महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - ११, अंक - ११ ] बुधवार, नोव्हेंबर ३०, २०२२ / अग्रहायण ९, शके १९४४ [ पृष्ठे २
असाधारण क्रमांक ११
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
जिल्हा पुणे,
भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याच्ाा आणि पारदर्शकतेच्ाा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९ चे
पोट-कलम (१) अन्वये.
घोषणापत्र
क्रमांक भूसं/एसआर-०४/पीएलबी-१/कावि-८४४/२०२२.--ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी, पुणे यांनी भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निदश उक्त अधिनियम असा केला आहे) याच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना क्रमांक भूसंपादन/रेल्वे/ एसआर-०४/२०२२ पुणे, दिनांक जून ३० ते जुलै ६, २०२२ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनींची, अनुसूची दोनमध्ये अधिक तपशीलवार विनिर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पुणे यांनी कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनी संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्यांची खात्री पटली आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम १९ चे पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, या अधिसूचनेच्या अनुसूची दोनमध्ये नमूद उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी या अधिसूचनेच्या अनुसूची एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या उक्त जमिनींची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे ;
आणि ज्याअर्थी, अनुसूची तीनमध्ये वर्णन केलेप्रमाणे बाधित व्यक्ती विस्थापित होत नाहीत म्हणून बाधित पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेच्या सारांश अनुसूची चारमध्ये वर्णन केलेला नाही ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड () अन्वये, समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची काय पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी, दौंड-पुरंदर उपविभाग, पुरंदर, पत्ता-बीएसएनएल ऑसिसमोर, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यास पदनिदशित करीत आहेत.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, ३० नोव्हेंबर २०२२ / अग्रहायण ९, शके १९४४ अनुसूची - एकजमिनीचे वर्णन
जिल्हा पुणे, तालुका पुरंदर, गाव वाल्हे
अ. क्र. भूमापन किंवा अंदाजित क्षेत्र
चतु:सीमा
गट क्रमांक
पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर १ २ ३ ४ ५ ६ ७
हे. आर
१ ५७०८ ०.३४.७५ रेल्वेलाईन ५७०८ चे ५८२२ ५७०८ चे
उर्वरित क्षेत्र. उर्वरित क्षेत्र.
२ ५८२२ ०.०२.४५ रेल्वेलाईन ५७२२ चे ५८२२ ५७०८
उर्वरित क्षेत्र.
३ ५८२३ ०.०२.९५ रेल्वेलाईन ५७२३ चे ५७०८ ५८२२
उर्वरित क्षेत्र.
एकूण ०.४०.१५
अनुसूची - दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव : पुणे-मिरज ब्रॉडगेज दुसरी रेल्वेलाईन बांधणी.
प्रकल्पाचे वर्णन : विशेष सार्वजनिक वाहतुकीचा पायाभूत सुविधा प्रकल्प.
समाजाला होणारे लाभ : पुणे-मिरज या मार्गावरील सार्वजनिक वाहतूक सुरळीत व जलदगतीने होण्यास मदत होणार आहे.
अनुसूची-तीन
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन
जिल्हा पुणे, तालुका पुरंदर, गाव वाल्हे
अनुक्रमांक
भूमापन क्रमांक किंवा गट नंबर
क्षेत्र (हेक्टरमध्ये) उक्त सार्वजनिक प्रयोजनामुळे बाधित व्यक्ती विस्थापित होत नाहीत. सबब पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन निरंक असे.
अनुसूची-चार
(पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश)
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश निरंक असे.
टीप : उक्त जमिनीच्या आराखडाचे उपविभागीय अधिकारी, दौंड-पुरंदर उपविभाग, पुरंदर यांचे कार्यालयाचा पत्ता-बीएसएनएल ऑसिसमोर, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथे निरीक्षण करता येईल.
डॉ. राजेश देशमुख, (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, पुणे.