Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग चार, असा., क्रमांक १५, सन २०२३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १४. मुंबई महानगरपालिका अधिनियम आणि महा. महानगरपालिका अधिनियम यांमध्ये सुधारणा करण्यासाठी अधिनियम

Published 23 March 2023

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-03-23.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, मार्च २३, २०२३/चैत्र २, शके १९४५ १ RNI No. MAHBIL /2009/35530

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष ९, अंक १०] गुरुवार, मार्च २३, २०२३/चैत्र २, शके १९४५ [पृष्ठे २, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक १५

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

पृष्ठे १-२ सन २०२३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १४.--- मुंबई महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र महानगरपालिका . . अधिनियम यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम. ..

. .

दिनांक २० मार्च २०२३ रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.

सतिश वाघोले, सचिव (विधि विधान), महाराष्ट्र शासन, विधि व न्याय विभाग.

सन २०२३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १४.

(माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर ""महाराष्ट्र शासन राजपत्रात"" दिनांक २३ मार्च २०२३ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)

मुंबई महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम

यांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम.

१८८८ चा ३.

१९४९ चा ५९.

ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, मुंबई महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम यांमध्ये सुधारणा करणे इष्ट आहे ; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या चौयाहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :--

प्रकरण एकप्रारंभिक. संक्षिप्त नाव. १. या अधिनियमास, मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) अधिनियम, २०२३, असे म्हणावे. (१) भाग चार-१५-१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, मार्च २३, २०२३/चैत्र २, शके १९४५ प्रकरण दोन

मुंबई महानगरपालिका अधिनियमाची सुधारणा.

१८८८ चा ३.

२. मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ५ मध्ये, पोट-कलम (१) मधील, खंड (ब) मध्ये, "पाच पालिका सदस्य" या मजकुराऐवजी, "दहा नामनिर्देशित पालिका सदस्य" हा मजकूर दाखल करण्यात येईल.

सन १८८८ चा अधिनियम क्रमांक ३ याच्या कलम ५ ची सुधारणा.

प्रकरण तीन

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाची सुधारणा.

१९४९ चा ५९.

सन १९४९ चा अधिनियम क्रमांक ५९ याच्या कलम ५ ची सुधारणा.

३. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ५ मध्ये, पोट-कलम (२) मधील, खंड (ब) मध्ये, " पाच पेक्षा अधिक नसतील इतक्या " या मजकुराऐवजी, " निवडून आलेल्या पालिका सदस्यांच्या एकूण संख्येच्या दहा टक्क्यांपेक्षा अधिक नसतील इतक्या किंवा दहा, यापैकी जी कमी असेल इतक्या" हा मजकूर दाखल करण्यात येईल.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 23 March 2023. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2023-03-23.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2023-03-23.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-.