Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) लवाद, नगररचना योजना, पुणे यांची सन 1966 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 37 च्या कलम 68 (2) अन्वये प्रारूप नगररचना योजना, फुरसुंगी क्रमांक 9 व उरूळी देवाची क्रमांक 6 बाबत अधिसूचना. (2) जिल्हाधिकारी, सांगली यांची भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 चे कलम 11 (1) अन्वये गाव कुंडलबाबत अधिसूचना. (3) जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सांगली यांची ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 अन्वये अधिसूचना. (4) जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, कोल्हापूर व सोलापूर यांजकडील सजा पुनर्रचनेबाबत अधिसूचना. (5) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, खराडी, पुणेबाबत अधिसूचना. (6) मुख्याधिकारी, मोहोळ नगरपरिषद, मोहोळ व माढा नगरपंचायत, माढा यांची महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 चे कलम 26 (1) अन्वये शहराची प्रारूप विकास योजना प्रसिद्धीबाबत अधिसूचना. (7) उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे यांची मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्यांचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम, 1947 अन्वये अधिसूचना. (8) पोलीस उप-आयुक्त, विशेष शाखा, पुणे शहर यांचा महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1), (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश. (9) उपविभागीय दंडाधिकारी, वाई उपविभाग, वाई, पंढरपूर विभाग, पंढरपूर, पुणे उपविभाग, पुणे, विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, खडकी विभाग, सिंहगड रोड विभाग, पुणे यांची मयत समरी. (10) उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (1), (3), (4), (5) व (6), पुणे यांची महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, 1960 चे कलम 12 (1) व त्याखालील नियम 10 (1) अन्वये आदेश प्रसिद्धीबाबत अधिसूचना.
Published 10 November 2022
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.