महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ--नाशिक विभागीय पुरवणी
वर्ष - ११, अंक - २३ ] बुधवार, डिसेंबर ७, २०२२ / अग्रहायण १६, शके १९४४ [ पृष्ठे ०२
असाधारण क्रमांक २३
प्राधिकृत प्रकाशन
विभागीय आयुक्त यांजकडून
१. या कार्यालयाचे आदेश क्रमांक नपा-२/२/जा.क्र.९८१/२०२०, दिनांक १७/१/२०२० च्या अनुषंगाने प्रसिध्द करण्यात आलेले दिनांक ६ ेब्रुवारी २०२०.
२. अतिरिक्त आयुक्त, धुळे महानगरपालिका यांचेकडील पत्र जा. क्रमांक धुमपा/न.स.वि/१८४, दिनांक १० नोव्हेंबर २०२२.
३. मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठाकडील रिट याचिका क्रमांक ४०६५/२०२० मधील दिनांक २९ सप्टेंबर २०२२ रोजीचा आदेश.
आदेश
क्रमांक नपप्र/२०२२/कार्या-२/कावि/१६००१/सन २०२२.---- ज्याअर्थ्ाी, मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम, १९४९ चे कलम १० (ई) अन्वये राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या वेळेमध्ये आणि आवश्यक केलेल्या रितीने निवडणूक खर्चाचा हिशोब देण्यास कसूर केली आहे, अशा उमेदवारांना अनर्ह ठरविण्याची तरतूद आहे.
महानगरपालिका निवडणुका लढविणाया उमेदवारांनी निवडणूक खर्चाची माहिती शपथ्ापत्रासह राज्य निवडणूक आयोगाने विहित केल्यानुसार निकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या कालावधीमध्ये सादर न केल्यास अशा उमेदवारांना अनर्ह ठरविण्याचा अधिकार विभागीय आयुक्त यांना आहे.
उपायुक्त (निवडणूक), धुळे महानगरपालिका यांनी धुळे महानगरपालिका, सार्वत्रिक निवडणूक-२०१८ मध्ये निवडणूक लढविणाया १६७ उमेदवारांनी निवडणुकीत केलेल्या खर्चाचा तपशील व शपथ्ापत्र सादर न केलेल्या संबंधित उमेदवारांना अधिनियमातील तरतुदींनुसार अनर्ह ठरविण्याची शिारस केलेली होती.
त्यानुसार धुळे महानगरपालिका-२०१८ सार्वत्रिक निवडणुकीत केलेल्या खर्चाबाबत माहिती मुदतीत सादर न केल्यामुळे मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम, १९४९ चे कलम १० (ई ) चे तरतुदी अन्वये उक्त संदर्भ क्रमांक १ अन्वये एकूण १६४ उमेदवारांना निवडणूक लढविण्यास पुढील ३ वषासाठी अनर्ह ठरविले होते. प्रस्तुत आदेश महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये दिनांक ६ ेब्रुवारी, २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला होता.
या आदेशात समाविष्ट श्री. सोनल दिलीप शिंदे यांनी त्याविरुद्ध मा. उच्च न्यायालयात रिट याचिका क्रमांक ४०६५/२०२० दाखल केली २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०२२ / अग्रहायण १६, शके १९४४ त्याअर्थ्ाी, सदर मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने दिनांक ६ ेब्रुवारी २०२० रोजीच्या शासन राजपत्र प्रसिद्ध झालेले व संदर्भ क्रमांक १ मध्ये नमूद आदेशात अंशत: ेरबदल करून सदर आदेशाच्या परिशिष्टामधील अनर्ह उमेदवारांच्या यादीतील अ. क्र. १४० वरील नोंद / मजकूर वगळण्यात येत आहे.
राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त, नाशिक.
नाशिक, २ डिसेंबर २०२२.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.