महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ८, अंक १११] बुधवार, नोव्हेंबर ३०, २०२२/अग्रहायण ९, शके १९४४ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक २२६
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग १५ वा मजला, नवीन प्रशासन भवन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३० नोव्हेंबर, २०२२.
अधिसूचना
महाराष्ट्र अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियम, २००६.
क्रमांक प्लास्टिक-२०२२/प्र.क्र.१०४/तां.क.१.------महाराष्ट्र अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियम, २००६ (२००६ चा रोमन दहा) अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्मोकॉल अविघटनशील वस्तूंचे (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी आणि साठवणूक), अधिसूचना, दिनांक २३ मार्च, २०१८ मध्ये पुुढीलप्रमाणे सुधारणा करीत आहे :-----
सदर अधिसूचनेच्या परिच्छेद ३ मध्ये,-----
(अ) नियम १ च्या उप-नियम (१) मध्ये ""नॉन वोवन पॉलिप्रॉपिलीन बॅग्ज"" च्या ऐवजी ""नॉन ओव्हन पॉलीप्रॉपीलीन बॅग्स (Non- woven Polypropylene Bags) ६० ग्रॅम पर स्क्वेअर मीटर (जीएसएम) पेक्षा कमी जाडी"" असे वाचण्यात यावे.
(ब) नियम ३ च्या उप-नियम ३ च्या २ मध्ये पुढीलप्रमाणे बाबी समाविष्ट करण्यात याव्यात.
(२अ) " कंपोस्टेबल पदाथार्ंपासून बनविण्यात आलेले एकल वापर वस्तू, उदा. स्ट्रॉ, ताट, कप्स, प्लेटस, ग्लासेस, काटे, चमचे, भांडे, वाडगा, कन्टेनर इ. तथापि, कंपोस्टेबल पदाथार्ंपासून प्लास्टीक पासून बनविलेल्या अशा वस्तू कंपोस्टेबल असल्याबाबत सेंट्रल इन्स्टीटयूट ऑफ प्लास्टीक इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी (CIPET) व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रमाणित करून घेणे बंधनकारक राहील. "
(क) नियम ३ च्या उप-नियम ४ च्या (अ) ऐवजी पुढीलप्रमाणे वाचावे.
" प्लास्टिक पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारे आवरण हे ५० मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीचे असावे. "
तथापि, पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणाया प्लास्टीकच्या जाडीचा उत्पादनाच्या गुणवत्तेवर परिणाम होते असेल अशा ठिकाणी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पॅकेजिंग मटेरिअलचा वापर करता येऊ शकेल.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, नोव्हेंबर ३०, २०२२/अग्रहायण ९, शके १९४४ ENVIRONMENT AND CLIMATE CHANGE DEPARTMENTMantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 30th November, 2022.
NOTIFICATION
MAHARASHTRA NON-BIODEGRADABLE GARBAGE (CONTROL) Act, 2006.
No.Plastic-2022/C.R.104/TC-1.—In exercise of the powers conferred by section 4 of the Maharashtra Non-biodegradable Garbage (Control) Act, 2006 (X of 2006), the Government of Maharashtra hereby amends the Maharashtra Plastic and Thermocol Products (Manufacture, Uses, Sale, Transport, Handling and Storage) Notification, 2018 dated 23rd March, 2018 as follows, namely :—
In the said notification, in para 3,—
(a) in clause (1), in sub-clause (1), for the words " non-woven polypropylene bags " the words " non-woven polypropylene bags less than sixty Grams per Square Meter (GSM) shall be substituted " ;
(b) in clause (3), after sub-clause (ii), the following sub-clause shall be inserted, namely :—
"(ii-a) Single use items made from compostable material such as Straw, Plates, Cups, Glasses, Forks, Container like Bowl, etc. The manufacturers or sellers of single use items made from compostable material shall obtain certificate from the Central Institute of Plastic Engineering and Technology (CIPET) and Central Pollution Control Board.".
(c) in clause (iv), for sub-clause (a), the following clause shall be substituted, namely:—
" (a) The plastic packaging material shall be more than fifty micron thickness :
Provided that, in case thickness of plastic sheets impair the functionality of the product, the packaging material may be less than fifty micron.".
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SANJAY SANDANSHIV,
Under Secretary of Government.