(सव्वीस) संक्रमणकालीन तरतुदी ; आणि
(सत्तावीस) व्याज व शास्ती लादण्याशी संबंधित असणाया तरतुदींसह संकीर्ण तरतुदी,
यांच्याशी संबंधित असणाया तरतुदी,-----
(क) जणू काही त्या, या अधिनियमाखाली अधिनियमित केल्या होत्या असे समजून केंद्रीय कराच्या संबंधात त्या जशा लागू होतात तशाच त्या, शक्य असेल तेथवर, संघ राज्यक्षेत्र कराच्या संबंधात, योग्य त्या फेरफारांसह, लागू होतील ;
(ख) पुढील परिस्थितीत, त्या तरतुदी अनुकूल करण्यासाठी, केंद्र सरकारला जे करणे आवश्यक व इष्ट वाटते अशा पुढील फेरबदलांस व फेरफारांस अधीन राहून, योग्य त्या फेरफारांसह, लागू होतील :----
(एक) ""या अधिनियमाचे"" संदर्भ हे, ""संघ राज्यक्षेत्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७"" याचे संदर्भ असल्याचे मानण्यात येईल ;
(दोन) ""आयुक्त्त"" याचे संदर्भ हे, या अधिनियमाच्या कलम २ च्या खंड (२) मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे, संघ राज्यक्षेत्र कर ""आयुक्त्त"" याचे संदर्भ असल्याचे मानण्यात येईल ;
(तीन) ""केंद्रीय कर अधिकायांचे"" संदर्भ हे, ""संघ राज्यक्षेत्र कर अधिकायांचे"" संदर्भ असल्याचे मानण्यात येईल ;
(चार) ""केंद्रीय कराचे"" संदर्भ हे, ""संघ राज्यक्षेत्र कराचे"" संदर्भ आणि ""संघ राज्यक्षेत्र कराचे"" संदर्भ हे, ""केंद्रीय कराचे"" संदर्भ असल्याचे मानण्यात येईल ;
(पाच) ""आयुक्त्त, राज्य कर किंवा आयुक्त्त, संघ राज्यक्षेत्र कर"" यांचे संदर्भ हे, ""आयुक्त्त केंद्रीय कर"" याचे संदर्भ असल्याचे मानण्यात येईल ;
(सहा) ""राज्य वस्तू व सेवा कर अधिनियम किंवा संघ राज्यक्षेत्र वस्तू व सेवा कर अधिनियम"" यांचे संदर्भ हे, ""केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियमाचे"" संदर्भ असल्याचे मानण्यात येईल ;
(सात) ""राज्य कर किंवा संघ राज्यक्षेत्र कर"" यांचे संदर्भ हे, ""केंद्रीय कर"" याचे संदर्भ असल्याचे मानण्यात येईल ;
भारताचे राजपत्र, असाधारण ४१ अनुभाग १] SECTION 1] GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARY२२. (१) केंद्र सरकारला, या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी परिषदेच्या शिफारशींवरून, नियम करण्याचा अधिकार.
अधिसूचनेद्वारे नियम करता येतील.
(२) पोट-कलम (१) च्या तरतुदींच्या सर्वसाधारणतेस बाध न आणता, केंद्र सरकारला, या अधिनियमाद्वारे, ज्या बाबतीत विहित करण्याची आवश्यकता आहे किंवा विहित करता येतील अथवा ज्याच्या बाबतीत, नियमांद्वारे तरतुदी करावयाच्या आहेत किंवा करता येतील अशा सर्व किंवा त्यापैकी कोणत्याही बाबींकरिता नियम करता येतील.
(३) या कलमान्वये प्रदान केलेल्या नियम करण्याच्या अधिकारात, या अधिनियमाच्या तरतुदी ज्या दिनांकास अंमलात येतील त्या दिनांकाच्या आधीच्या नसलेल्या दिनांकापासून नियमांस किंवा त्यापैकी कोणत्याही नियमास, भूतलक्षी प्रभाव देण्याच्या अधिकाराचा समावेश होतो.
(४) पोट-कलम (१) अन्वये केलेल्या कोणत्याही नियमांत, अशी तरतूद करता येईल की, त्याचे उल्लंघन झाल्यास, दहा हजार रुपयांपेक्षा अधिक नसेल एवढया शास्तीसाठी पात्र असेल.
२३. मंडळास, या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी या अधिनियमाशी व त्याखाली केलेल्या नियमांशी सुसंगत असतील असे विनियम, अधिसूचनेद्वारे करता येतील.
विनियम
करण्याचा
सर्वसाधारण
अधिकार.
नियम, विनियम
व अधिसूचना
मांडणे.
२४. या अधिनियमान्वये, केंद्र सरकारने केलेला प्रत्येक नियम, मंडळाने केलेला प्रत्येक विनियम आणि केंद्र सरकारने काढलेली प्रत्येक अधिसूचना, तो करण्यात आल्यानंतर किंवा ती काढण्यात आल्यानंतर, शक्य तितक्या लवकर, संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर, ते एका सत्राने बनलेल्या अथवा दोन किंवा अधिक क्रमवर्ती सत्रे मिळून बनलेल्या अशा एकूण तीस दिवसांच्या कालावधीकरिता सत्रासीन असताना, मांडण्यात येतील आणि उपरोक्त्त सत्राच्या किंवा क्रमवर्ती सत्रांच्या पाठोपाठचे सत्र संपण्यापूर्वी जर, त्या नियमात किंवा विनियमात, किंवा यथास्थिती, अधिसूचनेत कोणताही फेरबदल करण्याबाबत दोन्ही सभागृहांचे मतैक्य झाले तर, अथवा तो नियम, विनियम करण्यात येऊ नये किंवा ती अधिसूचना काढण्यात येऊ नये याबाबत दोन्ही सभागृहांचे मतैक्य झाले तर, त्यानंतर, तो नियम, विनियम किंवा, यथास्थिती, अधिसूचना अशा फेरबदल केलेल्या स्वरूपातच अंमलात येईल, किंवा यथास्थिति, मुळीच अंमलात येणार नाही ; तथापि, अशा कोणत्याही फेरबदलामुळे किंवा विलोपनामुळे, त्या नियमाखाली, विनियमाखाली किंवा, यथास्थिती, अधिसूचनेखाली त्यापूर्वी केलेल्या कोणत्याही गोष्टीच्या विधिग्रातेस बाध येणार नाही.
सूचना व निदेश
देण्याचा
अधिकार.
२५. आयुक्त्तास, या अधिनियमाच्या अंमलबजावणीमध्ये एकरूपता आणण्याच्या प्रयोजनार्थ तसे करणे आवश्यक किंवा इष्ट असल्याचे त्यास वाटत असेल तर, त्यास योग्य वाटेल त्याप्रमाणे, संघ राज्यक्षेत्र कर अधिकायांना असे आदेश, सूचना किंवा निदेश देता येतील, आणि त्यानंतर या अधिनियमाच्या अंमलबजावणीमध्ये तैनात केलेले असे सर्व अधिकारी व इतर सर्व व्यक्त्ती, अशा आदेशांचे, सूचनांचे व निदेशांचे अनुसरण व अनुपालन करतील.
अडचणी दूर
करणे.
२६. (१) जर या अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदी अंमलात आणताना कोणतीही अडचण उद्भवली तर, केंद्र सरकारला, परिषदेच्या शिफारशींवरून, राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे उक्त्त अडचणी दूर करण्याच्या प्रयोजनार्थ आवश्यक किंवा इष्ट असेल त्याप्रमाणे, या अधिनियमाच्या किंवा त्याखाली केलेल्या नियमांच्या किंवा विनियमांच्या तरतुदींशी विसंगत नसतील अशा तरतुदी करता येतील :
परंतु असे की, या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून तीन वषार्ंचा कालावधी समाप्त झाल्यानंतर, असा कोणताही आदेश काढण्यात येणार नाही.
(२) या कलमान्वये काढलेला प्रत्येक आदेश, तो काढण्यात आल्यानंतर शक्य तितक्या लवकर, संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर मांडण्यात येईल.
भाग बारा-(२०)-६अभारताचे राजपत्र, असाधारण ४२ अनुभाग १] SECTION 1] GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARY
केंद्रीय वस्तू व सेवा कर (जम्मू व काश्मीरवर विस्तार) अधिनियम, २०१७
(२०१७ चा अधिनियम क्रमांक २६)
[२५ ऑक्टोबर, २०२१ रोजी यथाविद्यमान]
[२३ ऑगस्ट, २०१७] केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ याचा जम्मू व काश्मीर राज्यावर विस्तार{{^{{FOOTNOTE *}}}} करण्याकरिता तरतूद करण्यासाठी अधिनियम.
भारतीय गणराज्याच्या अडुसष्टाव्या वर्षी, संसदेद्वारे पुढीलप्रमाणे अधिनियमित होवो :-----
१. (१) या अधिनियमास, केंद्रीय वस्तू व सेवा कर (जम्मू व काश्मीरवर विस्तार) अधिनियम, २०१७ संक्षिप्त नाव व प्रारंभ.
असे म्हणावे.
(२) तो, ८ जुलै, २०१७ रोजी अंमलात आला असल्याचे मानण्यात येईल.
२०१७ चा १२.
२. (१) केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७,(यात यापुढे ज्याचा निर्देश ""मुख्य अधिनियम"" असा केला आहे) आणि केंद्र सरकारने, त्याखाली केलेले सर्व नियम, काढलेल्या अधिसूचना व काढलेले आदेश यांचा याद्वारे, जम्मू व काश्मीर राज्यावर{{^{{FOOTNOTE *}}}} विस्तार करण्यात येईल, आणि ते त्यामध्ये अंमलात येतील.
(२) या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून, मुख्य अधिनियमातील,----
केंद्रीय वस्तू व
सेवा कर
अधिनियम,
२०१७ याचा
विस्तार व
सुधारणा.
(क) कलम १ च्या पोट-कलम (२) मधील ""जम्मू व काश्मीर राज्य खेरीजकरून"" हा मजकूर वगळण्यात येईल ;
(ख) कलम २२ च्या स्पष्टीकरणातील खंड (तीन) मधील, ""या शब्दाचा अर्थ"", या मजकुरानंतर, ""जम्मू व काश्मीर राज्य खेरीज करून{{^{{FOOTNOTE *}}}}"" हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल ;
(ग) कलम १०९, पोट-कलम (६) मध्ये,----
(एक) ""प्रत्येक राज्य किंवा संघ राज्यक्षेत्रासाठी"" या मजकुरानंतर, ""जम्मू व काश्मीर राज्य{{^{{FOOTNOTE *}}}} खेरीज करून"" हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल.
(दोन) पहिल्या परंतुकामध्ये, ""परंतु असे की"", या मजकुराऐवजी, पुढील मजकूर दाखल करण्यात येईल :----
""परंतु असे की, जम्मू व काश्मीर राज्यासाठी{{^{{FOOTNOTE *}}}}, या अधिनियमान्वये घटित केलेल्या वस्तू व सेवा कर अपील न्यायाधिकरणाचे राज्य न्यायपीठ, जम्मू व काश्मीर वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ अन्वये घटित केलेले राज्य अपील न्यायाधिकरण असेल :
""परंतु आणखी असे की"" ;
(तीन) दुसया परंतुकामध्ये, ""परंतु आणखी असे की"" या मजकुराऐवजी, ""परंतु तसेच,"" हा मजकूर दाखल करण्यात येईल.
३. (१) केंद्रीय वस्तू व सेवा कर (जम्मू व काश्मीरवर विस्तार) अध्यादेश, २०१७ याद्वारे निरसित निरसन व व्यावृत्ती.
करण्यात येत आहे.
२०१७ चा अध्यादेश ३.
(२) असे निरसन झाले असले तरी, उक्त्त अध्यादेशान्वये केलेली कोणतीही गोष्ट किंवा हाती घेतलेली कोणतीही कार्यवाही, या अधिनियमाच्या तत्सम तरतुदींन्वये करण्यात आली असल्याचे किंवा हाती घेण्यात आली असल्याचे मानण्यात येईल.
* अधिसूचना क्रमांक स्थायी आदेश ३९१२(ई), दिनांक ३० ऑक्टोबर, २०१९ अन्वये हा अधिनियम, जम्मू व काश्मीर संघ राज्यक्षेत्रास आणि लडाख संघ राज्यक्षेत्रास लागू केला आहे.
भारताचे राजपत्र, असाधारण ४३ अनुभाग १] SECTION 1] GAZETTE OF INDIA, EXTRAORDINARYएकात्मिक वस्तू व सेवा कर (जम्मू व काश्मीरवर विस्तार) अधिनियम, २०१७
(२०१७ चा अधिनियम क्रमांक २७)
[५ ऑक्टोबर, २०२१ रोजी यथाविद्यमान]
[२३ ऑगस्ट, २०१७] एकात्मिक वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ याचा जम्मू व काश्मीर राज्यावर{{^{{FOOTNOTE *}}}} विस्तार करण्याकरिता तरतूद करण्यासाठी अधिनियम.
भारतीय गणराज्याच्या अडुसष्टाव्या वर्षी, संसदेद्वारे पुढीलप्रमाणे अधिनियमित होवो :-----
१. (१) या अधिनियमास, एकात्मिक वस्तू व सेवा कर (जम्मू व काश्मीरवर विस्तार) अधिनियम, संक्षिप्त नाव व प्रारंभ.
२०१७ असे म्हणावे.
(२) तो, ८ जुलै, २०१७ रोजी अंमलात आला असल्याचे मानण्यात येईल.
२०१७ चा १३.
२. (१) एकात्मिक वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७, (यात यापुढे ज्याचा निर्देश, ""मुख्य अधिनियम"" असा केला आहे) आणि केंद्र सरकारने, त्याखाली केलेले सर्व नियम, काढलेल्या अधिसूचना, केलेल्या योजना व काढलेले आदेश यांचा याद्वारे, जम्मू व काश्मीर राज्यावर{{^{{FOOTNOTE *}}}} विस्तार करण्यात येत आहे, आणि ते, त्यामध्ये अंमलात येतील.
एकात्मिक वस्तू व
सेवा कर
अधिनियम,
२०१७ याचा
विस्तार व
सुधारणा.
(२) या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून मुख्य अधिनियमातील, कलम १ च्या पोट-कलम (२) मधील, ""जम्मू व काश्मीर राज्याखेरीज{{^{{FOOTNOTE *}}}} "" हा मजकूर वगळण्यात येईल ;
३. (१) एकात्मिक वस्तू व सेवा कर (जम्मू व काश्मीरवर विस्तार) अध्यादेश, २०१७ याद्वारे निरसित निरसन व व्यावृत्ती.
२०१७ चा अध्यादेश ४. करण्यात येत आहे.
(२) असे निरसन झाले असले तरी, उक्त्त अध्यादेशान्वये केलेली कोणतीही गोष्ट किंवा हाती घेतलेली कोणतीही कार्यवाही, या अधिनियमाच्या तत्सम तरतुदींन्वये करण्यात आली असल्याचे किंवा हाती घेण्यात आली असल्याचे मानण्यात येईल.
रीटा वशिष्ट, सचिव, भारत सरकार.
* अधिसूचना क्रमांक स्थायी आदेश ३९१२(ई), दिनांक ३० ऑक्टोबर, २०१९ अन्वये हा अधिनियम, जम्मू व काश्मीर संघ राज्यक्षेत्रास आणि लडाख संघ राज्यक्षेत्रास लागू केला आहे.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.