महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार
वर्ष ९, अंक १] मंगळवार, जानेवारी ३, २०२३/पौष १३, शके १९४४ [पृष्ठे २, किंमत : रुपये २३.००
असाधारण क्रमांक १
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.
अनुक्रमणिका
सन २०२३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १.--- मुंबई महानगरपालिका अधिनियमात आणखी सुधारणा करण्यासाठी पृष्ठे १-२ अधिनियम.
. . . . . .
दिनांक २९ डिसेंबर २०२२ रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.
सतिश वाघोले, प्रभारी सचिव (विधि विधान), महाराष्ट्र शासन, विधि व न्याय विभाग.
सन २०२३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १.
(माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर " महाराष्ट्र शासन राजपत्रात " दिनांक ३ जानेवारी २०२३ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.) मुंबई महानगरपालिका अधिनियमात आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम.
ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नव्हते ;
१८८८ चा ३.
आणि ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, मुंबई महानगरपालिका अधिनियमात आणखी सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तिवात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली होती, आणि म्हणून, त्यांनी दिनांक २४ नोव्हेंबर २०२२ रोजी मुंबई महानगरपालिका (दुसरी सुधारणा) अध्यादेश, २०२२, हा प्रख्यापित केला होता ;
२०२२ चा महा. अध्या. १२.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, जानेवारी ३, २०२३/पौष १३, शके १९४४ १. (१) या अधिनियमास, मुंबई महानगरपालिका (दुसरी सुधारणा) अधिनियम, २०२२, असे म्हणावे. संक्षिप्त नाव व प्रारंभ. (२) तो, दिनांक २४ नोव्हेंबर २०२२ रोजी अंमलात आला असल्याचे मानण्यात येईल.२. मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या (यात यापुढे ज्याचा निर्देश " मुख्य अधिनियम " असा करण्यात १८८८ चा ३.
आला आहे) कलम १५४ मध्ये, पोट-कलम (१ड) मधील, खंड (अ) मध्ये,----
(एक) उप-खंड (एक) मधील, " व २०२१-२०२२ या वर्षी " या मजकुराऐवजी, ", २०२१-२०२२ या सन १८८८ चा अधिनियम क्रमांक ३ याच्या कलम १५४ ची सुधारणा.
वर्षी व २०२२-२०२३ या वर्षी " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
(दोन) उप-खंड (दोन) मधील, " व २०२१-२०२२ या वर्षी " या मजकुराऐवजी, ", २०२१-२०२२ या वर्षी व २०२२-२०२३ या वर्षी " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
(तीन) उप-खंड (तीन) मधील,----
(अ) " २०२२-२०२३ या वर्षी " या मजकुराऐवजी, " २०२३-२०२४ या वर्षी " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
(ब) " व २०२१-२०२२ या वर्षी " या मजकुराऐवजी, ", २०२१-२०२२ या वर्षी व २०२२- २०२३ या वर्षी " हा मजकूर दाखल करण्यात येईल.
अडचणी दूर करण्याचा अधिकार.
३. (१) या अधिनियमाद्वारे सुधारणा केलेल्या, मुख्य अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणताना कोणतीही अडचण उद्भवल्यास, राज्य शासनास, प्रसंगानुरुप, ती अडचण दूर करण्याच्या प्रयोजनार्थ, त्यास आवश्यक किंवा इष्ट वाटतील असे, परंतु या अधिनियमाद्वारे सुधारणा केलेल्या मुख्य अधिनियमाच्या तरतुदींशी विसंगत नसतील असे निदेश, शासकीय राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे देता येतील :
परंतु, या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून दोन वषार्ंचा कालावधी समाप्त झाल्यानंतर, असा कोणताही आदेश काढण्यात येणार नाही.
(२) पोट-कलम (१) अन्वये काढलेला प्रत्येक आदेश, तो काढण्यात आल्यानंतर, शक्य तितक्या लवकर, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर मांडण्यात येईल.
४. (१) मुंबई महानगरपालिका (दुसरी सुधारणा) अध्यादेश, २०२२, हा याद्वारे, निरसित करण्यात येत आहे.
२०२२ चा महा. अध्या. १२.
सन २०२२ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १२ याचे निरसन व व्यावृत्ती.
(२) अशा प्रकारे निरसन झाले असले तरी, उक्त अध्यादेशाद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या मुख्य अधिनियमाच्या संबंधित तरतुदीन्वये करण्यात आलेली कोणतीही कृती किंवा कोणतीही कार्यवाही (काढण्यात आलेली कोणतीही अधिसूचना किंवा दिलेला आदेश यांसह) ही, या अधिनियमान्वये सुधारणा करण्यात आलेल्या मुख्य अधिनियमाच्या संबंधित तरतुदींन्वये करण्यात आलेली कोणतीही कृती, कार्यवाही किंवा, यथास्थिति काढण्यात आलेली अधिसूचना किंवा दिलेला आदेश असल्याचे मानण्यात येईल.