RNI No. MAHBIL /2009/40124
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग पाच
वर्ष ९, अंक २] मंगळवार, फेब्रुवारी २८, २०२३/फाल्गुन ९, शके १९४४ [पृष्ठे ५, किंमत : रुपये २६.००
असाधारण क्रमांक ३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधानपरिषदेत सादर केलेली विधेयके.
---------------------------------
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय
महाराष्ट्र विधानसभेत दिनांक २८ फेब्रुवारी, २०२३ रोजी पुर:स्थापित करण्यात आलेले खालील विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियम ११६ अन्वयेे प्रसिद्ध करण्यात येत आहेे :-----
L. A. BILL No. III OF 2023.
A BILL TO AMEND THE DR. BABASAHEB AMBEDKAR TECHNOLOGICAL UNIVERSITY ACT, 2014 AND THE MAHARASHTRA COEP
TECHNOLOGICAL UNIVERSITY ACT, 2022.
सन २०२३ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ अधिनियम, २०१४ आणि महाराष्ट्र
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ अधिनियम, २०२२ या अधिनियमांमध्ये
सुधारणा करण्यासाठी विधेयक.
ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ अधिनियम, २०१४ आणि महाराष्ट्र सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ अधिनियम, २०२२ या अधिनियमांमध्ये सुधारणा करणे इष्ट आहे ; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या चौयाहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :---
२०१४ चा महा. २९. २०२२ चा महा. ३५.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २८, २०२३/फाल्गुन ९, शके १९४४ प्रकरण एकप्रारंभिक.
संक्षिप्त नाव. १. या अधिनियमास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ आणि महाराष्ट्र सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ (सुधारणा) अधिनियम, २०२३, असे म्हणावे.
प्रकरण दोन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ अधिनियम, २०१४ याची सुधारणा.
२. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ अधिनियम, २०१४ याच्या कलम १३ मध्ये,— २०१४ चा महा. २९.
(१) पोट-कलम (१) मधील,-----
(क) खंड (क) मध्ये,----
सन २०१४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २९ याच्या कलम १३ ची सुधारणा.
(एक) " एक समिती " या मजकुराऐवजी, " एक शोध-नि-निवड समिती " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
(दोन) उप-खंड (एक) ऐवजी, पुढील उप-खंड दाखल करण्यात येईल :------
" (एक) कुलपतीने नामनिर्देशित केलेला सदस्य, जो उच्च शिक्षण क्षेत्रातील विख्यात व्यक्ती असेल आणि जो एकतर, शिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय ख्यातीची विख्यात विद्वान व्यक्ती किंवा पद्म पुरस्कारप्राप्त व्यक्ती असेल ;" ;
(तीन) उप-खंड (तीन) नंतर, पुढील उप-खंड समाविष्ट करण्यात येईल :------
" (चार) विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षाने नामनिर्देशित केलेला
सदस्य ;" ;
(ख) खंड (ग) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येईल :----
" (ग) समितीवर नामनिर्देशित केलेले सदस्य, अशा व्यक्ती असतील की ज्या, विद्यापीठाशी किंवा विद्यापीठाच्या कोणत्याही महाविद्यालयाशी किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त परिसंस्थेशी कोणत्याही रीतीने संबंधित असणार नाहीत ;" ;
(ग) खंड (घ) मधील, " तीन " हा मजकूर वगळण्यात येईल ;
(२) पोट-कलम (४) मधील,-----
(क) खंड (ख) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येतील :----
" (ख) उच्चस्तरीय क्षमता, सचोटी, नैतिकता व संस्थात्मक बांधिलकी असलेली व्यक्ती असेल ; आणि कोणत्याही विद्यापीठात प्राध्यापक म्हणून किमान दहा वषार्ंचा अनुभव असलेला किंवा शैक्षणिक नेतृव सिद्ध केल्याच्या पुराव्यासह लौकिकप्राप्त संशोधन किंवा शैक्षणिक प्रशासकीय संघटनेतील दहा वषार्ंचा अनुभव असलेला विख्यात शिक्षणतज्ज्ञ असेल ;" ;
(ख) खंड (ङ) मधील, " शैक्षणिक अर्हता " या मजकुराऐवजी, " अतिरिक्त शैक्षणिक अर्हता " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
(३) पोट-कलम (६) नंतर, पुढील पोट-कलम समाविष्ट करण्यात येईल :-----
" (६क) जर कुलपतीने निवड केलेली व्यक्ती, कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारीत नसेल तर, कुलपतीस, नामिकेतील उर्वरित व्यक्तींमधून अन्य सुयोग्य व्यक्तीची निवड करता येईल किंवा त्यास, एकतर त्याच समितीकडून किंवा या प्रयोजनासाठी नवीन समिती घटित केल्यानंतर, अशा नवीन समितीकडून, नवीन नामिकेची मागणी करता येईल .".
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २८, २०२३/फाल्गुन ९, शके १९४४ ३ प्रकरण तीनमहाराष्ट्र सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ अधिनियम, २०२२ याची सुधारणा.
४. महाराष्ट्र सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ अधिनियम, २०२२ याच्या कलम ११ मध्ये,-----
२०२२ चा महा. ३५.
(१) पोट-कलम (३) मधील,-----
(क) खंड (क) मध्ये,----
सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३५ याच्या कलम ११ ची सुधारणा.
(एक) उप-खंड (एक) ऐवजी, पुढील उप-खंड दाखल करण्यात येईल :-----
" (एक) कुलपतीने नामनिर्देशित केलेला सदस्य, जो उच्च शिक्षण क्षेत्रातील विख्यात व्यक्ती असेल आणि जो एकतर, शिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय ख्यातीची विख्यात विद्वान व्यक्ती किंवा पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्ती असेल ;";
(दोन) उप-खंड (तीन) नंतर, पुढील उप-खंड समाविष्ट करण्यात येईल :-----
" (चार) विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षाने नामनिर्देशित केलेला सदस्य ; " ;
(ख) खंड (ग) मधील, " तीन " हा मजकूर वगळण्यात येईल ;
(ग) खंड (घ) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येईल :----
" (घ) समितीवर नामनिर्देशित केलेले सदस्य, अशा व्यक्ती असतील की ज्या, विद्यापीठाशी किंवा विद्यापीठाच्या कोणत्याही महाविद्यालयाशी किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त परिसंस्थेशी कोणत्याही रीतीने संबंंधित असणार नाहीत ; " ;
(घ) खंड (च) मध्ये,-----
(एक) उप-खंड (एक) पूर्वी, पुढील खंड समाविष्ट करण्यात येईल :----
" (एक-१) उच्चस्तरीय क्षमता, सचोटी, नैतिकता व संस्थात्मक बांधिलकी असलेली व्यक्ती असेल ;";
(दोन) उप-खंड (चार) मध्ये,-----
(१) " शैक्षणिक अर्हता " या मजकुराऐवजी, " अतिरिक्त शैक्षणिक अर्हता " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
(२) परंतुकामधील, " शैक्षणिक अर्हता " या मजकुराऐवजी, " अतिरिक्त शैक्षणिक अर्हता " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २८, २०२३/फाल्गुन ९, शके १९४४(२) पोट-कलम (४) मधील,-----
(क) विद्यमान परंतुकापूर्वी, पुढील परंतुक समाविष्ट करण्यात येईल :-----
" परंतु, जर कुलपतीने निवड केलेली व्यक्ती, कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारीत नसेल तर, कुलपतीस, नामिकेतील उर्वरित व्यक्तींमधून अन्य सुयोग्य व्यक्तीची निवड करता येईल किंवा त्यास, एकतर त्याच समितीकडून किंवा या प्रयोजनासाठी नवीन समिती घटित केल्यानंतर, अशा नवीन समितीकडून, नवीन नामिकेची मागणी करता येईल : " ;
(ख) विद्यमान परंतुकामधील, " परंतु " या मजकुराऐवजी, " परंतु आणखी असे की, " हा मजकूर दाखल करण्यात येईल.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २८, २०२३/फाल्गुन ९, शके १९४४ ५उद्देश व कारणे यांचे निवेदन.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ अधिनियम, २०१४ (२०१४ चा महा. २९) याचे कलम १३ व महाराष्ट्र सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ अधिनियम, २०२२ (२०२२ चा महा. ३५) याचे कलम ११ यांमध्ये कुलगुरूची नियुक्ती करण्यासाठी पात्रता निकषांची व निवड समिती घटित करण्याची तरतूद केली आहे.
२. कुलगुरूची नियुक्ती करण्यासाठी पात्रता निकषांच्या व निवड समिती घटित करण्याच्या तरतुदींमध्ये, विद्यापीठ अनुदान आयोग अधिनियम, १९५६ (१९५६ चा ३) अन्वये तयार केलेल्या विद्यापीठ अनुदान आयोग (विद्यापीठांमधील व महाविद्यालयांमधील अध्यापकांच्या व इतर विद्याविषयक कर्मचारीवर्गाच्या नियुक्तीच्या किमान अर्हता आणि उच्च शिक्षणातील मानके राखण्याच्या इतर उपाययोजना) विनियम, २०१८ याद्वारे विद्यापीठ अनुदान आयोगाकडून फेरबदल करण्यात आले आहेत.
३. सर्वोच्च न्यायालयाने, गंभीरदान के. गढवी- विरुद्ध- गुजरात राज्य व इतर [रिट याचिका (दिवाणी) क्रमांक २०१९ चा १५२५] आणि प्राध्यापक डॉ. श्रीजीत पी. एस.-विरुद्ध- डॉ. राजश्री एम. एस. व इतर (दिवाणी अपील क्रमांक २०२२ चा ७६३४-७६३५) या प्रकरणांमध्ये असा निर्णय दिलेला आहे की, कुलगुरूचे पात्रता निकष व नियुक्ती, नेहमीच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या संबंंधित विनियमांनुसार असेल आणि जर राज्य अधिनियम, विद्यापीठ अनुदान आयोग विनियमांशी अनुरूप नसतील तर, ते, लागू असलेल्या विद्यापीठ अनुदान आयोग विनियमांशी अनुरूप करण्यासाठी त्यात सुधारणा केली पाहिजे आणि त्यात सुधारणा करण्यात येईपयर्ंत, लागू असलेले विद्यापीठ अनुदान आयोग विनियम, अधिभावी असतील.
४. वरील वस्तुस्थिती विचारात घेता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ अधिनियम, २०१४ व महाराष्ट्र सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ अधिनियम, २०२२ यांमध्ये अंतभर्ूत असलेल्या कुलगुरूची नियुक्ती करण्याशी संबंंधित, अस्तिवात असणाया तरतुदी, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विनियमांशी सुसंगत करण्यासाठी त्यांमध्ये यथोचित सुधारणा करण्याची गरज आहे.
५. वरील उद्दिष्टे साध्य करणे हा, या विधेयकाचा हेतू आहे.
मुंबई, दिनांक २६ फेब्रुवारी, २०२३.
चंद्रकांत (दादा) पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री.
विधान भवन : मुंबई,
राजेन्द्र भागवत, प्रधान सचिव,
दिनांक २८ फेब्रुवारी, २०२३.
महाराष्ट्र विधानसभा.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.