RNI No. MAHBIL /2009/35530
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार
वर्ष ८, अंक ३०(२)] गुरुवार, नोव्हेंबर २४, २०२२/अग्रहायण ३, शके १९४४ [पृष्ठे ८, किंमत : रुपये २३.००
असाधारण क्रमांक ६२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.
अनुक्रमणिका
पृष्ठे १-८ सन २०२२ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १३.-----यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अधिनियम, १९८९, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ) अधिनियम, १९९७ आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ या अधिनियमांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश. . .
उच्च व तंत्र शिक्षण विभाग
मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक २४ नोव्हेंबर २०२२.
MAHARASHTRA ORDINANCE No. XIII OF 2022.
AN ORDINANCE
FURTHER TO AMEND THE YASHWANTRAO CHAVAN
MAHARASHTRA OPEN UNIVERSITY ACT, 1989, THE
KAVI KULGURU KALIDAS SANSKRIT VISHVAVIDYALAYA
(UNIVERSITY) ACT, 1997 AND THE MAHARASHTRA
PUBLIC UNIVERSITIES ACT, 2016.
सन २०२२ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १३.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अधिनियम, १९८९, कवि कुलगुरू कालिदास
संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ) अधिनियम, १९९७ आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ
अधिनियम, २०१६ या अधिनियमांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश.
भाग चार ६२---१
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, नोव्हेंबर २४, २०२२/अग्रहायण ३, शके १९४४ ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही ;
आणि ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अधिनियम, १९८९, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ) अधिनियम, १९९७ आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ या अधिनियमांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची
१९८९ चा महा. २०. १९९७ चा महा. ३३. २०१७ चा महा. ६.
खात्री पटली आहे ;
त्याअर्थी, आता, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ च्या खंड (१) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे, पुढील अध्यादेश प्रख्यापित करीत आहेत :—
प्रकरण एक
प्रारंभिक.
संक्षिप्त नाव व प्रारंभ.
१. (१) या अध्यादेशास, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ) आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) अध्यादेश, २०२२, असे म्हणावे.
(२) तो, तात्काळ अंमलात येईल.
प्रकरण दोन
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अधिनियम, १९८९ याची सुधारणा.
२. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अधिनियम, १९८९ (यात यापुढे ज्याचा निर्देश, " मुक्त १९८९ चा महा. २०.
विद्यापीठ अधिनियम " असा केला आहे) याच्या कलम १० मध्ये,—
(१) पोट-कलम (१) मधील,-----
सन १९८९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २० याच्या कलम १० ची सुधारणा.
(क) खंड (क) मध्ये,----
(एक) " एक समिती " या मजकुराऐवजी, " एक शोध-नि-निवड समिती " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
(दोन) उप-खंड (एक) ऐवजी, पुढील उप-खंड दाखल करण्यात येईल :------
" (एक) कुलपतीने नामनिर्देशित केलेला सदस्य, जो उच्च शिक्षण क्षेत्रातील विख्यात व्यक्ती असेल आणि जो एकतर, शिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय ख्यातीची विख्यात विद्वान व्यक्ती किंवा पद्म पुरस्कारप्राप्त व्यक्ती असेल ;" ;
(तीन) उप-खंड (तीन) नंतर, पुढील उप-खंड समाविष्ट करण्यात येईल :------
" (चार) विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षाने नामनिर्देशित केलेला
सदस्य ;" ;
(ख) खंड (ग) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येईल :----
" (ग) समितीवर नामनिर्देशित केलेले सदस्य, अशा व्यक्ती असतील की ज्या, विद्यापीठाशी किंवा विद्यापीठाच्या कोणत्याही महाविद्यालयाशी किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त परिसंस्थेशी कोणत्याही रीतीने संबंधित असणार नाहीत ;" ;
(ग) खंड (घ) मधील, " तीन " हा मजकूर वगळण्यात येतील ;
(२) पोट-कलम (१घ) मधील,-----
(क) खंड (क) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येतील :----
" (क) उच्च स्तरीय क्षमता, सचोटी, नैतिकता व संस्थात्मक बांधिलकी असलेली व्यक्ती असेल ;
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, नोव्हेंबर २४, २०२२/अग्रहायण ३, शके १९४४ ३(क-१) कोणत्याही विद्यापीठात प्राध्यापक म्हणून किमान दहा वषार्ंचा अनुभव असलेला किंवा शैक्षणिक नेतृव सिद्ध केल्याच्या पुराव्यासह लौकिकप्राप्त संशोधन किंवा शैक्षणिक प्रशासकीय संघटनेतील दहा वषार्ंचा अनुभव असलेला विख्यात शिक्षणतज्ज्ञ असेल ;" ;
(ख) खंड (घ) मधील, " शैक्षणिक अर्हता " या मजकुराऐवजी, " अतिरिक्त शैक्षणिक अर्हता " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
(३) पोट-कलम (१फ) नंतर, पुढील पोट-कलम समाविष्ट करण्यात येईल :-----
" (१ग) जर कुलपतीने निवड केलेली व्यक्ती, कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारीत नसेल तर, कुलपतीस, नामिकेतील उर्वरित व्यक्तींमधून अन्य सुयोग्य व्यक्तीची निवड करता येईल किंवा त्यास, एकतर त्याच समितीकडून किंवा या प्रयोजनासाठी नवीन समिती घटित केल्यानंतर, अशा नवीन समितीकडून, नवीन नामिकेची मागणी करता येईल .".
३. मुक्त विद्यापीठ अधिनियमाच्या कलम १०अ ऐवजी, पुढील कलम दाखल करण्यात येईल :----
प्र-कुलगुरू.
सन १९८९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २० याच्या कलम १०अ याऐवजी नवीन कलम दाखल करणे.
" १०अ. प्र-कुलगुरू म्हणून एखाद्या व्यक्तीची व्यवस्थापन मंडळाकडे शिफारस करणे हा, कुलगुरूचा विशेषाधिकार असेल. व्यवस्थापन मंडळ, कुलगुरूच्या शिफारशीवरून, विद्यापीठासाठी प्र-कुलगुरूंची नियुक्ती करील. प्र-कुलगुरूची नियुक्ती, परिनियमांद्वारे विहित करण्यात येईल, अशा मुदतीसाठी व अशा वित्तलब्धीवर आणि सेवेच्या इतर शतर्ींवर करण्यात येईल आणि तो, विहित करण्यात येईल अशा अधिकारांचा वापर करील व अशी कामे पार पाडील.".
प्रकरण तीन
कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ) अधिनियम, १९९७ याची सुधारणा.
१९९७ चा
महा. ३३.
४. कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ) अधिनियम, १९९७ (यात यापुढे ज्याचा निर्देश, " संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ) अधिनियम " असा केला आहे) याच्या कलम १२ मध्ये,-----
(१) पोट-कलम (१) मधील,-----
सन १९९७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३३ याच्या कलम १२ ची सुधारणा.
(क) खंड (क) मध्ये,----
(एक) " एक समिती " या मजकुराऐवजी, " एक शोध-नि-निवड समिती " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
(दोन) उप-खंड (एक) ऐवजी, पुढील उप-खंड दाखल करण्यात येईल :-----
" (एक) कुलाधिपतीने नामनिर्देश केलेला सदस्य, जो उच्च शिक्षण क्षेत्रातील विख्यात व्यक्ती असेल आणि जो एकतर, शिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय ख्यातीची विख्यात विद्वान व्यक्ती किंवा पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्ती असेल ;";
(तीन) उप-खंड (तीन) नंतर, पुढील उप-खंड समाविष्ट करण्यात येईल :-----
" (चार) विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षाने नामनिर्देशित केलेला सदस्य ; " ;
(ख) खंड (ग) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येईल :----
" (ग) समितीवर नामनिर्देशित केलेले सदस्य, अशा व्यक्ती असतील की ज्या, विद्यापीठाशी किंवा विद्यापीठाच्या कोणत्याही महाविद्यालयाशी किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त परिसंस्थेशी कोणत्याही रीतीने संबंंधित असणार नाहीत; " ;
(ग) खंड (घ) मधील, " तीन " हा मजकूर वगळण्यात येईल ;
भाग चार ६२---१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, नोव्हेंबर २४, २०२२/अग्रहायण ३, शके १९४४ (२) पोट-कलम (३क) मधील,-----
(क) खंड (क) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येतील :-----
" (क) उच्च स्तरीय क्षमता, सचोटी, नैतिकता व संस्थात्मक बांधिलकी असलेली व्यक्ती असेल;
(क-१) कोणत्याही विद्यापीठात प्राध्यापक म्हणून किमान दहा वषार्ंचा अनुभव असलेला किंवा शैक्षणिक नेतृत्व सिद्ध केल्याच्या पुराव्यासह लौकिकप्राप्त संशोधन किंवा शैक्षणिक प्रशासकीय संघटनेतील दहा वषार्ंचा अनुभव असलेला विख्यात शिक्षणतज्ज्ञ असेल ;";
(ख) खंड (घ) मधील, " शैक्षणिक अर्हता " या मजकुराऐवजी, " अतिरिक्त शैक्षणिक अर्हता " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
(३) पोट-कलम (४) मधील,-----
(क) विद्यमान परंतुकापूर्वी, पुढील परंतुक समाविष्ट करण्यात येईल :-----
" परंतु, जर कुलाधिपतीने निवड केलेली व्यक्ती, कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारीत नसेल तर, कुलाधिपतीस, नामिकेतील उर्वरित व्यक्तींमधून अन्य सुयोग्य व्यक्तीची निवड करता येईल किंवा त्यास, एकतर त्याच समितीकडून किंवा या प्रयोजनासाठी नवीन समिती घटित केल्यानंतर, अशा नवीन समितीकडून, नवीन नामिकेची मागणी करता येईल : " ;
(ख) विद्यमान परंतुकामधील, " परंतु " या मजकुराऐवजी, " परंतु आणखी असे की, " हा मजकूर दाखल करण्यात येईल.
५. संस्कृत विश्वविद्यालय विद्यापीठ अधिनियमाच्या कलम १३ मधील, पोट-कलम (१) ऐवजी, पुढील पोट-कलम दाखल करण्यात येईल :-----
सन १९९७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३३ याच्या कलम १३ ची सुधारणा.
" (१) सम-कुलगुरू म्हणून एखाद्या व्यक्तीची व्यवस्थापन परिषदेकडे शिफारस करणे हा, कुलगुरूचा विशेषाधिकार असेल. व्यवस्थापन परिषद, कुलगुरूच्या शिफारशीवरून, विद्यापीठासाठी सम-कुलगुरूची नियुक्ती करील.".
प्रकरण चार
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ याची सुधारणा.
६. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ (यात यापुढे ज्याचा निर्देश, " सार्वजनिक विद्यापीठ २०१७ चा महा. ६.
अधिनियम " असा केला आहे) याच्या कलम ११ मध्ये,-----
(१) पोट- कलम (३) मधील,-----
सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६ याच्या कलम ११ ची सुधारणा.
(क) खंड (क) मध्ये,----
(एक) " एक समिती " या मजकुराऐवजी, " एक शोध-नि-निवड समिती " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
(दोन) उप-खंड (एक) ऐवजी, पुढील उप-खंड दाखल करण्यात येईल :----
" (एक) कुलपतीने नामनिर्देशित केलेला सदस्य, जो उच्च शिक्षण क्षेत्रातील विख्यात व्यक्ती असेल आणि जो एकतर, शिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय ख्यातीची विख्यात विद्वान व्यक्ती किंवा पद्म पुरस्कारप्राप्त व्यक्ती असेल ;";
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, नोव्हेंबर २४, २०२२/अग्रहायण ३, शके १९४४ ५(तीन) उप-खंड (तीन) नंतर, पुढील उप-खंड समाविष्ट करण्यात येईल :----
" (चार) विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षाने नामनिर्देशित केलेला सदस्य; " ;
(ख) खंड (ग) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येईल :----
" (ग) समितीवर नामनिर्देशित केलेले सदस्य, अशा व्यक्ती असतील की ज्या, संबंधित विद्यापीठाशी किंवा त्या विद्यापीठाच्या कोणत्याही महाविद्यालयाशी किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त परिसंस्थेशी कोणत्याही रीतीने संबंधित असणार नाहीत ;";
(ग) खंड (घ) मधील, " तीन " हा मजकूर वगळण्यात येईल ;
(घ) खंड (च) मधील,-----
(एक) उप-खंड (एक) ऐवजी, पुढील उप-खंड दाखल करण्यात येतील :-----
" (एक) उच्च स्तरीय क्षमता, सचोटी, नैतिकता व संस्थात्मक बांंधिलकी असलेली व्यक्ती असेल ;
(एक-क) कोणत्याही विद्यापीठात प्राध्यापक म्हणून किमान दहा वषार्ंचा अनुभव असलेला किंवा शैक्षणिक नेतृत्व सिद्ध केल्याच्या पुराव्यासह लौकिकप्राप्त संशोधन किंवा शैक्षणिक प्रशासकीय संघटनेतील दहा वषार्ंचा अनुभव असलेला विख्यात शिक्षणतज्ज्ञ असेल. " ;
(दोन) उप-खंड (चार) मधील, " शैक्षणिक अर्हता " या मजकुराऐवजी, " अतिरिक्त शैक्षणिक अर्हता " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
(२) पोट-कलम (४) मधील,----
(क) विद्यमान परंतुकापूर्वी, पुढील परंतुक समाविष्ट करण्यात येईल :----
" परंतु, जर कुलपतीने निवड केलेली व्यक्ती, कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारीत नसेल तर, कुलपतीस, नामिकेतीने उर्वरित व्यक्तींमधून अन्य सुयोग्य व्यक्तीची निवड करता येईल किंवा त्यास, एकतर त्याच समितीकडून किंवा या प्रयोजनासाठी नवीन समिती घटित केल्यानंतर, अशा नवीन समितीकडून, नवीन नामिकेची मागणी करता येईल : " ;
(ख) विद्यमान परंतुकामधील, " परंतु, " या मजकुराऐवजी, " परंतु आणखी असे की, " हा मजकूर दाखल करण्यात येईल.
७. सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमाच्या कलम १३ मध्ये, पोट-कलम (६) ऐवजी, पुढील पोट-कलम दाखल करण्यात येईल :-----
सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६ याच्या कलम १३ ची सुधारणा.
" (६) प्र-कुलगुरू म्हणून एखाद्या व्यक्तीची व्यवस्थापन परिषदेकडे शिफारस करणे हा, कुलगुरूचा विशेषाधिकार असेल. व्यवस्थापन परिषद, कुलगुरुच्या शिफारशीवरून, विद्यापीठासाठी प्र-कुलगुरूची नियुक्ती करील.".
८. सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमाच्या कलम १०९ मध्ये,-----
(१) पोट-कलम (३) मधील, खंड (छ) नंतर, दुसया परंतुकाऐवजी, पुढील परंतुक दाखल करण्यात येईल :-----
सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६ याच्या कलम १०९ ची सुधारणा.
" परंतु आणखी असे की, २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षासाठी, उच्च शिक्षणाचे नवीन महाविद्यालय किंवा परिसंस्था सुरू करण्यासाठी इरादा पत्र मागवण्यासाठी अर्ज करण्याचे, अधिष्ठाता मंडळाकडून अर्जाची छाननी करण्याचे व राज्य शासनाकडे पाठविण्याचे आणि राज्य शासनाकडून इरादा पत्र देण्याचे दिनांक वाढविण्याच्या दृष्टीने, खाली दिलेल्या तक्त्याच्या स्तंभ (२) मध्ये विर्िनदिष्ट६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, नोव्हेंबर २४, २०२२/अग्रहायण ३, शके १९४४ केल्याप्रमाणे, पोट-कलम (३) च्या खंड (क), (ग) व (घ) मध्ये र्िनदिष्ट केलेले दिवस किंवा दिनांक हे, उक्त तक्त्याच्या स्तंभ (३) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे दिवस किंवा दिनांक म्हणून वाचण्यात येतील :----
तक्ता
खंड
दिवस किंवा दिनांक
(१)
विद्यमान तरतुदीमध्ये तरतूद केलेले २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी तरतूद केलेले दिवस किंवा दिनांक (३)
(२)
(क) ज्यावर्षी इरादा पत्र मागवले असेल त्या वर्षाच्या अगोदरच्या वर्षाच्या १५ जानेवारी २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी.
सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसापूर्वी.
(ग) ज्यावर्षी असा अर्ज विद्यापीठाला प्राप्त झाला असेल त्या वर्षाच्या २८ फेब्रुवारी २०२३ रोजी ३० नोव्हेंबर रोजी किंवा त्यापूर्वी.
किंवा त्यापूर्वी.
(घ) विद्यापीठाच्या शिफारशींनंतर लगतनंतरच्या वर्षाच्या ३१ जानेवारी १ एप्रिल २०२३ रोजी रोजी किंवा त्यापूर्वी.
किंवा त्यापूर्वी.".
(२) पोट-कलम (४) मधील, खंड (घ) नंतर, दुसया परंतुकाऐवजी, पुढील परंतुक दाखल करण्यात येईल :-----
" परंतु आणखी असे की, दिनांक २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षासाठी, नवीन अभ्यास पाठयक्रम, विषय, विद्याशाखा, अतिरिक्त तुकडया किंवा सॅटेलाईट केंद्र सुरू करण्यासाठी परवानगी मागण्याचा अर्ज करण्याचा दिनांक वाढविण्याच्या दृष्टीने, खाली दिलेल्या तक्त्याच्या स्तंभ (२) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे, पोट-कलम (४) च्या खंड (क) मध्ये र्िनदिष्ट केलेला दिवस किंवा दिनांक हा, उक्त तक्त्याच्या स्तंभ (३) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे दिवस किंवा दिनांक म्हणून वाचण्यात येईल :----
तक्ता
खंड
दिवस किंवा दिनांक
(१)
विद्यमान तरतुदीमध्ये तरतूद केलेला २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी तरतूद केलेला दिवस किंवा दिनांक (३)
(२)
(क) ज्यावर्षी परवानगी मागितली असेल त्या वर्षाच्या अगोदरच्या वर्षाच्या १५ जानेवारी २०२३
सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसापूर्वी.
रोजी किंवा त्यापूर्वी.".
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, नोव्हेंबर २४, २०२२/अग्रहायण ३, शके १९४४ ७निवेदन
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अधिनियम, १९८९ (१९८९ चा महा. २०) याची कलमे १० व १०अ, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ) अधिनियम, १९९७ (१९९७ चा महा. ३३) याची कलमे १२ व १३ आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ (२०१७ चा महा. ६) याची कलमे ११ व १३ यांमध्ये कुलगुरूची नियुक्ती करण्यासाठी पात्रता निकषांची व निवड समिती घटित करण्याची आणि प्र-कुलगुरूची नियुक्ती करण्याची तरतूद केली आहे.
२. कुलगुरूची नियुक्ती करण्यासाठी पात्रता निकषांच्या व निवड समिती घटित करण्याच्या आणि प्र-कुलगुरूची नियुक्ती करण्याच्या तरतुदींमध्ये, विद्यापीठ अनुदान आयोग अधिनियम, १९५६ (१९५६ चा ३) अन्वये तयार केलेल्या विद्यापीठ अनुदान आयोग (विद्यापीठांमधील व महाविद्यालयांमधील अध्यापकांच्या व इतर विद्याविषयक कर्मचारी वर्गाच्या नियुक्तीच्या किमान अर्हता आणि उच्च शिक्षणातील मानके राखण्याच्या इतर उपाययोजना) विनियम, २०१८ याद्वारे विद्यापीठ अनुदान आयोगाकडून त्यानंतर फेरबदल करण्यात आले आहेत.
३. सर्वोच्च न्यायालयाने, गंभीरदान के. गढवी- विरुद्ध- गुजरात राज्य व इतर (रिट याचिका (दिवाणी) क्रमांक. २०१९ चा १५२५) आणि प्राध्यापक डॉ. श्रीजीत पी. एस.-विरुद्ध- डॉ. राजश्री एम. एस. व इतर (दिवाणी अपील क्रमांक. २०२२ चा ७६३४-७६३५) या प्रकरणांमध्ये असा निर्णय दिलेला आहे की, कुलगुरूचे पात्रता निकष व नियुक्ती, नेहमीच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या संबंंधित विनियमांनुसार असेल आणि जर राज्य अधिनियम, विद्यापीठ अनुदान आयोग विनियमांशी अनुरूप नसतील तर, ते, लागू असलेल्या विद्यापीठ अनुदान आयोग विनियमांशी अनुरूप करण्यासाठी त्यात सुधारणा केली पाहिजे आणि त्यात सुधारणा करण्यात येईपयर्ंत, लागू असलेले विद्यापीठ अनुदान आयोग विनियम अधिभावी असतील.
४. राज्यातील विवक्षित विद्यापीठांचे कुलगुरू व प्र-कुलगुरू यांची मुदत आधीच संपलेली असून नवीन नियुक्त्या करावयाच्या आहेत.
५. वरील वस्तुस्थिती विचारात घेता, विद्यापीठांशी संबंंधित असणाया उक्त राज्य अधिनियमांमध्ये अंतभर्ूत असलेल्या कुलगुरू व प्र-कुलगुरू यांच्या नियुक्त्या करण्याशी संबंंधित असणाया विद्यमान तरतुदी, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विनियमांशी सुसंगत करण्यासाठी त्यामध्ये यथोचित सुधारणा करण्याची गरज आहे.
६. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ याच्या कलम १०९ मध्ये, उच्च शिक्षणाचे नवीन महाविद्यालय किंवा परिसंस्था, नवीन अभ्यास पाठयक्रम, विषय, विद्याशाखा, अतिरिक्त तुकडया किंवा सॅटेलाइट केंद्रे सुरू करण्यासाठी परवानगी देण्याच्या प्रक्रियेमधील विविध टप्प्यांसाठी विवक्षित कालमर्यादेची तरतूद केली आहे.
उच्च शिक्षणाचे नवीन महाविद्यालय किंवा परिसंस्था, नवीन अभ्यास पाठयक्रम, इत्यादी सुरू करण्यासाठी परवानगी देण्याच्या प्रक्रियेमधील विविध टप्प्यांसाठी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी, कालमर्यादा वाढवण्यात आली होती. त्यामुळे, २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून नवीन महाविद्यालय किंवा नवीन अभ्यास पाठयक्रम, इत्यादी सुरू करण्याची परवानगी देण्याची प्रक्रिया, त्याच्या विर्िनदिष्ट कालमर्यादेत पार पाडता येऊ शकली नाही.
म्हणून, २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी, त्याकरिता वाढीव कालमर्यादा विर्िनदिष्ट करणे इष्ट आहे असे वाटते.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, नोव्हेंबर २४, २०२२/अग्रहायण ३, शके १९४४७. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही आणि उपरोक्त प्रयोजनांसाठी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अधिनियम, १९८९, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ) अधिनियम, १९९७ व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ यांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे, म्हणून, हा अध्यादेश प्रख्यापित करण्यात येत आहे.
मुंबई, दिनांक २४ नोव्हेंबर २०२२.
भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
विकास चंद्र रस्तोगी, शासनाचे प्रधान सचिव.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.