महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ८, अंक ७६] शुक्रवार, ऑगस्ट २६, २०२२/भाद्रपद ४, शके १९४४ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक १६५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
अल्पसंख्याक विकास विभाग
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक २६ ऑगस्ट, २०२२.
अधिसूचना
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग अधिनियम, २००४.
क्रमांक अविवि-२०१७/प्र.क्र.१३३/का-९.------ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग अधिनियम, २००४ (महाराष्ट्र २००५ चा ३१) (यानंतर याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात येईल) च्या कलम ३ च्या पोट-कलम (२) आणि कलम ४ च्या पोट- कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून श्री. जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर यांची महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या उपाध्यक्ष पदावर शासन अधिसूचना अल्पसंख्याक विकास विभाग क्र. अविवि-२०१७/ प्र.क्र.१३३/ का-९, दिनांक ४ सप्टेंबर, २०१८ अन्वये नियुक्ती केली होती ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमातील कलम ४ च्या पोट-कलम (१) मध्ये विहित केल्याप्रमाणे शासनाच्या मर्जीला अधीन राहून आयोगाचे उपाध्यक्ष हे त्यांनी अधिकार पद ग्रहण केल्याच्या दिनांकापासून ५ वषार्ंच्या मुदतीसाठी पद धारण करतील ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने आयोगाची पुनर्रचना करणे आवश्यक मानले आहे.
त्याअर्थी आता, उक्त अधिनियमाच्या कलम ४ पोट-कलम (१) व कलम ३ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे श्री. जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर यांची महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या उपाध्यक्ष पदावरील नियुक्ती ही अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याचा दिनांकापासून रद्द करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचा आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑगस्ट २६, २०२२/भाद्रपद ४, शके १९४४ MINORITIES DEVELOPMENT DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 26th August 2022.
NOTIFICATION
MAHARASHTRA STATE MINORITIES COMMISSION ACT, 2004.
No. MDD-2017/ CR-133/ Desk-9.—Whereas, the Government of Maharashtra has, in exercise of the powers conferred by sub-section (2) of section 3 read with sub-section (1) of section 4 of the Maharashtra State Minorities Commission Act, 2004 (Mah. XXXI of 2005) (hereinafter referred as " the said Act ") appointed Shri. Jagnnath Motiram Abyankar, as Vice-Chairperson of the Maharashtra State Minorities Commission, vide Government Notification, Minorities Development Department, No. MDD-2017/C.R.-133/Desk-9, dated the 4th September, 2018 ;
And whereas, as per provisions of sub-section (1) of section 4 of the said Act, the term of the office of the said Vice-Chairperson of the Commission is subject to pleasure of the Government shall be five years from the date he assumes office ;
And whereas, Government has considered it necessary to re-organise the Commission ;
Now, therefore, in exercise of powers conferred by sub-section (1) of section 4 read with section 3 of the Maharashtra State Minorities Commission Act, 2004, the Government of Maharashtra hereby revoke the nomination of Shri Jagnnath Motiram Abhyankar as the Vice-Chairperson of the Maharashtra State Minorities Commission, from the date of publication of this notification in the Official Gazette.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
A. U. PATIL,
Deputy Secretary to Government.