Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

а§≠а§Ња§Ч а§Ъа§Ња§∞, а§Еа§Єа§Њ., а§Ха•На§∞а§Ѓа§Ња§Ва§Х а•≠, а§Єа§® а•®а•¶а•®а•© а§Ъа§Њ а§Ѓа§єа§Ња§∞а§Ња§Ја•На§Яа•На§∞ а§Еа§Іа§ња§®а§ња§ѓа§Ѓ а§Ха•На§∞а§Ѓа§Ња§Ва§Х а•≠ а§ђа•Ба§Іа§µа§Ња§∞, а•Іа•І а§Ьа§Ња§®а•За§µа§Ња§∞а•А а•®а•¶а•®а•©

Published 11 January 2023

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-01-11.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, जानेवारी ११, २०२३/पौष २१, शके १९४४ १ RNI No. MAHBIL /2009/35530

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष ९, अंक ४] बुधवार, जानेवारी ११, २०२३/पौष २१, शके १९४४ [पृष्ठे ६, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक ६

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

पृष्ठे १-६ सन २०२३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६.--- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अधिनियम, १९८९, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ) अधिनियम, १९९७ आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ या अधिनियमांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम . . . . . .

दिनांक १० जानेवारी २०२३ रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.

सतिश वाघोले, प्रभारी सचिव (विधि विधान), महाराष्ट्र शासन, विधि व न्याय विभाग.

सन २०२३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६.

(माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर " महाराष्ट्र शासन राजपत्रात " दिनांक ११ जानेवारी २०२३ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अधिनियम, १९८९, कवि कुलगुरू कालिदास

संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ) अधिनियम, १९९७ आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ

अधिनियम, २०१६ या अधिनियमांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम.

ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नव्हते ;

आणि ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अधिनियम, १९८९, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ) अधिनियम, १९९७ आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ या अधिनियमांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची १९८९ चा महा. २०. १९९७ चा महा. ३३. २०१७ चा महा. ६.

(१)

भाग चार-६---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, जानेवारी ११, २०२३/पौष २१, शके १९४४ २०२२ चा महा. अध्या. १३.

खात्री पटली होती ; आणि, म्हणून, त्यांनी दिनांक २४ नोव्हेंबर २०२२ रोजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ) आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) अध्यादेश, २०२२, हा प्रख्यापित केला होता ;

आणि ज्याअर्थी, उक्त अध्यादेशाचे राज्य विधानमंडळाच्या अधिनियमात रुपांतर करणे इष्ट आहे ;

त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या याहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :----

प्रकरण एक

प्रारंभिक.

संक्षिप्त नाव व प्रारंभ.

१. (१) या अधिनियमास, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ) आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) अधिनियम, २०२२, असे म्हणावे.

(२) तो, दिनांक २४ नोव्हेंबर २०२२ रोजी अंमलात आला असल्याचे मानण्यात येईल.

प्रकरण दोन

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अधिनियम, १९८९ याची सुधारणा.

२. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अधिनियम, १९८९ (यात, याप्रकरणात, यापुढे ज्याचा १९८९ चा महा. २०.

निर्देश, " मुक्त विद्यापीठ अधिनियम " असा केला आहे) याच्या कलम १० मध्ये,—

(१) पोट-कलम (१) मधील,-----

सन १९८९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २० याच्या कलम १० ची सुधारणा.

(क) खंड (क) मध्ये,----

(एक) " एक समिती " या मजकुराऐवजी, " एक शोध-नि-निवड समिती " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

(दोन) उप-खंड (एक) ऐवजी, पुढील उप-खंड दाखल करण्यात येईल :------

" (एक) कुलपतीने नामनिर्देशित केलेला सदस्य, जो उच्च शिक्षण क्षेत्रातील विख्यात व्यक्ती असेल आणि जो एकतर, शिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय ख्यातीची विख्यात विद्वान व्यक्ती किंवा पद्म पुरस्कारप्राप्त व्यक्ती असेल ;" ;

(तीन) उप-खंड (तीन) नंतर, पुढील उप-खंड समाविष्ट करण्यात येईल :------

" (चार) विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षाने नामनिर्देशित केलेला

सदस्य ;" ;

(ख) खंड (ग) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येईल :----

" (ग) समितीवर नामनिर्देशित केलेले सदस्य, अशा व्यक्ती असतील की ज्या, विद्यापीठाशी किंवा विद्यापीठाच्या कोणत्याही महाविद्यालयाशी किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त परिसंस्थेशी कोणत्याही रीतीने संबंधित असणार नाहीत ;" ;

(ग) खंड (घ) मधील, " तीन " हा मजकूर वगळण्यात येईल ;

(२) पोट-कलम (१घ) मधील,-----

(क) खंड (क) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येतील :----

" (क) उच्चस्तरिय क्षमता, सचोटी, नैतिकता व संस्थात्मक बांधिलकी असलेली व्यक्ती असेल ;

(क-१) कोणत्याही विद्यापीठात प्राध्यापक म्हणून किमान दहा वषार्ंचा अनुभव असलेला किंवा शैक्षणिक नेतृव सिद्ध केल्याच्या पुराव्यासह लौकिकप्राप्त संशोधन किंवा शैक्षणिक प्रशासकीय संघटनेतील दहा वषार्ंचा अनुभव असलेला विख्यात शिक्षणतज्ज्ञ असेल ;" ;

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, जानेवारी ११, २०२३/पौष २१, शके १९४४ ३

(ख) खंड (घ) मधील, " शैक्षणिक अर्हता " या मजकुराऐवजी, " अतिरिक्त शैक्षणिक अर्हता " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

(३) पोट-कलम (१फ) नंतर, पुढील पोट-कलम समाविष्ट करण्यात येईल :-----

" (१ग) जर कुलपतीने निवड केलेली व्यक्ती, कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारीत नसेल तर, कुलपतीस, नामिकेतील उर्वरित व्यक्तींमधून अन्य सुयोग्य व्यक्तीची निवड करता येईल किंवा त्यास, एकतर त्याच समितीकडून किंवा या प्रयोजनासाठी नवीन समिती घटित केल्यानंतर, अशा नवीन समितीकडून, नवीन नामिकेची मागणी करता येईल .".

३. मुक्त विद्यापीठ अधिनियमाच्या कलम १०अ ऐवजी, पुढील कलम दाखल करण्यात येईल :----

सन १९८९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २० याच्या कलम १०अ याऐवजी नवीन कलम दाखल करणे.

प्र-कुलगुरू.

" १०अ. प्र-कुलगुरू म्हणून एखाद्या व्यक्तीची व्यवस्थापन मंडळाकडे शिफारस करणे हा, कुलगुरूचा विशेषाधिकार असेल. व्यवस्थापन मंडळ, कुलगुरूच्या शिफारशीवरून, विद्यापीठासाठी प्र-कुलगुरूंची नियुक्ती करील. प्र-कुलगुरूची नियुक्ती, परिनियमांद्वारे विहित करण्यात येईल, अशा मुदतीसाठी व अशा वित्तलब्धीवर आणि सेवेच्या इतर शतर्ींवर करण्यात येईल आणि तो, विहित करण्यात येईल अशा अधिकारांचा वापर करील व अशी कामे पार पाडील.".

प्रकरण तीन

कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ) अधिनियम, १९९७ याची सुधारणा.

१९९७ चा

महा. ३३.

४. कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ) अधिनियम, १९९७ (यात, याप्रकरणात, यापुढे ज्याचा निर्देश, " संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ) अधिनियम " असा केला आहे) याच्या कलम १२ मध्ये,-----

(१) पोट-कलम (१) मधील,-----

सन १९९७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३३ याच्या कलम १२ ची सुधारणा.

(क) खंड (क) मध्ये,----

(एक) " एक समिती " या मजकुराऐवजी, " एक शोध-नि-निवड समिती " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

(दोन) उप-खंड (एक) ऐवजी, पुढील उप-खंड दाखल करण्यात येईल :-----

" (एक) कुलाधिपतीने नामनिर्देश केलेला सदस्य, जो उच्च शिक्षण क्षेत्रातील विख्यात व्यक्ती असेल आणि जो एकतर, शिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय ख्यातीची विख्यात विद्वान व्यक्ती किंवा पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्ती असेल ;";

(तीन) उप-खंड (तीन) नंतर, पुढील उप-खंड समाविष्ट करण्यात येईल :-----

" (चार) विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षाने नामनिर्देशित केलेला सदस्य ; " ;

(ख) खंड (ग) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येईल :----

" (ग) समितीवर नामनिर्देशित केलेले सदस्य, अशा व्यक्ती असतील की ज्या, विद्यापीठाशी किंवा विद्यापीठाच्या कोणत्याही महाविद्यालयाशी किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त परिसंस्थेशी कोणत्याही रीतीने संबंंधित असणार नाहीत ; " ;

(ग) खंड (घ) मधील, " तीन " हा मजकूर वगळण्यात येईल ;

भाग चार-६---२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, जानेवारी ११, २०२३/पौष २१, शके १९४४ (२) पोट-कलम (३क) मधील,-----

(क) खंड (क) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येतील :-----

" (क) उच्च स्तरीय क्षमता, सचोटी, नैतिकता व संस्थात्मक बांधिलकी असलेली व्यक्ती असेल;

(क-१) कोणत्याही विद्यापीठात प्राध्यापक म्हणून किमान दहा वषार्ंचा अनुभव असलेला किंवा शैक्षणिक नेतृत्व सिद्ध केल्याच्या पुराव्यासह लौकिकप्राप्त संशोधन किंवा शैक्षणिक प्रशासकीय संघटनेतील दहा वषार्ंचा अनुभव असलेला विख्यात शिक्षणतज्ज्ञ असेल ;";

(ख) खंड (घ) मधील, " शैक्षणिक अर्हता " या मजकुराऐवजी, " अतिरिक्त शैक्षणिक अर्हता " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

(३) पोट-कलम (४) मधील,-----

(क) विद्यमान परंतुकापूर्वी, पुढील परंतुक समाविष्ट करण्यात येईल :-----

" परंतु, जर कुलाधिपतीने निवड केलेली व्यक्ती, कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारीत नसेल तर, कुलाधिपतीस, नामिकेतील उर्वरित व्यक्तींमधून अन्य सुयोग्य व्यक्तीची निवड करता येईल किंवा त्यास, एकतर त्याच समितीकडून किंवा या प्रयोजनासाठी नवीन समिती घटित केल्यानंतर, अशा नवीन समितीकडून, नवीन नामिकेची मागणी करता येईल : " ;

(ख) विद्यमान परंतुकामधील, " परंतु " या मजकुराऐवजी, " परंतु आणखी असे की, " हा मजकूर दाखल करण्यात येईल.

५. संस्कृत विश्वविद्यालय विद्यापीठ अधिनियमाच्या कलम १३ मधील, पोट-कलम (१) ऐवजी, पुढील पोट-कलम दाखल करण्यात येईल :-----

सन १९९७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३३ याच्या कलम १३ ची सुधारणा.

" (१) सम-कुलगुरू म्हणून एखाद्या व्यक्तीची व्यवस्थापन परिषदेकडे शिफारस करणे हा, कुलगुरूचा विशेषाधिकार असेल. व्यवस्थापन परिषद, कुलगुरूच्या शिफारशीवरून, विद्यापीठासाठी सम-कुलगुरूची नियुक्ती करील.".

प्रकरण चार

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ याची सुधारणा.

६. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ (यात, याप्रकरणात, यापुढे ज्याचा निर्देश, २०१७ चा महा. ६.

" सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम " असा केला आहे) याच्या कलम ११ मध्ये,-----

(१) पोट- कलम (३) मधील,-----

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६ याच्या कलम ११ ची सुधारणा.

(क) खंड (क) मध्ये,----

(एक) " एक समिती " या मजकुराऐवजी, " एक शोध-नि-निवड समिती " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

(दोन) उप-खंड (एक) ऐवजी, पुढील उप-खंड दाखल करण्यात येईल :----

" (एक) कुलपतीने नामनिर्देशित केलेला सदस्य, जो उच्च शिक्षण क्षेत्रातील विख्यात व्यक्ती असेल आणि जो एकतर, शिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय ख्यातीची विख्यात विद्वान व्यक्ती किंवा पद्म पुरस्कारप्राप्त व्यक्ती असेल ;";

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, जानेवारी ११, २०२३/पौष २१, शके १९४४ ५

(तीन) उप-खंड (तीन) नंतर, पुढील उप-खंड समाविष्ट करण्यात येईल :----

" (चार) विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षाने नामनिर्देशित केलेला सदस्य; " ;

(ख) खंड (ग) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येईल :----

" (ग) समितीवर नामनिर्देशित केलेले सदस्य, अशा व्यक्ती असतील की ज्या, संबंधित विद्यापीठाशी किंवा त्या विद्यापीठाच्या कोणत्याही महाविद्यालयाशी किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त परिसंस्थेशी कोणत्याही रीतीने संबंधित असणार नाहीत ;";

(ग) खंड (घ) मधील, " तीन " हा मजकूर वगळण्यात येईल ;

(घ) खंड (च) मधील,-----

(एक) उप-खंड (एक) ऐवजी, पुढील उप-खंड दाखल करण्यात येतील :-----

" (एक) उच्च स्तरीय क्षमता, सचोटी, नैतिकता व संस्थात्मक बांंधिलकी असलेली व्यक्ती असेल ;

(एक-क) कोणत्याही विद्यापीठात प्राध्यापक म्हणून किमान दहा वषार्ंचा अनुभव असलेला किंवा शैक्षणिक नेतृत्व सिद्ध केल्याच्या पुराव्यासह लौकिकप्राप्त संशोधन किंवा शैक्षणिक प्रशासकीय संघटनेतील दहा वषार्ंचा अनुभव असलेला विख्यात शिक्षणतज्ज्ञ असेल. " ;

(दोन) उप-खंड (चार) मधील, " शैक्षणिक अर्हता " या मजकुराऐवजी, " अतिरिक्त शैक्षणिक अर्हता " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

(२) पोट-कलम (४) मधील,----

(क) विद्यमान परंतुकापूर्वी, पुढील परंतुक समाविष्ट करण्यात येईल :----

" परंतु, जर कुलपतीने निवड केलेली व्यक्ती, कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारीत नसेल तर, कुलपतीस, नामिकेतीने उर्वरित व्यक्तींमधून अन्य सुयोग्य व्यक्तीची निवड करता येईल किंवा त्यास, एकतर त्याच समितीकडून किंवा या प्रयोजनासाठी नवीन समिती घटित केल्यानंतर, अशा नवीन समितीकडून, नवीन नामिकेची मागणी करता येईल : " ;

(ख) विद्यमान परंतुकामधील, " परंतु, " या मजकुराऐवजी, " परंतु आणखी असे की, " हा मजकूर दाखल करण्यात येईल.

७. सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमाच्या कलम १३ मध्ये, पोट-कलम (६) ऐवजी, पुढील पोट-कलम दाखल करण्यात येईल :-----

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६ याच्या कलम १३ ची सुधारणा.

" (६) प्र-कुलगुरू म्हणून एखाद्या व्यक्तीची व्यवस्थापन परिषदेकडे शिफारस करणे हा, कुलगुरूचा विशेषाधिकार असेल. व्यवस्थापन परिषद, कुलगुरुच्या शिफारशीवरून, विद्यापीठासाठी प्र-कुलगुरूची नियुक्ती करील.".

८. सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमाच्या कलम १०९ मध्ये,-----

(१) पोट-कलम (३) मधील, खंड (छ) नंतर, दुसया परंतुकाऐवजी, पुढील परंतुक दाखल करण्यात येईल :-----

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६ याच्या कलम १०९ ची सुधारणा.

" परंतु आणखी असे की, २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षासाठी, उच्च शिक्षणाचे नवीन महाविद्यालय किंवा परिसंस्था सुरू करण्यासाठी इरादा पत्र मागवण्यासाठी अर्ज करण्याचे, अधिष्ठाता मंडळाकडून अर्जाची छाननी करण्याचे व राज्य शासनाकडे पाठविण्याचे आणि राज्य शासनाकडून इरादा पत्र देण्याचे दिनांक वाढविण्याच्या दृष्टीने, खाली दिलेल्या तक्त्याच्या स्तंभ (२) मध्ये विर्िनदिष्ट६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, जानेवारी ११, २०२३/पौष २१, शके १९४४ केल्याप्रमाणे, पोट-कलम (३) च्या खंड (क), (ग) व (घ) मध्ये र्िनदिष्ट केलेले दिवस किंवा दिनांक हे, उक्त तक्त्याच्या स्तंभ (३) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे दिवस किंवा दिनांक म्हणून वाचण्यात येतील :----

तक्ता

खंड

दिवस किंवा दिनांक

(१)

विद्यमान तरतुदीमध्ये तरतूद केलेले २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी तरतूद केलेले दिवस किंवा दिनांक (३)

(२)

(क) ज्यावर्षी इरादा पत्र मागवले असेल त्या वर्षाच्या अगोदरच्या वर्षाच्या १५ जानेवारी २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी.

सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसापूर्वी.

(ग) ज्यावर्षी असा अर्ज विद्यापीठाला प्राप्त झाला असेल त्या वर्षाच्या २८ फेब्रुवारी २०२३ रोजी ३० नोव्हेंबर रोजी किंवा त्यापूर्वी.

किंवा त्यापूर्वी.

(घ) विद्यापीठाच्या शिफारशींनंतर लगतनंतरच्या वर्षाच्या ३१ जानेवारी १ एप्रिल २०२३ रोजी रोजी किंवा त्यापूर्वी.

किंवा त्यापूर्वी.";

(२) पोट-कलम (४) मधील, खंड (घ) नंतर, दुसया परंतुकाऐवजी, पुढील परंतुक दाखल करण्यात येईल :-----

" परंतु आणखी असे की, दिनांक २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षासाठी, नवीन अभ्यास पाठयक्रम, विषय, विद्याशाखा, अतिरिक्त तुकडया किंवा सॅटेलाईट केंद्र सुरू करण्यासाठी परवानगी मागण्याचा अर्ज करण्याचा दिनांक वाढविण्याच्या दृष्टीने, खाली दिलेल्या तक्त्याच्या स्तंभ (२) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे, पोट-कलम (४) च्या खंड (क) मध्ये र्िनदिष्ट केलेला दिवस किंवा दिनांक हा, उक्त तक्त्याच्या स्तंभ (३) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे दिवस किंवा दिनांक म्हणून वाचण्यात येईल :----

तक्ता

खंड

दिवस किंवा दिनांक

(१)

विद्यमान तरतुदीमध्ये तरतूद केलेला २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी तरतूद केलेला दिवस किंवा दिनांक (३)

(२)

(क) ज्यावर्षी परवानगी मागितली असेल त्या वर्षाच्या अगोदरच्या वर्षाच्या १५ जानेवारी २०२३

सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसापूर्वी.

रोजी किंवा त्यापूर्वी.".

प्रकरण पाच

संकीर्ण.

२०२२ चा महा. अध्या. १३.

९. (१) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ) आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) अध्यादेश, २०२२ हा, याद्वारे, निरसित करण्यात येत आहे.

सन २०२२ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १३ याचे निरसन व व्यावृत्ती.

१९८९ चा महा. २०. १९९७ चा महा. ३३ २०१७ चा महा. ६.

(२) अशा प्रकारे निरसन झाले असले तरी, उक्त अध्यादेशाद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अधिनियम, १९८९, कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ) अधिनियम, १९९७ आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ या अधिनियमांच्या संबंधित तरतुदींन्वये करण्यात आलेली कोणतीही कृती किंवा कोणतीही कार्यवाही (काढण्यात आलेली कोणतीही अधिसूचना किंवा दिलेला आदेश यांसह) ही, या अधिनियमाद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या, उक्त अधिनियमांच्या संबंधित तरतुदींन्वये करण्यात आलेली कोणतीही कृती, कार्यवाही किंवा, यथास्थिति, काढलेली अधिसूचना किंवा दिलेला आदेश असल्याचे मानण्यात येईल.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 11 January 2023. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2023-01-11.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2023-01-11.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-.