RNI No. MAHBIL /2009/40124
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग पाच
वर्ष ९, अंक १] सोमवार, फेब्रुवारी २७, २०२३/फाल्गुन ८, शके १९४४ [पृष्ठे ३, किंमत : रुपये २६.००
असाधारण क्रमांक १
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधानपरिषदेत सादर केलेली विधेयके.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय
महाराष्ट्र विधानसभेत दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ रोजी पुर:स्थापित करण्यात आलेले खालील विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियम ११६ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे :—
L. A. BILL No. I OF 2023.
A BILL
FURTHER TO AMEND THE MUMBAI MUNICIPAL CORPORATION ACT AND THE MAHARASHTRA MUNICIPAL CORPORATIONS ACT.
सन २०२३ चे विधानसभा विधेयक क्रमांक १.
मुंबई महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम
यांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी विधेयक.
१८८८ चा ३.
१९४९ चा ५९.
ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, मुंबई महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम यांमध्ये सुधारणा करणे इष्ट आहे ; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या चौयाहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :----
प्रकरण एक
प्रारंभिक.
संक्षिप्त नाव.
१. या अधिनियमास, मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) अधिनियम, २०२३, असे म्हणावे.
(१)
भाग पाच----१---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २७, २०२३/फाल्गुन ८, शके १९४४
प्रकरण दोन
मुंबई महानगरपालिका अधिनियमाची सुधारणा.
१८८८ चा ३.
२. मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ५ मध्ये, पोट-कलम (१) मधील, खंड (ब) मध्ये, " पाच पालिका सदस्य " या मजकुराऐवजी, " दहा नामनिर्देशित पालिका सदस्य " हा मजकूर दाखल करण्यात येईल.
सन १८८८ चा अधिनियम क्रमांक ३ याच्या कलम ५ ची सुधारणा.
प्रकरण तीन
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाची सुधारणा.
१९४९ चा ५९.
सन १९४९ चा अधिनियम क्रमांक ५९ याच्या कलम ५ ची सुधारणा.
३. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ५ मध्ये, पोट-कलम (२) मधील, खंड (ब) मध्ये, " पाच पेक्षा अधिक नसतील इतक्या " या मजकुराऐवजी, " निवडून आलेल्या पालिका सदस्यांच्या एकूण संख्येच्या दहा टक्क्यांपेक्षा अधिक नसतील इतक्या किंवा दहा, यापैकी जी कमी असेल इतक्या " हा मजकूर दाखल करण्यात येईल.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २७, २०२३/फाल्गुन ८, शके १९४४ ३उद्देश व कारणे यांचे निवेदन.
मुंबई महानगरपालिका अधिनियम (१८८८ चा ३) याच्या कलम ५ मध्ये, पोट-कलम (१) मधील खंड (ब) मध्ये अशी तरतूद आहे की, पालिका प्रशासनातील विशेष ज्ञान किंवा अनुभव असलेल्या पाच नामनिर्देशित पालिका- सदस्यांचा, महानगरपालिकेत समावेश असेल आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (१९४९ चा ५९) याच्या कलम ५ मध्ये, पोट-कलम (२) मधील खंड (ब) मध्ये अशी तरतूद आहे की, पालिका प्रशासनातील विशेष ज्ञान किंवा अनुभव असलेल्या पाच पेक्षा अधिक नसतील अशा संख्येतील नामनिर्देशित पलिका-सदस्यांचा प्रत्येक महानगरपालिकेत समावेश असेल.
२. पालिका प्रशासनातील ज्ञान व अनुभव असलेल्या व्यक्तीला, राज्यातील महानगरपालिकांच्या अधिक प्रभावी प्रशासनासाठी पालिका-सदस्य म्हणून नामनिर्देशित केले जाते. अशा प्रकारे नामनिर्देशित केलेल्या पालिका- सदस्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा वापर करून, महानगरपालिकांच्या कामकाजात गुणात्मक रीतीने सुधारणा करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये नामनिर्देशित पालिका-सदस्यांची संख्या पाच वरून दहा आणि राज्यातील इतर महानगरपालिकांमध्ये निवडून आलेल्या पालिका-सदस्यांची संख्या पाच पेक्षा अधिक नसतील वरून एकूण संख्येच्या दहा टक्क्यांपेक्षा अधिक नसतील इतक्या किंवा दहा, यापैकी जी कमी असेल इतक्या पालिका-सदस्यांच्या संख्येत वाढ करणे इष्ट आहे असे शासनास वाटते. म्हणून, मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ५(१)(ब) आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ५(२)(ब) यांमध्ये सुयोग्य सुधारणा करण्याचे प्रस्तावित केले आहे.
३. वरील उद्दिष्टे साध्य करणे हा, या विधेयकाचा हेतू आहे.
मुंबई, दिनांक २२ फेब्रुवारी, २०२३.
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री.
विधान भवन : मुंबई, दिनांक २७ फेब्रुवारी, २०२३.
राजेन्द्र भागवत, प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानसभा.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.