Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग चार, असा., क्रमांक १७, सन २०२३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १६ शुक्रवार, मार्च २४, २०२३.

Published 24 March 2023

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-03-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, मार्च २४, २०२३/चैत्र ३, शके १९४५ १

RNI No. MAHBIL /2009/35530

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष ९, अंक ११] शुक्रवार, मार्च २४, २०२३/चैत्र ३, शके १९४५ [पृष्ठे ४, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक १७

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

पृष्ठे १-४ सन २०२३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १६.-- डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ अधिनियम, २०१४ आणि महाराष्ट्र सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ अधिनियम, २०२२ या अधिनियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी अधिनियम.

दिनांक २४ मार्च २०२३ रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.

सतिश वाघोले, सचिव (विधि विधान), महाराष्ट्र शासन, विधि व न्याय विभाग.

सन २०२३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १६.

(माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर " महाराष्ट्र शासन राजपत्रात '' दिनांक २४ मार्च २०२३ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ अधिनियम, २०१४ आणि महाराष्ट्र

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ अधिनियम, २०२२ या अधिनियमांमध्ये

सुधारणा करण्यासाठी अधिनियम.

ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ अधिनियम, २०१४ आणि महाराष्ट्र सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ अधिनियम, २०२२ या अधिनियमांमध्ये सुधारणा करणे इष्ट आहे ; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या चौयाहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :---

२०१४ चा महा. २९. २०२२ चा महा. ३५.

भाग चार--१७-१

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, मार्च २४, २०२३/चैत्र ३, शके १९४५ प्रकरण एक

प्रारंभिक.

संक्षिप्त नाव. १. या अधिनियमास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ आणि महाराष्ट्र सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ (सुधारणा) अधिनियम, २०२३, असे म्हणावे.

प्रकरण दोन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ अधिनियम, २०१४ याची सुधारणा.

२. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ अधिनियम, २०१४ याच्या कलम १३ मध्ये,— २०१४ चा महा. २९.

(१) पोट-कलम (१) मधील,-----

(क) खंड (क) मध्ये,----

सन २०१४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २९ याच्या कलम १३ ची सुधारणा.

(एक) " एक समिती " या मजकुराऐवजी, " एक शोध-नि-निवड समिती " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

(दोन) उप-खंड (एक) ऐवजी, पुढील उप-खंड दाखल करण्यात येईल :------

" (एक) कुलपतीने नामनिर्देशित केलेला सदस्य, जो उच्च शिक्षण क्षेत्रातील विख्यात व्यक्ती असेल आणि जो एकतर, शिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय ख्यातीची विख्यात विद्वान व्यक्ती किंवा पद्म पुरस्कारप्राप्त व्यक्ती असेल ;" ;

(तीन) उप-खंड (तीन) नंतर, पुढील उप-खंड समाविष्ट करण्यात येईल :------

" (चार) विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षाने नामनिर्देशित केलेला

सदस्य ;" ;

(ख) खंड (ग) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येईल :----

" (ग) समितीवर नामनिर्देशित केलेले सदस्य, अशा व्यक्ती असतील की ज्या, विद्यापीठाशी किंवा विद्यापीठाच्या कोणत्याही महाविद्यालयाशी किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त परिसंस्थेशी कोणत्याही रीतीने संबंधित असणार नाहीत ;" ;

(ग) खंड (घ) मधील, " तीन " हा मजकूर वगळण्यात येईल ;

(२) पोट-कलम (४) मधील,-----

(क) खंड (ख) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येतील :----

" (ख) उच्चस्तरीय क्षमता, सचोटी, नैतिकता व संस्थात्मक बांधिलकी असलेली व्यक्ती असेल ; आणि कोणत्याही विद्यापीठात प्राध्यापक म्हणून किमान दहा वषार्ंचा अनुभव असलेला किंवा शैक्षणिक नेतृव सिद्ध केल्याच्या पुराव्यासह लौकिकप्राप्त संशोधन किंवा शैक्षणिक प्रशासकीय संघटनेतील दहा वषार्ंचा अनुभव असलेला विख्यात शिक्षणतज्ज्ञ असेल ;" ;

(ख) खंड (ङ) मधील, " शैक्षणिक अर्हता " या मजकुराऐवजी, " अतिरिक्त शैक्षणिक अर्हता " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

(३) पोट-कलम (६) नंतर, पुढील पोट-कलम समाविष्ट करण्यात येईल :-----

" (६क) जर कुलपतीने निवड केलेली व्यक्ती, कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारीत नसेल तर, कुलपतीस, नामिकेतील उर्वरित व्यक्तींमधून अन्य सुयोग्य व्यक्तीची निवड करता येईल किंवा त्यास, एकतर त्याच समितीकडून किंवा या प्रयोजनासाठी नवीन समिती घटित केल्यानंतर, अशा नवीन समितीकडून, नवीन नामिकेची मागणी करता येईल .".

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, मार्च २४, २०२३/चैत्र ३, शके १९४५ ३ प्रकरण तीन

महाराष्ट्र सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ अधिनियम, २०२२ याची सुधारणा.

३. महाराष्ट्र सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ अधिनियम, २०२२ याच्या कलम ११ मध्ये,-----

२०२२ चा महा. ३५.

(१) पोट-कलम (३) मधील,-----

(क) खंड (क) मध्ये,----

सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३५ याच्या कलम ११ ची सुधारणा.

(एक) उप-खंड (एक) ऐवजी, पुढील उप-खंड दाखल करण्यात येईल :-----

" (एक) कुलपतीने नामनिर्देशित केलेला सदस्य, जो उच्च शिक्षण क्षेत्रातील विख्यात व्यक्ती असेल आणि जो एकतर, शिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय ख्यातीची विख्यात विद्वान व्यक्ती किंवा पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्ती असेल ;";

(दोन) उप-खंड (तीन) नंतर, पुढील उप-खंड समाविष्ट करण्यात येईल :-----

" (चार) विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षाने नामनिर्देशित केलेला सदस्य ; " ;

(ख) खंड (ग) मधील, " तीन " हा मजकूर वगळण्यात येईल ;

(ग) खंड (घ) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येईल :----

" (घ) समितीवर नामनिर्देशित केलेले सदस्य, अशा व्यक्ती असतील की ज्या, विद्यापीठाशी किंवा विद्यापीठाच्या कोणत्याही महाविद्यालयाशी किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त परिसंस्थेशी कोणत्याही रीतीने संबंंधित असणार नाहीत ; " ;

(घ) खंड (च) मध्ये,-----

(एक) उप-खंड (एक) पूर्वी, पुढील खंड समाविष्ट करण्यात येईल :----

" (एक-१) उच्चस्तरीय क्षमता, सचोटी, नैतिकता व संस्थात्मक बांधिलकी असलेली व्यक्ती असेल ;";

(दोन) उप-खंड (चार) मध्ये,-----

(१) " शैक्षणिक अर्हता " या मजकुराऐवजी, " अतिरिक्त शैक्षणिक अर्हता " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

(२) परंतुकामधील, " शैक्षणिक अर्हता " या मजकुराऐवजी, " अतिरिक्त शैक्षणिक अर्हता " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, मार्च २४, २०२३/चैत्र ३, शके १९४५

(२) पोट-कलम (४) मधील,-----

(क) विद्यमान परंतुकापूर्वी, पुढील परंतुक समाविष्ट करण्यात येईल :-----

" परंतु, जर कुलपतीने निवड केलेली व्यक्ती, कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारीत नसेल तर, कुलपतीस, नामिकेतील उर्वरित व्यक्तींमधून अन्य सुयोग्य व्यक्तीची निवड करता येईल किंवा त्यास, एकतर त्याच समितीकडून किंवा या प्रयोजनासाठी नवीन समिती घटित केल्यानंतर, अशा नवीन समितीकडून, नवीन नामिकेची मागणी करता येईल : " ;

(ख) विद्यमान परंतुकामधील, " परंतु " या मजकुराऐवजी, " परंतु आणखी असे की, " हा मजकूर दाखल करण्यात येईल.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 24 March 2023. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2023-03-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2023-03-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-.