Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-I (K.D.S.) (Weekly) (Dated 6th - 12th April 2023)

Published 06 April 2023

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-04-06.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ६-१२, २०२३/चैत्र १६-२२, शके १९४५

RNI No. MAHBIL/2009/35529

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ९, अंक १४] गुरुवार ते बुधवार, एप्रिल ६-१२, २०२३/चैत्र १६-२२, शके १९४५ [पृष्ठे १२ किंमत रुपये : १४.००

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी

प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई यांजकडून

शुद्धिपत्रक

वाचले संदर्भ क्र. .------जा. क्र.यंत्र/बीइ-३/मदनपुरा पॉवरलुम/अंतिम/११४४/२२, दिनांक २९ सप्टेंबर २०२२ अन्वये निर्गमित झालेले अवसायनाचे अंतिम आदेश.

क्रमांक यंत्र/बी-३/मदनपुरा पॉवरलुम/अंतिमआ/शुद्धिपत्र/१३८८/२२.---- सदर आदेशानुसार मदनपुरा पॉवरलुम को-ऑप., सोसायटी लिमिटेड, ए-९, मिल्क स्ट्रीट, मोमीनपुरा, मुंबई ४०० ०११ ही संस्था अंतिमरित्या अवसायनात घेण्यात येऊन अवसायकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर संस्था तत्कालीन सहकार कायद्यानुसार दिनांक ३१ मार्च १९५३ रोजी नोंदलेली आहे. सदर आदेशात नजरचुकीचे टायपिंग मिस्टीकमुळे विशाल पॉवरलुम ओनर्स सहकारी संस्था मर्यादित, मालेगाव, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक असे नमूद झाली असून त्याऐवजी मदनपुरा पॉवरलुम को- ऑप., सोसायटी लिमिटेड, ए-९, मिल्क स्ट्रीट, मोमीनपुरा, मुंबई ४०० ०११ असे वाचावे.

मुंबई, दिनांक ३० डिसेंबर २०२२.

अजितकुमार सासवडे, प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई.

(१)

भाग एक (को.वि.पु.)-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ६-१२, २०२३/चैत्र १६-२२, शके १९४५

उप निबंधक, सहकारी संस्था, एम विभाग, मुंबई यांजकडून

आदेश

क्रमांक मुंबई/उपनि एम/क २१/२१७/सन २०२३.---- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ नुसार मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये मी, डॉ. ज्ञानेश्वर डोंगरे, उप निबंधक सहकारी संस्था, एम विभाग, मुंबई, पेस्तम सागर को-ऑप. हौ. सो. लि., प्लॉट नं. ३१, संगम पेस्तम सागर रोड क्र. ४, चेंबूर, मुंबई ८९, नोंदणी क्रमांक बीओएम/एचएसजी/१२९/सन १९६२, दिनांक २० मार्च १९६२ या संस्थेची नोंदणी रद्द करीत आहे. ह्य आदेशाच्या दिनांकापासून पेस्तम सागर को-ऑप. हौ. सो. लि., ही संस्था एकव्यक्तीभूत संस्था असल्याचे बंद होईल.

सदरचा आदेश माझे सही व या कार्यालयाच्या मुद्रेसह आज दिनांक २ फेब्रुवारी २०२३ रोजी दिला आहे.

डॉ. ज्ञानेश्वर डोंगरे, उप निबंधक, सहकारी संस्था, एम विभाग, मुंबई.

सहायक निबंधक, सहकारी संस्था, सी विभाग, मुंबई यांजकडून

आदेश

क्रमांक मुंबई/सनि/सी विभाग/नों. रद्द/७३/२०२३.---- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त अधिकारानुसार मी, सुदाम तु. काठे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, सी विभाग, मुंबई २४१, धनराज लेन, एम. जे. मार्केट, मुंबई ४०० ००२, नोंदणी क्रमांक बीओएम/डब्ल्यूसी/एचएसजी/टीसी/७९२४/१९९५, दिनांक २१ ऑक्टोबर १९९५ या संस्थेची परिसमापनाची कार्यवाही संपुष्टात आणून संस्थेची नोंदणी रद्द करीत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक ३० जानेवारी २०२३ रोजी माझे सही व शिक्क्यानिशी दिला आहे.

सुदाम तु. काठे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, सी विभाग, मुंबई.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ६-१२, २०२३/चैत्र १६-२२, शके १९४५

पोलीस उप आयुक्त (वाहतूक), पश्चिम उपनगरे, मुंबई यांजकडून

कायमस्वरूपी अधिसूचना/आदेश

क्रमांक ११०/पोउआ/प.उ./वा./कायम./अधि./वाहतूक/२०२३.----- वाहतुकीच्या दृष्टीने तसेच वाहतुकीस होणारा अडथळा त्यासाठी तसा निर्देश देण्याकरिता खालीलप्रमाणे वाहतुकीचे निबर्ंध देण्याकरिता मी, मंगेश शिंदे, पोलीस उप आयुक्त, वाहतूक, पश्चिम उपनगरे, मुंबई मोटार वाहन अधिनियम, १९८८ चे कलम ११५ (१९८८ चा अधिनियम ५९) व शासकीय अधिसूचना क्रमांक एम.व्ही.ए. ०५८९/सी आर-१०६१/ टिआरए-२, दिनांक १९ मे १९९० या नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून याद्वारे खालीलप्रमाणे आदेश देत आहे.

क्रमांक १२/पोउआ/वाहतूक/पश्चिम/उपनगरे/कायमस्वरूपी/अधि./२०२२, दिनांक १७ जानेवारी २०२३

प्रवेशबंदी समतानगर वाहतूक विभागाअंतर्गत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व वाहतुकीचे सुलभ नियोजन व्हावे याकरिता पश्चिम द्रुतगती महामार्गाचे दक्षिण वाहिनीकडील तानाजीनगर रोड नं. २ मार्गे व कै. मोहनराव सुर्वे चौक मार्गे पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे येणाया दुचाकी वाहने वगळून इतर सर्व प्रकारच्या वाहनांना कायमस्वरूपी प्रवेशबंदी (NO ENTRY) करण्यात येत आहे.

सदर आदेश माझ्या सही शिक्यानिशी दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

मंगेश शिंदे, पोलीस उप आयुक्त (वाहतूक), पश्चिम उपनगरे, मुंबई.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ६-१२, २०२३/चैत्र १६-२२, शके १९४५

BY THE DEPUTY COMMISSIONER OF POLICE, TRAFFIC,

WESTERN SUBURBAN, MUMBAI

PERMANENT NOTIFICATION/ORDER

No. 110/TCB/DCP/Trf./West/Sub./2023.-----In order to prevent danger, obstruction and inconvenience to the public, to so direct, I, Mangesh Shinde, Dy. Commissioner of Police, Traffic, Western Suburbans, Mumbai, in exercise of the powers conferred upon me under section 115 of Motor Vehicles Act, 1988 (Act No. 59 of 1988), read with Government of Maharashtra Notification No. M. V. A.0589/ C.R.-1061/TRA-2, dated 19th May 1990, do hereby issue the following order as under.

No. 12/D.C.P/West/Sub/Trf./Perm./Not./2022, dated 17th January 2023.

NO ENTRY

In the Jurisdiction of Samatanagar Traffic Division for better traffic regulation and decrease traffic congestion, all types of vehicles except two wheeler coming from Tanaji Nagar Road No.2 and Late Mohanrao Surve Chowk of Western Express Highway South bound are permanently banned to go straight towards Western Express Highway.

Issued under my seal and signature on the 17th day of January, 2023.

MANGESH SHINDE,

Dy. Commissioner of Police,

Traffic, Western Suburban, Mumbai.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ६-१२, २०२३/चैत्र १६-२२, शके १९४५

पोलीस उप आयुक्त (वाहतूक), पश्चिम उपनगरे, मुंबई यांजकडून

कायमस्वरूपी अधिसूचना/आदेश

जा. क्र.१०९/पोउआ/प.उ./वा./कायम./अधि./वाहतूक/२०२३.----- वाहतुकीच्या दृष्टीने तसेच वाहतुकीस होणारा अडथळा त्यासाठी तसा निर्देश देण्याकरिता खालीलप्रमाणे वाहतुकीचे निबर्ंध देण्याकरिता मी, मंगेश शिंदे, पोलीस उप आयुक्त, वाहतूक, पश्चिम उपनगरे, मुंबई मोटार वाहन अधिनियम, १९८८ चे कलम ११५ (१९८८ चा अधिनियम ५९) व शासकीय अधिसूचना क्रमांक एम.व्ही.ए. ०५८९/सी आर-१०६१/ टिआरए-२, दि. १९ मे १९९० या नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून याद्वारे खालील प्रमाणे आदेश देत आहे.

क्र.११/पोउआ/वाहतूक/पश्चिम/उपनगरे/कायमस्वरूपी/अधि./२०२३, दिनांक १७ जानेवारी २०२३

वाहने उभी करण्यास मनाई

समतानगर वाहतूक विभागाअंतर्गत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व वाहतुकीचे सुलभ नियोजन व्हावे याकरिता सुर्यकिरण मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, सुर्यकिरण को.ऑ.हा.सो., कांदिवली पूर्व, मुंबई च्या गेट समोर १०० मिटर अंतराच्या परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना कायमस्वरुपी वाहने उभी करण्यास मनाई (NO PARKING) क्षेत्र घोषित करण्यात येत आहे.

सदर आदेश माझ्या सही शिक्यानिशी दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

मंगेश शिंदे, पोलीस उप आयुक्त (वाहतूक),

पश्चिम उपनगरे, मुंबई.

भाग एक (को.वि.पु.)-----२६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ६-१२, २०२३/चैत्र १६-२२, शके १९४५

OFFICE OF DEPUTY COMMISSIONER OF POLICE, TRAFFIC, WESTERN SUBURBAN

PERMANENT NOTIFICATION / ORDER

No. 109 /DCP/TRF/West/Sub./PERM./NOT./2023.—In order to prevent danger, obstruction and inconvenience to the public, to so direct, I, Mangesh Shinde, Dy. Commissioner of Police, Traffic, Western Suburban, Mumbai, in exercise of the powers conferred upon me under section 115 of Motor Vehicles Act-1988 (Act No. 59 of 1988), read with Government of Maharashtra Notification No. M. V. A. 0589/ C.R-1061/TRA-2, dated 19th May 1990, do hereby issue the following order as under.

Not. No. 11/D.C.P/West/Sub/Trf./Perm./Not./2022, Date 17th January 2023

NO PARKING

In the Jurisdiction of Samtanagar Traffic Division at Suryakiran Multispeciality Hospital, Surya Kiran Co. op. Hsg. Society, Kandivali East, Mumbai for better traffic regulation and decrease traffic congestion, there will be in the Hospital premises of 100 meter from the gate for all types of vehicles declare Permanent No Parking.

Issued under my seal and signature on the 17th day of January, 2023.

MANGESH SHINDE,

Dy. Commissioner of Police

Traffic, Western Suburban,

Mumbai.

७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ६-१२, २०२३/चैत्र १६-२२, शके १९४५

पोलीस उप आयुक्त (वाहतूक), पश्चिम उपनगरे, मुंबई यांजकडून

कायमस्वरूपी अधिसूचना/आदेश

क्रमांक १६६/पोउआ/प.उ./वा./कायम./अधि./वाहतूक/२०२३.----- वाहतुकीच्या दृष्टीने तसेच वाहतुकीस होणारा अडथळा त्यासाठी तसा निर्देश देण्याकरीता खालीलप्रमाणे वाहतुकीचे निबर्ंध देण्याकरीता मी, मंगेश शिंदे, पोलीस उप आयुक्त, वाहतूक, पश्चिम उपनगरें, मुंबई मोटार वाहन अधिनियम, १९८८ चे कलम ११५ (१९८८ चा अधिनियम ५९) व शासकीय अधिसूचना क्रमांक एम.व्ही.ए. ०५८९/सी आर-१०६१/ टीआरए-२, दिनांक १९ मे १९९० यानुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून याद्वारे खालीलप्रमाणे आदेश देत आहे.

क्रमांक १८/पोउआ/वाहतूक/पश्चिम/उपनगरें/कायमस्वरूपी/अधि./२०२२, दिनांक २४ जानेवारी २०२३

प्रवेश बंदी

समतानगर वाहतूक विभागाअंतर्गत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व वाहतुकीचे सुलभ नियोजन व्हावे याकरीता पश्चिम दुतगती महामार्ग, उत्तर वाहिनी र्सव्िहस रोडने दहिसर वाहतूक विभाग हद्दीतून कांदिवली पूर्व येथील भोर जंक्शनकडे विरुद्ध दिशेने येणाया सर्व प्रकारच्या वाहनांना कायमस्वरुपी प्रवेश बंदी (NO ENTRY) करण्यात येत आहे.

सदर आदेश माझ्या सही शिक्यानिशी दिनांक २४ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

मंगेश शिंदे, पोलीस उप आयुक्त (वाहतूक), पश्चिम उपनगरे, मुंबई.

भाग एक (को.वि.पु.)-----२अ८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ६-१२, २०२३/चैत्र १६-२२, शके १९४५

OFFICE OF THE DY. COMMISSIONER OF POLICE, TRAFFIC, WESTERN SUBURBAN,

MUMBAI

PERMANENT NOTIFICATION / ORDER

No. 166 /TCB/DCP/Trf/West/Sub./2023.—In order to prevent danger, obtruction and inconvenience to the public, to so direct, I, Mangesh Shinde, Dy. Commissioner of Police, Traffic, Western Suburbans, Mumbai, in exercise of the powers conferred upon me under section 115 of Motor Vehicles Act, 1988 (Act No.59 of 1988), read with Government of Maharashtra Notification No. M. V. A.0589/ C.R-1061/TRA-2, dated 19th May 1990, do hereby issue the following order as under.

Not. No. 18/D.C.P/West/Sub/Trf./Perm./Not./2022, Date 24th January 2023

NO ENTRY

In the Jurisdiction of Samtanagar Traffic Division for better traffic regulation and decrease traffic congestion, all types of vehicles coming across from jurisdiction of Dahisar Traffic Division, Western Express Highway North bound service Road to Bhor Junction, Kandivali East are Permanently banned.

Issued under my seal and signature on the 24th day of January, 2023.

MANGESH SHINDE,

Dy. Commissioner of Police

Traffic, Western Suburban,

Mumbai.

९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ६-१२, २०२३/चैत्र १६-२२, शके १९४५

जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, ठाणे यांजकडून

वाचा.---- (१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्र./आस्थापना-१०९३/प्र.क्र.१९/ल-१, दि. १८ ऑगस्ट १९९४.

(२) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म. राज्य) पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस. व्हि. एस.

आर.४३२०/स.४/९४, दिनांक २२ सप्टेंबर १९९४.

(३) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९.

(४) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख, (म. राज्य) पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण/ ड्रोन सव्र्हे/प्र.क्र.३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१.

(५) उप अधीक्षक, भूमि अभिलेख, भिवंडी यांचेकडील पत्र क्र./न.भूमा/गावठाण ड्रोन/एलकुंदे/परि.प्रस्ताव/२०२३, दिनांक १८ जानेवारी २०२३.

अधिसूचना

क्रमांक शि.दा./गावठाण/अधिसूचना/मौजे एलकुंदे/२०२३/२०४.---- महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्र./आस्थापना- १०९३/प्र.क्र.१९/ल-१ दिनांक १८ ऑगस्ट १९९४ अन्वये भूमी अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्या अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म. राज्य) पुणे यांचेकडील अधिसूचना क्र./एस.व्ही.सी.आर./४३२३/स-४/ ९४, दिनांक २२ सप्टेंबर १९९४ अन्वये कोकण विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात जमाबंदी प्रकल्प राबविण्यात मान्यता दिली आहे. त्यानुसार गावठाण झालेल्या गावांचे परिरक्षणसाठी घेण्याचे अधिसूचना मंजुरीचे अधिकार मा. जमाबंदी आयु आणि संचालक भूमि अभिलेख (म.राज्य) पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण/ड्रोन सव्र्हे/प्र.क्र.३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१ अन्वये जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख यांना देण्यात आलेले आहेत.

उप अधीक्षक, भूमि अभिलेख, भिवंडी यांनी त्यांचेकडील दिनांक १८ जानेवारी २०२३ चे प्रस्तावामध्ये त्यांचे अधिनस्त परिरक्षण भूमापक भिवंडी १ यांचेकडे मौजे एलकुंदे गाव नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्तावित केले आहे.

त्यानुसार शर्तीस अधीन राहून स्वामित्व योजना अंतर्गत ड्रोनद्वारे गावठाण भूमापण झालेल्या मौजे-एलकुंदे, ता. भिवंडी, जि. ठाणे या गावाचे गावठाण भूमापनाचे काम पूर्ण झाल्यामुळे उप अधीक्षक, भूमि अभिलेख, भिवंडी यांचे आधिनस्त परिरक्षण भूमापक भिवंडी १ यांचेकडे मौजे एलकुंदे हे गाव नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन परिरक्षणास घेणेस एतद्वारे मंजुरी देणेत येत आहे.

सदर गावाची सनद फी र.रु. १५९६९ मात्र ची त्वरित वसुली करण्यात यावी. सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक जानेवारी २०२३ पासून होणेची आहे.

१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ६-१२, २०२३/चैत्र १६-२२, शके १९४५

परिशिष्ट ब

नगर भूमापन योजनेअंतर्गत नव्याने परिरक्षणासाठी घेण्यात येणाया गावांचा/मिळकतींचा तपशील

अ. क्र. जिल्हा तालुका कार्यालयाचे नाव सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध (पुनर्रचनेपूर्वी) परिरक्षण नव्याने घ्यावयाचे गाव पुनर्रचनेनंतरची स्थिती शेरा
सजा गावे मिळकती गाव मिळकती सजा गावे मिळकती
१. ठाणे भिवंडी उ.अ.भू.अ. भिवंडी परिरक्षण भूमापक भिवंडी १ भिवंडी ६०५७ एलकु दे ं ९९ परिरक्षण भूमापक भिवंडी १ भिवंडी एलकु दे ं ६०५७ ९९
एकूण ६०५७ ९९ ६१५६

ठाणे, दिनांक २० जानेवारी २०२३.

बाबासाहेब रेडेकर, जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, ठाणे.

११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ६-१२, २०२३/चैत्र १६-२२, शके १९४५

जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, सिंधुदुर्ग यांजकडून

मध्यंतरीय आदेश

क्रमांक जिदुविअ/सिंधु/क-१/मध्यंतरीय आदेश/श्रमजीवी रापण संस्था/२०२३/१३५.---- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४चे कलम १०२(१)(क) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, कृ. रा. धुळप, सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) सिंधुदुर्ग, मध्यंतरीय आदेस देत आहे की, श्रमजिवी रापण मच्छिमारी उत्पादक औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित, मालवण, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग नोंदणी क्रमांक एसडीजी/एमएलएन/आरएसआर/एसआर/३१८/सन १०, दिनांक ३१ जुलै २०१० या संस्थेचा कारभार बंद करण्यात यावा आणि त्याच अधिकारातील कलम १०३(१) अन्वये सहकारी अधिकारी श्रेणी-२, अधीन जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी, सिंधुदुर्ग यांना संस्थेचे ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून नेमण्यात येत आहे.

संस्थेच्या अधिकायांनी ज्या मालमत्तेवर व दावा योग्य हक्कांवर संस्थेचा अधिकार असेल किंवा आहे ती मालमत्ता, वस्तू किंवा दावा तसेच संस्थेच्या संबंधातील संस्थेचे सर्व दप्तर कागदपत्र व इतर दस्तऐवज यांचा ताबा व नियंत्रण यांची व्यवस्था उपर्िनदिष्ट ऋणपरिशोधक/अवसायक यांच्या स्वाधीन करावी.

हा आदेश माझ्या सही व शिक्क्यानिशी आज दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ रोजी दिला आहे.

कृ. रा. धुळप, सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), सिंधुदुर्ग.

जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, सिंधुदुर्ग यांजकडून

मध्यंतरीय आदेश

क्रमांक जिदुविअ/सिंधु/क-१/मध्यंतरीय आदेश/गंगेश्वर दुग्ध/२०२३/१३६.---- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४चे कलम १०२(१)(क) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, कृ. रा. धुळप, सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) सिंधुदुर्ग, मध्यंतरीय आदेश देत आहे की, गांगेश्वर दुग्ध व्यवसायीक सहकारी संस्था मर्यादित, लोरे, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग नोंदणी क्रमांक एसडीजी/केकेआय/अेजीआर/(ओ)/३२०/९४, दिनांक १९ जानेवारी १९९४ या संस्थेचा व्यवहार/कामकाज गुंडाळुन संस्था अवसायनात घेण्यात येत आहे. आणि त्याच अधिकारातील कलम १०३(१) अन्वये सहकारी अधिकारी श्रेणी-२, अधीन जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी, सिंधुदुर्ग यांना संस्थेचे ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून नेमण्यात येत आहे.

संस्थेच्या अधिकायांनी ज्या मालमत्तेवर व दावा योग्य हक्कांवर संस्थेचा अधिकार असेल किंवा आहे ती मालमत्ता, वस्तू किंवा दावा तसेच संस्थेच्या संबंधातील संस्थेचे सर्व दप्तर कागदपत्र व इतर दस्तऐवज यांचा ताबा व नियंत्रण यांची व्यवस्था उपर्िनदिष्ट ऋणपरिशोधक/अवसायक यांच्या स्वाधीन करावी.

हा आदेश माझ्या सही व शिक्क्यानिशी आज दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ रोजी दिला आहे.

कृ. रा. धुळप, सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), सिंधुदुर्ग.

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ६-१२, २०२३/चैत्र १६-२२, शके १९४५

जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, सिंधुदुर्ग यांजकडून

अंतिम आदेश

वाचले------(१) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ व १०३.

(२) या कार्यालयाचे जा. क्र. जिदुविअ/सिंधु/क-१/मध्यंतरीय आदेश/सिंको कुक्कट संस्था/२०२२/७८६, दिनांक ३० डिसेंबर २०२२.

क्रमांक जिदुविअ/सिंधु/क-१/सिंको कुक्कूट संस्था/अवसायन/अंतिम आदेश/२०२३/१३७.---- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२(१)(क) व १०३(१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, कृ. रा. धुळप, सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) सिंधुदुर्ग, सिंको कुक्कुट पालन सहकारी संस्था मर्यादित, दाभोली पंचक्रोशी, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग नोंदणी क्रमांक एसडीजी/व्हीएलए/ अेजीआर/ओ/३०४, दिनांक ३१ जानेवारी २००० या संस्थेचा कारभार बंद असल्याने या कार्यालयाचे जा. क्र. जिदुविअ/सिंधु/क-१/मध्यंतरीय आदेश/सिंको कुक्कुट संस्था/२०२२/७८६, दिनांक ३० डिसेंबर २०२२ रोजीचे मध्यंतरीय आदेशामध्ये नमूद केल्याप्रमाणे, अवसायक पदी सहकारी अधिकारी श्रेणी-२, अधीन जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी, सिंधुदुर्ग यांची नेमणूक करण्यात येत असून सदरचे मध्यंतरीय आदेश कायम करीत आहे.

हा आदेश माझे सही व शिक्क्यानिशी आज दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ रोजी दिला आहे.

कृ. रा. धुळप, सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), सिंधुदुर्ग.

जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, सिंधुदुर्ग यांजकडून

अंतिम आदेश

वाचले------(१) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ व १०३.

(२) या कार्यालयाचे जा. क्र. जिदुविअ/सिंधु/क-१/मध्यंतरीय आदेश/श्री गवळदेव दुग्ध संस्था/२०२२/

७८६, दिनांक ३० डिसेंबर २०२२.

क्रमांक जिदुविअ/सिंधु/क-१/श्री गवळदेव दुग्ध संस्था/अवसायन/अंतिम आदेश/२०२३/१३८.---- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२(१)(क) व १०३(१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, कृ. रा. धुळप, सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) सिंधुदुर्ग, श्री गवळदेव सहकारी दुग्ध उत्पादक संस्था मर्यादित, भरणी-आगारवाडी, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग नोंदणी क्रमांक एसडीजी/ केडीएल/अेजीआर/ओ-४१७ /सन २०१४, दिनांक ४ मार्च २०१४ या संस्थेचा कारभार बंद असल्याने या कार्यालयाचे जा. क्र. जिदुविअ/सिंधु/ क-१/मध्यंतरीय आदेश/ श्री गवळदेव दुग्ध संस्था/२०२२/७८८, दिनांक ३० डिसेंबर २०२२ रोजीचे मध्यंतरीय आदेशामध्ये नमूद केल्याप्रमाणे, अवसायक पदी सहकारी अधिकारी श्रेणी-२, अधीन जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी, सिंधुदुर्ग यांची नेमणूक करण्यात येत असून सदरचे मध्यंतरीय आदेश कायम करीत आहे.

हा आदेश माझे सही व शिक्क्यानिशी आज दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ रोजी दिला आहे.

कृ. रा. धुळप, सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), सिंधुदुर्ग.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 06 April 2023. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2023-04-06.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2023-04-06.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.