¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ
असाधारण
|ÉÉÊvÉEÞòiÉ |ÉEòɶÉxÉ
क्र. ३२] सोमवार, दिनांक ०३ ऑक्टोंबर २०२२ : आश्विन ११, शके १९४४ [किंमत ०.०० रु.] स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत भाग एक-अ औरंगाबाद विभाग
जिल्हाधिकारी औरंगाबाद यांजकडून
आदेश
जिल्हानिहाय आरक्षण महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणुक नियम १९६४ च्या नियम २ अ (१) (२) नुसार पुढील ०५ वर्षाच्या कालावधीसाठी निश्चीत करून दिलेले असुन त्याचे जिल्हानिहाय वाटप महाराष्ट्र शासन अधिसूचना असाधारण क्रमांक ७१ दिनांक ०५ मार्च २०२० रोजीच्या परिशिष्टानुसार जाहीर केलेले आहे.
विषय :- माहे एप्रिल २०२० ते मार्च २०२५ या कालावधीकरिता ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन होवून नव्याने स्थापित ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे तालुकानिहाय आरक्षण निश्चीत करुन देणेबाबत
त्यानुसार अनुसुची-२ मध्ये दर्शविल्याप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला (अ.जा., अ. जमाती आणि यातील महिलांसह) राज्यातील ग्रामपंचायतीमधील सरपंचाची पदे विर्िनदिष्ट करून दिलेले आहे.
त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यतील एकूण ८६५ ग्रामपंचायती करिता
खालीलप्रमाणे सरपंच पदे आरक्षण निश्चीत करून दिलेले आहे.
जा. क्र. २०२२/साप्र/ग्रापंनि/एप्रिल २०२० ते मार्च २०२५/नवनिर्मीत ग्रा. प./सरपंच आरक्षण / कावि.-८२६.- ज्या अर्थी महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई यांचे पत्र क्रमांक ग्रापंनि-२०२०/प्र.क्र. ०६/पं. रा. -२ दिनांक ०९ मार्च २०२० अन्वये राज्यातील ग्रामपंचायतीच्या सन २०२० ते २०२५ मध्ये होणाया सार्वत्रिक निवडणुका व या कालावधीत गठीत होणाया ग्रामपंचायती लक्षात घेता ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे राज्य स्तरावरील
अनुसुची - २
| अधिसूचने मधील अ.क्र. | जिल्हा | बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीची संख्या | अनुसूचित जातीसाठी आरक्षित सरपंच पदे | अधिसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंच पदे | ना. मा. प्र. करिता आरक्षित सरपंच पदे | खुला प्रवर्ग |
| १६ | औरंगाबाद | ८६५ | महिला | महिला | महिला | महिला |
| ५४ १०७ | ४७ २४ | २३४ ११७ | ४७६ २३८ |
ज्या अर्थी संदर्भ क्र. २ ते ७ अन्वये औरंगाबाद जिल्ह्यतील खालील नमूद
४. मुळ ग्रुप ग्रामपंचायत आळंद-नायगव्हाण ता. फुलंब्री मधून ०६ ग्रुप ग्रामपंचायतीमधून ०६ स्वतंत्र ग्रामपंचायती निर्माण झालेल्या आहेत-
नायगव्हाण ही स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण झाली आहे.
१. मूळ ग्रुप ग्रामपंचायत करोडी-सहजापूर ता. औरंगाबाद मधून
५. मुळ ग्रुप ग्रामपंचायत नानेगाव-जंजाळा ता. सिल्लोड मधून जंजाळा सहजापूर ही स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण झाली आहे.
ही स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण झाली आहे.
२. मुळ ग्रुप ग्रामपंचायत खेर्डा-नानेगांव ता. पैठण मधून नानेगांव ही स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण झाली आहे.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र, सोमवार, दिनांक ०३ ऑक्टोंबर २०२२ : आश्विन ११, शके १९४४ भाग - १ अ - असाधारणवरीलप्रमाणे अधिसूचनेमध्ये माहे एप्रिल २०२० ते मार्च २०२५ या कालावधीकरिता औरंगाबाद जिल्ह्यतील ८६५ ग्रामपंचायतीमधील सरपंच पदांचे आरक्षण तालुकानिहाय आरक्षण संदर्भ क्र.१ अन्वये यापुर्वीच वाटप करण्यात आलेले आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यतील औरंगाबाद, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, कन्नड व खुलताबाद या ०५ तालुक्यातील नवर्िनमित ०६ ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण निच्छित करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग, मंत्रालय मुंबई यांचे पत्र क्रमांक ग्रापंनि-२०१५/प्र.क्र. ०९/पं. रा.-२ दिनांक २४ मार्च २०१५ (ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या महिला आरक्षणबाबत) अन्वये असे निर्देश दिलेले आहेत की, सरपंच पदाचे तालुकानिहाय आरक्षण निश्चीत करताना सरपंच पदाची संख्या विषम असल्यास महिलांसाठी जास्त पदे जाण्याची शक्यता आहे. निश्चीत करून दिलेल्या संख्येपेक्षा जास्त पदे महिलांसाठी आरक्षित होत असतील तर ती देणे क्रमप्राप्त आहे ही बाब विचारात घेवून महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ नुसार कार्यवाही करावी असे कळविण्यात आलेले आहे.
वरीलप्रमाणे अधिसूचनेमध्ये औरंगाबाद जिल्ह्यतील ८६५ ग्रामपंचायतीमधील सरपंच वाटप दिलेले आहे. सदर दिलेल्या आरक्षणानुसार व सूचनांनुसार औरंगाबाद जिल्ह्यतील ०५ तालुक्यांतील ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे आरक्षण निश्चीत करून देणे आवश्यक आहे.
करिता मी, सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी औरंगाबाद, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम मधील, मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ मधील नियम (३), (४) आणि महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, मंत्रालय मुंबई यांचे पत्र क्रमांक ग्रापंनि - २०२०/प्र. क्र. ६/ पंरा - २ दिनांक ९ मार्च २०२० नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये औरंगाबाद जिल्ह्यतील ०५ तालुक्यातील ग्रामपंचायतीकरिता सरपंच पदाचे तालुकानिहाय आरक्षण खालीलप्रमाणे वाटप करण्यात येत आहे.
अनुसुची - २
असुसूची - २ (सन २०२० ते २०२५ करिता नवनिर्मीत ग्रमपंचायतींचे आरक्षण)
| अधिसूचने मधील अ.क्र. | जिल्हा | बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीची संख्या | अनुसूचित जातीसाठी आरक्षित सरपंच पदे | अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंच पदे | ना. मा. प्र. करिता आरक्षित सरपंच पदे | खुला प्रवर्ग |
| १६ | औरंगाबाद | ८७० | महिला | महिला | महिला | महिला |
| ५४ १०८ | ४७ २४ | २३५ ११८ | ४८० २४० |
औरंगाबाद जिल्हयातील पूर्वीच्या ८६५ ग्रामपंचायतीच्या सरपंचाची विगतवारी आजच्या नवीन ग्रामपंचायती (एकूण ०६) ह्य एकूण ८७१ ग्रामपंचायती होतात. परंतु पानेवाडी ग्रामपंचायत ही फुलंब्री नगरपंचायत मध्ये समाविष्ट झाल्याने आजरोजी ग्रामपंचायत ची संख्या ८७० होते. त्यांच्या नविन विगतवारीनुसार तुलनात्मक तक्ता खालीलप्रमाणे होतो.
| अ. क्र. | आरक्षण प्रवर्ग | पूर्वीच्या ८६५ ग्रामपंचायतीची विगतवारी | आताच्या ग्रामपंचायतीची विगतवारी | फरक |
| १ | अनुसूचित जाती | १० | १०८ | १ |
| २ | अनुसूचित जमाती | ४७ | ४७ | ० |
| ३ | नागरिकांचा मागास प्रवर्ग | २३४ | २३५ | १ |
| ४ | सर्वसाधारण | ४७६ | ४८० | ४ |
अनु. जातीची एक जागा अनु.जातीच्या लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार तपासली असता सहजापूर ग्रामपंचायत ता. औरंगाबाद ची लोकसंख्या सर्वाधिक ६८२ असल्यामुळे सदर अनु.जातीची सरपंच पदाची जागा ही ग्रा.पं. सहजापूर यांना आरक्षित होईल.
ना. मा .प्र. प्रवर्गासाठी सर्मपित अयोगाच्या टक्केवारीनुसार पैठण तालुक्यातील टक्केवारी सर्वाधिक असल्याकारणाने सदर ना. मा. प्र. प्रवर्गाची जागा पैठण तालुक्यातील ग्रामपंचायतीला देण्यात येत आहे. तथापी पैठण मधील नानेंगाव व आगरनांदर या दोन्ही ग्रामपंचायती नवीन असून नानेगाव ही ग्रामपंचायत खेर्डा या ग्रुप ग्रामपंचायतीमधून व आगरनांदर ही ग्रामपंचायत आपेगाव या ग्रुप ग्रामपंचायतीमधून विभक्त झाली आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतीची सर्मपित अयोगाची अचूक ना.मा.प्र. ची आकडेवारी आजरोजी उपलब्ध नाही. त्यामुळे संबंधित ठिकाणी ना.मा.प्र. प्रवर्गाचे सरपंच पदाचे आरक्षण ठरविण्यासाठी मा. राज्य निवडणूक अयोगाच्या दिनांक २०/०९/२०२२ च्या निर्देशानुसार उपलब्ध अभिलेखांच्या अचूक अभ्यास करुन तहसिलदार पैठण यांचा प्राप्त अहवाल दिनांक २३/०९/२०२२ नूसार सर्मपित आयोगाच्या अहवालानूसार नानेगाव ग्रामपंचायतीची ना.मा.प्र. ची टक्केवारी १६.५४ टक्के व अगरनांदर ग्रामपंचायतीची ना.मा.प्र ची टक्केवारी ९.३० टक्के आहे. त्यामुळे सदर ना.मा.प्र. सरपंच पदाचे आरक्षण हे ग्रामपंचायत नानेगाव ता. पैठण यांना देण्यात येत आहे.
सर्व संबंधित तहसिलदार जि. औरंगाबाद यांनी ग्रामपंचायतीमध्ये आरक्षित पदाचे वाटप व त्यानुसार सरपंच पदाच्या निवणूका घेण्याबाबतची कार्यवाही करावी. सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन त्याबाबतचा पूर्तता अहवाल या कार्यालयास तात्काळ सादर करावा.
दिनाक : ३०/०९/२०२२२ (सुनिल चव्हाण, भाप्रसे)
जिल्हाधिकारी औरंगाबाद.
------------------