Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part V, Extra Ordinary Gazette No. 24, Dated 25th March 2023, Maharashtra Police Act, L.A. Bill No. VI of 2023

Published 25 March 2023

Type
Extra - Ordinary
Part
Part 5 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-03-25.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च २५, २०२३/चैत्र ४, शके १९४५ १ RNI No. MAHBIL /2009/40124

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग पाच

वर्ष ९, अंक १०] शनिवार, मार्च २५, २०२३/चैत्र ४, शके १९४५ [पृष्ठे ३, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक २४

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधानपरिषदेत सादर केलेली विधेयके.

----------------

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय

महाराष्ट्र विधानसभेत दिनांक २५ मार्च, २०२३ रोजी पुर:स्थापित करण्यात आलेले खालील विधेयक, महाराष्ट्र विधानसभा नियम ११६ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे :—

L. A. BILL No. VI OF 2023.

A BILL

FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA POLICE ACT.

सन २०२३ चे विधानसभा विधेयक क्रमांक ६.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी विधेयक.

१९५१ चा २२.

ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, महाराष्ट्र पोलीस अधिनियमात आणखी सुधारणा करणे इष्ट आहे ; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या चौयाहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :----

भाग पाच----२४-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च २५, २०२३/चैत्र ४, शके १९४५ संक्षिप्त नाव. १. या अधिनियमास, महाराष्ट्र पोलीस (सुधारणा) अधिनियम, २०२३, असे म्हणावे.

२. महाराष्ट्र पोलीस अधिनियम (यात यापुढे, ज्याचा निर्देश, "" मुख्य अधिनियम "" असा करण्यात आला १९५१ चा २२.

आहे) याच्या कलम २ मधील, खंड (६) मध्ये,----

(क) "" "" आयुक्त "" "" या मजकुरानंतर, "" "" विशेष आयुक्त "" "" हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल आणि तो, दिनांक ४ जानेवारी २०२३ पासून समाविष्ट करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल ;

सन १९५१ चा अधिनियम क्रमांक २२ याच्या कलम २ ची सुधारणा.

(ख) "" पोलीस आयुक्त "" या मजकुरानंतर, "" विशेष पोलीस आयुक्त "" हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल आणि तो, दिनांक ४ जानेवारी २०२३ पासून समाविष्ट करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल.

३. मुख्य अधिनियमाच्या कलम ७ मधील, खंड (अ) नंतर, पुढील खंड समाविष्ट करण्यात येईल आणि तो, दिनांक ४ जानेवारी २०२३ पासून समाविष्ट करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल :----

"" (अ-१) राज्य शासनास, बृहन्मुंबईकरिता विशेष पोलीस आयुक्त नेमता येईल."".

सन १९५१ चा अधिनियम क्रमांक २२ याच्या कलम ७ ची सुधारणा.

४. मुख्य अधिनियमाच्या कलम २५ मधील, पोट-कलम (२) मधील, खंड (अ) मध्ये, "" अपर आयुक्त "" या मजकुरानंतर "", विशेष आयुक्त "" हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल आणि तो, दिनांक ४ जानेवारी २०२३ पासून समाविष्ट करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल.

सन १९५१ चा अधिनियम क्रमांक २२ याच्या कलम २५ ची सुधारणा.

५. उद्देशिकेसह संपूर्ण मुख्य अधिनियमामध्ये, इंग्रजीमधील "" ग्रेटर बॉम्बे "" हा मजकूर ज्या ज्या ठिकाणी आला असेल त्या त्या ठिकाणी त्याऐवजी "" बृहन्मुंबई "" हा मजकूर, त्याच्या व्याकरणिक फेरफारांसह दाखल करण्यात येईल.

व्यावृत्ती.

२०२३ चा महा. .

६. विशेष पोलीस आयुक्ताने, मुख्य अधिनियमाखालील त्याची कर्तव्ये पार पाडण्यासाठी, राज्य शासनाने कोणत्याही आदेशान्वये त्याला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करताना केलेली कोणतीही कृती किंवा कोणतीही कार्यवाही ही, महाराष्ट्र पोलीस (सुधारणा) अधिनियम, २०२३ याद्वारे सुधारणा केलेल्या मुख्य अधिनियमाच्या तरतुदींन्वये केलेली कृती किंवा यथास्थिति, कार्यवाही असल्याचे मानण्यात येईल.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च २५, २०२३/चैत्र ४, शके १९४५ ३

उद्देश व कारणे यांचे निवेदन.

महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या (१९५१ चा २२) कलम ७ मध्ये बृहन्मुंबईकरिता किंवा इतर कोणत्याही क्षेत्रांकरिता पोलीस आयुक्त नेमता येईल आणि अशा क्षेत्रांपैकी कोणत्याही क्षेत्रांकरिता अपर पोलीस आयुक्त आणि पोलीस सह आयुक्त नेमता येतील अशी तरतूद आहे.

२. कल्याणकारी राज्याच्या आणि परिणामी पोलीस दलाच्या कर्तव्यांची व कायार्ंची संकल्पना निश्चितपणे बदलत असताना व व्यापक होत असताना, शासनास तसेच पोलीस दलास अधिनियमाखालील त्यांच्या अधिकारांचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी व त्यांची कर्तव्ये पार पाडण्यासाठी त्यांनी समर्थ व्हावे म्हणून, महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या विद्यमान तरतुदींमध्ये विवक्षित बदल करणे आवश्यक आहे. म्हणून, बृहन्मुंबईकरिता राज्य शासनाने, शासन निर्णय, गृह विभाग, क्र. भापोसे - २०२२/प्र. क्र. ४३७/पोल -१, दिनांक ४ जानेवारी २०२३ द्वारे अपर पोलीस महासंचालक श्रेणीतील एक पद विशेष पोलीस आयुक्त म्हणून पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवर वर्ग करण्यात आले आहे. त्या प्रयोजनाकरिता, अधिनियमामध्ये उक्त पदाच्या संदर्भाचा समावेश करण्यासाठी वैधानिक तरतुदी करण्याकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियमात सुधारणा करणे शासनास इष्ट वाटते.

३. सन १९९६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २५ द्वारे दिनांक ४ सप्टेंबर १९९६ पासून "" ग्रेटर बॉम्बे"" या नावात "" बृहन्मुंबई "" असा बदल केला असल्यामुळे, उक्त अधिनियमामध्ये सर्वत्र "" ग्रेटर बॉम्बे "" या संज्ञेऐवजी, "" बृहन्मुंबई "" ही संज्ञा दाखल करण्यात येत आहे. म्हणून, महाराष्ट्र पोलीस अधिनियमामध्ये यथोचित सुधारणा करणे, शासनास इष्ट वाटते.

४. वरील उद्दिष्टे साध्य करणे हा, या विधेयकाचा हेतू आहे.

मुंबई, दिनांक २८ फेब्रुवारी २०२३.

देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री.

विधान भवन : मुंबई दिनांक २५ मार्च, २०२३.

राजेन्द्र भागवत, प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानसभा.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 25 March 2023. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2023-03-25.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2023-03-25.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-.