महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ८, अंक ८४] बुधवार, डिसेंबर ७, २०२२/अग्रहायण १६, शके १९४४ [पृष्ठे २, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक १४८
प्राधिकृत प्रकाशन
ठाणे महानगरपालिका, ठाणे
शहर विकास विभाग
जाहीर सूचना
(महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये )
क्रमांक ठामपा/मुख्या-१/शविवि-२९/वियोअंक/१९८६
ज्याअर्थी, ठाणे शहराची सुधारित विकास योजना शासन निर्णय क्रमांक टिपीएस/१२९७/१३१९/सी. आर-१४८/९७/नवि-१२, दिनांक ४ ऑक्टोबर, १९९९ अन्वये मंजूर असून, २२ नोव्हेंबर १९९९ पासून अंमलात आली. तसेच सुधारित विकास योजनेतील वगळलेले क्षेत्र (Excluded portion) शासन निर्णय क्रमांक टिपीएस/ १२०१/ २७४/सीआर-२८/२००९/नवि-१२, दिनांक ३ एप्रिल, २००३ अन्वये मंजूर झाली असून दिनांक १४ मे २००३ पासून अंमलात आली आहे. (यापुढे " उक्त मंजूर विकास योजना " असे संबोधिले आहे.) ;
आणि ज्याअर्थी, ठाणे शहराच्या मंजूर सुधारित विकास योजनेमध्ये सेक्टर क्र. ८ मध्ये रेल्वे लाईनच्या पूर्व बाजूस एकही स्मशानभूमी उपलब्ध नाही. तसेच सेक्टर क्र. ८ मध्ये मंजूर विकास आराखडयानुसार मौजे कळवा येथील स. क्र. १८९पै., १९८पै., २१८पै. या भूखंडावरील होमगार्ड ट्रेनिंग सेंटर हे आरक्षण आहे. सदर होमगार्ड ट्रेनिंग सेंटर आ. क्र. १ मध्ये बदल करून त्याऐवजी संयुक्त स्मशानभूमी असे आरक्षणाच्या नामाधिमानात बदल, निवासी भागालगत ३० मी. हरितपट्टा आरक्षणाचे आत ठेवणेचे अटीवर फेरबदल करणेकरिता महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ नुसार फेरबदलाची कार्यवाही करणेस मा. महासभा ठराव क्र. ७२९, दिनांक ३ मार्च २०२२ अन्वये मान्यता दिलेली आहे. (यापुढे " उक्त फेरबदल " असे संबोधिले आहे.) ;
आणि त्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) मधील तरतुदीनुसार " उक्त मंजूर विकास योजनेत " " उक्त फेरबदलाबाबत " आम जनतेच्या सूचना/हरकती मागविण्यासाठी ही जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे. उक्त फेरबदल दर्शविणारा नकाशा सहायक संचालक नगररचना, ठाणे महानगरपालिका, " महापालिका भवन ", जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे यांचे कार्यालयीन सूचनाफलकावर व खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. उक्त फेरबदलाबाबत कोणत्याही व्यक्तीस सूचना/हरकती घ्यावयाची असल्यास त्यांनी ही सूचना वृत्तपत्रात व www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर आणि महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० (तीस) दिवसांचे आत आपली सूचना/हरकत महापालिका आयुक्त, ठाणे महानगरपालिका आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे यांचेकडे अथवा E-mail ID - [email protected] वर सादर करावी.
संकेतस्थळ :- www.thanecity.gov.in महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, डिसेंबर ७, २०२२/अग्रहायण १६, शके १९४४ २ THANE MUNICIPAL CORPORATION, THANE Town Planning Department
Notice
(U/s. 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966)
No. TMC Hq.1/ TDD-29/ DPIC/1986
Whereas, the Revised Development Plan of the city of Thane has been Sanctioned by Government vide Notification No. TPS/1297/1319/CR-148/97/UD-12, Dt. 4th October 1999 and came into force from 22nd November, 1999. Also the Development Plan for Excluded portion (EP) from Revised Development plan was sanctioned vide Government's Notification No. TPS/1201/274/ CR-28/2009/UD-12, Dt. 3rd April 2003 and came into force from 14th May 2003 (Hereinafter referred to as "The said Sanctioned Development Plan") ;
And whereas, as per Sanctioned Development Plan in Sector No. 8, Smashanbhumi is not available near across the Railway line, Kalwa (East) side. Also as per Sanctioned Development Plan in Sector No. 8 land bearing S. No. 189pt., 198pt., 218pt. of Village Kalwa, is reserved for Home Guard Training Center Reservation No. 1. It is propose to change this Home Guard Training Center Reservation No. 1 to "Sanyukta Smashanbhumi" subject to condition that 30 mt. wide green belt, adjacent to the residential zone, shall be kept within the proposed reservation under section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 in "the said Sanctioned Development Plan" (hereinafter referred to as "The said modification"). Hon. General Body of Thane Municipal Corporation vide its Resolution No. 729, Dated 3rd March 2022 has accorded sanction for following the abovesaid procedure of modification ;
And therefore, this notice is published for inviting suggestions/objections from the public to carry out " The said Modification in The said Sanctioned Development Plan " as per the provisions under section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. The Plan showing "The said modification" is displayed on the notice board in the office of Assistant Director Town Planning, Town Development Department, Thane Municipal Corporation, "Mahapalika Bhavan", General Arunkumar Vaidya Marg, Chandanvadi, Panchpakhadi, Thane and also published on website mentioned below. Any person who wants to submit suggestion may submit his suggestion or objection to the said modification within 30 (Thirty) days from the publication of this notice in the news paper, on the website www.thanecity.gov.in and Maharashtra Government Gazette, to the Municipal Commissioner, Thane Municipal Corporation, Thane or on the Email ID - [email protected]
Website - www.thanecity.gov.in
S. P. UGILE,