Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग चार, असाधारण क्रमांक १२, सन २०२३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ११. सोमवार, २३ जानेवारी २०२३/माघ ३, शके १९४४.

Published 23 January 2023

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-01-23.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, जानेवारी २३, २०२३/माघ ३, शके १९४४ १ RNI No. MAHBIL /2009/35530

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष ९, अंक ७] सोमवार, जानेवारी २३, २०२३/ माघ ३, शके १९४४ [पृष्ठे २, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक १२

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

सन २०२३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ११.--- महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र सिनेमा (विनियमन) पृष्ठे १-२ अधिनियम यांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम.

दिनांक २० जानेवारी २०२३ रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे :-----

मुग्धा अ. सावंत,

प्रारुपकार-नि-सह सचिव,

महाराष्ट्र शासन,

विधि व न्याय विभाग.

सन २०२३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ११.

(माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर महाराष्ट्र शासन राजपत्रात दिनांक २३ जानेवारी २०२३ रोजी

प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)

महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र सिनेमा (विनियमन)

अधिनियम यांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम.

१९५१ चा २२.

१९५३ चा ११.

ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी, महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र सिनेमा (विनियमन) अधिनियम यांमध्ये आणखी सुधारणा करणे इष्ट आहे; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या याहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे:---

प्रकरण एक

प्रारंभिक

संक्षिप्त नाव. १. या अधिनियमास, महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र सिनेमा (विनियमन) (सुधारणा) अधिनियम, २०२२, असे म्हणावे. भाग चार--१२-१ (१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, जानेवारी २३, २०२३/माघ ३, शके १९४४ प्रकरण दोन

महाराष्ट्र पोलीस अधिनियम याची सुधारणा.

१९५१ चा २२.

२. महाराष्ट्र पोलीस अधिनियम ( यात यापुढे, या प्रकरणात, ज्याचा निर्देश, ""पोलीस अधिनियम"" असा करण्यात आला आहे) याच्या कलम ९०अ मध्ये, पोट-कलम (१) मधील, खंड (१) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येईल:---

सन १९५१ चा अधिनियम क्रमांक २२ याच्या कलम ९०अ ची सुधारणा.

""(१) पहिल्या अपराधाबद्दल, जी तीन हजार रूपयांपयर्ंत असू शकेल इतकी दंडाची शिक्षा होईल;"".

३. पोलीस अधिनियमाच्या कलम ११८ मध्ये, पोट-कलम (१) मधील, खंड (एक) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येईल:----

""(एक) पहिल्या अपराधाबद्दल, जी चार हजार रूपयांपयर्ंत असू शकेल इतकी दंडाची शिक्षा होईल;"".

सन १९५१ चा अधिनियम क्रमांक २२ याच्या कलम ११८ ची सुधारणा.

४. पोलीस अधिनियमाच्या कलम १३१ मध्ये, खंड (ब) मधील, उप-खंड (दोन) वगळण्यात येईल.

सन १९५१ चा अधिनियम क्रमांक २२ याच्या कलम १३१ ची सुधारणा.

प्रकरण तीन

महाराष्ट्र सिनेमा (विनियमन) अधिनियम याची सुधारणा.

१९५३ चा ११.

सन १९५३ चा अधिनियम क्रमांक ११ याच्या कलम ७ ची सुधारणा.

५. महाराष्ट्र सिनेमा (विनियमन) अधिनियम (यात यापुढे, या प्रकरणात, ज्याचा निर्देश, ""सिनेमा अधिनियम"" असा करण्यात आला आहे) याच्या कलम ७ मध्ये, पोट-कलम (१) मधील, ""त्यांना तीन महिन्यांपयर्ंत वाढविता येईल"" या मजकुराने सुरू होणाया आणि ""इतकी दंडाची शिक्षा होईल,"" या मजकुराने संपणाया मजकुराऐवजी, पुढील मजकूर दाखल करण्यात येईल:---

""त्यांना, पन्नास हजार रुपयांपयर्ंत वाढविता येईल इतक्या दंडाची शिक्षा होईल आणि अपराध करण्याचे चालू राहिल्यास त्याबाबतीत, अशा पहिल्या अपराधाच्या दोषसिद्धीनंतर, ज्या कालावधीत असा अपराध करण्याचे चालू राहिले असेल त्या कालावधीतील प्रत्येक दिवसासाठी, पाच हजार रुपयांपयर्ंत वाढविता येईल इतकी आणखी दंडाची शिक्षा होईल,"".

६. सिनेमा अधिनियमाच्या कलम ९ मध्ये, पोट-कलम (३) मधील, ""तीन महिनेपयर्ंत असू शकेल"" या मजकुराने सुरू होणाया आणि ""आणखी दंडाची शिक्षा होईल,"" या मजकुराने संपणाया मजकुराऐवजी, पुढील मजकूर दाखल करण्यात येईल:---

सन १९५३ चा अधिनियम क्रमांक ११ याच्या कलम ९ ची सुधारणा.

""पन्नास हजार रुपयांपयर्ंत वाढविता येईल इतक्या दंडाची शिक्षा होईल आणि अपराध करण्याचे चालू राहिल्यास त्याबाबतीत, अशा पहिल्या अपराधाच्या दोषसिद्धीनंतर, ज्या कालावधीत असा अपराध करण्याचे चालू राहिले असेल त्या कालावधीतील प्रत्येक दिवसासाठी, पाच हजार रुपयांपयर्ंत वाढविता येईल इतक्या आणखी दंडाची शिक्षा होईल,"".

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 23 January 2023. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2023-01-23.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2023-01-23.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-.