Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-IV-B, Ext. 44, (Dated 25th February 2023) वित्त विभाग अधिसूचना महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम, २००२ क्रमांक मूवक-१५२३/प्र.क्र. ०६/कराधान-१

Published 25 February 2023

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-02-25.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर ३, २०२२/कर्ातिक १२, शके १९४४ १ RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--ब

वर्ष ९, अंक २५] शनिवार, फेब्रुवारी २५,२०२३/फाल्गुन ६, शके १९४४ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ४४

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त), नियम व आदेश.

वित्त विभाग हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २५ फेब्रुवारी २०२३.

अधिसूचना

महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२.

क्रमांक मूवक-१५२३/प्र.क्र. ०६/कराधान-१.-----ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाची अशी खात्री झाली आहे की, महाराष्ट्र मूल्यर्वधित कर नियम, २००५ मध्ये तात्काळ सुधारणा करण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२ (२००५ चा महा. ९) च्या कलम ८३ च्या उप-कलम (४) च्या परंतुकानुसार सदर नियमांना पूर्व प्रसिद्धी देण्याची अट पाळण्याची गरज नाही ;

म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ८३ च्या उप-कलम (४) च्या परंतुकासह उप-कलमे (१), (२) आणि (३) च्या शक्तींचा वापर करून तसेच यासंदर्भात प्राप्त झालेल्या सर्व अधिकारांचा वापर करून, याद्वारे महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र मुल्यर्वधित कर नियम, २००५ मध्ये खालील सुधारणा करीत आहे, म्हणजेच :----

१. या नियमांना महाराष्ट्र मूल्यर्वधित कर (सुधारणा) नियम, २०२३ असे संबोधण्यात येईल. २. महाराष्ट्र मूल्यर्वधित कर नियम, २००५ च्या नियम ५४ मधील खंड (क) मध्ये, " केंद्रिय विक्रीकर अधिनियम " या शब्दांच्या आधी " दिनांक १ जुलै २०१७ च्या लगतपूर्वी लागू असलेल्या," हे शब्द आणि अंक दाखल करण्यात येत असून ते दिनांक ३० जून २०१७ पासून दाखल करण्यात आलेले आहेत असे समजण्यात यावे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

मंदार केळकर, शासनाचे उप सचिव.

(१) भाग चार-ब--४४----१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी २५, २०२३/फाल्गुन ६, शके १९४४ FINANCE DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 25th February 2023.

NOTIFICATION

MAHARASHTRA VALUE ADDED TAX ACT, 2002.

No. VAT-1523/CR-06/Taxation-1.—Whereas, the Government of Maharashtra is satisfied that circumstances exist which render it necessary to take immediate action further to amend the Maharashtra Value Added Tax Rules, 2005 and to dispense with the condition of previous publication thereof under the proviso to sub-section (IV) of section 83 of the Maharashtra Value Added Tax Act, 2002 (Mah. IX of 2005) ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-sections (I), (II) and (III) read with the proviso to sub-section (IV) of section 83 of the said Act, and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby, makes the following rules further to amend the Maharashtra Value Added Tax Rules, 2005, namely :—

1. These rules may be called the Maharashtra Value Added Tax (Amendment) Rules, 2023.

2. In clause (c) of rule 54 of the Maharashtra Value Added Tax Rules, 2005, after the words and figures, " Central Sales Tax Act, 1956, " the words, figures and letters " as it stood immediately before 1st July 2017, " shall be inserted and shall be deemed to have been inserted with effect from the 30th June 2017.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

MANDAR KELKAR,

Deputy Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 25 February 2023. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2023-02-25.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2023-02-25.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.