Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, सांगली यांजकडील सांगली जिल्ह्यातील भूसंपादनाबाबतची अधिसूचना

Published 17 January 2023

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-01-17.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक---पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - १२, अंक - १ ] मंगळवार, जानेवारी १७, २०२३ / पौष २७, शके १९४४ [ पृष्ठे २

असाधारण क्रमांक १

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

जिल्हा सांगली

नमुना-१ अ

भूमी संपादन अधिनियम, भूमी संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम

१९ अन्वये.

अधिसूचना

क्रमांक भूसंपादन/एसआर-१/२०२२.-- ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या सांगली जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निदश उक्त अधिनियम असा केला आहे) आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची दोनमध्ये अधिक तपशीलवार विनिर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्यांची खात्री पटली आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड () अन्वये, समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची काय पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी, कडेगाव उपविभाग, कडेगाव यांस पदनिदशित करीत आहे.

अनुसूची-एक

संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन

जिल्हा सांगली, तालुका पलूस, गाव कुंडल

अ. क्र. भूमापन क्रमांक किंवा

बाधित क्षेत्र एकूण क्षेत्र

गट क्रमांक१ २ ३ ४ हे. आर हे. आर १ ४२७ ०.०७ ४.२५ (१) एच-३६६, भाग एक-असा. (पु.वि.पु.)--- १ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, १७ जानेवारी २०२३ / पौष २७, शके १९४४ अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव : पुणे-मिरज ब्रॉडगेज दुहेरी रेल्वेलाईन बांधणी.

प्रकल्प कामाचे वर्णन : दुहेरी रेल्वेलाईन बांधणी पुणे-मिरज ब्रॉडगेज दुहेरी रेल्वेलाईन बांधणीसाठी मौजे कुंडल येथील गट नंबर ४२७ मधील ०.०७ हे. आर क्षेत्र.

समाजाला होणारे लाभ : पुणे-मिरज ब्रॉडगेज दुहेरी रेल्वेलाईन बांधणीमुळे नव्याने विकसित झालेले ताकारी क्रॉसिंग स्टेशन येथे लांब पल्ल्याच्या गाडा थांबतील. या सुविधेमुळे गावकरी धार्मिक व पर्यटन उद्देशाने कुंडलपासून देशाच्या इतर भागांत जातील. मालाच्या वाहतूक सुविधेमुळे व्यावसायिक उत्पन्नात वाढ झालेमुळे स्थानिक शेतकरी व ग्रामस्थ यांची आर्थिक स्थिती सुधारेल, तसेच दुहेरी मार्गामुळे प्रवासाचा वेळ वाचतो व प्रवासी वेळेत पोहोचतात. सदर भाग हा नगदी पिके (ऊस) प्रदेश असलेमुळे ऊस व उत्पादने देशाचे इतर भागांत पाठवणे सुलभ होणार आहे.

अनुसूची-तीन

(बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे)

प्रस्तावित संपादन क्षेत्रामध्ये क्त शेतजमीन येत असून गावठाण तसेच भूसंपादन क्षेत्रातील कोणाचेही विस्थापन होत नाही.

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

गावाचे नाव

तालुका

जिल्हा

निरंक

अनुसूची-चार

(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाया अभिकरणाने दिलेला) सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार, दिनांक २४ ऑगस्ट २०२२ रोजी प्रसिद्ध झालेल्या राजपत्रानुसार सदरचा प्रकल्प ग्रामीण पायाभूत सुविधांतर्गत येत असल्याने त्यास भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ मधील सामाजिक प्रभाव निर्धारणापासून सूट देण्यात आलेली आहे.

अनुसूची-पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

सदर भूसंपादनामुळे व्यक्तीचे/व्यक्तींचे विस्थापन होत नसलेमुळे पुनर्वसन व पुनर्वसाहत प्रशासक नियुक्त करणेची आवश्यकता नाही.

टीप : उक्त जमिनीच्या आराखडाचे उपविभागीय अधिकारी, कडेगाव उपविभाग, कडेगाव (मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तडसर रोड, कडेगाव) यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येऊ शकेल.

डॉ. राजा दयानिधी, भा.प्र.से., जिल्हाधिकारी, सांगली.

कडेगाव, १६ जानेवारी २०२३.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 17 January 2023. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2023-01-17.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2023-01-17.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1.