RNI No. MAHBIL /2009/40124
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग पाच
वर्ष ८, अंक १०] गुरुवार, ऑगस्ट २५, २०२२/भाद्रपद ३, शके १९४४ [पृष्ठे ७, किंमत : रुपये २६.००
असाधारण क्रमांक २५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधानपरिषदेत सादर केलेली विधेयके.
---------------------------------
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय
महाराष्ट्र विधानसभेत दिनांक २५ ऑगस्ट, २०२२ रोजी पुर:स्थापित करण्यात आलेले खालील विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियम ११६ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे :-----
L. A. BILL No. XXVI OF 2022.
A BILL
FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA LEGISLATIVE COUNCIL (CHAIRMAN AND DEPUTY CHAIRMAN) AND MAHARASHTRA LEGISLATIVE ASSEMBLY (SPEAKER AND DEPUTY SPEAKER) SALARIES AND ALLOWANCES ACT, THE MAHARASHTRA MINISTERS' SALARIES AND ALLOWANCES ACT, THE MAHARASHTRA LEGISLATURE MEMBERS' SALARIES AND ALLOWANCES ACT AND THE LEADERS OF OPPOSITION IN MAHARASHTRA LEGISLATURE SALARIES AND ALLOWANCES
ACT, 1978.
सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक २६.
महाराष्ट्र विधानपरिषद (सभापती व उप सभापती) आणि महाराष्ट्र विधानसभा (अध्यक्ष व
उपाध्यक्ष) यांचे वेतन व भत्ते यांबाबत अधिनियम, महाराष्ट्र मंयांचे वेतन व भत्ते यांबाबत
अधिनियम, महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्यांचे वेतन व भत्ते यांबाबत अधिनियम आणि
महाराष्ट्र विधानमंडळातील विरोधी पक्ष नेत्यांचे वेतन व भत्ते अधिनियम, १९७८ यांमध्ये
आणखी सुधारणा करण्यासाठी विधेयक.
(१)
भाग पाच-२५----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, ऑगस्ट २५, २०२२/भाद्रपद ३, शके १९४४ ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी, महाराष्ट्र विधानपरिषद (सभापती व उप सभापती) आणि
१९५६ चा ४७.
महाराष्ट्र विधानसभा (अध्यक्ष व उपाध्यक्ष) यांचे वेतन व भत्ते यांबाबत अधिनियम, महाराष्ट्र मंयांचे वेतन व
१९५६ चा ४८.
भत्ते यांबाबत अधिनियम, महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्यांचे वेतन व भत्ते यांबाबत अधिनियम आणि महाराष्ट्र विधानमंडळातील विरोधी पक्ष नेत्यांचे वेतन व भत्ते अधिनियम, १९७८ यांमध्ये आणखी सुधारणा करणे इष्ट
१९५६ चा ४९.
आहे; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या याहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :-----
१९७८ चा महा. ८.
प्रकरण-एक
प्रारंभिक
१. (१) या अधिनियमास, महाराष्ट्र विधानपरिषद (सभापती व उप सभापती) आणि महाराष्ट्र विधानसभा संक्षिप्त नाव व प्रारंभ.
(अध्यक्ष व उपाध्यक्ष) यांचे वेतन व भत्ते, महाराष्ट्र मंयांचे वेतन व भत्ते, महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्यांचे वेतन व भत्ते आणि महाराष्ट्र विधानमंडळातील विरोधी पक्ष नेत्यांचे वेतन व भत्ते (सुधारणा) अधिनियम, २०२२, असे म्हणावे.
(२) तो, १ एप्रिल २०२२ पासून अंमलात आला असल्याचे मानण्यात येईल.
प्रकरण-दोन
महाराष्ट्र विधानपरिषद (सभापती व उप सभापती) आणि महाराष्ट्र
विधानसभा (अध्यक्ष व उपाध्यक्ष) यांचे वेतन व भत्ते यांबाबत अधिनियम
याची सुधारणा.
१९५६ चा ४७.
सन १९५६ चा अधिनियम क्रमांक ४७ याच्या कलम १२ब ची सुधारणा.
२०
२. महाराष्ट्र विधानपरिषद (सभापती व उप सभापती) आणि महाराष्ट्र विधानसभा (अध्यक्ष व उपाध्यक्ष) यांचे वेतन व भत्ते यांबाबत अधिनियमाच्या कलम १२ब मध्ये, पोट-कलम (१) मधील, " राज्य शासनाकडून दरमहा रुपये २५,००० एवढे " या मजकुराऐवजी, " राज्य शासनाने, वेळोवेळी काढलेल्या आदेशाद्वारे विर्िनदिष्ट करण्यात येईल त्याप्रमाणे दरमहा " हा मजकूर दाखल करण्यात येईल.
प्रकरण-तीन
महाराष्ट्र मंयांचे वेतन व भत्ते यांबाबत अधिनियम याची सुधारणा.
१९५६ चा ४८.
३. महाराष्ट्र मंयांचे वेतन व भत्ते यांबाबत अधिनियमाच्या कलम १०क मध्ये, पोट-कलम (१) मधील, " राज्य शासनाकडून दरमहा रुपये २५,००० एवढे " या मजकुराऐवजी, " राज्य शासनाने, वेळोवेळी काढलेल्या आदेशाद्वारे विर्िनदिष्ट करण्यात येईल त्याप्रमाणे दरमहा " हा मजकूर दाखल करण्यात येईल.
सन १९५६ चा अधिनियम क्रमांक ४८ याच्या कलम १०क ची सुधारणा.
प्रकरण-चार
महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्यांचे वेतन व भत्ते यांबाबत
अधिनियम याची सुधारणा.
१९५६ चा ४९.
सन १९५६ चा अधिनियम क्रमांक ४९ याच्या कलम ६ ची सुधारणा.
४. महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्यांचे वेतन व भत्ते यांबाबत अधिनियमाच्या कलम ६ मध्ये, पोट-कलम (३) मधील, " राज्य शासनाकडून दरमहा रुपये २५,००० एवढे " या मजकुराऐवजी, " राज्य शासनाने, वेळोवेळी काढलेल्या आदेशाद्वारे विर्िनदिष्ट करण्यात येईल त्याप्रमाणे दरमहा " हा मजकूर दाखल करण्यात येईल.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, ऑगस्ट २५, २०२२/भाद्रपद ३, शके १९४४ ३प्रकरण-पाच
महाराष्ट्र विधानमंडळातील विरोधी पक्ष नेत्यांचे वेतन व भत्ते
अधिनियम, १९७८ याची सुधारणा.
१९७८ चा महा. ८.
५. महाराष्ट्र विधानमंडळातील विरोधी पक्ष नेत्यांचे वेतन व भत्ते अधिनियम, १९७८ याच्या कलम १०अ मध्ये, पोट-कलम (१) मधील, " राज्य शासनाकडून दरमहा रुपये २५,००० एवढे " या मजकुराऐवजी, " राज्य शासनाने, वेळोवेळी काढलेल्या आदेशाद्वारे विर्िनदिष्ट करण्यात येईल त्याप्रमाणे दरमहा " हा मजकूर दाखल करण्यात येईल.
सन १९७८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ८ याच्या कलम १०अ ची सुधारणा.
भाग पाच-२५----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, ऑगस्ट २५, २०२२/भाद्रपद ३, शके १९४४
उद्देश व कारणे यांचे निवेदन.
महाराष्ट्र विधानपरिषद (सभापती व उप सभापती) आणि महाराष्ट्र विधानसभा (अध्यक्ष व उपाध्यक्ष) यांचे वेतन व भत्ते यांबाबत अधिनियम (१९५६ चा ४७) याच्या कलम १२ब, महाराष्ट्र मंयांचे वेतन व भत्ते यांबाबत अधिनियम (१९५६ चा ४८) याच्या कलम १०क, महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्यांचे वेतन व भत्ते यांबाबत अधिनियम (१९५६ चा ४९) याच्या कलम ६ आणि महाराष्ट्र विधानमंडळातील विरोधी पक्ष नेत्यांचे वेतन व भत्ते अधिनियम, १९७८ (१९७८ चा महा. ८) याच्या कलम १०अ यांमध्ये, अनुक्रमे, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती व उप सभापती आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, प्रत्येक मंत्री व राज्यमंत्री, विधानमंडळाचे सदस्य आणि विधानमंडळातील विरोधी पक्ष नेते यांच्यासाठी स्वीय सहायकाच्या सुविधांची तरतूद केली आहे.
त्या स्वीय सहायकास, दरमहा रुपये २५,००० इतके नियत वेतन मिळेल अशी तरतूद उक्त अधिनियमांमध्ये केलेली आहे.
२. स्वीय सहायकाचे वेतन वाढविण्याची मागणी, विधानमंडळ सदस्यांकडून केली जात आहे. स्वीय सहायकाचे वेतन, दरमहा रुपये २५,००० वरून रुपये ३०,००० इतके वाढविणे शासनास इष्ट वाटते आणि त्या प्रयोजनार्थ, उक्त अधिनियमांमध्ये सुयोग्य सुधारणा करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे.
३. वरील उद्दिष्टे साध्य करणे हा या विधेयकाचा हेतू आहे.
मुंबई,
चंद्रकांत (दादा) पाटील,
दिनांक २४ ऑगस्ट, २०२२.
संसदीय कार्य मंत्री.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, ऑगस्ट २५, २०२२/भाद्रपद ३, शके १९४४ ५वैधानिक अधिकार सोपविण्यासंबंधीचे ज्ञापन
या विधेयकात, वैधानिक अधिकार सोपविण्यासंबंधीचे पुढील प्रस्ताव अंतभर्ूत आहेत :-----
खंड २.---- महाराष्ट्र विधानपरिषद (सभापती व उप सभापती) आणि महाराष्ट्र विधानसभा (अध्यक्ष व उपाध्यक्ष) यांचे वेतन व भत्ते यांबाबत अधिनियम याच्या कलम १२ब मध्ये सुधारणा करण्याचा हेतू असलेल्या या खंडान्वये, अध्यक्ष, सभापती, उपाध्यक्ष व उप सभापती यांच्या स्वीय सहायकाला मिळणारे नियत वेतन, आदेशाद्वारे विर्िनदिष्ट करण्याचा अधिकार, राज्य शासनाकडे घेण्यात आला आहे.
खंड ३.---- महाराष्ट्र मंयांचे वेतन व भत्ते यांबाबत अधिनियम याच्या कलम १०क मध्ये सुधारणा करण्याचा हेतू असलेल्या या खंडान्वये, मंत्री, राज्यमंत्री व उपमंत्री यांच्या स्वीय सहायकाला मिळणारे नियत वेतन, आदेशाद्वारे विर्िनदिष्ट करण्याचा अधिकार, राज्य शासनाकडे घेण्यात आला आहे.
खंड ४.---- महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्यांचे वेतन व भत्ते यांबाबत अधिनियम याच्या कलम ६ मध्ये सुधारणा करण्याचा हेतू असलेल्या या खंडान्वये, सदस्यांच्या स्वीय सहायकाला मिळणारे नियत वेतन, आदेशाद्वारे विर्िनदिष्ट करण्याचा अधिकार, राज्य शासनाकडे घेण्यात आला आहे.
खंड ५.---- महाराष्ट्र विधानमंडळाच्या विरोधीपक्ष नेत्याचे वेतन व भत्ते अधिनियम, १९७८ याच्या कलम १०अ मध्ये सुधारणा करण्याचा हेतू असलेल्या या खंडान्वये, विरोधीपक्ष नेत्याच्या स्वीय सहायकाला मिळणारेे नियत वेतन, आदेशाद्वारे विर्िनदिष्ट करण्याचा अधिकार, राज्य शासनाकडे घेण्यात आला आहे.
२. वैधानिक अधिकार सोपविण्यासंबंधीचे वर नमूद केलेले प्रस्ताव, सामान्य स्वरूपाचे आहेत.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, ऑगस्ट २५, २०२२/भाद्रपद ३, शके १९४४वित्तीय ज्ञापन
या विधेयकाच्या खंड २, ३, ४ व ५ यांमध्ये, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती व उप सभापती आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, प्रत्येक मंत्री व राज्यमंत्री, विधानमंडळाचे सदस्य आणि विधानमंडळातील विरोधी पक्ष नेते यांच्या स्वीय सहायकाचे वेतन, दरमहा रुपये २५,००० वरून रुपये ३०,००० इतके वाढविण्याची तरतूद केली आहे. सदर विधेयक, राज्य विधानमंडळाचा अधिनियम म्हणून अधिनियमित झाल्यावर, या प्रयोजनासाठी, राज्याच्या एकत्रित निधीमधून दरवर्षी, रुपये २,१९,६०,००० इतका अतिरिक्त आवर्ती खर्च करावा लागेल.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, ऑगस्ट २५, २०२२/भाद्रपद ३, शके १९४४ ७भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २०७ अन्वये राज्यपालांची शिफारस
(महाराष्ट्र शासन, विधि व न्याय विभाग, आदेशाची प्रत)
भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २०७ याच्या खंड (३) अन्वये महाराष्ट्राच्या राज्यपालांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून, ते महाराष्ट्र विधानपरिषद (सभापती व उप सभापती) आणि महाराष्ट्र विधानसभा (अध्यक्ष व उपाध्यक्ष) यांचे वेतन व भत्ते, महाराष्ट्र मंयांचे वेतन व भत्ते, महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्यांचे वेतन व भत्ते आणि महाराष्ट्र विधानमंडळातील विरोधी पक्ष नेत्यांचे वेतन व भत्ते (सुधारणा) विधेयक, २०२२ विचारात घेण्याबाबत राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांना शिफारस करीत आहेत.
विधान भवन : मुंबई, दिनांक २५ ऑगस्ट, २०२२.
राजेन्द्र भागवत, प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानसभा.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.