Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग चार, असा., क्रमांक २२, सन २०२३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २१ शुक्रवार, २१ एप्रिल २०२३.

Published 21 April 2023

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-04-21.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, एप्रिल २१, २०२३/वैशाख १, शके १९४५ १ RNI No. MAHBIL /2009/35530

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष ९, अंक १५] शुक्रवार, एप्रिल २१, २०२३/वैशाख १, शके १९४५ [पृष्ठे २, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक २२

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

पृष्ठे १-२ सन २०२३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २१.--- महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश . . व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम, २०१५ यात आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम.. .

दिनांक २० एप्रिल २०२३ रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.

सतिश वाघोले, सचिव (विधि विधान), महाराष्ट्र शासन, विधि व न्याय विभाग.

सन २०२३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २१.

(माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर ""महाराष्ट्र शासन राजपत्रात"" दिनांक २१ एप्रिल २०२३ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)

महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन)

अधिनियम, २०१५ यात सुधारणा करण्यासाठी अधिनियम.

२०१५ चा महा. २८.

ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम, २०१५ यामध्ये सुधारणा करणे इष्ट आहे; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या चौयाहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :----

संक्षिप्त नाव. १. या अधिनियमास, महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) (सुधारणा) अधिनियम, २०२३, असे म्हणावे. (१) भाग चार-२२-१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, एप्रिल २१, २०२३/वैशाख १, शके १९४५ २. महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम, २०१५, याच्या कलम ११ मधील,-

२०१५ चा महा. २८.

सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २८ याच्या कलम ११ ची सुधारणा.

(१) पोट-कलम (३) मध्ये,-

(क) खंड (ग) व (घ) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येतील:-

सदस्य

" (ग) दहा वषार्ंहून कमी नसेल इतक्या कालावधीसाठी भारतीय सनदी लेखापाल संस्थेचे सदस्य असलेले असे दोन नामांकित सनदी लेखापाल

सदस्य;"

(घ) दहा वषार्ंहून कमी नसेल इतक्या कालावधीसाठी भारतीय व्यय आणि परिव्यय लेखा संस्थेचे सदस्य असलेले असे दोन नामांकित परिव्यय लेखापाल किंवा प्रख्यात अर्थतज्ञ

(ख) खंड (च) वगळण्यात येईल;

(ग) खंड (ज) नंतर पुढील खंड समाविष्ट करण्यात येतील:----

" (ज-१) आयुक्त, वैद्यकीय शिक्षण

सदस्य;

(ज-२) संचालक, आयुष, महाराष्ट्र राज्य

सदस्य" ;

(घ) खंड (त्र) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येईल :-

सदस्य सचिव." ;

" (त्र) सह सचिवाच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसेल असा राज्य

शासनाचा अधिकारी.

(२) पोट-कलम (४) नंतर, पुढील पोट-कलमे दाखल करण्यात येतील :-

"(४क) अध्यक्षास, महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही विद्यापीठाच्या कुलसचिवास, जेव्हा, त्या विद्यापीठाच्या व्यावसायिक पाठयक्रमाशी संबंधित शुल्क नियामक प्राधिकरणाचे कामकाज करावयाचे असेल तेव्हा, निमंत्रित सदस्य म्हणून निमंत्रित करता येईल.

(४ख) अध्यक्षास, उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, वैद्यकीय व आरोग्य विज्ञान, वास्तुशास्त्र, कृषी, आयुर्वेद, औषधवैद्यकशास्त्र, समचिकित्साशास्त्र (होमिओपॅथी), दंतवैद्यकशास्त्र, परिचर्या किंवा औषधनिर्माणशास्त्र शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही व्यक्तींना किंवा अधिकायांना देखील, त्यांचे तज्ञ मत घेण्यासाठी निमंत्रित करता येईल. अशा तज्ञ निमंत्रितांना शुल्क नियामक प्राधिकरणाच्या बैठकांच्या कामकाजामध्ये सहभागी होता येईल, परंतु त्यांना मतदानाचा हक्क असणार नाही." ;

(३) पोट-कलम (५) मधील, "सदस्य" या मजकुराऐवजी, "सदस्य किंवा तज्ञ" हा मजकूर दाखल करण्यात येईल.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 21 April 2023. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2023-04-21.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2023-04-21.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-.