Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-KDS (Weekly) (Dated 2-8, March 2023)

Published 02 March 2023

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-03-02.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २-८, २०२३/फाल्गुन ११-१७, शके १९४४ १ RNI No. MAHBIL/2009/35529

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ९, अंक ९] गुरुवार ते बुधवार, मार्च २-८, २०२३/फाल्गुन ११-१७, शके १९४४ [पृष्ठे १६ किंमत रुपये : १४.००

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी

जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, रायगड-अलिबाग यांजकडून

आदेश

क्रमांक जिउनि/कात-६/कलम-१५६/आदेश/लोकनेते श्री अ. साबळे पतसंस्था/११२/सन २०२२.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ (१) मधील तरतुदीनुसार अध्यक्ष, लोकनेते श्री. अशोकदादा साबळे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., खांदाड, ता. माणगांव, जि. रायगड यांचेकडील दिनांक १२ जानेवारी २०२३ रोजीच्या प्रस्तावानुसार संस्थेच्या थकीत कर्जदारांकडून कर्ज वसुली होण्याकरीता संस्थेचे व्यवस्थापक, श्री. मणिराम सखाराम मुंढे यांना संपुर्ण माणगाव तालुका कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१ व कलम ९१ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी/कर्ज वसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ (१) व नियम १०७ अनुसार वसुली अधिकारी म्हणून मालमत्ता जप्त करुन व तिची विक्री करुन रक्कम वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार खालील अटीस अधिन राहून या आदेशाचा दिनांक ते दिनांक ३१ मार्च २०२३ या कालावधीकरीता प्रदान करीत आहे-

अटी :–

(१) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम, १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करुन आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील.

(२) सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१ व ९१ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरीता असतील.

(३) वसुली अधिकारी यांनी दरमहा विहीत नमुन्यात १,२,३ व ५ प्रमाणे कर्ज वसुलीची माहिती या कार्यालयास सादर करावी.

(४) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवानिवृत्ती झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास अशा अधिकायास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.

(५) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.

(६) शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-१५०४/प्र.क्र.२३१/१५-स दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये वसुली अधिकायांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.

(१)

भाग एक (को.वि.पु.)-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २-८, २०२३/फाल्गुन ११-१७, शके १९४४ (७) वसुली अधिकायास त्याच्या नावापुढे कोठेही " महाराष्ट्र शासन नियुक्त " आणि किंवा " सिव्हील कोर्ट " " एक्झीक्युटीव्ह कोर्ट " या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिकायांनी त्यांच्या नावापुढे " वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ चे नियम, १०७ अन्वये ) " असे लिहावे.

(८) वसुली अधिकायास वसुलीसाठी वापर करण्यात येणाया वाहनावर " वसुली अधिकारी, लोकनेते श्री. अशोकदादा साबळे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., खांदाड, ता. माणगांव, जि. रायगड " असा फलक लावता येऊ शकेल.

(९) वसुली अधिकायाने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या/जामीनदाराच्या पगारकपाती बाबत राष्ट्रीयकृत बँका वा अन्य बँका यांचेकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर वेतन कपात करता येणार नाही.

(१०) वसुली अधिकायास, थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसूलपात्र रक्कम मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजीचे आदेशामध्ये निश्चित केलेल्या हुकूमनाम्याच्या/वसुलीच्या दाखल्याच्या आदेशिकेचा खर्चाच्या (Cost of Process) दराने वसूल करावयाची रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम थकबाकीदारांकडून वसूल करता येणार नाही. सदर खर्चाची आकारणी व विनियोग याबाबत प्रकरणनिहाय हिशोब ठेवावयाचा असून त्याची तपासणी अर्जदार बँकेच्या वैधानिक लेखापरिक्षकांकडून करुन घ्यावयाची आहे.

(११) वसुली अधिकारी यांनी मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ व दिनांक २३ एप्रिल २०२२ रोजीच्या परिपत्रकातील सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावयाची आहे. सदर परिपत्रकातील सूचनांचे उल्लंघन झाल्यास वसूलीचे अधिकार काढून घेण्यात येऊन भविष्यकाळात असे अधिकार प्रदान केले जाणार नाहीत.

(१२) वसुली अधिकारी यांनी निर्गमित करावयाच्या नोटीस/आदेश/ घोषणा यामध्ये त्यांना अधिकार प्रदान केलेल्या आदेशाचा संदर्भ नमूद करावा.

(१३) संस्थेचे अध्यक्षांनी त्यांचे स्तरावर वेळोवेळी वसुली अधिकारी कामकाज आढावा घेणे तसेच वसुली अधिकारी यांना वेळोवेळी वसुली संबंधांत उजळणी प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करुन त्यासंबंधात कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास वेळोवेळी सादर करावा.

डॉ. सोपान शिंदे,

रायगड-अलिबाग, दिनांक २० जानेवारी २०२३.

जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, रायगड-अलिबाग.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २-८, २०२३/फाल्गुन ११-१७, शके १९४४

जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, रायगड-अलिबाग यांजकडून

आदेश

क्रमांक जिउनि/कात-६/कलम-१५६/आदेश/श्री सिद्धिविनायक बँक/५३३४/सन २०२२.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ (१) मधील तरतूदीनुसार व्यवस्थापक, श्री सिद्धवििनायक नागरी सहकारी बँक लि. (अवसायनात) मोहोपाडा, ता. खालापूर यांचेकडील दिनांक १ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या प्रस्तावानुसार सदर बँकेचे श्री शरद गंगाराम रसाळ, व्यवस्थापक यांस संपूर्ण रायगड जिल्हा कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१, १०५ ९१ व कलम ९८ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी/कर्ज वसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ (१) व नियम १०७ अनुसार वसुली अधिकारी म्हणून मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रक्कम वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार खालील अटीस अधिन राहून या आदेशाचा दिनांक ते दिनांक ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीकरिता प्रदान करीत आहे-

अटी :–

(१) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम, १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील.

(२) सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१, १०५ व ९८ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.

(३) वसुली अधिकारी यांनी दरमहा विहीत नमुन्यात १, २, ३ व ५ प्रमाणे कर्ज वसुलीची माहिती या कार्यालयास सादर करावी.

(४) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवानिवृत्ती झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास अशा अधिकायास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.

(५) वसुली अधिकारी यांनी नमुद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.

(६) शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-१५०४/प्र.क्र.२३१/१५-स दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये वसुली अधिकायांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.

(७) वसुली अधिकायास त्याच्या नावापुढे कोठेही " महाराष्ट्र शासन नियुक्त " आणि किंवा " सिव्हील कोर्ट " " एक्झीक्युटीव्ह कोर्ट " या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्या ऐवजी वसुली अधिकायांनी त्यांच्या नावापुढे " वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ चे नियम १०७ अन्वये) " असे लिहावे.

(८) वसुली अधिकायास वसुलीसाठी वापर करण्यात येणाया वाहनावर " वसुली अधिकारी, श्री सिद्धवििनायक नागरी सहकारी बँक लि.

(अवसायनात) माहोपाडा, ता. खालापूर " असा फलक लावता येऊ शकेल.

(९) वसुली अधिकायाने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या/ जामीनदाराच्या पगार कपाती बाबत राष्ट्रीयकृत बँका वा अन्य बँका यांचेकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर वेतन कपात करता येणार नाही.

(१०) वसुली अधिकायास, थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसूलपात्र रक्कम मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजीचे आदेशामध्ये निश्चित केलेल्या हुकूमनाम्याच्या/वसुलीच्या दाखल्याच्या आदेशिकेचा खर्चाच्या (Cost of Process) दराने वसूल करावयाची रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम थकबाकीदारांकडून वसूल करता येणार नाही. सदर खर्चाची आकारणी व विनियोग याबाबत प्रकरणनिहाय हिशोब ठेवावयाचा असून त्याची तपासणी अर्जदार बँकेच्या वैधानिक लेखापरिक्षकांकडून करून घ्यावयाची आहे.

(११) वसुली अधिकारी यांनी मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ व दिनांक २३ एप्रिल २०२२ रोजीच्या परिपत्रकातील सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावयाची आहे. सदर परिपत्रकातील सूचनांचे उल्लंघन झाल्यास वसुलीचे अधिकार काढून घेण्यात येऊन भविष्यकाळात असे अधिकार प्रदान केले जाणार नाहीत.

भाग एक (को.वि.पु.)-----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २-८, २०२३/फाल्गुन ११-१७, शके १९४४ (१२) वसुली अधिकारी यांनी निर्गमित करावयाच्या नोटीस/आदेश/घोषणा यामध्ये त्यांना अधिकार प्रदान केलेल्या आदेशाचा संदर्भ नमूद करावा.

(१३) बँकेचे अवसायक यांनी या कार्यालयात दरमहा होणाया विशेष वसुली अधिकारी यांचे आढावा सभेस आवश्यक त्या माहितीसह उपस्थित राहणे आवश्यक आहे.

डॉ. सोपान शिंदे,

रायगड-अलिबाग, दिनांक १७ नोव्हेंबर २०२२.

जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, रायगड-अलिबाग.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २-८, २०२३/फाल्गुन ११-१७, शके १९४४

PRINCIPAL DISTRICT AND SESSIONS JUDGE, SINDHUDURG

Order

No. Admn./154/2023.— Smt. R. R. Bedagkar, Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Sawantwadi, is granted earned leave for 03 days from 16th January 2023 to 18th January 2023.

No locum tenens is necessary. On return from leave Smt. R. R. Bedagkar, is re-posted as Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Sawantwadi.

Certified that, under note 2 below Rule 39 of M.C.S. (Pay) Rule 1981, Smt. R. R. Bedagkar, would have been continued to an officiate as Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Sawantwadi had she not proceeded on leave as above.

During the abovesaid leave period, the charge of the Court of the Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Sawantwadi alongwith the charge of the Court of the Jt. Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Sawantwadi, shall remain with Smt. A. J. Bachulkar, Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Kudal.

The Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Sawantwadi is directed to hand over the charge of her Court alongwith the charge of the Court of the Jt. Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Sawantwadi to the Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Kudal.

The Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Sawantwadi is directed to submit joining report to this office, in view of provisions contained in para 571 of Chapter XXX of Civil Manual.

Contents of this order be communicated to the officers concerned.

Sindhudurg, dated 17th January 2023.

S. J. BHARUKA, Principal District and Sessions Judge, Sindhudurg.

PRINCIPAL DISTRICT AND SESSIONS JUDGE, SINDHUDURG

Order

No. Admn./181/2023.— Smt. R. R. Bedagkar, Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Sawantwadi, is granted earned leave for 02 days on 19th January 2023 and 20th January 2023 with permission to prefix earned leave from 16th January 2023 to 18th January 2023.

No locum tenens is necessary. On return from leave Smt. R. R. Bedagkar, is re-posted as Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Sawantwadi.

Certified that, under note 2 below Rule 39 of M.C.S. (Pay) Rule, 1981, Smt. R. R. Bedagkar, would have been continued to an officiate as Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Sawantwadi had she not proceeded on leave as above.

During the abovesaid leave period, the charge of the Court of the Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Sawantwadi alongwith the charge of the Court of the Jt. Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Sawantwadi, shall remain with Smt. A. J. Bachulkar, Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Kudal.

The Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Sawantwadi is directed to submit joining report to this office, in view of provisions contained in para 571 of Chapter XXX of Civil Manual.

Contents of this order be communicated to the officers concerned.

Sindhudurg, dated 20th January 2023.

S. J. BHARUKA, Principal District and Sessions Judge, Sindhudurg.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २-८, २०२३/फाल्गुन ११-१७, शके १९४४

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांजकडून

आदेश

क्रमांक पोआ/११(६)/(०२)/ए.पी./३७(३)/१०(३)/२०२३.----ज्याअर्थी, विविध स्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शांतता व सार्वजनिक सुव्यवस्था भंग होण्याची शक्यता आहे आणि मानवी जीवन आणि मालमत्तेचे नुकसान यास गंभीर धोका आहे.

त्याअर्थी, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या नियंत्रणाखालील भागात सार्वजनिक शांतता बिघडवणे आणि मानवी जीवितास धोका आणि मालमत्तेची हानी आणि कोणत्याही प्रकारची दंगल रोखण्यासाठी पाच किंवा अधिक व्यक्तींच्या हालचाली आणि बेकायदेशीर एकत्र येण्यावर प्रतिबंध घालण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करणे हिताचे मानले जाते.

आता, म्हणून, मी, विशाल ठाकूर, पोलीस उप आयुक्त (अभियान), बृहन्मुंबई, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ (१९५१ चा महा. अधिनियम XXII) च्या कलम १० मधील पोट-कलम (२) सह कलम ३७ मधील पोट-कलम (३) द्वारे मला बहाल केलेल्या अधिकारांचा वापर करताना, याद्वारे ५ फेब्रुवारी २०२३ रोजी ००-०१ वाजलेपाहुन सुरू होणाया आणि १९ फेब्रुवारी २०२३ रोजी २४-०० वाजता संपणाया १५ दिवसांसाठी संपूर्ण बृहन्मुंबई शहरात खालील प्रतिबंध लागू करीत आहे :---

(१) पाच किंवा अधिक व्यक्तींच्या कोणत्याही संमेलनास प्रतिबंध.

(२) कोणत्याही व्यक्तीची कोणतीही मिरवणूक आणि

(३) कोणत्याही मिरवणुकीत लाउडस्पीकर, वाद्ये, वाद्य बँड आणि फटाके फोडण्याचा कोणताही वापर.

आदेशात समाविष्ट असलेल्या मनाईसाठी खालीलप्रमाणे सूट देण्यात आली आहे.---

(अ) सर्व प्रकारचे विवाह समारंभ इ.

(ब) अंत्यसंस्कार सभा आणि स्मशानभूमी / दफन स्थळांच्या मार्गावर मिरवणूक.

(क) कंपन्या, क्लब, सहकारी संस्था इतर संस्था आणि संघटनांची कायदेशीर बैठका.

(ड) सामाजिक मेळावे, आणि क्लब, सहकारी संस्था, इतर सोसायटया आणि संघटना यांचे सामान्य व्यवहार करण्यासाठी त्यांची बैठक.

(ई) चित्रपटगृहे, नाटकगृहे किंवा सार्वजनिक करमणुकीच्या कोणत्याही ठिकाणी किंवा त्याभोवती चित्रपट, नाटक किंवा कार्यक्रम पाहण्याच्या उद्देशाने संमेलने.

(फ) सरकारी किंवा निमशासकीय कार्ये पार पाडण्यासाठी सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची कायदे न्यायालये आणि कार्यालयांमध्ये किंवा त्याभोवती लोकांचे संमेलन.

(ग) शैक्षणिक उपक्रमांसाठी शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये किंवा त्यांच्या आसपास संमेलने.

(घ) कारखाने, दुकाने, आणि आस्थापनांमध्ये सामान्य व्यापार, व्यवसाय आणि आवाहनासाठी संमेलने.

(ह) अशा इतर संमेलने आणि मिरवणुकी, ज्यांना विभागीय पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई आणि त्यांचे पर्यवेक्षक अधिकारी यांनी परवानगी दिली आहे.

वरील नमूद केलेल्या कालावधीनंतर जरी या आदेशाची मुदत संपली तरी,----

(अ) कोणताही तपास किंवा कायदेशीर कार्यवाही सुरू केली जाऊ शकते, चालू ठेवली जाऊ शकते किंवा लागू केली जाऊ शकते.

(ब) या आदेशाच्या कोणत्याही उल्लंघनाच्या संदर्भात झालेला कोणताही दंड, शिक्षा, जप्ती हा आदेश कालबा झाला नसल्याप्रमाणे लागू केली जाऊ शकते.

मी पुढे असे निर्देश देतो की, हा आदेश बृहन्मुंबईत सार्वजनिक ठिकाणे, न्यायालये, सरकारी कार्यालये यांच्या सुस्पष्ट भागांमध्ये त्याच्या प्रती चिकटवून आणि लाऊडस्पीकर किंवा मेगाफोनच्या माध्यमातून तसेच उपलब्ध असलेल्या कोणत्याही स्वरूपात प्रसारमाध्यमांद्वारे प्रसिद्ध करून प्रकाशित केला जाईल.

सदरचा आदेश माझ्या सही शिक्क्यानिशी आज दिनांक १ फेब्रुवारी २०२३ रोजी दिला आहे.

विशाल ठाकूर, पोलीस उप आयुक्त (अभियान), तथा कार्यकारी दंडाधिकारी बृहन्मुंबई.

७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २-८, २०२३/फाल्गुन ११-१७, शके १९४४

OFFICE OF THE COMMISSIONER OF POLICE, BRIHAN MUMBAI

Order

No. CP/XI (6)/(02)/A.P./37(3)/10(3)/2023.— WHEREAS, based on the information received from various sources, it is apprehended that there is likelihood of breach of peace and disturbance of public tranquility and also there is grave danger to human lives and loss of properties. On that account, it is considered expedient to issue prohibitory order for restricting movement and unlawful assembly of five or more persons for prevention of breach of peace, disturbance to public tranquility and danger to human lives and loss of properties, and to prevent any kind of riot or affray in the areas under the control of Commissioner of Police, Brihan Mumbai.

NOW, THEREFORE, I, Vishal Thakur, Dy. Commissioner of Police (Operations), Brihan Mumbai in exercise of the powers conferred upon me by sub-section (3) of section 37 read with sub-section (2) of section 10 of the Maharashtra Police Act, 1951 (Mah. Act XXII of 1951), do hereby prohibit, for the period commencing from 00-01 hours on 5th February 2023 and ending at 24-00 hours on 19th February 2023 throughout the City of Brihan Mumbai,

(i) Any assembly of five or more persons,

(ii) Any procession of any persons and

(iii) Any use of loudspeakers, amplifying instruments, musical band and bursting of crackers in any procession by the assembly.

The prohibition contained in the order is exempted for :—

(a) Marriage ceremony and matrimonial functions etc.

(b) Funeral assemblies and procession on way to crematoriums/burial places.

(c) Statutory meeting of companies, clubs, co-operative societies, other societies and associations.

(d) Social gathering and meeting of clubs, co-operative societies, other societies and associations to transact their normal business.

(e) Assemblies in or around Cinema houses, theatres or any place of public amusement for the purpose of watching films, dramas or performances as the case may be.

(f) Assemblies in or around courts of law and offices of the Government and local bodies in discharge of Governmental or Semi-Governmental functions.

(g) Assemblies in or around schools, colleges and other educational institutions for academic activities.

(h) Assemblies in factories, shops, and establishments for normal trade, business and callings.

(i) Such other assemblies and the processions as may be permitted by Zonal Deputy Commissioners of Police, Brihan Mumbai and their supervisory officers.

Notwithstanding the expiration of this order after the period here in above mentioned.

(a) Any investigation or legal proceeding may be instituted, continued or enforced.

(b) Any penalty, forfeiture of punishments incurred in respect of any contravention of this order may be imposed as if this order had not expired.

I further direct that this order will be published and promulgated in Brihan Mumbai

by affixing copies thereof, in conspicuous part of public places, courts, Govt. Offices and

by proclaiming the same through loudspeakers or megaphones as well as publishing

through media of whatever form available.

Given under my hand and seal on the 1st day of the February, 2023.

VISHAL THAKUR, Dy. Commissioner of Police (Operations), and Executive Magistrate, Greater Mumbai.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २-८, २०२३/फाल्गुन ११-१७, शके १९४४

पोलीस उप आयु, विशेष शाखा, ठाणे शहर यांजकडून

आदेश

क्रमांक ठाआ/विशा/कोविशिमसंनि/मनाई आदेश/०३/२०२३.---- ज्याअर्थी, उपोद्घातातील अनु. क्रमांक १ मधील अधिसुचनेनुसार महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघ कोकण विभागातील द्विवर्ाषिक निवडणुक - २०२२ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ठाणे जिल्ह्यत आदर्श आचारसंहिता दिनांक २९ डिसेंबर २०२२ रोजीपासून लागू झाली आहे. दिनांक ५ जानेवारी २०२३ पासुन ते दिनांक १२ जानेवारी २०२३ रोजी नामनिर्देशन पत्रे दाखल करणे व दिनांक १३ जानेवारी २०२३ रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होऊ न दिनांक १६ जानेवारी २०२३ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम दिनांक तसेच मतदान दिनांक ३० जानेवारी २०२३ रोजी होणार असुन मतदानाची वेळ सकाळी ०८:०० ते ०४:०० वा. पयर्ंत असून दिनांक २ फेब्रुवारी २०२३ रोजी मतमोजणी होणार आहे. दिनांक ४ फेब्रुवारी २०२३ रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघ कोकण विभागातील द्विवर्ाषिक निवडणुक - २०२२ चे अनुषंगाने मतदान साहित्य वाटप केंद्र व मतदान केंद्रांवर शांतता व सुरक्षितता राखण्याच्या दृष्टीने सदर ठिकाणी योग्य तो प्रतिबंधात्मक आदेश लागू करणे क्रमप्राप्त वाटते.

त्याअर्थी, उपरोक्त परिस्थितीत मी, "डॉ. श्रीकांत परोपकारी" पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा ठाणे शहर, पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांना फौजदारी दंड प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ (१) अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेले अधिकार त्यांनी कार्यालयीन आदेश जावक क्रमांक CP/SB/ORDERS/87/2022, DATE 07/04/2022 अन्वये आम्हास प्रदान केल्याने त्या अधिकाराचा वापर करून ठाणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ १ ठाणे, २ भिवंडी, ३ कल्याण व ४ उल्हासनगर हद्दीत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघ कोकण विभागातील द्विवर्ाषिक निवडणुक २०२२ निवडणुकीचे मतदान होणार असल्याने त्या इमारतींच्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरात खालील व्यक्तींशिवाय अन्य व्यक्तीस प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत असलेबाबत आदेश पारित करीत आहे :----

(१) नियुक्त केलेले निवडणूक निर्णय अधिकारी/निरीक्षक

(२) मतदान कामकाजाकरिता नियुक्त केलेले अधिकारी / कर्मचारी

(३) मतदार (मतदानाचे दिवशी)

(४) प्रत्येक उमेदवार त्यांचे सोबत एका वेळी एकच निवडणूक प्रतिनिधी

(५) निवडणुकीशी संबंधित कामावर असलेले इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी

(६) मतदारांचे कडेवर असलेले लहान मुल (मतदानाचे दिवशी)

(७) ज्या व्यक्तीस मदतीशिवाय चालता येत नाही किंवा मत देता येत नाही अशा अंध किंवा अपंग व्यक्तीला सोबत करणारी व्यक्ती (मतदानाचे दिवशी)

तसेच (१) मतदान केंद्रांचे (इमारतीचे) पासून १०० मीटर परिसराचे आतील सर्व व्यावसायिक दुकाने, रेस्टॉरंट, टपया, स्टॉल (अत्यावश्यक सेवा वगळून) सर्व आस्थापना बंद ठेवाव्यात.

(२) मतदान केंद्रांपासून १०० मीटरच्या आतील परिसरात मोबाईल, फोन, कॉडलेस फोन, इलेक्ट्रॉनिक घडयाळ इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादी नेण्यास प्रतिबंध जाहीर केला आहे.

(३) विविध पक्षांचे कार्यकत्यार्ंचे निवासस्थाने १०० मीटर आतील परिसरात असल्यास त्या ठिकाणी राहणारे कुटुंब व इतरांनी प्रचार करणे, बैठक घेणे, मतदान केंद्रांवर येणाया मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी कोणतेही कृत्य करण्यासाठी एकत्र जमणे व तसे कृत्य करू नये.

(४) शस्त्र परवाना धारकांनी त्यांची शस्त्रे मतदान केंद्रापासून १०० मीटरच्या आत घेऊ न जाऊ नयेत.

सदरचा आदेश ठाणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ १ ठाणे, २ भिवंडी, ३ कल्याण व ४ उल्हासनगर हद्दीतील महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघ कोकण विभागातील द्विवर्ाषिक निवडणुक - २०२२ निवडणूक असलेल्या कार्यक्षेत्रातील मतदान साहित्य वाटप केंद्र व मतदान केंद्र या इमारतींच्या परिसरात दिनांक २९ जानेवारी २०२३ रोजी ००.०१ पासून ते दिनांक ३० जानेवारी २०२३ रोजी २४.०० वाजे पयर्ंत अथवा मतदान प्रक्रिया संपुष्टात येईपयर्ंत अमलात राहील.

उपरोक्त मनाई आदेशाचे उल्लंघन करणाया व्यक्तींवर भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.

सदरचा आदेश दिनांक २७ जानेवारी २०२३ रोजी माझे सही व शिक्क्यानिशी दिला आहे.

डॉ. श्रीकांत परोपकारी, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर.

९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २-८, २०२३/फाल्गुन ११-१७, शके १९४४

पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे यांजकडून

अधिसूचना

क्रमांक विशा/मनाई आदेश/०३/२०२३.---- ज्याअर्थी, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना इत्यादीकडून जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेराव, धरणे, सभा, उपोषणे इ. कार्यक्रमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. दिनांक ०८ फेब्रुवारी २०२३ रोजी हाजीमलंग उरुस, मुख्य दिवस ( पालखी मिरवणूक ) दिनांक १४ फेब्रुवारी २०२३ रोजी व्हॅलेंटाईन डे, दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोजी महाशिवरात्री असे सण / उत्सव संपन्न होणार आहेत.

सदर घटनांच्या अनुषंगाने माझी खात्री झाली आहे की, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधीत राखण्याकामी प्रतिबंधक आदेश जारी करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, मी, डॉ. श्रीकांत परोपकारी, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर, आम्हांस पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये असलेले अधिकार त्यांनी कार्यालयीन आदेश जावक क्रमांक CP/SB / ORDERS/87/2022, DATE 07/04/2022 अन्वये प्रदान केल्याने त्या अधिकाराचा वापर करून ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात जिवीत व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खालील कृत्यांना मनाई आदेश देत आहे.

(१) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंड, बंदुका, लाठया किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करणे.

(२) दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(३) कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ आणि द्रव बाळगणे, बरोबर नेणे.

(४) सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादी.

(५) कोणत्याही इसमाचे चित्राचे / प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढायांच्या चित्राचे / प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(६) सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्यातील शांतता धोक्यात येईल किंवा ज्यामुळे राज्यशासन उलथून पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक प्रर्दशित करणे.

(७) पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्ये.

वरील मनाई आदेश खालील व्यक्तींना लागू राहणार नाहीत. जो कोणी इसम सरकारी नोकर आहे, किंवा ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल, किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिकायाने सूट दिलेली आहे.

सदर आदेश खालील मिरवणुका व जमावास लागू राहणार नाहीत.

(१) लग्न कार्यासाठी जमलेले लोक.

(२) प्रेत यात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका.

(३) सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेया येथे जमलेले लोक.

(४) सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय.

(५) पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकायांनी परवानगी दिलेल्या सभा / मिरवणुका.

(६) सर्व शासकीय / निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण.

सदर मनाई आदेश दिनांक ४ फेब्रुवारी २०२३ रोजी ००-०१ वाजेपासून दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोजी २४-०० वाजेपयर्ंत अंमलात राहील.

वरील मनाई आदेशाचा भंग करणाया विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात येईल.

ठाणे शहर, दिनांक १ फेब्रुवारी २०२३.

डॉ. श्रीकांत परोपकारी, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर.

भाग एक (को.वि.पु.)-----२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २-८, २०२३/फाल्गुन ११-१७, शके १९४४

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांजकडून

आदेश

क्रमांक पोआ/११(६)/एल. डब्ल्यू./३७(१)(२)/२(६)/१०(२)/(०२)/२०२३.----ज्याअर्थी, बृहन्मुंबईतील सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी मी, विशाल ठाकूर, पोलीस उप आयुक्त (अभियान), बृहन्मुंबई, मला दिलेल्या अधिकारांचा वापर करताना कलम ३७ चे उप कलम (१) आणि (२) कलम २ चे पोट-कलम (६) आणि कलम १० चे पोट-कलम (२) महाराष्ट्र पोलीस कायदा, (१९५१ चा महा. XXII) याद्वारे ४ फेब्रुवारी २०२३ च्या ००-०१ वाजलेपासून ते ५ मार्च २०२३ रोजी २४-०० वाजेपयर्ंत या कालावधीसाठी संपूर्ण बृहन्मुंबईमध्ये खालील गोष्टींना प्रतिबंधित करतो,

(अ) शस्त्रे, अग्निशस्त्रे, बॅटन, तलवारी, भाले, दंडूके, सोटे, विना परवाना बंदुका, चाकू, काठया किंवा लाठया किंवा इतर कोणतीही वस्तू जी शारीरिक हानी (हिंसा) करण्यासाठी वापरली जाऊ शकते अशी हत्यारे बाळगणे ज्या अधिकायाने परवाना दिला असेल किंवा सक्षम प्राधिकायाकडून अशी शस्त्रे वाहून नेण्यासाठी विशिष्ट परवानगी मागितली असेल अशा बंदुकांसाठी वगळता,

(ब) कोणताही संक्षारक पदार्थ किंवा स्फोटके वाहून नेणे,

(क) दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा उपकरणे किंवा क्षेपणास्त्रे टाकण्याची किंवा प्रक्षेपित करण्याची साधने, वाहून नेणे, गोळा करणे आणि तयार करणे,

(ड) व्यक्ती किंवा प्रेत किंवा आकृती किंवा पुतळे यांचे प्रदर्शन,

(ई) सार्वजनिक टिकाकरण उच्चार, गाणी गाणे संगीत वाजवणे,

(च) बृहन्मुंबई शहरात तैनात असलेल्या कोणत्याही पोलीस अधिकायाच्या मते, शालीनता किंवा शिष्टाचाराच्या विरोधात असणारी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणतीही वस्तू किंवा वस्तू तयार करणे, प्रदर्शन करणे किंवा प्रसारित करणे जेणे करून सामाजिक नैतिकता किंवा सुरक्षा धोक्यात येईल किंवा राज्य उलथून टाकणेस कारणीभूत ठरू शकेल.

२. जर कोणतीही व्यक्ती अशा कोणत्याही वस्तूसह सशस्त्र जात असेल किंवा अशा प्रतिबंधाचे उल्लंघन करत कोणताही उपरोधक पदार्थ किंवा स्फोटक किंवा क्षेपणास्त्र घेऊन जात असेल, तर तो/ती कोणत्याही पोलीस अधिकायामार्फत निशस्त्र होण्यास जबाबदार असेल किंवा त्याच्याकडून संक्षारक पदार्थ किंवा स्फोटक किंवा क्षेपणास्त्र जप्त करण्यास जबाबदार असेल त्यांचे कडील जप्त केलेली वस्तू, उपरोधिक पदार्थ, स्फोटक किंवा क्षेपणास्त्र राज्य सरकारकडे जमा करण्यात येईल.

३. हा आदेश, कोणत्याही सरकारी किंवा सरकारी उपक्रमाच्या सेवेत किंवा नोकरीत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्याच्या वरिष्ठांना किंवा त्याच्या कर्तव्याच्या स्वरूपानुसार, शस्त्रे बाळगण्यासाठी लागू होणार नाही. हा आदेश खाजगी सुरक्षा रक्षक किंवा गुरखा किंवा चौकीदार इत्यादींना लागू होणार नाही, जे ३१/२ फूट पयर्ंत लांबीपयर्ंतच्या लाठया बाळगत आहेत.

४. वर नमूद केलेल्या कालावधीनंतर या आदेशाची मुदत संपली तरीही,

(अ) कोणताही तपास किंवा कायदेशीर कार्यवाही सुरू केली जाऊ शकते, चालू ठेवली जाऊ शकते किंवा लागू केल्या जाऊ शकते, (ब) या आदेशाच्या कोणत्याही उल्लंघनाच्या संदर्भीत झालेल्या कोणत्याही दंड, जप्ती किंवा शिक्षा लागू केल्या जाऊ शकतात, जणू हा आदेश कालबा झाला नाही.

५. मी, पुढे असे निर्देश देतो की, बृहन्मुंबईमध्ये सदर आदेशाच्या प्रती सुस्पष्ट सार्वजनिक ठिकाणी चिकटवून आणि लाऊडस्पीकर किंवा मेगाफोनद्वारे घोषित करून, तसेच उपलब्ध कोणत्याही स्वरूपाच्या माध्यमांद्वारे प्रकाशित करून प्रकाशित केला जाईल.

सदरचा आदेश माझ्या सही शिक्यानिशी आज दिनांक १ फेब्रुवारी २०२३ रोजी दिला आहे.

विशाल ठाकूर, पोलीस उप आयुक्त (अभियान), तथा कार्यकारी दंडाधिकारी बृहन्मुंबई.

११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २-८, २०२३/फाल्गुन ११-१७, शके १९४४

OFFICE OF THE COMMISSIONER OF POLICE, BRIHAN MUMBAI

Order

No. CP/XI (6)/L.W./37(1)(2)/2(6)/10(2)/(02)/2023.— WHEREAS, Considering necessity for the preservation of public peace and public safety in Brihan Mumbai. I, Vishal Thakur, Dy. Commissioner of Police (Operations), Brihanmumbai in exercise of the powers conferred upon me under sub-section (1) and (2) of section 37 read with sub-section (6) of section 2 and sub-section (2) of section 10 of the Maharashtra Police Act (Mah. XXII of 1951) do hereby prohibit the following Act throughout Brihanmumbai for the period from 00-01 hours of 4th February 2023 to 24-00 hours on 5th March 2023.

1. (a) The Carrying of arms, cudgels, swords, spears, bludgeons, unlicensed guns, knives, sticks or lathis or any other article which is capable of being used for causing physical harm (violence), save for such firearms where license has been granted by this authority or where specific permission is sought for carriage of such arms from the competent authority.

(b) The carrying of any corrosive substance or explosives.

(c) The carrying, collection and preparation of stones or other missiles or instruments or means of casting or impelling missiles.

(d) The exhibition of persons or corpses or figures or effigies thereof.

(e) The public utterance of cries, singing of songs, playing of music.

(f) Delivery of harangues, the use of gestures or mimetic representations, and the preparation, exhibition or dissemination of pictures, symbols, playcards or any other object or thing which may in the opinion of any police officer posted in Brihan Mumbai City, offend against decency or morality or undermine the security of or tend to overthrow the state.

2. If any person goes armed with any such article or carries any corrosive substance or explosive or missile in contravention of such prohibition, he/she shall be liable to be disarmed or the corrosive substance or explosive or missile shall be liable to be seized from him/her by any police officer, and the article, corrosive substance, explosive or missile so seized shall be forfeited to the State Government.

3. This order will not be applicable to any person being in service or employment of any Government or Government Undertaking required by his superiors or by the nature of his duties, to carry weapons. The order will also not be applicable to Private Security Guards or Gurkhas or Chowkidars etc., employed on watch-n-ward duties carrying lathis admeasuring in length not exceeding 3½ feet.

4. Notwithstanding the expiration of this order after the period hereinabove mentioned.

(a) Any investigation or legal proceedings may be instituted, continued or enforced.

(b) Any penalty, forfeiture or punishments incurred in respect of any contravention of this order may be imposed, as if this order had not expired.

5. I further direct that this order shall be published and promulgated in Brihanmumbai by affixing copies thereof in conspicuous public places and by announcing the same through loudspeakers or megaphones, as well as publishing through media of whatever form available.

Given under my hand and Seal on this 1st day February, 2023 at Mumbai.

VISHAL THAKUR, Dy. Commissioner of Police (Operations), and Executive Magistrate, Greater Mumbai.

भाग एक (को.वि.पु.)-----२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २-८, २०२३/फाल्गुन ११-१७, शके १९४४

सहायक निबंधक, सहकारी संस्था, वाडा-पालघर यांजकडून

उप निबंधक, सहकारी संस्था, कल्याण तालुका, कल्याण यांजकडून

नोंदणीची अधिसूचना

अधिसूचना

क्रमांक पीएलआर/डब्ल्यूडीअे/एचएसजी/(टीसी)/१७९९/सन- २०२३.----सहायक निबंधक, सहकारी संस्था, वाडा यांनी निशिगंधा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., अशोकवन, प्लॉट नं. १९ ते २३ आणि २७ ते ३०, सिटी सव्र्हे नं. २४६८, २४६९, २४७० आणि २०७१, ता. वाडा, जि. पालघर, ही संस्था महाराष्ट्र अधिनियम, १९६० (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) च्या कलम ९ (१) अन्वये नोंदणी क्रमांक पीएलआर/डब्ल्यूडीअे/एचएसजी/ (टीसी)/१७९९/सन-२०२३, दिनांक १२ जानेवारी २०२३ ने नोंदविण्यांत आलेली आहे. उक्त अधिनियमांच्या कलम १२ (१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम, नियम क्र. १० (१) अन्वये तिचे वर्गीकरण ""गृहनिर्माण संस्था"" असून उप वर्गीकरण ""भाडेकरू सहभागिदारी गृहनिर्माण संस्था"" असे करण्यात आले आहे.

रविंद्र एस. भोसले, सहायक निबंधक, पालघर, दिनांक १२ जानेवारी २०२३. सहकारी संस्था, वाडा,

जि. पालघर.

क्रमांक उपनि/कल्याण/बी-२/अधिसूचना/३३०६/सन-२०२३.---- उप निबंधक, सहकारी संस्था, कल्याण तालुका, या प्रमाणपत्राद्वारे प्रमाणित करतात की, "" परिस पार्क फळे भाजीपाला, फलोद्यान "" सहकारी संस्था मर्या., कुंदे, सव्र्हे नं. १५, हिस्सा नं. १, प्लॉट नं. २१, मौजे कुंदे, ता. कल्याण, जि. ठाणे, नोंदणी क्रमांक टीएनए/केएलएन/ जीएनएल/(ओ)/२६९१/२०२२-२३/सन २०२३, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९(१) अन्वये नोंदविण्यांत आलेली आहे.

उपराक्त अधिनियमाचे कलम १२(१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १० (१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण ""सर्वसाधारण संस्था"" असे असून उप वर्गीकरण ""इतर संस्था"" असे आहे.

विशाल जाधवर, उप निबंधक, कल्याण, सहकारी संस्था, कल्याण तालुका, दिनांक ०२ जानेवारी २०२३. कल्याण.

सहायक निबंधक, सहकारी संस्था, मुरबाड यांजकडून

उप निबंधक, सहकारी संस्था, कल्याण तालुका, कल्याण यांजकडून

अधिसूचना

अधिसूचना

क्रमांक सनिमु/वि-२/संस्था नोंदणी/अधिसूचना/३५/सन २०२२.---- सहायक निबंधक, सहकारी संस्था, मुरबाड यांचेद्वारे अधिसूचित करण्यात येत आहे की, ग्रीन पार्क थर्ड फेज को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., स.नं. ५१६, प्लॉट क्र. १ ते २१, ग्रीन पार्क, एन.एच.६१, नढई, ता. मुरबाड, जि. ठाणे, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यांत आलेली असून तिचा नोंदणी क्रमांक टीएनए/एमबीडी/(एचएसजी)/(टीसी)/ ३०४८२/२०२२-२०२३/सन २०२२, दिनांक ९ जानेवारी २०२३ असा आहे तसेच उक्त अधिनियमातील कलम १२ (१) व त्याखालील नियम, १९६१ चे नियम १० (१) अन्वये तिचे वर्गीकरण ""गृहनिर्माण संस्था"" असून उप वर्गीकरण ""मालकी हक्क सहभागीदारी गृहनिर्माण संस्था"" असे करण्यात आले आहे.

सदरची अधिसूचना आज दिनांक ९ जानेवारी २०२३ रोजी काढण्यात येत आहे.

उमेद कांबळे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, मुरबाड.

क्रमांक उपनि/कल्याण/बी-२/अधिसूचना/३४४८/सन-२०२३.---- उप निबंधक, सहकारी संस्था, कल्याण तालुका, कल्याण या प्रमाणपत्राद्वारे प्रमाणित करतात की, ""दि बिग वल्र्ड प्रिमायसेस"" को-ऑप. सोसायटी लि., सव्र्हे नं. १३/२ पै, ३, सव्र्हे नं. ७/२, बिर्ला कॉलेज रोड, भोईरवाडी बसस्टॉपसमोर, चिकनघर, कल्याण पश्चिम, ता. कल्याण, जि. ठाणे, नोंदणी क्रमांक टीएनए/केएलएन/जीएनएल/(ओ)/२६९२/ २०२२-२३/सन २०२३, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९(१) अन्वये नोंदविण्यांत आलेली आहे.

उपरोक्त अधिनियमाचे कलम १२(१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १० (१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण ""सर्वसाधारण संस्था"" असे असून उप वर्गीकरण ""इतर संस्था"" असे आहे.

विशाल जाधवर, उप निबंधक, कल्याण, सहकारी संस्था, कल्याण तालुका, दिनांक ०९ जानेवारी २०२३. कल्याण.

१३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २-८, २०२३/फाल्गुन ११-१७, शके १९४४

जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी (ना.क्षे.क.म.) बृहन्मुंबई यांजकडून

अधिसूचना

क्रमांक सी/युएलसी/डे-XIII/ ६(१)/SR-XIV-१२२ व SR-XIV-१२९/२०२३.---- ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक २८ मे १९८१ च्या कोकण विभागीय पुरवणीत पृष्ठ क्र. ४८२ वर प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेत श्री. आर. सी. आग्रवाल यांनी धारण केलेली खालील अनुसूचित दाखविलेली जमीन ही कमालमर्यादेपेक्षा अधिक असल्यामुळे ती जमीन महाराष्ट्र शासनाद्वारे संपादित केली जावयाची आहे, हे नागरी जमीन (कमाल धारणा व विनियमन) अधिनियम, १९७६ च्या कलम १० पोट-कलम (१) अन्वये अधिसूचित करण्यात आले होते. त्यानंतर ती जमीन सर्व भारांपासून मुक्त अशी महाराष्ट्र शासनाकडे सर्वार्थाने निहीत होईल असे महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक ११ ऑगस्ट २००५च्या कोकण विभागीय पुरवणीत पृष्ठ क्रमांक ५१ वर प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेत उक्त अधिनियमाच्या कलम १० पोट-कलम (३) प्रमाणे अधिसूचित करण्यात आले आहे ;

ज्याअर्थी, नाजकधा अधिनियमांतर्गत कलम १० अन्वये भूसंपादनाची कार्यवाही करण्यात आली आहे. कलम १० च्या कार्यवाहीच्या अनुषंगाने विवरणपत्रधारक श्री. आर. सी. आग्रवाल यांनी धारण केलेल्या खालील अनुसूचित नमूद जमिनीच्या अधिकार अभिलेखातील भोगवटादार सदरी तसेच इतर हक्कात महाराष्ट्र शासन अशी नोंद घेण्यात आली आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रकरणी, मौजे-कोलेकल्याण, ता.अंधेरी येथील न.भू.क्र. ५६४२ मधील ९११.०० चौ. मी. क्षेत्र अतिरिक्त घोषित क्षेत्राचा नागरी जमीन (कमाल धारणा व विनियमन) अधिनियम, १९७६ निरसीत दिनांकापूर्वी म्हणजेच दिनांक २९ नोव्हेंबर २००७ पूर्वी शासन व सक्षम प्राधिकारी यांचेवतीने संबंधित यंत्रणनेने ताबा (संमतीने अथवा एकतर्फी) घेतल्याचे दिसून येत नाही. मौजे-कोलेकल्याण, ता. अंधेरी येथील न.भू.क्र. ५६४२ मधील ९११.०० चौ. मी. या क्षेत्रावरील नाजकधा अंतर्गत संपादनाची कार्यवाही रद्द ठरते.

त्याअर्थी, उपरोल्लिखित महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक ११ ऑगस्ट २००५ च्या कोकण विभागीय पुरवणीत पृष्ठ क्रमांक ५१ वर प्रसिद्ध झालेली नाजकधा कलम १०(३) ची अधिसूचना खालील मर्यादित क्षेत्राकरिता रद्द करण्यात येत आहे.

अनुसूची

अ. क्र. जिल्हा गाव तालुका न. भू. क्र. क्षेत्र (चौ.मी.)
१. मुंबई उपनगर कोलेकल्याण अ धेरी ं ५६४२ ९११.००
एकूण ९११.००

ठिकाण : वांद्रे (पूर्व), मुंबई-५१, दिनांक : १५ फेब्रुवारी २०२३.

निधी चौधरी, जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी, (ना.क्षे.क.म.), बृहन्मुंबई.

१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २-८, २०२३/फाल्गुन ११-१७, शके १९४४

पोलीस आयुक्तालय, मिरा-भाइर्ंदर, वसई-विरार यांजकडून

आदेश

क्रमांक विशा/टे-१३/मनाई आदेश/२०२३-१६१०.— ज्याअर्थी, मिरा-भाइर्ंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेराव, धरणे, सभा, अतिक्रमण हटवणे तसेच दिनांक ६ मार्च २०२३ रोजी होळी व दिनांक ७ मार्च २०२३ रोजी धुलिवंदन व शब-ए-बारात या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते ;

ज्याअर्थी, मी, अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), पोलीस आयुक्तालयाकडील क्रमांक पो.आ.वा./अधि. प्रदान/आदेश/३०/२०२०, दिनांक ९ नोव्हेंबर २०२० अन्वये, मा. पोलीस आयुक्त यांचे महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ कलम ३७ चे पोट-कलम (१) व (३) चे वापरावयाचे अधिकार आम्हास प्रदान करण्यात आले आहेत ;

मिरा-भाइर्ंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील मिरारोड, काशिमिरा, नवघर, नयानगर, भाइर्ंदर, उत्तन, वसई, माणिकपूर, आचोळे, वालीव, पेल्हार, नालासोपारा, तुळींज, विरार, अर्नाळा व मांडवी असे एकूण १६ पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, समाज कंटक व गुंड प्रवृत्तीचे इसम यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करणे सोईचे व्हावे.

त्याअर्थी, वरील घटनांच्या अनुषंगाने सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मी, अविनाश अंबुरे पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय) मिरा-भाइर्ंदर, वसई-विरार, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (१) व (३) अन्वये जिवित व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था जोपासण्यासाठी खालीलप्रमाणे मनाई आदेश देत आहे :–

(१) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, बंदुका, लाठया किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तू बाळगणे.

(२) दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जमा करणे.

(३) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे.

(४) व्यक्तींच्या किंवा प्रेताकृतीच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे.

(५) सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजवणे.

(६) सभ्यता अगर निती या विरुद्ध असतील अशी किंवा राज्यातील शांतता धोक्यात आणतील किंवा ज्यामुळे राज्य शासन उलथून पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रर्दशित करणे.

(७) पाच किंवा पाचांपेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इ. कृत्यांना या आदेशान्वये मनाई करीत आहे.

वरील मनाई आदेश खालील व्यक्तींना लागू राहणार नाही.

" जो कोणी इसम सरकारी नोकर आहे, किंवा ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल, किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिकायाने सूट दिलेली आहे. "

सदर आदेश खालील मिरवणुका व जमावास लागू राहणार नाहीत.

(१) लग्न कार्यासाठी जमलेले लोक.

(२) प्रेत यात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका.

(३) सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेया येथे जमलेले लोक.

(४) सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला समुदाय.

(५) पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकायांनी परवानगी दिलेल्या सभा/मिरवणुका.

(६) सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण.

सदर मनाई आदेश दिनांक २५ फेब्रुवारी २०२३ रोजीचे ००-०१ वाजेपासून ते दिनांक ८ मार्च २०२३ रोजीचे २४-०० वाजेपयर्ंत अंमलात राहील. वरील मनाई आदेशाचा भंग करणाया विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात येईल.

अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) मिरा-भाइर्ंदर, वसई-विरार, दिनांक २५ फेब्रुवारी २०२३.

अति. कार्यभार पोलीस उप आयुक्त (मुख्यालय),

मिरा-भाइर्ंदर, वसई-विरार.

१५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २-८, २०२३/फाल्गुन ११-१७, शके १९४४

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांजकडून

आदेश

क्रमांक पोआ/११(६)(१)/३७(१)/१०(०२)/२०२३.— ज्याअर्थी, होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमी सण ५ मार्च २०२३ ते ११ मार्च २०२३ या कालावधीत साजरा केला जात आहे.

ज्याअर्थी, सार्वजनिक ठिकाणी अंधाधुंदपणे रंगीत पाणी शिंपडणे आणि अश्लील बोलणे यामुळे जातीय तणाव आणि सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता असते ;

ज्याअर्थी, मी सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी येथे नमूद केलेल्या काही कृत्यांना प्रतिबंधित करणे आवश्यक मानतो.

त्याअर्थी, मी, विशाल ठाकूर, पोलीस उप आयुक्त (अभियान), बृहन्मुंबई महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ (मुंबई अधिनियम, १९५१ चा कायदा XXII ) च्या कलम १०(२) सह कलम ३७ मधील उप-कलम (१) मधील खंड (सी), (डी) आणि (एफ) द्वारे मला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून खालील बाबी प्रतिबंधित करतो :---

(१) अश्लील शब्द किंवा घोषणांचे सार्वजनिक उच्चारण किंवा अश्लील गाणी गाणे.

(२) हावभाव किंवा नकलेचा वापर आणि चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणत्याही वस्तू किंवा गोष्टींचे, प्रदर्शन किंवा प्रसार करणे ज्यामुळे कोणाचीही प्रतिष्ठा सभ्यता किंवा नैतिकता दुखावते.

(३) पादचायांवर रंगीत पाणी, रंग किंवा पावडर फवारणे किंवा फेकंणे.

(४) रंगीत किंवा साध्या पाण्याने किंवा कोणत्याही द्रवाने भरलेले फुगे तयार करणे आणि/किंवा फेकणे.

आणि जो कोणी आदेशाचे उल्लंघन करेल किंवा आदेशाचे उल्लंघन करण्यास मदत करेल त्याला महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम १३५ नुसार शिक्षा केली जाईल.

मी निर्देश देतो की, हा आदेश स्थानिक दैनिक वर्तमानपत्रांमध्ये, अधिकृत राजपत्रांमध्ये आणि प्रत सुस्पष्ट सार्वजनिक ठिकाणी चिकटवून आणि लाऊडस्पीकरद्वारे घोषणा करून प्रसिद्ध केला जाईल.

हा आदेश दिनांक ५ मार्च २०२३ रोजी सकाळी ००-०१ ते दिनांक ११ मार्च २०२३ च्या २४-०० वाजेपयर्ंत लागू राहील.

सदर आदेश माझ्या सही शिक्यानिशी आज दिनांक २४ फेब्रुवारी २०२३ रोजी दिला आहे.

विशाल ठाकूर,

पोलीस उप आयुक्त (अभियान),

बृहन्मुंबई.

१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २-८, २०२३/फाल्गुन ११-१७, शके १९४४

OFFICE OF THE COMMISSIONER OF POLICE, BRIHAN MUMBAI

Order

No. C.P./XI (6)(1)/Holi/37(1)/10(2)/2023.— WHEREAS, Holi, Dhulivandan and Rang Pachanmi Festival is being celebrated from 5th March 2023 to 11th March 2023.

And WHEREAS, acts sprinkling colored water indiscriminately and obscene utterances in public places are likely to lead to communal tension and breach of public peace.

And WHEREAS, I consider it necessary for the presrvation of public peace and public safety to prohibit certain acts mentioned hereunder.

NOW, THEREFORE, I, Vishal Thakur, Deputy Commissioner of Police (Operations), Brihan Mumbai in exercise of the power conferred upon me by clauses (c), (d) and (f) of sub-section (1) of section 37 read with section 10(2) of the Maharashtra Police Act, 1951, (Bom. Act XXII of 1951) do, prohibit.

(i) The public utterances of obscene words or slogans, or singing of obscene songs.

(ii) The use of gestures or mimetic representations and the preparation, exhibition or dissemination of pictures, symbols, placards or any other objects or things which may offend the dignity, decency or morality.

(iii) The practice of spraying or throwing colored water, dyes or powder on pedestrians.

(iv) Preparation and/ or throwing of balloons filled with colored or plain water or any liquid.

And Whoever disobeys the order or abets the disobedience there of shall be punished under section 135 of Maharashtra Police Act, 1951.

I direct that this order shall be published in local daily newspapers, in Official Gazettes and by affixing copies thereof at conspicuous public places and announcing the same through loudspeakers in Brihan Mumbai.

This order will remain in force from 00-01 hours of 5th March 2023 to 24-00 hrs. of 11th March 2023.

Given under my hand and seal this 24th February 2023.

VISHAL THAKUR,

Deputy Commissioner of Police (Operations),

Brihan Mumbai.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 02 March 2023. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2023-03-02.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2023-03-02.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.