महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार
वर्ष ८, अंक २४] शुक्रवार, ऑगस्ट २६, २०२२/भाद्रपद ४, शके १९४४ [पृष्ठे २, किंमत : रुपये २३.००
असाधारण क्रमांक ४७
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.
अनुक्रमणिका
पृष्ठे १-२ सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३८.--- महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम. ... ... ... ... ...
दिनांक २६ ऑगस्ट २०२२ रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.
सतिश वाघोले, प्रभारी सचिव (विधि विधान), महाराष्ट्र शासन, विधि व न्याय विभाग.
सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३८.
(माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर " महाराष्ट्र शासन राजपत्रात " दिनांक २६ ऑगस्ट २०२२ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम.
ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नव्हते ;
२०१७ चा महा. ६.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, ऑगस्ट २६, २०२२/भाद्रपद ४, शके १९४४ आणि ज्याअर्थी, उक्त अध्यादेशाचे राज्य विधानमंडळाच्या अधिनियमात रुपांतर करणे इष्ट आहे ; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या याहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :-----१. (१) या अधिनियमास, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (दुसरी सुधारणा) अधिनियम, २०२२, असे म्हणावे.
संक्षिप्त नाव व प्रारंभ. (२) तो, दिनांक ३ ऑगस्ट २०२२ रोजी अंमलात आला असल्याचे मानण्यात येईल.
२. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ (यात यापुढे ज्याचा निर्देश ""मुख्य अधिनियम"" असा २०१७ चा महा. ६.
केला आहे) याच्या कलम १०९ मध्ये,-----
(एक) पोट-कलम (३) मधील, खंड (छ) मधील, दुसया परंतुकामधील, तक्त्यातील खंड (घ), सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६ याच्या कलम १०९ ची सुधारणा.
(च) व (छ) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येतील :---
"(घ) विद्यापीठाच्या शिफारशीनंतर, लगत १७ ऑगस्ट २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी.
नंतरच्या वषार्ंच्या ३१ जानेवारी रोजी किंवा त्यापूर्वी.
(च) ज्या वर्षामध्ये अनुपालन अहवाल २४ ऑगस्ट २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी.
प्राप्त झाला असेल त्या वर्षाच्या १ मे रोजी किंवा त्यापूर्वी.
(छ) ज्या वर्षी असे नवीन महाविद्यालय १ सप्टेंबर २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी.";
किंवा परिसंस्था सुरू करण्याचे प्रस्तावित केले आहे त्या वर्षाच्या १५ जून रोजी किंवा त्यापूर्वी.
(दोन) पोट-कलम (४) मधील, दुसया परंतुकामधील, तक्त्यातील खंड (घ) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येईल:-----
"(घ) ज्या वर्षी राज्य शासनाने परवानगी १७ ऑगस्ट २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी."".
दिली असेल त्या वर्षाच्या १५ जून रोजी किंवा त्यापूर्वी.
३. (१) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) अध्यादेश, २०२२, हा, याद्वारे, निरसित करण्यात येत आहे.
२०२२ चा महा. अध्या. ६.
सन २०२२ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ६ याचे निरसन व व्यावृत्ती.
(२) अशा प्रकारे निरसन झाले असले तरी, उक्त अध्यादेशाद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या मुख्य अधिनियमाच्या संबंधित तरतुदींन्वये करण्यात आलेली कोणतीही कृती किंवा कोणतीही कार्यवाही (काढण्यात आलेली कोणतीही अधिसूचना किंवा दिलेला आदेश यांसह), ही, या अधिनियमान्वये सुधारणा करण्यात आलेल्या मुख्य अधिनियमाच्या संबंधित तरतुदींन्वये करण्यात आलेली कोणतीही कृती, कार्यवाही किंवा, यथास्थिती, काढण्यात आलेली अधिसूचना किंवा दिलेला आदेश असल्याचे मानण्यात येईल.