Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग दोन असा. क्र. १४५, पाचोरा नगरपरिषद कार्यालय, पाचोरा, अधिसूचना, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये, क्रमांक बांध/३१५६/२०२२ (१-१२-२०२२)

Published 01 December 2022

Type
Extra - Ordinary
Part
Maharashtra Shasan Rajpatra Part-II
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-12-01.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, डिसेंबर १, २०२२/अग्रहायण १०, शके १९४४ १ RNI No. MAHBIL/2012/46121

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग दोन

वर्ष ८, अंक ८१] गुरुवार, डिसेंबर १, २०२२/अग्रहायण १०, शके १९४४ [ पृष्ठ १, किंमत : रुपये १२.००

असाधारण क्रमांक १४५

प्राधिकृत प्रकाशन

पाचोरा नगरपरिषद कार्यालय पाचोरा

क्रमांक बांध/३१५६/२०२२

अधिसूचना

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये.

पाचोरा शहराची दुसरी सुधारीत + वाढीव हद्दीची विकास योजना महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग, निर्णय क्रमांक टिपीएस. ३५१०/२७७२/ प्र.क्र. १८६/२०११/नवि-९, दिनांक ३ एप्रिल २०१२ अन्वये भागश: तसेच निर्णय क्रमांक टिपीएस-३५१२/३०१(न)/प्र.क्र. ३२(ब)/२०१३/नवि-९, दिनांक २० फेब्रुवारी २०२५ अंतिम मान्यता मिळाली असून सदर भागश: मंजूर विकास योजना, दिनांक १५ मे २०१२ पासून अंमलात आलेली आहे.

नगरपरिषद प्रशासकीय आदेश क्रमांक १४३, दिनांक २४ नोव्हेंबर २०२२ अन्वये सदर मंजूर विकास योजनेमध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये खालीलप्रमाणे किरकोळ बदल करणेचे ठरविले आहे :----

पाचोरा शहराच्या दुसरी सुधारित + वाढीव हद्दीच्या मंजूर विकास योजनेतील सव्र्हे नंबर १५९ पैकी (गट नं. २११ पैकी) खाजगी मालकीच्या जमिनीवर आरक्षण क्रमांक १८ नुसार '' प्रायमरी स्कुल, हायस्कुल अॅण्ड प्ले ग्राऊंड '' वापरासाठी २.८५ हेक्टर क्षेत्राचे प्रस्तावित आरक्षण वगळून सदर जमिनीचा वापर रहिवास प्रयोजनासाठी करण्याचा इरादा आहे.

नगरपरिषदेने प्रस्तावित केलेला बदल दर्शविणारा नकाशा म. अध्यक्षांचे सही, शिक्क्यानिशी व दिनांक सहीत नगरपरिषद कार्यालयीन वेळेत जनतेच्या अवलोकनार्थ ठेवणेत आला आहे. त्याबाबत कोणास सूचना अथवा आक्षेप घ्यावयाचे असतील त्यांनी ही नोटीस महाराष्ट्र शासन राजपत्र, तसेच स्थानिक व जिल्हा पातळीवरील वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेपासून एक महिन्याचे आत निम्न स्वाक्षरीकार यांचेकडेस लेेखी पाठवाव्यात. वरील मुदतीमध्ये आलेल्या हरकती व सुचनांचा विचार प्रस्तावित बदल महाराष्ट्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यापुर्वी नगरपरिषदेमार्फत करण्यात येईल.

श्रीमती शोभा भगवान बाविस्कर, मुख्याधिकारी तथा प्रशासक, पाचोरा नगरपरीषद, पाचोरा.

पाचोरा नगरपरिषद कार्यालय, पाचोरा, जि. जळगांव, दिनांक १ डिसेंबर २०२२.

(१)

भाग दोन-१४५--१

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHEDAT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 01 December 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-12-01.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-12-01.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II.