Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग चार,असाधारण राजपत्र क्र. ६०, दिनांकित २२ नोव्हेंबर २०२२, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, सन २०२२ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ११.

Published 22 November 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-11-22.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, नोव्हेंबर २२, २०२२/अग्रहायण १, शके १९४४ १

RNI No. MAHBIL /2009/35530

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष ८, अंक २९] मंगळवार, नोव्हेंबर २२, २०२२/अग्रहायण १, शके १९४४ [पृष्ठे ३, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक ६०

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

सन २०२२ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ११.--- महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ पृष्ठे १-३ यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश. . .

. .

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २२ नोव्हेंबर २०२२.

MAHARASHTRA ORDINANCE No. XI OF 2022.

AN ORDINANCE

FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA AGRICULTURAL

PRODUCE MARKETING (DEVELOPMENT AND REGULATION)

ACT, 1963.

सन २०२२ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ११.

महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ यामध्ये

आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश.

ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही ;

१९६४ चा महा. २०.

आणि ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे ;

भाग चार ६०---१

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग नोव्हेंबर २२, २०२२/अग्रहायण १, शके १९४४ त्याअर्थी, आता, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ च्या खंड (१) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे, पुढील अध्यादेश प्रख्यापित करीत आहेत :—

१. (१) या अध्यादेशास, महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा) अध्यादेश, संक्षिप्त नाव व प्रारंभ. २०२२, असे म्हणावे.

(२) तो, तात्काळ अंमलात येईल.

१९६४ चा महा. २०.

२. महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ याच्या कलम १३ मध्ये, पोट-कलम (१) मधील, खंड (अ) मध्ये, ""ज्यांची संबंधित मतदारसंघाच्या मतदार यादीत नावे असतील असे आणि"" हा मजकूर वगळण्यात येईल.

सन १९६४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २० याच्या कलम १३ ची सुधारणा.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, नोव्हेंबर २२, २०२२/अग्रहायण १, शके १९४४ ३

निवेदन

महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ (१९६४ चा महा. २०) याच्या कलम १३ मध्ये शेतकरी, व्यापारी, अडते, हमाल व तोलारी यांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली कृषि उत्पन्न बाजार समिती घटित करण्याची तरतूद आहे.

२. ज्यांची नावे संबंधित मतदारसंघाच्या मतदार यादीत आहेत आणि जे कलम १३ च्या पोट-कलम (१) च्या खंड (अ) मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या इतर निकषांची पूर्तता करतात अशा बाजार क्षेत्रात राहणाया शेतकयांमधून निवडून आलेल्या शेतकयांचा सध्या कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये समावेश होतो. कोणत्याही शेतकयाला,---मग त्याचे नाव मतदार यादीत आहे किंवा नाही हे विचारात न घेता,- कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढविण्याचा हक्क असावा अशी तरतूद करणे शासनाला इष्ट वाटते. म्हणून, त्यात विर्िनदिष्ट केलेल्या इतर निकषांची पूर्तता करणाया, बाजार क्षेत्रात राहणाया सर्व शेतकयांना, कृषि उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक लढविणे शक्य व्हावे यासाठी, उक्त अधिनियमाच्या कलम १३ च्या पोट-कलम (१) च्या खंड (अ) मध्ये यथोचित सुधारणा करण्याचे प्रस्तावित केले आहे.

३. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही आणि उपरोक्त प्रयोजनांसाठी, महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ यात आणखी सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तिवात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे, म्हणून, हा अध्यादेश प्रख्यापित करण्यात येत आहे.

मुंबई,

भगत सिंह कोश्यारी,

दिनांक २२ नोव्हेंबर २०२२.

महाराष्ट्राचे राज्यपाल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अनूप कुमार,

शासनाचे अपर मुख्य सचिव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 22 November 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-11-22.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-11-22.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-.