RNI No. MAHBIL 2012/47976
www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक - पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ११, अंक - ९ ]
शुक्रवार , ऑक्टोबर १४ , २०२२ / आश्विन २२ , शके १९४४
[ पृष्ठे४
असाधारण क्रमांक ९
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
जिल्हा पुणे,
भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९ चे पोट-कलम (१ ) अन्वये घोषणापत्र.
घोषणापत्र
क्रमांक भूसं/एसआर-०३/पीएलबी-१/कावि-७३८/२०२२.--ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी, पुणे यांनी भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम , २०१३ (२०१३ चा ३०) ( यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे) याच्या कलम ११ च्या पोट- कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना क्रमांक भूसंपादन/रेल्वे / एसआर-०३/२०२२ पुणे , दिनांक जून ३० ते जुलै ६ , २०२२ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची दोनमध्ये अधिक तपशीलवार विनिर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;
आणि ज्याअर्थी , जिल्हाधिकारी , पुणे यांनी कलम १५ च्या पोट- कलम ( २) अन्वये दिलेला अहवाल , कोणताही असल्यास , विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे , याबाबत त्यांची खात्री पटली आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम १ ९ चे पोट- कलम (१) च्या तरतुदीन्वये , या अधिसूचनेच्या अनुसूची दोनमध्ये नमूद उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी या अधिसूचनेच्या अनुसूची एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या उक्त जमिनीची आवश्यकता आहे , असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे ;
आणि ज्याअर्थी , अनुसूची तीनमध्ये वर्णन केलेप्रमाणे बाधित व्यक्ती विस्थापित होत नाहीत म्हणून बाधित पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची चारमध्ये वर्णन केलेला नाही ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी , उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी , दौंड-पुरंदर उपविभाग , पुरंदर पत्ता- बीएसएनएल ऑफिससमोर , सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यास पदनिर्देशित करीत आहेत .
(१)
एच-२३ ९ , भाग एक- असा. (पु.वि.पु. )- ९ २
महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक- असाधारण- पुणे विभागीय पुरवणी , १४ ऑक्टोबर २०२२ / आश्विन २२ , शके १९ ४४
अनुसूची - एक
जमिनीचे वर्णन
अंदाजित क्षेत्र अ. क्र. भूमापन किंवा
गट क्रमांक
१
२
३
हे. आर १
६२१
०.०२
२
०.०१
६२७
०.०२
३
९ २३
४
०.०४
९ २८
०.०१
५
१०६६
०,१०
एकूण
जिल्हा पुणे, तालुका पुरंदर , गाव पिंपरे खु.
चतुःसीमा
दक्षिण
उत्तर पश्चिम
पूर्व
४
६
७ ५
रेल्वेलाईन ६२२
६१७
६२४
कॅनॉल
रेल्वेलाईन ६२६
६२८
रेल्वेलाईन ९२३
९२४
९२६
रेल्वेलाईन
९२०
९१६
९ २३
१०६७
रेल्वेलाईन १०६९
१०७९
अनुसूची - दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव : पुणे-मिरज ब्रॉडगेज दुसरी रेल्वेलाईन बांधणी.
प्रकल्पाच्या कामाचे वर्णन विशेष सार्वजनिक वाहतुकीचा पायाभूत सुविधा प्रकल्प.
समाजाला होणारे लाभ : पुणे - मिरज या मार्गावरील सार्वजनिक वाहतूक सुरळीत व जलद गतीने होण्यास मदत होणार आहे .
अनुसूची-तीन
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन
अनुक्रमांक
जिल्हा पुणे, तालुका पुरंदर , गाव पिंपरे खु.
क्षेत्र
भूमापन क्रमांक किंवा गट नंबर
(हेक्टरमध्ये) उक्त सार्वजनिक प्रयोजनामुळे बाधित व्यक्ती विस्थापित होत नाहीत. सबब पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन निरंक असे.
अनुसूची-चार
(पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश)
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश निरंक असे .
टीप : उक्त जमिनीच्या आराखड्याचे उपविभागीय अधिकारी , दौंड- पुरंदर उपविभाग , पुरंदर पत्ता- बीएसएनएल ऑफिससमोर, सासवड, तालुका पुरंदर , जिल्हा पुणे येथे निरीक्षण करता येईल .
पुणे , १३ ऑक्टोबर २०२२.
डॉ. राजेश देशमुख,
(भा.प्र.से.),
जिल्हाधिकारी , पुणे .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- असाधारण- पुणे विभागीय पुरवणी, १४ ऑक्टोबर २०२२ / आश्विन २२ , शके १ ९४४ जिल्हा पुणे,
भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९ चे पोट-कलम (१ ) अन्वये घोषणापत्र.
घोषणापत्र
क्रमांक भूसं/एसआर -०४ /पीएलबी-१ /कावि -७३९/२०२२.-- ज्याअर्थी , समुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी , पुणे यांनी भूमी संपादन , पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम , २०१३ (२०१३ चा ३० ) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे) याच्या कलम ११ च्या पोट- कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून , अधिसूचना क्रमांक भूसंपादन/रेल्वे/ एसआर/०४/२०२२ , पुणे, दिनांक जून ३० ते जुलै ६ , २०२२ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनींची, अनुसूची दोनमध्ये अधिक तपशीलवार विनिर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;
आणि ज्याअर्थी , जिल्हाधिकारी , पुणे यांनी कलम १५ च्या पोट- कलम (२) अन्वये दिलेला अहवाल , कोणताही असल्यास , विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्यांची खात्री पटली आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम १ ९ चे पोट - कलम (१ ) च्या तरतुदीन्वये , या अधिसूचनेच्या अनुसूची दोनमध्ये नमूद उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी या अधिसूचनेच्या अनुसूची एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या उक्त जमिनींची आवश्यकता आहे , असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे ;
आणि ज्याअर्थी , अनुसूची तीनमध्ये वर्णन केलेप्रमाणे बाधित व्यक्ती विस्थापित होत नाहीत म्हणून बाधित पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची चारमध्ये वर्णन केलेला नाही ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी , उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी, दौड- पुरंदर उपविभाग, पुरंदर पत्ता- बीएसएनएल ऑफिससमोर , सासवड, तालुका पुरंदर , जिल्हा पुणे यांस पदनिर्देशित करीत आहेत .
अनुसूची - एक
जमिनीचे वर्णन
जिल्हा पुणे , तालुका पुरंदर, गाव वाल्हे
अ. क्र.
अंदाजित क्षेत्र
चतुःसीमा
भूमापन क्रमांक/ गट क्रमांक
दक्षिण
उत्तर
पश्चिम
पूर्व
१
६
४
७
३
२
५
हे. आर
१
रेल्वे
०.०१
५८८१
५८७६
५८७७
५८७८
शीव
रोड
रेल्वे
५८८१
२
०.०२३१
५८८०
०.०३.३१
एकूण
अनुसूची - दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव : पुणे-मिरज ब्रॉडगेज दुसरी रेल्वेलाईन बांधणी.
प्रकल्पाच्या कामाचे वर्णन विशेष सार्वजनिक वाहतुकीचा पायाभूत सुविधा प्रकल्प.
समाजाला होणारे लाभ : पुणे- मिरज या मार्गावरील सार्वजनिक वाहतूक सुरळीत व जलद गतीने होण्यास मदत होणार आहे.
अनुसूची-तीन
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन
जिल्हा पुणे, तालुका पुरंदर , गाव वाल्हे
अनुक्रमांक
भूमापन क्रमांक किंवा गट नंबर
क्षेत्र (हेक्टरमध्ये) उक्त सार्वजनिक प्रयोजनामुळे बाधित व्यक्ती विस्थापित होत नाहीत . सबब , पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन निरंक असे .
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- असाधारण पुणे विभागीय पुरवणी , १४ ऑक्टोबर २०२२ / आश्विन २२ , शके १९ ४४
अनुसूची-चार
(पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश)
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश निरंक असे.
टीप : उक्त जमिनींच्या आराखड्याचे उपविभागीय अधिकारी , दौड- पुरंदर उपविभाग , पुरंदर पत्ता- बीएसएनएल ऑफिससमोर , सासवड, तालुका पुरंदर , जिल्हा पुणे येथे निरीक्षण करता येईल.
डॉ. राजेश देशमुख,
(भा.प्र.से.),
जिल्हाधिकारी , पुणे.
पुणे , १३ ऑक्टोबर २०२२ .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .
EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .