महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ८, अंक ३४] गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २५-३१, २०२२/भाद्र ३-९, शके १९४४ [पृष्ठे ८ किंमत रुपये : १४.००
प्राधिकृत प्रकाशन
शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी
पोलीस आयुक्तालय, मिरा-भाइर्ंदर, वसई-विरार यांजकडून
मनाई आदेश
क्रमांक वि.शा/टे-१३/मनाई आदेश/२०२२- ५२८९.---- ज्याअर्थी, मिरा-भाइर्ंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेराव, धरणे, सभा, अतिक्रमण हटवणे तसेच दिनांक ३१ जुलै २०२२ रोजी मोहरम मासारंभ, दिनांक २ ऑगस्ट २०२२ नागपंचमी, दिनांक ९ ऑगस्ट २०२२ मोहरम, दिनांक ११ ऑगस्ट २०२२ नारळी पर्ौणिमा व रक्षाबंधन या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते ;
ज्याअर्थी, मी, विजयकांत सागर, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), पोलीस आयुक्तालयाकडील क्रमाकं/पो.आ.वा./अधि.प्रदान/आदेश/ ३०/२०२०, दिनांक ९ नोव्हेंबर २०२० अन्वये, मा. पोलीस आयुक्त यांचे महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ कलम ३७ चे पोट-कलम (१) व (३) चे वापरावयाचे अधिकार आम्हास प्रदान करण्यात आले आहेत.
मिरा-भाइर्ंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील मिरारोड, काशिमिरा, नवघर, नयानगर, भाइर्ंदर, उत्तन, वसई, माणिकपुर, अचोळे, वालीव, पेल्हार, नालासोपारा, तुळींज, विरार, अर्नाळा व मांडवी असे एकुण १६ पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, समाजकंटक व गुंड प्रवृत्तीचे इसम यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करणे सोईचे व्हावे.
त्याअर्थी, वरील घटनांच्या अनुषंगाने सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मी, विजयकांत सागर, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), मिरा-भाइर्ंदर, वसई-विरार, महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (१) व (३) अन्वये जीवित व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था जोपासण्यासाठी खालीलप्रमाणे मनाई आदेश देत आहे :-----
१. शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, बंदुका, लाठया किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तु बाळगणे.
२. दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जमा करणे.
३. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे.
४. व्यक्तींच्या किंवा प्रेताकृतीच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे.
५. सार्वजनिक रितीने घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजवणे.
६. सभ्यता अगर निती याविरुद्ध असतील अशी किंवा राज्यातील शांतता धोक्यात आणतील किंवा ज्यामुळे राज्य शासन उलथून पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक प्रर्दशित करणे.
(१)
भाग एक (को.वि.पु.)-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २५-३१, २०२२/भाद्र ३-९ शके १९४४ ७. पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्यांना या आदेशान्वये मनाई करीत आहे.
वरील मनाई आदेश खालील व्यक्तींना लागु राहणार नाही.
" जो कोणी इसम सरकारी नोकर आहे किंवा ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्र घेणे भाग पडेल, किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिकायाने सुट दिलेली आहे. "
सदर आदेश खालील मिरवणुका व जमावास लागु राहणार नाहीत.
१. लग्न कार्यासाठी जमलेले लोक.
२. प्रेतयात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका.
३. सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेरी येथे जमलेले लोक .
४. सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला समुदाय.
५. पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकायांनी परवानगी दिलेल्या सभा/मिरवणुका.
६. सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडत असलेली ठिकाण.
सदर मनाई आदेश दिनांक २८ जुलै २०२२ रोजीचे ०२-०० वाजे पासुन ते दिनांक ११ ऑगस्ट २०२२ रोजीचे २४-०० वाजेपयर्ंत अंमलात राहील. वरील मनाई आदेशाचा भंग करणाया विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात येईल.
मि.-भा., व.-वि., दिनांक २७ जुलै २०२२.
विजयकांत सागर, पोलीस उप आयुक्त (मुख्या.), मिरा-भाइर्ंदर, वसई-विरार.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २५-३१, २०२२/भाद्र ३-९ शके १९४४ ३उप संचालक, भूमि अभिलेख, कोंकण प्रदेश, मुंबई यांजकडून
वाचा.---- (१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना १०९३/प्र.क्र.१९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४.
(२) जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी. आर-४३२०/स-४/९४, दिनांक २२ सप्टेंबर १९९४.
(३) जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक गावठाण/परिपत्रक/का.वि.६०७/प्र.क्र.०१/२०२२ पुणे, दिनांक १० जानेवारी २०२२.
(४) जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख, ठाणे यांचेकडील क्रमांक न.भू./परिरक्षण/मौजे आयरे/२०२२/२००६, ठाणे, दिनांक २८ जुलै २०२२.
अधिसूचना
क्रमांक ना.भू.२/गावठाण/अधिसूचना-आयरे/२०२२/३११९.---- महाराष्ट्र शासन, महसून व वन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक आस्थापना १०९३/प्र.क्र.१९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ अन्वये भूमि अभिलेख विभागाची तालुकास्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्याअनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर-४३२०/स-४/९४, दिनांक २२ सप्टेंबर १९९४ अन्वये कोंकण विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली आहे. तसेच पारंपारिक पद्धतीने नगर भूमापन झालेली गावे परिरक्षणासाठी घेण्याचे अधिसूचना मंजुरीचे अधिकार मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांनी त्यांचेकडील परिपत्रक क्रमांक गावठाण/परिपत्रक/का.वि.६०७/प्र.क्र.०१/२०२२, दिनांक १० जानेवारी २०२२ अन्वये उप संचालक, भूमि अभिलेख (प्रादेशिक प्रमुख) यांना दिलेले आहेत.
जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, ठाणे यांनी त्यांचेकडील प्रस्तावामध्ये उप अधीक्षक, भूमि अभिलेख, कल्याण यांचे अधिनस्त सजा आयरे मध्ये मौजे आयरे हे गाव नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्तावित केले आहे.
त्यानूसार सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे सजा आयरे मध्ये मौजे आयरे हे गाव नव्याने उप अधीक्षक, भूमि अभिलेख, कल्याण मध्ये समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन परिरक्षणास घेणेस एतद्वारे मंजुरी देणेत येत आहे. तसेच सनद फी रुपये ५,०८,१२८/- वसूल करावी. सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक २८ जुलै २०२२ पासून होणेची आहे.
मुंबई, दिनांक २८ जुलै २०२२.
जयंत निकम, उप संचालक, भूमि अभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई.
भाग एक (को.वि.पु.)-----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २५-३१, २०२२/भाद्र ३-९ शके १९४४
OFFICE OF THE COMMISSIONER OF POLICE, BRIHAN MUMBAI
Order
No. CP/XI (6)/A.P./701(08)/2022.—WHEREAS, based on the information received from various sources, it is apprehended that there is likelihood of breach of peace and disturbance of public tranquility and also there is grave danger to human lives and loss of properties. On that account, it is considered expedient to issue prohibitory order for restricting movement and unlawful assembly of five or more persons for prevention of breach of peace, disturbance to public tranquility and danger to human lives and loss of properties and to prevent any kind of riot or affray in the areas under the control of Commissioner of Police, Brihan Mumbai.
NOW, THEREFORE, I, Sanjay Latkar, Dy. Commissioner of Police (Operations), Brihan Mumbai in exercise of the powers conferred upon me by sub-section (3) of section 37 read with sub-section (2) of section 10 of the Maharashtra Police Act, 1951 (Mah. Act XXII of 1951), do hereby prohibit, for the period commencing from 00-01 hours on 28th July 2022 and ending at 24-00 hours on 11th August 2022 throughout the City of Brihan Mumbai,
(i) Any assembly of five or more persons,
(ii) Any procession of any persons and
(iii) Any use of loudspeakers, amplifying instruments, musical band and bursting of crackers in any procession by the assembly.
The prohibition contained in the order is exempted for :—
(a) Marriage ceremony and matrimonial functions etc.
(b) Funeral assemblies and procession on way to crematoriums/burial places.
(c) Statutory meeting of companies, clubs, co-operative societies, other societies and associations.
(d) Social gathering and meeting of clubs, co-operative societies, other societies and associations to transact their normal business.
(e) Assemblies in or around Cinema houses, theatres or any place of public amusement for the purpose of watching films, dramas or performances as the case may be.
(f) Assemblies in or around courts of law and offices of the Government and local bodies in discharge of Governmental or Semi-Governmental functions.
(g) Assemblies in or around schools, colleges and other educational institutions for academic activities.
(h) Assemblies in factories, shops, and establishments for normal trade, business and callings.
(i) Such other assemblies and the processions as may be permitted by Zonal Deputy Commissioners of Police, Brihan Mumbai and their supervisory officers.
Not withstanding the expiration of this order after the period here inabove mentioned.
(a) Any investigation or legal proceeding may be instituted, continued or enforced.
(b) Any penalty, forfeiture of punishments incurred in respect of any contravention of this Order may be imposed as if this order had not expired.
I further direct that this order will be published and promulgated in Brihan Mumbai by affixing copies thereof, in conspicuous part of public places, courts, Govt Offices and by proclaiming the same through loudspeakers or megaphones as well as publishing through media of whatever form available.
Given under my hand and seal on the 21st day of the July, 2022.
SANJAY LATKAR, Dy. Commissioner of Police (Operations) and Executive Magistrate, Greater Mumbai.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २५-३१, २०२२/भाद्र ३-९ शके १९४४ ५OFFICE OF THE COMMISSIONER OF POLICE, BRIHAN MUMBAI
Order
No. CP/XI (6)/L.W./702 (07)/2022.— WHEREAS, considering necessity for the preservation of public peace and public safety in Brihan Mumbai. I, Sanjay Latkar, Dy. Commissioner of Police (Operations), Brihan Mumbai in exercise of the powers conferred upon me under sub-section (1) and (2) of section 37 read with sub-section (6) of section 2 and sub-section (2) of section 10 of the Maharashtra Police Act (Mah. XXII of 1951) do hereby prohibit the following Act throughout Brihan Mumbai for the period from 00-01 hours of 2nd August 2022 to 24-00 hours on 31st August 2022,
1. (a) The Carrying of arms, cudgels, swords, spears, bludgeons, unlicensed guns, knives, sticks or lathis or any other article which is capable of being used for causing physical harm (violence), save for such firearms where license has been granted by this authority or where specific permission is sought for carriage of such arms from the competent authority, (b) The carrying of any corrosive substance or explosives,
(c) The carrying, collection and preparation of stones or other missiles or instruments or means of casting or impelling missiles,
(d) The exhibition of persons or corpses or figures or effigies thereof,
(e) The public utterance of cries, singing of songs, playing of music,
(f) Delivery of harangues, the use of gestures or mimetic representations, and the preparation, exhibition or dissemination of pictures, symbols, placards or any other object or thing which may in the opinion of any police officer posted in Brihan Mumbai City, offend against decency or morality or undermine the security of or tend to overthrow the state.
2. If any person goes armed with any such article or carries any corrosive substance or explosive or missile in contravention of such prohibition, he/she shall be liable to be disarmed or the corrosive substance or explosive or missile shall be liable to be seized from him/her by any police officer, and the article, corrosive substance, explosive or missile so seized shall be forfeited to the State Government.
3. This order will not be applicable to any person being in service or employment of any Government or Government Undertaking required by his superiors or by the nature of his duties, to carry weapons. The order will also not be applicable to Private Security Guards or Gurkhas or Chowkidars etc., employed on watch-n-ward duties-carrying lathis admeasuring in length not exceeding 3½ feet.
4. Notwithstanding the expiration of this order after the period hereinabove mentioned, (a) Any investigation or legal proceedings may be instituted, continued or enforced.
(b) Any penalty, forfeiture or punishments incurred in respect of any contravention of this order may be imposed, as if this order had not expired.
5. I, further direct that this order shall be published and promulgated in Brihan Mumbai by affixing copies thereof in conspicuous public places and by announcing the same through loudspeakers or megaphones, as well as publishing through media of whatever form available.
Given under my hand and Seal on this 28th day July, 2022 at Mumbai.
SANJAY LATKAR, Dy. Commissioner of Police (Operations), and Executive Magistrate,
Greater Mumbai.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २५-३१, २०२२/भाद्र ३-९ शके १९४४जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी (नागरी क्षेत्र कमाल धारणा) बृहन्मुंबई यांजकडून
वाचले.---- (१) या कार्यालयाचे कलम ८(४) चे आदेश क्र. सी/युएलसी/डे-XV-६(i)/SR-II/६६८/२६४२, दिनांक ०६.०२.१९९१.
(२) ना.ज.क.धा. अधिनियम, १९७६ चे कलम १०(३)खालील अधिसूचना, दिनांक २५.११.२००५. (३) ना.ज.क.धा. अधिनियम, १९७६ चे कलम १०(५) खालील नोटीस, दिनांक २७.०२.२००७. (४) या कार्यालयाचे पत्र क्र. सी/युएलसी/डे-XV/XI/६६८, दिनांक ०६.११.२०१३ रोजीचे पत्र. (५) या कार्यालयाचे पत्र क्र. सी/युएलसी/डे-१५/SR-XI-६६८/२०१६, दिनांक ११.०४.२०१६ रोजीचे पत्र. (६) शासन, नगर विकास विभाग पत्र क्र.नाजक-२०१३/३८४/प्र.क्र.१०१/नाजकधा-१ (नाजकधा), दिनांक ०४.०५.२०२२ रोजीचे पत्र.
आदेश
क्रमांक सी/युएलसी/कक्ष-५/६(१)/एसआर-XI-६६८/जा.क्र. ४२७/२०२२.---- जमीनधारक श्री. नामदेव गोया वैती यांनी मौजे-मालवणी, ता. बोरीवली येथील धारण केलेल्या मिळकतीकरिता दिनांक ११ ऑगस्ट १९७६ रोजी नाजकधा कलम ६(१) खालील दाखल केलेल्या विवरणपत्राची छाननी करून दिनांक ६ फेब्रुवारी १९९१ रोजी नाजकधा कलम ८(४) चे आदेश पारित केले आहेत. सदर आदेशान्वये एकूण ५४८३.२० चौ.मी. अतिरीक्त मोकळे क्षेत्र घोषित करण्यात आले. सदर अतिरिक्त क्षेत्राकरिता दिनांक २५ नोव्हेंबर २००५ रोजी नाजकधा कलम १० (३) ची अधिसूचना पारित करून सदर अधिसूचना दिनांक २२ डिसेंबर २००५ रोजीच्या महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात पृष्ठ क्र. ११९ वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तद्नंतर कलम १०(५) खालील नोटीस दिनांक २७ फेब्रुवारी २००७ अन्वये नगर भूमापन अधिकारी, गोरेगाव यांनी उक्त अतिरिक्त क्षेत्राचा दिनांक १३ मार्च २००७ रोजी ताबा घेतलेला आहे, व मिळकत पत्रिकेला " महाराष्ट्र शासनाचे " नाव दाखल केले आहे.
प्रकरणी, अर्जदार जयकुमार नायर यांनी शासनास सादर केलेल्या दिनांक ४ मार्च २०१३ रोजीच्या निवेदनानुसार अतिरिक्त घोषित क्षेत्रापैकी विषयांकित न.भू.क्र. १८३० मधील १२५७.४० चौ.मी. क्षेत्र मूळ जमीनधारकाकडून दिनांक ६ मे २००५ च्या नोंदणीकृत खरेदीद्वारे संपादन केल्याचे उपलब्ध कागदपत्रावरून दिसून येते. सदर १२५७.४० चौ.मी. क्षेत्र खरेदी करण्यापूर्वी मूळ जमीनधारकाने दिनांक ११ मार्च २००५ रोजी उक्त क्षेत्राच्या हस्तांतरणास परवानगी मिळणेबाबत या कार्यालयास रितसर अर्ज सादर केला होता. उपजिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी यांनी विषयांकित न.भू.क्र. " ना विकास क्षेत्रात " असल्याचे नमूद करून दिनांक ३० मार्च २००५ च्या पत्राने उक्त जागेच्या हस्तांतरणास परवानगीसुद्धा दिलेली आहे. त्या अनुषंगाने सदर जागेचे हस्तांतरणपत्र नोंदणी झाल्याने विषयांकित मिळकतीवरील कलम १०(३) व १०(५) अन्वये भूसंपादनाची कार्यवाही रद्द करणेबाबत अर्जदार जयकुमार नायर यांनी विनंती केली होती. त्यानंतर नागरी जमीन कमाल धारणा अधिनियम, १९७६ कलम १०(३) व १०(५) अन्वये सदर मिळकतीचा ताबा घेण्यास आला आहे. तथापि, नागरी जमीन कमाल धारणा अधिनियम, १९७६ कलम २(q)(१) नुसार सदर मिळकतीमध्ये बांधकाम अनुज्ञेय नाही. वरील सर्व बाबी लक्षात घेऊन शासन स्तरावरुन योग्य ते आदेश होणेस विनंती आहे. असा या कार्यालयाकडील सविस्तर अहवाल शासनास उपोद्घातातील क्र. ४ अन्वये सादर करण्यात आला होता. तद्नंतर शासन पत्र दिनांक २९ जानेवारी २०१६ सोबत न्याय व विधी विभाग यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांची टिप्पणीच्या अनुषंगाने या कार्यालयाकडून उपोद्घातातील क्र. ५ अन्वये शासनास सविस्तर अहवाल सादर करण्यात आला होता.
तद्नंतर प्रस्तुत प्रकरणी उपोद्घातातील क्र. ६ अन्वये " सदर क्षेत्र ना-विकास प्रभागात (No Development Zone: NDZ) मध्ये येत असल्याने, प्रस्तुत प्रकरणी विधी व न्याय विभागाचे अभिप्राय घेण्यात आले आहेत. सदर अभिप्रायनुसार विचारधीन क्षेत्राला नाजकधा अधिनियमाच्या तरतुदी लागू होत नसल्याने मौजे-मालवणी, ता. बोरीवली येथील न.भू.क्र. १८३०, क्षेत्र १२५७.९४ चौ.मी. क्षेत्रावरील नाजकधा कलम १०(३) व १०(५) ची कार्यवाही रद्द करण्यात यावी. " असे शासनाने निर्देश दिले आहेत.
सबब, शासन, नगरविकास विभागाकडील दिनांक ४ मे २०२२ रोजीच्या पत्रातील निर्देशानुसार मी, जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी, बृहन्मुंबई याद्वारे आदेशित करतो की, मौजे-मालवणी, ता. बोरीवली येथील न.भू.क्र. १८३०, क्षेत्र १२५७.४० चौ.मी. या क्षेत्राकरिता नाजकधा अधिनियम, १९७६ कलम १० (३) व १० (५) नुसार दाखल केलेली मिळकत पत्रिकेवरील " महाराष्ट्र शासन " ही नोंद कमी करण्यास मान्यता देण्यात येत आहे. त्याप्रमाणे अभिलेखात उचित नोंद घेण्याची कार्यवाही करण्यात यावी.
मुंबई, दिनांक १० ऑगस्ट २०२२.
डॉ. विकास नाईक, जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी (ना.क्षे.क.म.), बृहन्मुंबईकरिता.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २५-३१, २०२२/भाद्र ३-९ शके १९४४ ७जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी (ना.क्षे.क.म.) बृहन्मुंबई यांजकडून
अधिसूचना
क्रमांक युएलसी/कक्ष-५/६(१)/एसआर-XI-३६८/जा.क्र. ४२८/२०२२.---- ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक ६ ऑक्टोबर २००५ च्या कोकण विभागीय पुरवणीत पृष्ठ क्र. १६७ वर प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेत श्री. नामदेव गौया वैती, मौजे-मालवणी, ता. बोरीवली यांनी धारण केलेली खालील अनुसूचित दाखविलेली जमीन ही कमाल मर्यादेपेक्षा अधिक असल्यामुळे ती जमीन महाराष्ट्र शासनाद्वारे संपादीत केली जावयाची आहे, हे नागरी जमीन (कमाल धारणा व विनियमन) अधिनियम, १९७६ च्या कलम १० पोट-कलम (१) अन्वये अधिसूचित करण्यात आले होते. त्यानंतर ती जमीन सर्व भारांपासून मुक्त अशी महाराष्ट्र शासनाकडे सर्वार्थाने निहीत होईल असे महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक २२ डिसेंबर २००५ च्या कोकण विभागीय पुरवणीत पृष्ठ क्रमांक ११९ वर प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेत उक्त अधिनियमाच्या कलम १० पोट-कलम (३) प्रमाणे अधिसूचित करण्यात आले आहे ;
ज्याअर्थी, नाजकधा अधिनियमांतर्गत कलम १० पोट-कलम (१), (३) व (५) अन्वये भूसंपादनाची कार्यवाही करण्यात आली आहे. कलम १० पोट-कलम (३) व पोट-कलम (५) च्या कार्यवाहीच्या अनुषंगाने विवरणपत्रधारक श्री. नामदेव गोया वैती यांनी धारण केलेल्या खालील अनुसूचित नमूद जमिनीच्या अधिकार अभिलेखातील भोगवटादार सदरी तसेच इतर हक्कात महाराष्ट्र शासन अशी नोंद घेण्यात आली आहे ;
आणि ज्याअर्थी, शासन, नगरविकास विभागाकडील दिनांक ४ मे २०२२ च्या पत्रान्वये " सदर क्षेत्र ना-विकास प्रभागात (No Development Zone: NDZ) मध्ये येत असल्याने, प्रस्तुत प्रकरणी विधी व न्याय विभागाचे अभिप्राय घेण्यात आले आहेत. सदर अभिप्रायानुसार विचारधीन क्षेत्राला नाजकधा अधिनियमाच्या तरतुदी लागू होत नसल्याने मौजे-मालवणी, ता. बोरीवली येथील न.भू.क्र. १८३०, क्षेत्र १२५७.९४ चौ.मी. क्षेत्रावरील नाजकधा कलम १०(३) व १०(५) ची कार्यवाही रद्द करण्यात यावी. " असे शासनाने निर्देश दिले आहेत.
त्याअर्थी, मौजे मालवणी, ता. बोरीवली येथील न.भू.क्र. १८३०, क्षेत्र १२५७.४० चौ.मी. या क्षेत्राकरिता नाजकधा कलम १० (३) व १० (५) नुसार दाखल केलेली मिळकत पत्रिकेवरील धारक सदरी " महाराष्ट्र शासन " ही नोंद कमी करण्यास मान्यता देण्यात येत आहे. उपरोल्लिखीत महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक २२ डिसेंबर २००५ च्या कोकण विभागीय पुरवणीत पृष्ठ क्रमांक ११९ वर प्रसिद्ध झालेली ना.ज.क.धा. कलम १०(३) ची अधिसूचना रद्द करण्यात येत आहे.
अनुसूची
अ.क्र. जिल्हा गाव तालुका न.भू.क्र. क्षेत्र (चौ.मी.) (१) (२) (३) (४) (५) (६)
१ मुंबई उपनगर मालवणी बोरीवली १८३० १२५७.४
एकूण १२५७.४
मुंबई, दिनांक १० ऑगस्ट २०२२.
डॉ. विकास नाईक, जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी (ना.क्षे.क.म.), बृहन्मुंबईकरिता.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २५-३१, २०२२/भाद्र ३-९ शके १९४४प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक रा.अ./३४५५/२०२२.----- श्री. के. जी. पालदेवार, जिल्हा न्यायाधीश-२, पनवेल, रायगड यांची दिनांक ३ जुलै २०२२ व दिनांक ४ जुलै २०२२ अशी एकूण २ दिवसांची र्अजित रजा, मागील दिनांक ३० जून २०२२ ते दिनांक २ जुलै २०२२ रोजीचे र्अजित रजेस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्री. के. जी. पालदेवार, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची जिल्हा न्यायाधीश-२, पनवेल, रायगड म्हणून पुर्ननियुक्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. के. जी. पालदेवार, हे अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर जिल्हा न्यायाधीश-२, पनवेल, रायगड या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
श्री. के. जी. पालदेवार, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.
उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता.
रायगड-अलिबाग, दिनांक ११ जुलै २०२२.
श्रीमती एस. एस. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक रा.अ./३४५६/२०२०.----- श्री. एस. एस. महाले, दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, रोहा यांची दिनांक ५ जुलै २०२२ ते दिनांक ७ जुलै २०२२ अशी एकूण ३ दिवसांची वैद्यकीय रजा मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्री. एस. एस. महाले, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, रोहा म्हणून पुर्ननियुक्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. एस. एस. महाले, हे अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, रोहा या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
श्री. एस. एस. महाले, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.
उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार श्रीमती एम. डब्ल्यू. जाधव, दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, पाली यांजकडे राहील.
रायगड-अलिबाग, दिनांक ८ जुलै २०२२.
श्रीमती एस. एस. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.